क्षमस्व

Submitted by शुभम् on 5 April, 2020 - 23:04

http://manatalepanavar.blogspot.com/?m=1

या ठिकाणी त्या चारही कथा आहेत .
वाचून पहा मग ठरवा शृंगारिक आहेत कि अश्लील आहेत की उत्तानरसाच्या कथा आहेत....

तुम्हाला त्या उत्तान वाटत असतील , तर त्या मी काढलेल्या आहेतच .

मी म्हटलं होतं शिव्या दिल्या तरी चालतील , सरळ बोलणं वेगळं नि नाव न घेता त्या तीन कथा आंबट आहेत व मायबोली अश्लील होत चालली आहे , यात फरक आहे . मायबोली अश्लील होत चालली आहे त्यांच्या या म्हणण्याला प्रतिक्रियांमध्ये बऱ्याच जणांनी दिलेला होकार मी पाहिला , त्यामुळे मला वाटलं मी चुकीच्या जागी कथा टाकलेली आहेत म्हणून मी त्या कथा काढून टाकल्या .

मला तरी माझी कथा अश्लील वाटत नव्हती , कारण उत्तेजित करणं हा कथेचा हेतु नव्हता . होय , ती कथा प्रोढांसाठी होती हे ही खरं .

मी बारीवीत असताना पहिल्यांदा मला मायबोली कळाली , नविन मोबाइल होता , वाचायला आवडायचं . त्यावेळी मधुराणी नावाची कथा वाचलेली आठवते . ती भयंकर आवडली होती . त्यानंतरही श्रुंगार नावाची देखिल..

या कथालेखकांची मला माहिती नाही पण कथा मात्र आवडल्या . त्याखाली लोकांनी प्रतिक्रिया पण दिल्या होत्या . त्याच्याशी माझी तुलना होउ शकत नाही हे मला माहित आहे , पण जराशं प्रोढ इथे टाकलं तर मोकळे प्रतिसाद भेटतील ,
मग ते काहीही असो ...

एक प्रतिसाद तसा आहे सुद्धा - फालतु / बकवास कथा आहे .
मी त्यांचे आभार मानलेत मनमोकळ्या प्रतिसादासाठी ..

मी लिहण्याच्या प्रयन्त करतोय . आतापर्यंत पाच सहा दिर्घकथा लिहिल्या आहेत . त्यातील सगळ्या मायबोलीवरती मी टाकलेल्या नाहीत . त्यांचा दर्जा सुमार आहे हे मला माहित्याय . माझी पहिली कथा जत्रा मी वाचायला घेतली तर मलाही वाचू वाटत नाही . वरचेवर काहीतरी फरक होतोय एवढं मात्र खरं ...

लिहण्याचा हेतू काय किंवा उद्देश काय हा वादाचा विषय आहे पण मनोरंजन हा माझा हेतु असतो . मनोरंजना बरोबर मग बाकी गोष्टी . मर्यादा ,व्यसन या दोनही कथा आजुबाजुला मी स्वतः पाहिलेल्या आहेत . मला मांडता आल्या नाहीत ही माझी कमतरता , पण ती दुर व्हावी म्हणुन तर लिहितो ना.

आंबट कथा आहेत का नाही हे ज्याचं त्याचं मत पण माझा हेतु त्या आंबट व्हाव्या हा नव्हता . आणि हो मी त्या विचार करुणच लिहिल्या होत्या .

बऱ्याच वेळा दोन पात्रामधील शारीरिक प्रसंग लिहिताना माझी पहिल्यापासुन तारांबळ उडते . मर्यादामध्ये तो बऱ्यापैकी जमला हे तरी मला कळालं...

आता कोणती किती श्रुंगारिक व किती उत्तान या बद्दल मतभेद होत राहतील व वाद वाढेलच .

जर कथा श्रुंगारिक वाटत असतील तल त्या काढलेल्या आहेतच .

आंबट शौकीन म्हटलं याचा राग म्हणुन मी कथा काढल्या नव्हत्या तर या अशा कथांमुळे मायबोली अश्लील होत चालली आहे असं म्हटलं गेलं म्हणुन कथा काढल्या .

मी कमेंट मध्ये वाचलं कि मायबोलीचं सरासरी वय चाळीस आहे , मग एका बावीस वर्षाच्या नवख्या लेखकाच्या अपरिपक्वतेला व पोरकटपणाला तुम्ही माफ करु शकालच....

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद...
खरं सांगितल्या बद्दल

पूर्ण वाचली... लेखनशैली चांगली आहे...
अशा बायका असतात आणि त्या स्त्री ने असे का केले याचे एका वाक्यात कारण देखील दिले आहे तुम्ही... तेच कारण असावे...थॊडा आणखी क्लोझर देता आला असता...
धाडसी कथा.. मायबोली वरील स्त्री आयडी कडून फटके खायची तयारी असू द्या...

धाडसी कथा...
+१११
मायबोली वरील स्त्री आयडी कडून फटके खायची तयारी असू द्या... Lol

------------

कथाबीज जुनंच असलं तरी अजुन नीट फुलवली असती तर अधिक परिणामकारक वाटली असती ही गोष्ट.

बकवास नाही वाटत.
पण थोडी भडक आणि Fast झालीय असं वाटतंय.

एक स्पष्ट सांगतो, राग मानला तरी चालेल.
तुम्ही मायबोलीवर लगोलग तीन कथा पोस्ट केल्या, तीनही कथांमध्ये लैंगिकता हा प्रमुख मुद्दा होता. दुसरी गोष्ट, या तिन्ही गोष्टी विचार करून न लिहिता घिसाडघाईने, काहीतरी लिहायचं, कुठलातरी राग कुठेतरी काढायचा अशा लिहिलेल्या वाटतात.
तिसरी गोष्ट, तद्दन अश्लील वाटेल, असं वर्णन सुद्धा तुम्ही केलंय, आणि ते तुम्ही करताय याची तुम्हाला स्पष्ट जाणीवही होती. त्यामुळेच तुम्ही वर डिस्क्लेमर टाकलेलं दिसतंय.
यापूढे जरा विचार करून लिहीत चला, आणि मगच पोस्ट करा.

hi

Katha chhan hotya. Shringar thoda naajuk padhatine fulwala asta tar koni hi aaxep ghetla nasata.
tumhi swata bolalat kharya pratikriya havya aahet mag tya milalyavr ragvayche ka?
tumhala je lihaych aahe te liha, jyanna vachaych asel te vachatil.
mala vatat aata mayboli var shringarik katha taktana (18+) lihit ja mhanje lokanna vachanya aadhi te kalel aani kunachi sakaal kharab honar nahi.

Khup naajuk vishay khup ughadpane hatalaych dhadas kelya baddal abhinandan. Fakt tyat titkach naajuk Pana asu dya mhanje tya ashlil vatnar nahit.
Eg., Oz hi katha hi thodi shringarik aahe pan sundar lihili aahe.

शुभम,
तुम्हीच म्हटलं होतं. शिव्या दिल्या तरी चालेल. आता लोकांनी त्यांना जसं वाटलं तसं खरं मत दिलंय; म्हणून तुम्हाला वाईट का वाटायला हवं.
मत विचारात घ्या आणि त्याप्रमाणे बदल करायचे किंवा नाही, हे ठरवा!

कसंय ना शुभम... कोणती गोष्ट मनावर घ्यायची आणि कोणती नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे. तुम्ही छान लिहिता..
तुमची प्रलय आणि अनंत प्रेमचक्र या कादंबऱ्या मस्त आहेत..
दोन तीन लोकांमुळे नाराज होऊन मायबोली ब्लॉक वगैरे गोष्टी करू नका...
त्या आयडी ने तुम्हाला आंबट शौकीन बोलून जनरलायझेशन केले कारण त्या आयडी ने तुमच्या बाकीच्या कथा वाचलेल्या दिसत नाहीत...तुमचा उल्लेख त्यांनी नवीन आयडी असा केला आहे... त्यांची चूक नसावी...

khar tar tumhi tumchya katha kadhun ek prakate tumchya swatachya lekhanicha apman Kela aahe. Aso. I think that at least you should keep some maturity and understand that not all people can have a broad prospective & enough maturity to handle such subjects.
They have their own set of rules and with their narrow mindset they assume that they are all doing it right & judge others.
Why u r bothering & insulting urslf?
if few people are against you let them be.
you are not alone, you hv us with u. we understand with what intentions u might hv written it.
so just chill & instead of restricting, let the writer in u free & write more.

remember our tukaram maharaja has said, "nindakachi ghare asavi shejari".
critics are also very important. If they correct you, take it positively. The more you learn the more you prosper.
so just thank them & move on....

धन्यवाद शुभम
आणि माफी सुध्दा मागते.
मुळात विषय फक्त तुमच्या कथांचा नव्हता, पण मला तरी मायबोली वर खूप जास्त प्रमाणात असं काही लिहलं गेल्याच वाचनात नाही. तुम्ही तुमच्या कथा पुन्हा तकल्यात हे महत्त्वाचं.

एक स्पष्ट सांगतो, राग मानला तरी चालेल.
तुम्ही मायबोलीवर लगोलग तीन कथा पोस्ट केल्या, तीनही कथांमध्ये लैंगिकता हा प्रमुख मुद्दा होता. दुसरी गोष्ट, या तिन्ही गोष्टी विचार करून न लिहिता घिसाडघाईने, काहीतरी लिहायचं, कुठलातरी राग कुठेतरी काढायचा अशा लिहिलेल्या वाटतात.
तिसरी गोष्ट, तद्दन अश्लील वाटेल, असं वर्णन सुद्धा तुम्ही केलंय, आणि ते तुम्ही करताय याची तुम्हाला स्पष्ट जाणीवही होती. त्यामुळेच तुम्ही वर डिस्क्लेमर टाकलेलं दिसतंय.
यापूढे जरा विचार करून लिहीत चला, आणि मगच पोस्ट करा.>>>>

फक्त माझं एकटीच हे मत होतं असं नाही..

हो. तुमच्या एकट्याचं मत नव्हतं , बऱ्याचजनाना त्या अति वाटल्या

त्यामुळेच काढल्या होत्या मी कथा . आणि प्रौढांसाठी असं लिहायला हवं होतं हे मला कळवुन दिलंय...

तुमची सकाळ व पुढचे दोन दिवस उगाच मनस्ताप झाला त्याबद्दल माफी ...

बाकी लोकांनीही चर्चेसाठी किबोर्ड झिजवला , तुम्हाला त्रास झाला त्याबद्दलही माफी ....

आणि इथुनपुढे असं टाकायचं असेल तर स्पष्टपणे प्रोढांसाठी असं लिहिन.....

mafi chi garaj navhati pan mothepana aavdla.
char hi katha ashlil "NAVHATYA", mana pasun aavdlya. pratyekachi vaicharik pragalbhata vegli aste tyamule sarv prakarchya pratikriya swaikarnya itak man moth asu dya & titki tayari hi theva.
pan punha ase katha kadhun takanyache prakar karu naka. tumchya sarv changlya - vait prasangat anekjan tumchya sobat aahet, tumhi EKATE nahi aahat he kayam laxat asu dya.
tumchya sahityik pravasala shubhhecha.
God bless you.
P. S. - tumchya navin likhanachya pratikshet.....

माझं मत आधीही तेच होतं, आणि त्यात काडीचाही बदल नाही. मोरल पोलिसिंग करायचा मलासुद्धा अधिकार नाही, पण शृंगारिक लेखन आणि सरळ सेक्सवर्णन हा संपूर्ण वेगळा प्रकार आहे असं वाटत. यात मी जव्हेरगंज यांचं उदाहरण देऊ शकतो. म्हसरावर ध्यान ठिवा ही कथा त्यांचीच, पण ती एक उदाहरण ठरू शकेल. त्यांचा कंटेंट परफेक्टली वाचकापर्यंत पोहोचतो, आणि तद्दन अश्लील वाटावं असंही होत नाही.
अनेक साईट, अनेक मासिके आहेत, आणि ते जिभल्या चाटत वाचणारे सुद्धा आहेत. पण त्यांचा एक स्पेशल विभाग आहे. युट्युब व्हिडीओ स्ट्रीमिंग साईट आहे, ओपन आहे, म्हणून कुणीही कथेच्या वेष्टनात लपेटलेलं पॉर्न दाखवत नाही. तसंच बाकीच्याही साईट्सचं.
आता कुणाचं स्पष्ट मत कुणाला आरोप वाटू शकतो. प्रत्येकाची डिग्री ऑफ सेन्सिटिविटी वेगळी असते, पण त्यानंतर नॉन आणि नेवर कॉन्ट्रीब्युटिंग आयडी लेखकाची बाजू घेऊन भांडतो, संतुलितपणाचा आव आणून लेखक किती बरोबर आणि आरोप करणारेच कसे लेखकाच्या लेखनस्वातंत्राची गळचेपी करतायेत असं भासवतो, तेव्हा म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावला ही म्हण प्रत्ययास येते.
आता, ही कथा आधी मायबोलीवर टाकणं, त्यावर स्पष्ट मत मागण, मग ते सहन न होऊन पुन्हा काढणं, मग पुन्हा त्यांची मायबोलीवर लिंक देणं, आणि पुन्हा स्वतःचच समर्थन करणं हा बालिश प्रकार जरूर वाटतो.

Adnyatvasi thanks,
ya "non & never contributing" id ni pahilyanda ch kelel contribution kadachit aavdlel disat nahi aahe.
Doesn't matter.
geli kityek varshe fakt "befikir" yanch sahitya vachanari mi fakt gelya EKA varshapasun dusarya lekhakanch sahitya vachat aahe.
khup vela anek kathanna pratisad dyavasa vatla pan ugach vadat padayla nko mhanun swatala aavaral.
yaveli shubham yanni Chari katha kadhun taklya mhanun vait vatal & tumchya madhye aale.
mi swata hi lekhika aahe, thodya far thikani, news papers, Facebook, blogs, masikan madhye thod far lihite. tyamule lekhan & lekhak samjun gheun to samjavun dyaycha prayatn karat hote.
shevti aapan sagle ekach pravasat aahot, vata veglya aslya tari antim shikhar ekch aahe.
sagle sukhani pohachu, kunala dukhavun nako itakch.
ho aata saglyanche vichar vegle aahet tyamule matbhed honarch. te savrun gheun pudhe jaych aahe.
thodi openness, broad mindset, free attitude conflict kami karte ya anubhava varun bolale.
Thank you.
God bless you all.

Thank you for your blessings queen, and I really appreciate your intentions to protect the interest of another writer. It was a very Noble intention.
I sincerely apologize for my words!!!
But let the writer defend himself, let the writer express his side. To defend someone with extra efforts and in that process to prove someone wrong at his every extent will create a sense of pseudo protectism, which is according to me, more harmful than being unprotected.
And if someone is asking genuine opinion, then he should be ready for harsh opinion too.
I really don't want to request you to read my writings here, but if you read before, I have written on homosexuality, love life and many things. So, I think I may posses some of the qualities you mentioned above.
But now, instead of making a fight for protecting interest of third party, I would like to request you to please publish some of your literature here.
I am desperately waiting to read that!!!!
Thank you again!!!

And if someone is asking genuine opinion, then he should be ready for harsh opinion too.

But let the writer defend himself, let the writer express his side.

डिफेंड करुन अजुन काय स्पष्टीकरण देणार होतो .
" कथेच्या वेष्टनात लपेटलेलं पॉर्न " असं तुमचं मत आहेच , ते बदलणार नाही आणि मी त्याचा आदर करतो .
तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाटेवर भरपुर दुकाने असतात , कोणी लगेच five star उघडु नाही शकत , सुरवात टफरीपासुनच होते .

मी खरी मतं म्हणुन कथा काढल्या नव्हत्या हे वरही सांगितले . मायबोली अश्लील होतीय , असं लिखान इथे नको म्हणुन काढलं होत .

" कथेच्या वेष्टनात लपेटलेलं पॉर्न " आहे याची मला जाणीव नव्हती , मला फक्त कथा बोल्ड आहेत एवढंच माहित होतं .

हार्ष मते मी एकु शकतो , तुम्ही इथं सुरवातीलाच सांगितलं होतं ,
" एक स्पष्ट सांगतो, राग मानला तरी चालेल.
तुम्ही मायबोलीवर लगोलग तीन कथा पोस्ट केल्या, तीनही कथांमध्ये लैंगिकता हा प्रमुख मुद्दा होता. दुसरी गोष्ट, या तिन्ही गोष्टी विचार करून न लिहिता घिसाडघाईने, काहीतरी लिहायचं, कुठलातरी राग कुठेतरी काढायचा अशा लिहिलेल्या वाटतात.
तिसरी गोष्ट, तद्दन अश्लील वाटेल, असं वर्णन सुद्धा तुम्ही केलंय, आणि ते तुम्ही करताय याची तुम्हाला स्पष्ट जाणीवही होती. त्यामुळेच तुम्ही वर डिस्क्लेमर टाकलेलं दिसतंय.
यापूढे जरा विचार करून लिहीत चला, आणि मगच पोस्ट करा.>>>>

मी हे वाचलं होतं . ते एकुन मी कथा काढल्या नाहीत .
या कथा इथं असू नयेत असं मत बऱ्याच लोकांचं होतं म्हणुन काढल्या.

मी प्रतिक्रिया स्विकारु शकतो .

कुठलातरी राग कुठेतरी काढायचा अशा लिहिलेल्या वाटतात....

हे मात्र मला अजुन कळलेलं नाही...?

आणि ते तुम्ही करताय याची तुम्हाला स्पष्ट जाणीवही होती. त्यामुळेच तुम्ही वर डिस्क्लेमर टाकलेलं दिसतंय.

पुन्हा एकदा...
मी मागेही बऱ्याचदा असं लिहिलेलं आहे कि शिव्या दिल्या तरी चालतील पण खऱ्या प्रतिक्रिया द्या....

Thanks,
you are right, but I really didn't say that you lack certain qualities.... forgive me if you felt so. plz don't tk it personally.
I hv read ur literature, also liked & loved it. will be waiting for it always....
and about my writings, honestly I hv thought about it several times but I don't think I can.
Thanks again for your interest.
let me just be a reader here. I guess I hv already hurted few people & it's enough now.
Thank you,
God bless you.

Adnyatvasi,
<>
was for you.
Thank you

Adnyatvasi Thanks,
you are right, but I really didn't say that you lack certain qualities.... forgive me if you felt so. plz don't tk it personally.
I hv read ur literature, also liked & loved it. will be waiting for it always....
and about my writings, honestly I hv thought about it several times but I don't think I can.
Thanks again for your interest.
let me just be a reader here. I guess I hv already hurted few people & it's enough now.
Thank you,
God bless you.

it's getting posted repeatedly dnt knw how,
plz avoid the repeated part. (I m new here dnt knw the editing rules).

<ंमुळात विषय फक्त तुमच्या कथांचा नव्हता, पण मला तरी मायबोली वर खूप जास्त प्रमाणात असं काही लिहलं गेल्याच वाचनात नाही. >
अशा आणखी कोणत्या कथा खटकल्या?

@Queen -

Don't worry, I only read one post Lol
And one more thing, please don't think you have gutted someone. According to me, everyone here is mature enough to know when get hurted and when not.
But seriously, I really want to read your writings. If a person knows to value the writers works, then it's writing must be valuable (Just my opinion.)
So plz do post.

<नॉन आणि नेवर कॉन्ट्रीब्युटिंग आयडी लेखकाची बाजू घेऊन भांडतो, संतुलितपणाचा आव आणून लेखक किती बरोबर आणि आरोप करणारेच कसे लेखकाच्या लेखनस्वातंत्राची गळचेपी करतायेत असं भासवत?>

हे मला उद्देशून आहे का?

हा नॉन आणि नेव्हर कॉन्ट्रीब्युटिंग आयडी काय प्रकार आहे? मी कथा लिहीत नसेन, वाचत नसेन तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलायचा मला हक्क आहेच. ( आता अशा साहित्याला विरोध करणं हेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य या लूपमध्ये जाऊ नका)

असं साहित्य मायबोलीवर असता कामा नये या आग्रहाला विरोध केलाय. त्यात कुणा एका लेखकाची बाजू घेण्याचा प्रश्न कुठे येतो?
तसं असेल तर तो आग्र ह धरणारे कुणा एका लेखकाच्या विरोधत आहेत, असा अर्थ होतो.

त्या आंबट शौकीन धाग्यावर असं बरंच साहित्य दिसलं असं म्हटलंय , ते कोणतं?

आणखीही मुद्दे आहेत. पण झेपतील का याबाबत शंका आहे म्हणून तूर्तास लिहीत नाही.

Pages