स्त्री जन्मा ही तुझी कहाणी.....

Submitted by माझी लेखणी.... on 29 March, 2020 - 12:46

नमस्कार, माझं मायबोलीवरचं पहिलंच लेखन. चांगल्या वाईट प्रतिसादांच स्वागत आहे.

आज माझ्या छकुलीचा दुसरा वाढदिवस.
दोन वर्षांपूर्वी तिचा जन्म झाला. माझ्या आयुष्यातला सोनेरी दिवस.स्त्री असल्याचा ज्याने अभिमान वाटावा असं मातृत्व निसर्गाने मला बहाल केलं होतं. मी खूप खूष झाले कारण मला मुलगी झाली. माझी सिझिरियन डिलिव्हरी झाली.जेव्हा मी बाळाचं रडणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा आपसूकचं डोळ्यांत पाणी तरळलं.मी तिला छातीशी कवटाळलं आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतलं.तिचं इवलेशे नाजूक हात, इवलासा जीव तो.खरंच जन्माचं सार्थक झालं माझ्या.
मला आणि बाळाला स्वच्छ करून वॉर्ड मध्ये आणलं गेलं. माझं कुटुंब तिथे माझी वाट पाहत होतं.मी माझ्या नवऱ्याकडे पाहिल तेव्हा डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.माझा आनंद माझ्या डोळ्यांतून वाहत होता.आमचा अंश जन्माला आला होता.त्या भावना माझ्या नवऱ्याला कळल्या.त्यालाही खूप आनंद झाला होता.
माझे अश्रू पाहून सासूबाई लगेच म्हणाल्या "मुलगी झाली म्हणून रडतेयस?"
खरंच कींव करावीशी वाटली त्यांच्या जुन्या बुरसट विचारांची.
स्वतः एक आई असलेली स्त्री असं बोलू शकते ?
अजूनही मुलगी जन्माला आली कि चेहरे पडतात लोकांचे आणि मुलगा जन्माला आला कि आनंद होतो अस का ?
मुलगा आणि मुलगी ह्यात होणारा भेदभाव कधी संपेल कोणास ठाऊक.
मुलगा मुलगी समान हे वाक्य फक्त पुस्तकांतच शोभून दिसणार आहे का मग ??
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिला प्रयत्न छान

बुरसट विचारांना गाडुन पुढे आलात ,
सोबत तुमच्या ह्यांची आहेच
मस्त रहा स्वस्थ रहा

तुमच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलगा मुलगी भेदभाव जे करतात त्यांच्याकडे जमेल तितके दुर्लक्ष करावे. लोकांची मेंटेलिटी ला आपण कुठे काय करू शकतो. या भेदभाव करणार्यामध्ये बहुतेकदा जवलचे नातलग (विशेष तः स्त्रीया) असतात, close असतील तर समजवावे , किंवा मतपरिवर्तन शक्य नसल्यास पुन्हा असे comments etc करू नये याची स्पष्ट कल्पना द्यावी. जर अगदीच close नसतील तर जमल्ययास पाण उतारा करावा (मला स्वतः ला हे मनात असूनही जमले नाहीय, पण माझ्या बहिणीने गांवी अशाच एका भोचक बाईला तुझो बेवडो झिल काय करता असे विचारल्याचे स्मरते. )

आणि या सर्वात मुख्य गोष्ट अशी की स्वतः ला त्रास मनस्ताप करून घेऊ नये. अशी माणसे भेटतच राहतील.
माझ्या आईला (वय७०) हल्ली हल्ली पर्यंत तुम्हाला किती मुले असं विचारून आईने तिच्या मुलींची माहिती दिल्यावरही तुम्हाला मुलगा नाही का? असं भोचकपणे विचारणार्या बायका बघितल्यात.
तर सासूबाई असं बोलल्या म्हणून वाईट वाटून घेत राहाण्यापेक्षा मुलीला मुलीला कणखर सक्षम स्वावलंबी ई. बनवणे जे आपल्या हातात आहे , ते करावे असे माझे अनुभवा अंती मत तयार झालेय.