साडेसातीे: वास्तविक उपाय!

Submitted by केअशु on 7 March, 2020 - 00:44

मित्रहो! दिनांक २४/१/२०२० रोजी सकाळी ९.५४ पासून शनीने मकर राशीत प्रवेश केलेला आहे.याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीची साडेसाती संपली आणि कुंभ राशीची साडेसाती सुरु झाली.म्हणजेच एकूणात धनु,मकर,कुंभ या तीन राशींना साडेसाती अाहे.

साडेसाती आली की सोशल मिडियावर "घाबरुन जाऊ नका.शनीला अभिषेक करा,शनिवार करा अडचणी कमी होतील वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं आढळेल.एवढंच नाही तर पुढे शनी हा हाडाचा शिक्षक आहे, तो कष्ट देऊन शिकवतो तिथपासून ते आपल्या पूर्वकर्मांची फळेच साडेसातीत मिळत असतात"वगैरे तत्वज्ञान वाटल्याचेही आढळेल.

पण वास्तवात असं आहे का? आजपर्यंत या उपायांनी(शनीच्या मंदिरात जाणे,उपास करणे वगैरे) साडेसाती गायब झाली आणि साडेसातीत त्रासच झाला नाही असं उदाहरण सापडणं अवघड अाहे.नुकत्याच जन्मलेल्या मुलालादेखील साडेसाती असू शकते.मग आपल्या कर्मांचे फळ शनी देतो वगैरे गोष्टींना फारसा अर्थ उरतच नाही.

तर लक्षात घ्या की शनी हा मुळातच फलज्योतिषात 'पापग्रह' म्हणून मानलेला आहे.'शनी तिथे हानी','शनी तिथे विलंब' हेच सत्य आहे.प्रयत्नांमधे अडथळे आणणं,मानसिक संतुलन बिघडवणं,पैसे खर्चायला लावून आर्थिक स्थिती ढासळवणं हेच शनी साडेसातीत करत असतो.अर्थात शनीचं गिर्‍हाईक काही तुम्ही एकटेच नाही त्यामुळे रोज उठून तो तुम्हालाच पीडत बसेल असे नाही.

मग साडेसातीत करावं तरी काय? यासाठी वास्तवात उपयोगी पडू शकणारे हे उपाय:

१. जमेल तितके तोंड गप्प ठेवा.कारण असल्याशिवाय कोणाशीही बोलायला जाऊ नका.भांडू किंवा वाद घालायला तर मुळीच जाऊ नका.जातकाला अडचणीत आणण्यासाठीचे शनीचे हे 'हुकमी हत्यार' आहे.राग कंट्रोल करायला शिका.

२. जमेल तितकी काटकसर करा.फारच गरज असल्याशिवाय पैसे खर्च करु नका.कारण पुढे काय नि किती खर्च वाढून ठेवलेयत आपण नाही सांगू शकत.

३. तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तरच शनी किंवा मारुती मंदिरात शनीवारी जा.विश्वास नसेल आणि कोणीतरी सांगितलंय म्हणून गेलात तर काहीच फायदा होणार नाही.शनी/मारुती मंदिरात गेल्याने तुमची साडेसाती जाते वगैरे काही होत नाही.फक्त तुमचे मनोधैर्य वाढते इतकेच.

४. घरातल्या लहान मुलांना साडेसाती असेल तर त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.लहान मुले धडपडी,फार सावध वगैरे नसतात.त्यामुळे धडपडून काही इजा होणे वगैरे शक्य असते.यासाठी मोठ्यांनीच लक्ष ठेवून असणे चांगले.त्यांच्या शालेय शिक्षणातही काही अडचणी येत असतील तर त्यातही लक्ष द्या.

५. साडेसातीत तुम्हाला होणारा मनस्ताप ही शनीभ्रमणाची फळे आहेत.त्यामुळे या काळात एखाद्याच्या गैरवर्तनाचा राग आला तरी तो नियंत्रणात ठेवायला शिका.कदाचित तुम्हीदेखील पूर्वी तुम्हाला साडेसाती नसताना एखाद्या साडेसाती असलेल्या माणसावर असेच डाफरला असाल.तस्मात हे आपल्यासोबत होणारच आहे.आहे त्या परिस्थितीपासून लांब पळून किंवा आहे ती नोकरी सोडून दुसरी पकडल्यास साडेसातीचा त्रास होणार नाही हा भ्रम आहे.तसं काही होत नाही.

६. आणि हे ज्यांना साडेसाती नाही त्यांच्यासाठी: तुमच्या अवतीभवती,आंजावर साडेसाती असलेले कोणी माहिती असल्यास त्यांची सध्याची अवस्था समजून घ्या.आज त्यांच्यावर डाफराल,अोरडाल.चोपून घ्याल.पण तुम्हालाही नंतर कधीतरी साडेसाती येणारच आहे याची जाणीव असू द्या.तस्मात थोडा संयम तुम्हीच दाखवा.कारण तुम्हाला साडेसाती नाहीये.त्यामुळे तुम्हाला ते चांगलं जमू शकेल.

७. सर्वात शेवटी लक्षात घ्या की ही साडेसात वर्षे कधीतरी संपणारच आहेत.त्यामुळे हा काळ पार करण्याची तयारी ठेवा.हा आपला बिकट काळ आहे आणि हा कधीतरी नक्की संपणार आहे हे सतत मनाला बजावत रहा.तग धरायला शिका.मन खंबीर राहू द्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शनी ज्या राशीचा स्वामी आहे अशा राशीना साडे सातीचा त्रास होत नाही किंवा कमी होतो असे म्हंटले जाते यात काही तथ्य आहे का?

प्राचीन
धन्यवाद.

pintee
असे काही नाही.शनी सर्वांना त्रास देतो.लाडका/दोडका असे काही नाही.

नथ्थुराम
नाही.

१. साडेसाती फक्त एका ठराविक धर्मातल्या ठराविक वर्गालाच त्रास देते का?
२. समजा त्या ठराविक धर्मातून एखादा दुसऱ्या धर्मात गेला तर त्याला साडेसाती लागू होते का?
३. साडेसाती जर जन्मकुंडलीत असलेल्या ग्रहागोळ्यांच्या स्थितिवरून ठरत असेल तर संबंधित व्यक्ती ऑनसाईट गेल्यास अक्षांश रेखांश च्या फरकाने ती नष्ट होते का?
४. प्राणी, पक्षी, किडे, जंतू यांना साडेसाती लागू होते का?
५. एखाद्या देशाला साडेसाती लागू शकते का?
६. माबो वर कुठल्या आयडी ला साडेसाती लागू झाली आहे हे सहज ओळखू शकतो का?

सर्वात शेवटी लक्षात घ्या की ही साडेसात वर्षे कधीतरी संपणारच आहेत >>>>> या जगात तस सर्वच संपणार आहे एकेदिवशी...अगदी जगसुद्धा. त्यामुळे जे शाश्वत आहे त्याचा शोध घ्यावा. ब्रह्म सत्यं जगत मिथ्या, जीव ब्रहमैव नापर: (इति आदि शंकराचार्य)

कोहंसोहं साहेब कुठे आदि शंकराचार्य आणि कुठं माझ्या सारखे पामर! विषयातच जगलो आणि विषयोपभोगातच मर्नार.

उपाय आवडले. हे साडेसातीव्यतिरिक्तही केलेत तर फायदाच होईल.

साडेसाती त्रास नको असेल तर शनिवारी शक्यतो घराबाहेर पडू नये. जरी घराबाहेर पडलात तर शरीर पूर्ण झाकलेलं असावं. जेणेकरून शनि महाराजांची दृष्टी आपल्यावर पडली तर त्यांना कोण आहे ते ओळखू येऊ नये. दर शनिवारी आपल्या चेहऱ्याचे पुठ्याचे मुखवटे इतरांना घालायला द्यावेत म्हणजे शनि महाराज गोंधळात पडतील. आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलताना ग्रहांचा विषय काढावा आणि शनी ग्रहाची स्तुती करावी. बायकोसमोर शक्यतो स्तुती करू नये. कारण बायको आपल्या विरुद्ध मत मांडून साडेसातीचा त्रास वाढवू शकते.

Dj..

१. साडेसाती फक्त एका ठराविक धर्मातल्या ठराविक वर्गालाच त्रास देते का?
-असे काही नाही.पण साडेसाती ही संकल्पना हिंदू धर्मात आहे.

२. समजा त्या ठराविक धर्मातून एखादा दुसऱ्या धर्मात गेला तर त्याला साडेसाती लागू होते का?
- ते धर्म बदलण्यावर नाही तर फलज्योतिषावर विश्वास असण्यावर अवलंबून आहे.

३. साडेसाती जर जन्मकुंडलीत असलेल्या ग्रहागोळ्यांच्या स्थितिवरून ठरत असेल तर संबंधित व्यक्ती ऑनसाईट गेल्यास अक्षांश रेखांश च्या फरकाने ती नष्ट होते का?
- नाही नष्ट होत.

४. प्राणी, पक्षी, किडे, जंतू यांना साडेसाती लागू होते का?
- प्राणी, पक्षी, किडे, जंतू यांना साडेसाती लागू होत नाही कारण या भोग योनी आहेत.

५. एखाद्या देशाला साडेसाती लागू शकते का?
- फलज्योतिष हे व्यक्तीगत असतं.समुहासाठी नसतं.

६. माबो वर कुठल्या आयडी ला साडेसाती लागू झाली आहे हे सहज ओळखू शकतो का?
- त्यांचे जन्मटिपण दिल्यास अोळखता येते.

धन्यवाद केअशु.

पण मला काहिच कळालं नाही. एखादा शनि सारखा अवाढव्य आणि जीवसॄष्टी नसलेला ग्रह पॄथ्वी ग्रहावरच्या कःयश्चित (साडेसाती भोगत असलेया लाखो/करोडो) मनुष्यप्राण्याला तब्बल साडेसात वर्षं त्रास देत बसेल हे काही केल्या मनाला पटत नाही. आपले २७ चंद्र आणि कैय्योक कड्या सांभाळत सुर्याला प्रदक्षिणा घालण्यात दिवस्/महिने/वर्षं कसे जातायत हे त्याला सुद्धा कळत नसेल.

- फलज्योतिष हे व्यक्तीगत असतं.समुहासाठी नसतं.>>>>मेदनीय ज्योतिष हे देखील फलज्योतिष असते. त्यात प्रांताला पत्रिका असते

हे बऱ्याचदा ऐकायला/वाचायला मिळते की अमुक एक ग्रह पृथ्वीपासून एवढ्या लांबवर आहे तर त्याचा प्रभाव कसा पडेल? आपल्याला हे माहित आहे की माणसाने या आकाशगंगेचा ज्ञात विस्तार किती आहे हे कसे ओळखले किंवा एखादा अतिदूरवरचा तारा किंवा आकाशगंगा पृथ्वीपासून किती दूर अंतरावर आहे हे वैज्ञानिक कसे शोधून काढतात. आपण जेंव्हा म्हणतो की एखादा तारा अमुक मिलिअन किंवा बिलियन प्रकाशवर्ष दूर आहे याचा अर्थ त्या ताऱ्यापासून निघालेला प्रकाश किंवा तत्सम ऊर्जा तेवढी बिलियन वर्षे आकाशातून प्रवास करून पृथीपर्यंत पोहोचलेली असते.
२०१६ मध्ये जेंव्हा लिगो ने गुरुत्वाकर्षण तरंगे ( gravitational waves) पकडली ती १.३ बिलियन प्रकाशवर्षे दूर निर्माण झाली होती. प्रकाश, गुरुत्वाकर्षण ही ऊर्जा आहे आणि अनेकदा अतिशय दूर अंतर कापूनसुद्धा ही ऊर्जा काही प्रमाण शिल्लक राहते आणि शोधली जाऊ शकते.
सांगायचा मुद्दा हा की या ब्रह्माण्डात प्रत्येक वस्तू कोणती ना कोणती ऊर्जा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात (जसे की प्रकाश, गुरुत्वाकर्षण) उत्सर्जित करत असते आणि त्याचा कमीअधिक प्रभाव इतर वस्तूंवर पडत असतो. माणसाची विचारतरंगे , कर्मे ही सुद्धा एक प्रकारची ऊर्जाच आहे आणि ही ऊर्जा आपल्या ग्रहमालीकेतल्या ९ ग्रहांनी उत्सर्जित केलेल्या ऊर्जातरंगांना सेन्सिटिव्ह आहे ज्याचा प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावर पडत असतो ज्यावरून आपण म्हणतो की शनी ही न्यायदेवता किंवा शुक्र कला, शृंगार यांचे कारक आहेत. आता हा प्रभाव कोणत्या रूपाने कसा पडतो आणि त्याचे काय फळ मिळते हे सर्व आपल्या पूर्वजांनी शोधून काढले आणि त्यातून ज्योतिषशास्त्र तयार झाले. भौतिक विज्ञान अजूनही या बाबतीत परिपूर्ण नाही. आईन्स्टाईन ने २० व्या शतकात मांडलेल्या गुरुत्वाकर्षण तरंगांचा सिद्धांत चुकीचा की बरोबर हे प्रयोगाद्वारे सिद्ध करायला २०१६ उजाडले. २०० वर्षांपूर्वी कोणी म्हणाले असते आपल्या विश्वात करोडो आकाशगंगा आहेत आणि प्रत्येक आकाशगंगेत लाखो ग्रह तारे आहेत तर त्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता किंवा त्याला वेड्यात काढले असते. हीच परिस्थिती सध्या आपल्या ज्योतिषशास्त्रबाबत आहे आणि कुडमुड्या ज्योतिषांनी या ज्ञानाला अजूनच बदनाम केले. पण शनी काय किंवा इतर ग्रह काय यांचा सूक्ष्म प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो आणि सतर्कतेने निरीक्षण केल्यास त्याचा अनुभवही घेता येतो.

साडेसाती त्रास नको असेल तर शनिवारी शक्यतो घराबाहेर पडू नये. जरी घराबाहेर पडलात तर शरीर पूर्ण झाकलेलं असावं. जेणेकरून शनि महाराजांची दृष्टी आपल्यावर पडली तर त्यांना कोण आहे ते ओळखू येऊ नये. दर शनिवारी आपल्या चेहऱ्याचे पुठ्याचे मुखवटे इतरांना घालायला द्यावेत म्हणजे शनि महाराज गोंधळात पडतील. आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलताना ग्रहांचा विषय काढावा आणि शनी ग्रहाची स्तुती करावी. बायकोसमोर शक्यतो स्तुती करू नये. कारण बायको आपल्या विरुद्ध मत मांडून साडेसातीचा त्रास वाढवू शकते.>>>>>> Rofl

डीजे तुमचा प्रश्न असा
६. माबो वर कुठल्या आयडी ला साडेसाती लागू झाली आहे हे सहज ओळखू शकतो का?
- त्यांचे जन्मटिपण दिल्यास अोळखता येते.
उत्तर ; म बो. वर बोकलत नावाचा आयडी आहे आयआयच्छा असल्यास त्यांना invite करा, तसे खूप उच्चा दर्जाचे पोस्ट असतात त्यांचे, पण तुम्हाला त्यांनी मनात आणले तर साडेसाती mhanjevkaay ते म बी वर कळेल, याधी अंनेकानी. त्यांना या साठी सालं केला आहे.... बोललात यांनी मनावर घेतले तर तुम्हाला नक्की अनुभव येईल.... हा ..हा ...हा ....

डीजे तुमचा प्रश्न असा
६. माबो वर कुठल्या आयडी ला साडेसाती लागू झाली आहे हे सहज ओळखू शकतो का?
- त्यांचे जन्मटिपण दिल्यास अोळखता येते.
उत्तर ; म बो. वर बोकलत नावाचा आयडी आहे ईच्छा असल्यास त्यांना invite करा, तसे खूप उच्चा दर्जाचे पोस्ट असतात त्यांचे, पण तुम्हाला त्यांनी मनात आणले तर साडेसाती म्हणजे नक्की काय ते म बी वर कळेल, याआधी अंनेकानी. त्यांना या साठी सकाम केला आहे.... बोललात यांनी मनावर घेतले तर तुम्हाला नक्की अनुभव येईल.... हा ..हा ...हा ....