Submitted by सुप्रिया जाधव. on 3 April, 2020 - 14:09
पुरुषांमध्ये बाप शोधला चुकले माझे
पुरुषांमधला पुरुष जागला चुकले माझे
सूर्यास्ताला मानत आले नवीन आशा
अर्थ काढला फक्त चांगला चुकले माझे
लाट उसळली, लाट लोपली... स्तब्ध किनारा !
आवेगाने काठ गाठला चुकले माझे
फार लाघवी होत्या काही फार निरागस
मी इच्छांचा गळा घोटला चुकले माझे
स्त्री असण्याचे माजवले नाही अवडंबर
कुणीच नाही कधी विसरला चुकले माझे
तेच तेच ते लिहिले जाते मान्य मला पण
दुसरे नाही अनुभवायला चुकले माझे
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फार लाघवी होत्या काही फार
फार लाघवी होत्या काही फार निरागस
मी इच्छांचा गळा घोटला चुकले माझे
तेच तेच ते लिहिले जाते मान्य मला पण
दुसरे नाही अनुभवायला चुकले माझे
आवडले
नॉट बेस्ट, बट वन ऑफ द बेस्ट!!
नॉट बेस्ट, बट वन ऑफ द बेस्ट!!!
जोशी साहेब आणि अज्ञातवासी खूप
जोशी साहेब आणि अज्ञातवासी खूप खूप आभार
Khup Chan.... Agdich relate
Khup Chan.... Agdich relate zali