वजन कसे कमी करावे?

Submitted by आकाशगंगा on 10 April, 2020 - 08:56

गेल्या 7 -8 महिन्यांपासून migraine आणि depression च्या treatment मुळे माझं वजन खूप वाढलंय. कसं कमी करावं ते कळतं नाहीये. मधे दीक्षित डाएट बद्दल ऐकलं होतं. इथे कोणाला अनुभव आहे का त्याचा? त्याने वजन होत का नक्की कमी? Please कोणाला माहीत असेल तर नक्की share करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या जवळच्या नातेवाईकाला दीक्षित डाएट चा फायदा झाला आहे. मधुमेह बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे आणि वजन पण कमी झाले आहे. एकूणच आरोग्याच्या तक्रारीसुद्धा कमी झाल्या आहेत. नातेवाईकांच्या ओळखीतून कळले आहे काही जणांना याचा फायदा झाला आहे. परंतु आरोग्याच्या इतर तक्रारींसाठी तुमची एक ट्रीटमेंट सुरु आहे त्यामुळे हे डाएट करायचे असल्यास तुम्ही डॉक्टरांना एकदा विचारून पहा. दीक्षित डॉक्टरांच्या कार्यात हातभार लावणारे आणि दीक्षित डाएट फॉलो करण्याऱ्या अनेक पेशंटची मोफत तपासणी करणारे काही डॉक्टर्स आहेत, त्यांचे व्हाट्सअप ग्रुप पण आहेत. त्यापैकी एका डॉक्टरांशी बोलून मग निर्णय घेऊ शकता.

Depressionmule बऱ्याच जणांना खा खा सुटते.specially godakade kal वाढतो.तसेच अँटी डीप्रे संट गोळ्यांमुळे वजन वाढू शकते.
अर्थात डॉक्टरांशी बोलून खात्री करा.दीक्षित डाएट ने नक्की वजन कमी होते.पण तेही करायचे असल्यास सगळ्या तपासण्या डॉक्टर सांगतील तशा करा.त्या आता च्या परिस्थितीत शक्य नाही.तेव्हा गोड खात असल्यास टाळा.किंवा कमी पोर्शन घ्या.
मुख्य रोज व्यायाम करा.

आरोग्यं धनसंपदा ग्रुपमध्ये इंटरमिटंट फास्टिंग , दीक्षित डाएट , डाएट + व्यायाम याबद्दल काही धागे आहेत. ते वाचा.
व्यायाम बघावा करून
https://www.maayboli.com/node/61222
माझे वजन कमी करण्याचे प्रयोग
https://www.maayboli.com/node/48355
इंटरमिटंट फास्टिंग
https://www.maayboli.com/node/60322
व जन कमी करताना
https://www.maayboli.com/node/60365
चला वजन कमी करूया
https://www.maayboli.com/node/50148

एक मिल कमी करा... माझा हा सिम्पल फॉर्मुला आहे... वजन वाढवायला एक एक्सट्रा मील - ऍड करायचा.. कमी करायला कमी करायचा... शेवटी कॅलोरी इन्टेक महत्वाचा...

Depressionmule बऱ्याच जणांना खा खा सुटते.specially godakade kal वाढतो.तसेच अँटी डीप्रे संट गोळ्यांमुळे वजन वाढू शकते.
अर्थात डॉक्टरांशी बोलून खात्री करा.दीक्षित डाएट ने नक्की वजन कमी होते.पण तेही करायचे असल्यास सगळ्या तपासण्या डॉक्टर सांगतील तशा करा.त्या आता च्या परिस्थितीत शक्य नाही.तेव्हा गोड खात असल्यास टाळा.किंवा कमी पोर्शन घ्या.
मुख्य रोज व्यायाम करा>>>>तशी खा खा मला treatment च्या सुरुवातीला सुटली होती. वजन वाढायच तेपण एक कारण आहे. आता गोड खाणं पुष्कळ कमी आहे.

एक मिल कमी करा... माझा हा सिम्पल फॉर्मुला आहे... वजन वाढवायला एक एक्सट्रा मील - ऍड करायचा.. कमी करायला कमी करायचा... शेवटी कॅलोरी इन्टेक महत्वाचा>>>तसं नाही करू शकतं. Migraine असल्यामुळे जेवण करावंच लागत नाही तर भयंकर डोकेदुखी होते. त्यामुळे तोपण उपाय बाद.

>>गेल्या 7 -8 महिन्यांपासून migraine आणि depression च्या treatment मुळे माझं वजन खूप वाढलंय. >>
डॉक्टरांशी बोलून औषधे बदलता येतील का हे बघा. ते शक्य नसेल तर त्यांच्याशीच बोलून आहार-विहारात काय बदल करणे योग्य ठरेल ते ठरवा. नियमित व्यायामाने डिप्रेशन आणि मायग्रेन या दोन्ही व्याधींमधे खूप फायदा होतो. मात्र औषधे सुरु आहेत तर तुमचा आहार ठरवताना, अन्न आणि औषधांची इंटरअ‍ॅक्शन लक्षात घेवून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आखणी करणे श्रेयस्कर. इतर वेळी योग्य वाटणारे एखादे फळ देखील औषधांचा प्रभाव कमी करणारे असू शकते.

@विंगार्डीअम लेविओसा
हे फोन नंबर विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या पुस्तकाच्या १५ व्या आवृत्तीमधे पान क्रमांक १४० वर दिलेले आहेत.

क्र्मांक नाव शहर व्हॉटस अ‍ॅप क्रमांक
1 श्री. अरूण नावगे , मुंबई 8999406017
2 डॉ. वेदा नलावडे , पुणे 9545529255
3 डॉ. संतोष ढुमणे , पुणे 9890886727
4 डॉ. संगिता पंडित , पुणे 9822022416
5 श्री. संदीप सोनवणे , नाशिक 9422256450
6 श्री. अमोल भागवत , मुंबई 9757399529
7 श्री. ए जी चौधरी , ठाणे 9821862424
8 डॉ. अंजली दीक्षित , औरंगाबाद 9423779765
9 श्री. बाळासाहेब कदम , फलटण 9422033382
10 सौ. शर्मिला इनामदार , ठाणे 9769695940
11 डॉ. विमल डोळे , लातूर 9850056648
12 डॉ. नंदनवनकर , नांदेड 9823121986
13 डॉ. हेमंत अडीकणे , नागपूर 9420515123
14 श्री. अतुल कुलकर्णी , सोलापूर 9423067399
15 डॉ. शिल्पा तोतला , औरंगाबाद 9823281391
16 डॉ. सुजाता लाहोटी , औरंगाबाद 9325205455
17 अनिता बाहेकर , औरंगाबाद 9422211854
18 डॉ. आशिष चव्हाण , आंबेगाव, पुणे 9975051000
19 डॉ. सौ. सीमा दहाड , औरंगाबाद 8888849809
20 डॉ. राजेश दाते , दौंड 9422224298
21 डॉ. निकोसे , अमरावती 9422912614
22 श्री. दीपक कुलकर्णी , पुणे 9850217641
23 मुक्ता गाडगीळ , पुणे 9822171517
24 डॉ. गौतम शाह , धुळे 9881278698
25 डॉ. श्रीराम गोसावी , पालघर 9028381578
26 डॉ. गजानन जत्ती , सोलापूर 8237005707
27 डॉ. सुभाष जोशी , बीड 8275387063
28 डॉ. जयश्री कालानी , परभणी 9422925227
29 डॉ. राजकुमार कालानी , परभणी 9422176227
30 श्री. राजू अकोलकर , नागपूर 9096399222
31 डॉ. अर्चना बिर्ला , जळगाव 9226219302
32 सौ. वर्षा मालखरे , औरंगाबाद 9850184084
33 मनोज गोविंदवार , जळगाव 8237513242
34 डॉ. ए एन मस्के , सोलापूर 7030884546
35 डॉ. शैलेश नागपूरे , वर्धा 9503509430
36 सौ. शिल्पा उनकुले , पुणे 8975469006
37 डॉ. सुधीर चौधरी , औरंगाबाद 9822874194
38 डॉ. शालीनी , ओतूर पुणे 9975721202
39 डॉ. शर्मीली सूर्यवंशी , नांदेड 9325565009
40 श्री. शिवशंकर स्वामी , औरंगाबाद 9422210371
41 श्री. साकेत देशपांडे , बंगळूरू 9886843808
42 प्रा. प्रदीप पाटील , औराद शहाजानी 7588876455
43 सौ. रचना मालपाणी , लातूर 9422110282
44 श्री. उल्हास सावजी , औरंगाबाद 9049711106
45 सौ. वैशाली तोष्णीवाल , नगर 9657607268
46 श्री. रवी जगन्नाथन , ठाणे 9819576176
47 सौ. रेखा मुंदडा , धुळे 9422706111
48 डॉ. मनिषा चौरे , शिरूर 9270152610
49 डॉ. संध्या दळे , चेन्नई 9790799599

तसेच लेखात दिलेल्या लिंकमधील व्हीडीओमधे सांगितल्याप्रमाणे

effortlessjag@gmail.com येथे मेल करा.
किवा
डॉ. दिक्षीतांचा फोन नं. ९९२२९९४७७७ आहे. या नंबरवर व्हॉट अ‍ॅपवर तुमचा प्रश्न विचारा.
किंवा
त्यांचा इमेल drjvdixit@gmail.com येथे कळवा.

सोर्सः https://www.misalpav.com/node/42935?page=1
पोस्ट: शाम भागवत

मिसळपाव वरील वर दिलेला धागा सुद्धा जरूर वाचा.

डॉक्टरांशी बोलून औषधे बदलता येतील का हे बघा. ते शक्य नसेल तर त्यांच्याशीच बोलून आहार-विहारात काय बदल करणे योग्य ठरेल ते ठरवा. नियमित व्यायामाने डिप्रेशन आणि मायग्रेन या दोन्ही व्याधींमधे खूप फायदा होतो. मात्र औषधे सुरु आहेत तर तुमचा आहार ठरवताना, अन्न आणि औषधांची इंटरअ‍ॅक्शन लक्षात घेवून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आखणी करणे श्रेयस्कर. इतर वेळी योग्य वाटणारे एखादे फळ देखील औषधांचा प्रभाव कमी करणारे असू शकते.>>>>औषधे बदलून सध्या काहीही फायदा होत नाहीये. दुखण्याच्या त्रासाची तीव्रता फक्त कमी जास्त होते. Treatment long term आहे. आहाराबद्दल बोलून बघितलेले पण त्यांचा सल्ला होता की बाहेरचे खाणे टाळा. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मग पोर्शन कमी करा ...>>>माझं जेवण कमी आहे. दोन पोळ्या, थोडा भात आणि कधी केलाच तर नाष्टा. वजन तरीही वाढतंय. कदाचित गोळ्यांमुळे असेल. Treatment बंदपन करता येत नाहीये.

Dar don -tin tasani lahan lahan meal kha mhanje divsachi 4 lahan meals, pan tyat poli aivaji jwari nachani chi lahan bhakri kiva mugache dhirde, koshimbiri fruits asa add kara, poli bhaji varan bhat aivaji one pot meals upyogi padtat, tari tumhi under medication aslyamule doctor chya Sallya shivay konta h diet athva changes karu naye asa watta

रात्रीच्या व सकाळच्या जेवणाच्या वेळेत किमान 15 तासांच अंतर ठेवा. पाणी, ग्रीन टी, पातळ ताक चालेल. येता जाता खाणे बंद करा. पोटाला तडस लागेपर्यंत जेऊ नका. झोप किमान आठ तासांची झालीच पाहिजे. झोप झाली नाही तर दिवसभर केलेल्या व्यायामाचा, डायटिंग चा काहीही उपयोग होत नाही. माझे 10 किलो कमी झाले.

मी काही डॉक्टर नाही, पण डॉक्टर दीक्षित प्लॅन छा नक्की फरक दिसतो, माझ्या मुलाने अचानक मनात आणून यू तुबे व्हिडिओ मधील सूचना ऐकून केले फरक दिसला, पण मला मात्र वाटते फक्त आधी तुमच्या डॉक्टरांशी बोलूनच असे काहीं करा, माझे वजन acidity मुळे अचानक ५ ते ६ किलो कमी झाले होते पण ते वाढवण्याकर्ता मला अनेक महिने लागले कारण अचानक वजन कमी झाल्यावर सध्या सध्या गोष्टी जसे पाणी आणण्यासाठी उठणे, घरात दार्वुघडणे, ऑफिस मध्ये जागेवरून उठून दुसरीकडे जाणे कठीण होत होते, हा अनुभव आहे म्हणून खूप काळजी घेत प्रयत्न करा... कारण वजन कमी होऊन सुद्धा खूप त्रास होतो...

मायग्रेन अर्थात एका बाजूस डोके दुखणे यावर पूर्वी माझी अजजी एक उपाय करीत असे तो म्हणजे दुधाची मिठाई कलाकंद रात्री झोपेतून उठून २वड्या खाणे आणि लगेच तोंड वगैरे न धुता लगेच पुन्हा झोपणे म्हणजे मिठाई खाल्ल्यावर एक झोप व्हावी असे २ ते ३ दिवस केल्यावर बरे वाटत असे

मायग्रेन अर्थात एका बाजूस डोके दुखणे यावर पूर्वी माझी अजजी एक उपाय करीत असे तो म्हणजे दुधाची मिठाई कलाकंद रात्री झोपेतून उठून २वड्या खाणे आणि लगेच तोंड वगैरे न धुता लगेच पुन्हा झोपणे म्हणजे मिठाई खाल्ल्यावर एक झोप व्हावी असे २ ते ३ दिवस केल्यावर बरे वाटत असे

>> हो माझे आजोबा पेढे खायला सांगत असत. फरक नक्की पडतो.

मायग्रेन अर्थात एका बाजूस डोके दुखणे यावर पूर्वी माझी अजजी एक उपाय करीत असे तो म्हणजे दुधाची मिठाई कलाकंद रात्री झोपेतून उठून २वड्या खाणे आणि लगेच तोंड वगैरे न धुता लगेच पुन्हा झोपणे म्हणजे मिठाई खाल्ल्यावर एक झोप व्हावी असे २ ते ३ दिवस केल्यावर बरे वाटत असे>> माझ्या वडिलांनी पण सुरुवातीला मला असाच एक उपाय करायला लावलेला. पहाटे पहाटे अनशापोटी जिलेबी दह्यामध्ये बुडवून खायची. मी तेपण करून पाहिलेला पण फरक नाही पडला. मला stress migraine आहे. Stress वाढला की त्रास वाढतो. म्हणजे जेवढी treatment
केलेली आहे ती निष्फळ ठरते. Depression आणि anxiety मुळे अस होतं. सुरुवातीला migraine चे attacks पण यायचे.

Migraine he बरेचसे सायको सोमटिक आहे.
तुमच्या स्ट्रेसचे कारण शक्य झाल्यास शोधायचा प्रयत्न करा.कुठल्यातरी कामत स्वतला गुंतवून ठेवा.मायग्रेन टाळण्यासाठी airiated drinks, आंबवलेले पदार्थ,चॉकलेट्स टाळा.हे सारे मायग्रेन ट्रिगर स आहेत.
बेस्ट लक.

मन प्रसन्न असेल तर आपोआपच विनाकारण खाण्याची सतत इच्छा होत नाही असा माझा अनुभव आहे. परंतु असे क्रेव्हिंग्ज माझी मनस्थिती सुधारल्या नंतर साधारण महिनाभराने थांबली. आणि स्ट्रेस, डिप्रेशन किंवा अजून तसेच काही मधून बाहेर पडायचे असेल तर वर्तमान काळात राहणे हाच उत्तम उपाय आहे. खूपच त्रास होत असेल तर भूतकाळ गेला खडड्यात आणि भविष्याचे जेव्हाच तेव्हा बघू असा attitude ठेवणं गरजेचं. Happy

डॉक्टर कडे जा. मनाने काही करू नका. +११
व्यायाम आणि डाइट तर खुप सुचवता येतील पण काहीही करण्यापूर्वी आधी डॉक्टरसोबत सल्ला मसलत आवश्यक.

डाएट आणि त्याचे परिणाम हे व्यक्तिनुरुप वेगळे असतात. एखाद्याला दिसलेले चांगले परिणाम तुमच्या बाबतीत अगदी वेगळे असू शकतात. त्यामुळे स्वतःच्या प्रकृतीला जसे झेपेल त्या प्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार- विहारात बदल करा.
दुसरं म्हणजे डाएट चा हेतू नुसता वजन कमी करण्याचा असू नये तर स्टॅमिना वाढवण्याचा सुद्धा असावा.
डाएट करताना तुम्ही पहिल्यापासून कोणत्या प्रदेशात राहता तेथील खानपानाच्या सवयी, तुमच्या लहानपणापासुन खाण्याच्या सवयी आणि तुमची शरीर प्रकृति ई. गोष्टी विचारात घेऊन सध्या घेत असलेल्या जेवणात छोटे छोटे बदल करा आणि सुरुवात करा. त्यामुळे डाएट चा ताण येणार नाही. मग सवय झाली की हळूहळू साखर, चहा- कॉफी पूर्ण बंद करणे असे बदल करता येतील. डाएट बरोबर व्यायाम/ योग- प्राणायाम तुमच्या प्रकृतीनुसार अवश्य करा. वाटल्यास सुरुवातीला बाहेर ग्रुप मध्ये किंवा जिम मध्ये जाऊन सुरुवात करा.
एक मात्र लक्षात असू द्या, जर तुमचं वजन दोन वर्षांत वीस किलोंनी वाढलं असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्हाला चार वर्ष लागू शकतात. परंतु काहीही अशक्य नाही.

तुम्ही डाएटसोबतच व्यायामही सुरू करा. एरोबिक्स, स्ट्रेंग्थ ट्रेनिंग आणि स्ट्रेचिंग. योगासन, प्राणायाम.
हळू हळू करा आणि प्रमाण वाढवत न्या. व्यायाम करताना मन त्यावर एकाग्र करता येतं. सकारात्मकता वाढायलाही मदत होईल.

ध्यानही लावता आलं तर उत्तम. शरीरासोबत मनालाही व्यायाम.

तुम्ही डाएटसोबतच व्यायामही सुरू करा. एरोबिक्स, स्ट्रेंग्थ ट्रेनिंग आणि स्ट्रेचिंग. योगासन, प्राणायाम.
हळू हळू करा आणि प्रमाण वाढवत न्या. व्यायाम करताना मन त्यावर एकाग्र करता येतं. सकारात्मकता वाढायलाही मदत होईल.

ध्यानही लावता आलं तर उत्तम. शरीरासोबत मनालाही व्यायाम.>>> गेल्या काही दिवसांपासून प्राणायाम आणि ध्यान करतेय. त्याचे परिणामही चांगले दिसताय. खूप शांत वाटतंय आणि सकारात्मकपण. Antidepressants चे side effects फक्त शरीरावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही दिसतात. त्यासाठी प्राणायाम आणि ध्यान हे उत्तम औषध आहे हा माझा अनुभव आहे.

एकदम शरीराला कमी खाण्याची सवय लावू नका. Metabolism कमी झाला की थोडेसे जरी जादा खाल्ले की वजन वाढते>>>>मी जेवणात 2 चपात्या आणि थोडा भात घेते . अजून काय काय add करायला हवं आणि काय कमी करायला हव?

घरातील पौष्टीक आणि सात्विक जेवणाने वजन वाढत नाही हा स्वानुभव आहे
नवऱ्याला सुद्धा अनुभव आला आहे सध्याच्या आहारशैलीमुळे
मी सध्या सकाळी नाश्त्याला पोहा उपमा थालीपीठ कटलेट साबू खिचडी पकोडे आप्पे डोसे इडली ढोकळा असं काहीतरी करते,तेल सगळया जेवणातच खूप कमी वापरण्यकडे कल आहे
दोन्ही जेवणात चपाती भाजी(बऱ्याचदा पालेभाजी) वरण /कढी/आमटीआणि बऱ्याचदा दुपारी ताक,किंवा गुळ घालून पन्ह.
संध्याकाळच्या भुकेला खूपदा मोड आलेले कडधान्य थोडे तेल कांदा लसूण मिठावर फ्राय करून देते.
तळलेले ,गोड पदार्थ अगदी 1 2 वेळाच झाले संपूर्ण महिन्यात (6मार्च ते आजपर्यंत)
वजन वाढल्यासारख आजिबात वाटत नाहिये दोघांनाही,
संध्याकाळी आणि रात्री अर्धा तास गॅलरीत चालणं must केलं आहे आम्ही
आणि हो आम्ही बिलकुल कमी कमी खात नाही,पोटभर खातो

बिस्कीट न खाताही मी चहा पिऊ शकते हे शोध लागला आहे सध्याच

शक्य असल्यास एखाद्या चांगल्या आहारतज्ञाचा सल्ला घ्या. त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण कोणाला तरी आन्सरेबल आहोत म्हणून काटेकोरपणे डाएट केलं जातं. बऱ्याच वेळा आपण योग्य तेच खात असतो पण ते कधी, किती प्रमाणात खावं हे माहीत नसतं आणि इथेच आहारतज्ञाचा उपयोग होतो.

मी जेवणात 2 चपात्या आणि थोडा भात घेते . अजून काय काय add करायला हवं आणि काय कमी करायला हव? >> अर्धी चपाती कमी करून तिची जागा ताक, सलाड, कोशिंबीर, दही, फळे यांनी भरून काढू शकता. Dietician उत्तम सल्ला देइल यात शंका नाही.

त्यांना वजन कमी करायचं आहे>>बरोबर आहे
पण आता काही भलतेच प्रयोग करण्यापेक्षा किंवा भूक मारण्यापेक्षा मी त्यांना आहे तेवढेच वजन ठेण्यासाठी ते सगळं सांगितलं आहे म्हणजे निदान वजन वाढणार तरी नाही Happy

मला ब्रह्मविद्येच्या व्यायामाने खूप फायदा झाला. माय्ग्रेनसाठी. डिप्रेशन नव्हते. वजनही वाढले नव्हते. उलट आदर्शवत होते. ध्यान, प्राणायाम ह्याने फायदा झाल्याची उदाहरणे आहेत नात्यामध्ये. अर्थात फक्त माय्ग्रेनसाठी.

मला ब्रह्मविद्येच्या व्यायामाने खूप फायदा झाला. माय्ग्रेनसाठी. डिप्रेशन नव्हते. वजनही वाढले नव्हते. उलट आदर्शवत होते. ध्यान, प्राणायाम ह्याने फायदा झाल्याची उदाहरणे आहेत नात्यामध्ये. अर्थात फक्त माय्ग्रेनसाठी>>>ही ब्रह्मविद्या काय असते?

मुख्यत: श्वासोच्छ्वासास प्राधान्य दिले जाते. दीर्घ आणि खोल श्वास घेऊन तो विशिष्ट सेकंद कोंडून त्या अवधीत शरीराच्या सोप्या हालचाली करायच्या. शेवटी स्वयंसूचना आणि स्वकल्याण प्रार्थना असते. विकीवर त्यांची साइट आहे. त्यावर संस्थेबद्दल जुजबी माहिती आहे. व्यायामप्रकारांबद्दल नाही.

https://www.brahmavidya.net/#
ब्रह्मविद्येत श्वसनाचे व्यायाम शिकवतात. माझ्या आईच्या शेजारच्या काकी शिकल्यात आणि शिकवायलाही जातात.

डॉक्टरांनी डाएट करायला हरकत नाही असे सांगितले आहे तर डाएटिशियनचा सल्ला घ्या. तुमची व्याधी, सुरु असलेली औषधे हे सगळे लक्षात घेवून बॅलन्स्ड मिल प्लॅन सुचवेल अशीच व्यक्ती डायटेशियन म्हणून निवडा. अतिरेकी डाएट टाळा.
मला मायग्रेनसाठी दीर्घ श्वसन, लो इंपॅक्ट एरोबिक्स उपयोगी पडते. सुरवातीला आहारनोंद ठेवल्याने काही ट्रिगर्स कळले. ते पदार्थ कधीतरी आणि कमी प्रमाणात खाते. मात्र माझे मायग्रेन हे मुख्यतः हवामानातील बदलामुळे येते. थंडरस्टॉर्मची पूर्वसुचना असल्यासारखे मायग्रेन येते. काही वेळा तीव्रता आवाज, उजेड सहन होत नाही इतपत असते, इतरवेळी लक्षणे तीव्र नसतात, औषध न घेताही पेन मॅनेज करता येते, दैनंदिन व्यवहारात अडथळा येत नाही.

माझे मायग्रेन हे मुख्यतः हवामानातील बदलामुळे येते. थंडरस्टॉर्मची पूर्वसुचना असल्यासारखे मायग्रेन येते. काही वेळा तीव्रता आवाज, उजेड सहन होत नाही इतपत असते, इतरवेळी लक्षणे तीव्र नसतात, औषध न घेताही पेन मॅनेज करता येते, दैनंदिन व्यवहारात अडथळा येत नाही.>>> मला stress migraine आहे. थोडाजरी ताण आला , लगेच डोकेदुखी चालू होते. Triggers मीपण शोधलेत . प्रत्येकाचे triggers वेगळे असतात. माझं पोहे खाल्ल्यावर डोकं दुखत. सुरुवातीला migraine चे attacks पण यायचे मला. Sound आणि light sensitivity पण खूप जास्त होती. थोडा जरी जास्त आवाज आला तरी मी कानावर हात ठेवून मोठमोठ्याने रडायचे इतका त्रास व्हायचा आवजाचा. पण आत्ता पुष्कळ आटोक्यात आहे . पण sound sensitivity आहे अजून बऱ्यापैकी. आता त्रास फक्त depression मुळे होतोय. यातून बाहेर पडायचे तर ठरवलंय. बघू काय होतंय ते.