मलबेरी / तुती/ शहतूत ह्याची फळे कशी प्रिझर्व करावीत?

Submitted by sneha1 on 8 April, 2020 - 21:14

नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. घरच्या मलबेरी च्या झाडाची फळे आता काही दिवसात पिकतील. ती कशी टिकवता येतील? माझ्याकडे dehydrator नाही आणि घरात अजून एक उपकरण वाढवायचे नाही. नेटवर ओव्हन मधे सुकवण्याबद्दल वाचले काही ठिकाणी, पण ती खूप वेळाची प्रक्रिया वाटली. उन्हामधे वाळवता येतील का? नवरा म्हणतो की पिकलेल्या रसाळ फळांपेक्षा थोडी आंबट फळे सुकवणे सोपे जाईल. नेट वर काही रेसिपीज दिसल्या पण सगळ्या गोडच होत्या.
म्हटलं Amazon वर सुपरफूड म्हणून घेण्यापेक्षा घरी ट्राय करून बघावे Happy
धन्यवाद!

(इथे आधीची रिक्षा :-)) https://www.maayboli.com/node/62447

berry1.jpgberry2.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाट्ते प्रिझर्व करून ( साखर पाक लिंबू रस घालून ) ठेवावे. जास्त बा टल्या लागतील व ओळखी पाळखीत देउन झाल्यावर विकता येइल. यु ट्युब वर आहेत ह्या डिटेल रेसीपी.

Va,भाग्यवान आहात. ही फळे खूप आवडीची.mahabaléshwarla गेलो असता strawberipeksha मलबेरी आवडलेले.इथे तर तुमच्या अंगणी झाड आहे.मस्त.

अमा, फक्त स्वतः पुरतेच करायचे आहे. खूप लोकांना हे फळ माहितच नसते. आणि गोडाचा एक पर्याय आहेच, पण अजून काय करता येईल ते बघायला आवडेल.
देवकी, तुम्ही पण घरी लावू शकता. फार पटकन वाढते हे झाड, आणि छान पक्षी पण येतात. कधी कधी अती येतात Happy

उत्तम.
-------
बहुतेक /How-to-Sun-Dry-Fruit/ अशा वेबसाईटसवर मिळणारी माहिती उपयोगी पडेल.

आम्ही तरी तूती उन्हात सुकवतो.
आमच्याकडे पण अमाप पिक येते,
पुर्ण पिकलेल्या नाही काढायच्या. जरा रंग बदलताना काढून , तुरटीच्या पाण्यात धूवून , परत धूवून उन्हात सुकवायच्या.

माझ्याकडे पण बॅकयार्डात २-३ झाडे आहेत ही. पण दर स्प्रिंग मधे फळे आली आली म्हणता म्हणता पक्षी आणि खारी फन्ना उडवतात. अजिबात शिल्लक रहात नाहीत !!

सगळ्यांना धन्यवाद. मी बघते सगळ्या लिन्क्स आता.

झंपी, थोडी माहिती देऊ शकाल का अजून?म्हणजे लाल आणि थोड्या कडक असतानाच काढायच्या ना? आणि अगदी कडक होईपर्यंत वाळवायच्या की किसमिस सारख्या मऊ होऊ द्यायच्या? आणि त्यांना कसे वापरता तुम्ही?
फक्त ऊन चांगले असले म्हणजे झाले.

मैत्रेयी,
सकाळी आणि संध्याकाळी फळे मिळायचे चान्सेस असतात. आणि सहसा सीझनच्या शेवटच्या आठवड्याम्धे पक्षी कमी असतात.
ती पण गंमत असते. cedar wax wing नावाचे पक्षी आमच्याकडे अगदी थव्याने येतात, आणि दिवसभर झाडावर असतात. grackle नावाचा थोडा मोठा पक्षी पण येतो, सहसा नर मादी ची एकच जोडी असते. हा पक्षी cedar wax wing ला मधून मधून हाकलून देतो Happy
खारी असतातच आणि.

स्नेहा,
आमचे गडी आधी तुती काढून साफ करतात. तुती अगदी लाल नाही आणि काळी सुद्धा नाही अशी काढायची( तुमच्या फोटोत आहे तशी जवळपास). नाहितर हाताने जराशी दाबून जर रस लाल-काळा आला टिचकन तर घ्यायची. नुसता रस आला पाहिजे, पुर्ण गर टिचला गेला दाबल्यावर तर नाही घ्यायची.
१) हि प्रक्रिया सकाळी खुप लवकर उठून केली तर उन मिळते , तर आधी पान, किडे ( मलबेरी सिल्क किडा) वगैरे फेकून मग ती तुती थंड पाण्यात धूवून घ्या.
२)कमर्शियली वेगळे मिश्रण वापरतात ते इथे देत नाही, घरगुती करत आहात म्हणून हे मिश्रण करा.
एक गॅलन पाण्यात, अर्धा लिटर सफेद विनेगर पाण्यात टाकून ढवळून घ्या. मग सर्व साफ केलेल्या तुती दोन ते तीन तास टाकून ठेवा.
३) त्या पाण्यातून काढून निथळून ठेवायच्या. जमल्यास लाकडी पट्ट्याच्या खोके अथवा जाळीवर ठेवून उन्हात ठेवायच्या. एकेरी लावून ठेवायच्या.
४) दिवसभरात दोन वेळा बाजू पलटवून वाळवायच्या.
तीन चार दिवसात कडकडीत वाळतात.

केल्या की सांगा.

पण पक्षी व सिल्क वर्म ह्यांना थोडी फळे शिल्लक ठेवा हे माझी नम्र विनंती. तुमच्या प्रयोगा पुरते च घ्या. आता सगळी कडे उन्हाळा व अन्नाचे दुर्भिक्ष्य आहे प्राणी पक्षी विश्वात.

झंपी, प्लीज माफ करा, इथे रिप्लाय टाकायला उशीर झाला मला.
यावर्षी हवामान खराब होते, की काय कारण होते माहिती नाही पण फळे फारच कमी आली. त्यात पक्षांनी खूप खाल्ली, आणि उन नव्हतेच, पावसाळी हवाच होती. त्यामुळे फळे बाहेर पण ठेवता आली नाहीत.
थोडी फळे नवर्‍याने सरळ ओव्हन मधे ठेवली, नुसता लाईट लावून दोन दिवस. त्याने ती अगदी खडखडीत वाळली, पण त्यांना चव नाही राहिली .
पुढच्या वर्षी तुम्ही सांगितलेली पद्धत वापरीन पुन्हा.
धन्यवाद ! Happy