ऑनलाइन फ्री लान्सर म्हणून कसे काम करावे?

Submitted by अज्ञातवासी on 7 March, 2020 - 23:05

नमस्कार!

माझ्या एका मैत्रिणीचे MBA पूर्ण झालेले असून घरातल्या काही जबाबदाऱ्यामुळे ती बाहेर काही जॉब करू शकत नाहीये. तिचं MBA मार्केटिंग मध्ये झालेले आहे.
तर ती ऑनलाइन फ्रीलान्सर म्हणून काम करू इच्छिते. याविषयी मला काहीही माहिती नसल्याने हे बेसिक प्रश्न.

१. हे काम कुठून शोधता येईल, व कुठून चांगला स्टार्ट मिळेल?
२. त्यासाठी काय करावे लागेल.
३. मार्केटिंग रिलेटेड वर्क कुठे जास्त मिळेल.
४. या कामासाठी अजून काही एक्स्ट्रा सर्टिफिकेशन करावं लागेल का?

आणि अजून काही माहिती, गरजेची असल्यास.

जाणकारांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Upwork.com हि एक चांगली website आहे online कामाकरिता. येथे विविध प्रकारचे चांगले प्रोजेक्ट्स आहेत. तेथे प्रयत्न करता येईल.

धन्यवाद माबो वाचक.
तिने upwork वर रजिस्टर केलंय, पण अजूनही काम मिळत नाहीये. तर त्यासाठी काही आयडिया अथवा आपले अनुभव?

मी upwork वरून काम करून घेतले आहे, पण ती व्यक्ती रेफरन्समुळे माहीत होती.
रेफरन्स नसेल तर काम मिळणे खूप कठीण आहे.
MBA मार्केटिंग केले असेल तर सोशल मिडिया, SEO किंवा ब्रँड मार्केटिंगचे काम कदाचित मिळू शकेल.

त्यांना घरगुती उद्योग ऑफलाइन करता येत असतील तर साबण बनवणे उदबत्ती, अत्तराचे बॉटलिन्ग वगिअरे अगदी सहज साध्य आहेत. व केटरिन्ग.
ह्याची पण फार डिमांड आहे. ऑनलाइनच करायचे आहे का? आजकल कंपनी डाटा तिर्‍हाइत माणसाच्या हातात देत नाहीत. त्यांना घरून क्लासेस सुरू करता येतील.

अमा हे उद्योग खालच्या दर्जाचे आहेत असं मी म्हणत नाही, पण एका certain education level ला पोहोचल्यावर त्या लेवलच काम करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते.
असो, तिला ऑनलाइन फ्रीलांस करायची इच्छा आहे, त्यानुसार मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल.
Meanwhile तिने एका वर्क फ्रॉम होम कंपनीसाठीही अप्लाय केलंय, बघुयात।

MBA मार्केटिंग अशी काय value addition करतात याबद्दल माझ्या मनात शंका आहे, पण ते जाऊ दे. शुभेच्छा.