लाईफ आफ्टर डेथ - जर्नी ऑफ सोल्स - भाग 2

Submitted by राधानिशा on 11 April, 2020 - 01:44

मायकल न्यूटन लिखित जर्नी ऑफ सोल्स या पुस्तकात वर्णन केलेले महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे -

13 - देहाच्या मृत्यूनंतर आत्मा स्पिरिट वर्ल्ड मध्ये पोहोचतो . तिथे त्याला पूर्वस्मृती प्राप्त होईपर्यंत कम्फर्टेबल वाटावं , वेलकम्ड वाटावं म्हणून त्या जन्मातील किंवा आधीच्या जन्मांतील काही प्रिय व्यक्तींचे आत्मे प्रवेशद्वारावर भेटायला येतात ...

14 - स्पिरिट वर्ल्ड मध्ये पोहोचल्यावर काही वेळ स्थिरस्थावर झाल्यावर , पूर्वस्मृती जागृत झाल्यानंतर आत्म्याचा गाईड आणि आत्म्यामध्ये संवाद - चर्चा होते .

नुकताच ज्या जन्मातून आत्मा परतून आलेला असतो - ते एक प्रोजेक्ट होतं .. त्या प्रोजेक्टचं सक्सेस किंवा अपयश , त्यातून प्राप्त झालेल्या गोष्टी , त्या व्यक्तीकडून झालेल्या चुका हे सगळं डिस्कस केलं जातं .

यामध्ये दोषी ठरवण्याचा कोणताही हेतू नसतो . क्षणभर असं समजा की आत्मा हा विद्यार्थी / एखाद्या स्पर्धेत भाग घेतलेला कंटेस्टंट आहे आणि त्याचा गाईड हा भरपूर पैसे देऊन नेमलेला पर्सनल ट्यूटर आहे , ट्यूटरला आपल्या शिष्याच्या जास्तीत जास्त प्रगतीपेक्षा अन्य काही महत्वाचं नाही .

पण हा ट्यूटर म्हणजे वकील नाही ... तो आत्म्याच्या चुकांवर पांघरूण घालत नाही ; शिक्षा होणार नाही यासाठी प्रयत्न करत नाही .

आत्मा आणि त्याचा गाईड यांमध्ये अतिशय जवळचे , जिव्हाळ्याचे संबंध असतात . आत्म्याला आपल्या गाईडविषयी अत्यंत विश्वास आणि आदर असतो . जसं एखादं लहान मूल आईपासून काही लपवत नाही आणि लपवू शकतही नाही तसं आपल्या गाईडपासून काहीही लपवणं अशक्य असतं .

मुळात स्पिरिट वर्ल्ड मध्ये खोटं बोलणं , एखादी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करणं , स्वतःच्या चुका जस्टीफाय करण्याचा प्रयत्न करणं हे होत नाही . आत्मा स्वरूपात आपण अतिशय प्रामाणिक असतो .

तेव्हा नुकत्याच संपवून आलेल्या जन्मातून काय शिकायला मिळालं ह्यावर चर्चा होते . आयुष्यातल्या घटना डिस्कस केल्या जातात ... अमुक एका घटनेत तू असा का वागलास ? असं वर्तन कसं घडू दिलंस ? असा तोल कसा जाऊ दिलास ? यापेक्षा वेगळं वागता आलं नसतं का ? या प्रसंगातून तू काय शिकलास ? अशी सखोल चर्चा केली जाते .

एखाद्या वेदनादायक घटनेतून आत्म्याला काय फायदा झाला हे गाईड निदर्शनास आणून देतो . उदाहरणार्थ - विश्वासघात सहन करावा लागल्यामुळे विश्वासघाताची वेदना काय असते हे समजलं , आता तो आत्मा पुढच्या जन्मांमध्ये कोणाचा विश्वासघात करण्याआधी 100 वेळा विचार करेल .

किंवा त्या आत्म्याच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे दुसऱ्या आत्म्याची कशी प्रगती झाली हेही गाईड निदर्शनास आणून देतो .

बरीच सखोल चर्चा होते .. अनेकविविध मुद्द्यांचा कीस पाडला जातो . म्हणजे एखाद्या कलाकाराच्या परफॉर्मन्स नंतर त्याचा कोरिओग्राफर त्याच्या चुका दाखवून देतो , चांगल्या गोष्टींची माफक स्तुती करतो आणि पुढचा परफॉर्मन्स अधिक चांगला कसा होईल याची दोघे मिळून चर्चा करतात तसंच काहीसं .

गाईड बरोबरची चर्चा झाल्यानंतर अधिक प्रगत अशा निवडक आत्म्यांचं पॅनेल असतं त्याच्यासमोर जावं लागतं .. अर्थात स्पिरिट वर्ल्ड मध्ये कसलीच सक्ती नसते , आत्मा नकारही देऊ शकतो ... पण इथे जजमेंट , अपराधी ठरवणे , रागाने / तिरस्काराने संबोधित करणे , शिक्षा देणे असे कोणतेच प्रकार नसतात ... इथे कोणीही कोणाला जज करत नाही . शिवाय आत्म्याचा मूळ हेतू हा स्वतःची प्रगती हा असतो , त्यासाठी हे पॅनेल मदतच करत असतं .. त्यामुळे सहसा कोणीही आत्मा याला नकार देत नाही .

या पॅनेल मधल्या आत्म्यांबरोबर लेटेस्ट संपवून आलेल्या जन्माबद्दल गाईडशी झाली साधारण त्याच प्रकारची चर्चा होते . व्यक्तीच्या हातून झालेल्या कृती , त्यामागच्या भावना , त्यामागचे हेतू सगळ्याबद्दल प्रश्नोत्तरं होतात ... काऊन्सिलिंगही केलं जातं . एक प्रकारचं कोर्टरूम ट्रायलच . फक्त शिक्षा नसलेली . त्या व्यक्तीच्या पुढच्या जन्मातील घटना डिझाईन करण्यासाठी ह्या चर्चेतून मिळालेल्या माहितीचा वापर केला जातो . पुढच्या जन्मात अधिक सावधगिरी बाळगणे , यावेळी झाल्या त्या चुका न होऊ देण्याची काळजी घेणे यासाठी आत्म्याचं समुपदेशन केलं जातं .
अर्थात पृथ्वीवर घडलेल्या वाईट कर्मांचा पश्चाताप झाला म्हणून ती माफ केली जातात असं नाही . त्यांचं फळ हे पुढच्या जन्मातील कुठल्यातरी घटनेतून दिलं जातं . पण हे कर्मफल अशा रीतीने ठरवलं जातं की ती नुसतीच शिक्षा असणार नाही तर त्यातून त्या आत्म्याच्या प्रगतीला हातभारही लागेल . उदाहरणार्थ - एका जन्मात आर्थिक पिळवणूक करणारी व्यक्ती पुढच्या जन्मात पिळवणूक अनुभवेल आणि त्या दुःखाचा प्रत्यक्ष अनुभव घेईल ... साहजिकच पुढच्या जन्मात आर्थिक पिळवणूकीची संधी असूनही तशी इच्छाच तिच्या मनात निर्माण होणार नाही तर सहानुभूती असेल .

शिक्षेच्या भीतीने कुणीही आत्मा ही ट्रायल नाकारत नाही . मुळात पृथ्वीवरील वेदना यांची आत्म्याला भीतीच नसते कारण प्रत्येक वेदनेतून , त्रासातून काहीतरी शिकायला मिळून त्यांच्या प्रगतीला हातभार लागत असतो .

आत्म्याचा स्पिरिट वर्ल्ड मधला विश्रांतीचा काळ संपून नवीन जन्माची वेळ येते तेव्हा पुन्हा एकदा या पॅनेल सोबत एक मिटिंग होते .. पुन्हा सगळ्या सूचना नव्याने केल्या जातात .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग!

वाचून मनात आलं ते मांडते:

तुम्ही म्हणताय हे सर्व आत्म्यांच्या उन्नतीसाठी घडते. पण एक अजून शक्यता असू शकते का की हा सर्व एखाद्या जगडव्याळ प्रयोगाचा भाग आहे. प्रत्येक आत्म्याकडून त्याचं एक जीवन संपल्यावर डेटा गोळा केला जातो. अनुभव, भावना, विचार, क्षमता इ इ.

आत्मे पुन्हा पुन्हा वापरले जातात आणि मागच्या जन्मातील अनुभवांचा (डेटाचा) या नविन जन्मात कसा फायदा/तोटा होतो किंवा काय फरक पडतो हे नोंदवलं जातं. आपल्याला या प्रयोगाचं कारण, हेतू त्यामगचा तर्क माहीत नाही. कदाचित माहीत होणारही नाही. आपण (त्या प्रयोगकर्तीच्या दृष्टीनं) काळाच्या एका छोट्या तुकड्याचा भाग ठरतो त्यामुळे हा प्रचंड प्रयोग आपल्या आवाक्याबाहेरचा असेल. आपल्या मर्यादित जाणीव कक्षेच्या कित्येकपट बाहेरचा असेल.

प्रयोग आहे , हा छान दृष्टीकोन आहे .. पण डेटासाठी केलेला हे मला पटत नाही .. हा जो निर्माता आहे त्याला या प्रयोगाची असल्या डेटासाठी गरज नाही .. तो त्रिकालज्ञानी आहे , त्याच्यासाठी तिन्ही काळ सारखे आहेत ... कोणावर कोणत्या अनुभवाचा काय परिणाम होईल , त्याच्यात कसा बदल होईल हे त्याला आधीच माहीत आहे . त्याचदृष्टीने घटना पूर्वनिश्चित करणारी सिस्टीम त्याने बनवली आहे ... he already has all the data that can ever there be . एखादी व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत कशी वागेल याचे जर 10 पर्याय असतील तर कुठलाही पर्याय त्या सिस्टीम मध्ये आधीच नोट केलेला नव्हता , अनपेक्षित असेल असं वाटत नाही ...

शिवाय आत्मे हे कमोडिटी असं ऑब्जेक्ट नाहीत प्रयोगासाठी वापरलेले ... They are given incredible amount of free will and they are all very much loved . याच पुस्तकात असा एक विचार मांडला आहे की क्रिएटर हा परफेक्ट आहे ; त्याने असे इम्परफेक्ट जीव का निर्माण करावेत ? तो सुरुवातीलाच परफेक्ट आत्मे निर्माण करू शकला नसता का ? तर नक्कीच करू शकला असता .. पण imperfection कडून perfection साठी केला जाणारा प्रवास हा त्याचा हेतू आहे .

माझं असंही एक मत आहे की या पुस्तकात वर्णन केलेले सोल्स हे आत्म्याचं संपूर्णतः सत्य स्वरूप नाही , जरी त्यांना जन्मोजन्मीची , अगदी त्यांच्या निर्मितीपासूनची आठवण असली तरीही ... they are incomplete too .. They are spirits , not souls with their 100 % energy . कम्प्लिशन साठी जन्मामागून जन्म हा एकच मार्ग नाही .. क्रिएटर बरोबर युनिफिकेशन साठी जन्मामागून जन्म थोडी थोडी प्रगती करण्याऐवजी याच जन्मात मुक्ती प्राप्त करण्याची संधी दर जन्मात दिली जाते ... प्रत्येक जन्म ही त्यासाठीच दिलेली संधी असते ...

प्रयोग आहे , हा छान दृष्टीकोन आहे .. पण डेटासाठी केलेला हे मला पटत नाही .. हा जो निर्माता आहे त्याला या प्रयोगाची असल्या डेटासाठी गरज नाही .. तो त्रिकालज्ञानी आहे , त्याच्यासाठी तिन्ही काळ सारखे आहेत ... कोणावर कोणत्या अनुभवाचा काय परिणाम होईल , त्याच्यात कसा बदल होईल हे त्याला आधीच माहीत आहे . त्याचदृष्टीने घटना पूर्वनिश्चित करणारी सिस्टीम त्याने बनवली आहे ... he already has all the data that can ever there be . एखादी व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत कशी वागेल याचे जर 10 पर्याय असतील तर कुठलाही पर्याय त्या सिस्टीम मध्ये आधीच नोट केलेला नव्हता , अनपेक्षित असेल असं वाटत नाही ...

>> मी या पुस्तकाच्या अनुषंगाने तो विचार मांडलेला नाही. असाच एक वेगळा विचार मांडला आहे. म्हणजे त्या पुस्तकात जी त्रिकालज्ञानी शक्ती आहे ती त्रिकालज्ञानी होण्याआधीची प्रोसेस अशी असू शकते.

मला एक प्रश्न आहे जर कोणी आत्महत्या करत असेल तर त्यांच्या आत्म्यांना काय केलं जातं... माझा प्रश्न बरोबर की चूक आहे ते ही सांगा एक शंका विचारतेय..

हे पुस्तक मला कितीही आवडलं असलं तरी ते कदाचित कल्पनाविलास असण्याची शक्यताही मी गृहीत धरते . त्यातल्या गोष्टी मी 100 % स्वीकारलेल्या नाहीत , फक्त असं असू शकेल किंवा नसेलही एवढंच स्वतःशी म्हणते ...

त्यामुळे नवीन जन्माबाबत पूर्णतः निवडस्वातंत्र्य , पुन्हा जन्माची सक्ती नाही इत्यादी गोष्टी अत्यंत मोहक वाटत असल्या तरी कुठल्यातरी एका अनोळखी लेखकाने लिहिलेल्या पुस्तकावर पूर्ण विश्वास ठेवून जीवनमरणाचे निर्णय घेणं म्हणजे नुकत्याच भेटलेल्या अनोळखी माणसाच्या गोड बोलण्याला भुलून डोळे मिटून कड्यावरून उडी मारण्यासारखं होईल ... तो भले सांगत असेल , खाली मऊ मऊ गादी उशा आहे , खरचटणार सुद्धा नाही .. जोवर माझ्या डोळ्याने ते पाहत नाही तोवर त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार... बरं एकदा उडी मारल्यावर तो खोटं बोलत होता समजूनही उपयोग नाही ... तेव्हा लाईफ आफ्टर डेथ , पारलौकिक अनुभव टाईपच्या कुठल्याही पुस्तकांवर एका मर्यादेपलीकडे विश्वास ठेवण्यात अर्थ नाही ... त्यात सुचवलेल्या साधना , प्रॅक्टीस , मेडिटेशन , प्रार्थना जे जे पॉजिटिव्ह आहे ते जरूर ट्राय करावं .... अमुक जण सांगत असेल ध्यानाचे हे फायदे आहेत , या पद्धतीने ध्यान करा ; आपल्याला बरं वाटलं तर जरूर त्या मार्गाला जावं ... त्यात काही नुकसान नाही .

पण एखादा सांगत असेल , आत्महत्येला काहीही शिक्षा नाही उलट नवीन जन्म घ्यायचा की नाही याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला मिळतं तर ती वाचून सोडून देण्याच्या योग्यतेची गोष्ट आहे कारण पुस्तक लिहिणारा बॉण्ड पेपर वर गॅरंटी घेणार नसतो तुमचं पुढे काय होईल याची ....

जेव्हा जगणं संपूर्णतः अशक्य होईल तेव्हा आणखी सहन करण्याची 1 % ही क्षमता नाही म्हणून केलेली आत्महत्या वेगळी आणि कुठल्यातरी ऐऱ्यागैरया स्वयंघोषित तज्ज्ञाच्या पैसे कमावण्याच्या हेतूने लिहिलेल्या पुस्तकावर आंधळा विश्वास ठेवून केलेली आत्महत्या वेगळी ... अनोळखी माणसाला तुम्ही 10 , 000 रुपये उसने सुद्धा देणार नाही , अनोळखी माणसाच्या सांगण्याच्या भरवशावर लाखमोलाच्या आयुष्याचा जुगार खेळणं ही फार मोठी चूक होईल .

निदान या पुस्तकानुसार -

आत्महत्या हा गुन्हा मानला जात नाही , त्याला नरकवास टाईप काहीही शिक्षा नाही . पण

प्रत्येक जन्म , त्यातील घटना ह्या अतिशय तज्ज्ञ आत्म्यांनी त्या व्यक्तीची विशिष्ट प्रगती व्हावी अशा रीतीने डिझाईन केलेला असतो . आयुष्यातल्या एखाद्या घटनेला व्यक्ती कशी सामोरी जाते यासाठी अनेक पर्याय दिले जातात व निवडीची संधी दिली जाते ... योग्य पर्यायाची निवड केली तर व्यक्तीची प्रगती होते , चुकीची निवड केली तर प्रगती खुंटते आणि अतिशय वाईट पर्यायाची निवड केली तर अधोगती होते ...

प्रगती व्हावी म्हणून आत्मा वारंवार या भयंकर ग्रहावर जन्म घेत असतो ... आत्महत्या म्हणजे एक संधी फुकट घालवणं ..

म्हणजे पहा हं , तुम्ही एका स्पर्धेत भाग घेतलाय , 6 महिने प्रचंड मेहनत घेतलीय .. पहिल्या राऊंडमध्ये थर्ड आला , सेकंड राऊंड मध्ये सेकंड आलात ....इतकी मेहनत घेतली त्याचं चीज होतंय ; तुमचा आनंद गगनात मावत नाहीये आणि लास्ट राऊंड मध्ये क्षुल्लक कारणामुळे तुम्ही हटून बसता , पुरे झालं ; मला पुढे खेळायचंच नाही ... आणि स्पर्धेतून बाहेर पडता .. नंतर भरपूर पश्चाताप होतो की जरा धीराने घ्यायला हवं होतं , 6 महिन्याची सगळी मेहनत पाण्यात घालवली .... अर्थात तुम्ही इतके चिवट आणि जिद्दी असता की परत पहिल्यापासून मेहनतीला सुरुवात करता , की अजून वर्ष का लागेना ; मी दुप्पट मेहनत घेईन पण मी जिंकणारच ...

ज्या गोष्टी व्यक्तीला इथे असह्य होतात त्या आत्म्याच्या दृष्टीने क्षुल्लक असतात त्यामुळे आणखी वेदना नको म्हणून घाबरून आत्मा नवीन जन्माला नकार देत नाही .

आत्महत्या करून स्पिरीट वर्ल्ड मध्ये परत आलेल्या व्यक्तीवर कुणीही रागावत नाही , कोणतीही शिक्षा नसते ... काहीतरी शिकण्यासाठी , फक्त 2 महिन्यासाठी घरापासून लांब हॉस्टेलमध्ये राहणं जमेना म्हणून परस्पर घरी पळून आलेल्या मुलाला समजूतदार आईवडील जितके समजावून घेतील तितक्याच प्रेमाने अशा आत्म्याचं कौन्सिलिंग केलं जातं ... आणि मुलगाही आपल्या वेडेपणावर जीभ चावून , माफी मागून , 4 दिवस घरच्या पाहुणचाराचा आस्वाद घेऊन परत जायला सज्ज होतो ... परत नवा जन्म घेऊन सुरुवात करावी लागते ...

रागाच्या भरात , दुसऱ्याला वेदना देण्याच्या इच्छेने आत्महत्या केली असेल तर पुढच्या जन्मात प्रिय व्यक्तीच्या आत्महत्येचं दुःख अनुभवावं लागू शकतं ...

विज्ञानाच्या आभासातील छद्मविज्ञान! – डॊ हमीद दाभोलकर
आत्मा , पुनर्जन्म ह्या संकल्पना शास्त्रीय शोध घेत असल्याच्या ह्या पुस्तकातील दाव्याचा ह्या मध्ये प्रतीवाद आहे....
पहिल्या भागात तुम्ही लिहिले आहेच की अशा प्रतिक्रिया पण असू शकतात

भारतीय ग्रंथांप्रमाणे आत्महत्या हा एक मोठा गुन्हा आहे. आत्महत्या केलेली व्यक्ती जीवनाच्या शेवटी अत्यंत विषण्ण मनस्थितीमध्ये असते आणि गीतेत म्हणल्याप्रमाणे अन्ते मती: गती म्हणजे शेवटच्या क्षणी जसे विचार/बुद्धी असते त्याप्रमाणे पुढचा जन्म किंवा पुढची योनी प्राप्त होते. आपल्याकडे जडभरताची कथा प्रसिद्ध आहे ज्यामध्ये एका जन्मात प्रचंड साधना करून देखील शेवटच्या क्षणी हरिणाच्या मोहात पडला आणि पुढचा जन्म त्याला हरिनाचा मिळाला. पुढे हरिनाचा देह पडल्यावर पूर्वपुण्याईने त्याला पुन्हा मनुष्यदेह प्राप्त झाला आणि त्या जन्मात त्याने प्रयत्नपूर्वक सर्व प्रकारचा मोह टाळून मोक्ष प्राप्त केला.
आत्महत्या केलेल्या व्यक्ती प्रेत योनी मध्ये जन्मतात असे मानले जाते. हिंदू धर्मात मृत्यूनंतर घरामध्ये गरुडपुराण वाचले जाते ज्यात परलोक मृत्यूनंतरही गती, कोणत्या प्रकारच्या कर्मांना कोणती शिक्षा मिळते याचे सविस्तर वर्णन आहे. सहसा हे पुराण मृत्यूनंतर वाचले जाण्याची प्रथा आहे त्यामुळे कोणाला वाचावे वाटल्यास योग्य अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेऊन वाचावे.