जिकडे तिकडे उगवलेले पॉप कवि

Submitted by सामो on 1 March, 2020 - 03:49

https://qz.com/quartzy/1192915/in-defense-of-rupi-kaur-and-instagrams-po...
वरील लेख वाचताना माझ्या मनात आलेले विचार खाली नोंदवलेले आहेत.
सर्व इमेजेस जालावरुन.

पावसाळ्यात फोफावणाऱ्या कवकांसारखे सध्या पॉप कवि फोफावलेले आहेत. इन्स्टाग्रॅमवरच्या वरवर दिसायला शॉर्ट न स्वीट अशा ४ ओळी असा यांच्या कवितांचा साधारण साचा असतो. पुस्तकांच्या कोणत्याही दुकानात जा व या कविंची पुस्तके चाळता येतात. पैकी रुपी कौरचे मिल्क & हनी , अमान्डा लव्हलेसचे 'द विच डझंट बर्न इन धिस वन' वगैरे पुस्तके वाचलेली आहेत. हेतूपुरस्सर व ओढून ताणून, ' आम्ही विरुद्ध ते' असा काहीसा ॲप्रोच (पठडी) या पुस्तकांची असतो.अमांडाची हीच कविता -
https://assets.rebelmouse.io/eyJhbGciOiJIUzI1NiIsInR5cCI6IkpXVCJ9.eyJpbWFnZSI6Imh0dHBzOi8vYXNzZXRzLnJibC5tcy8xMTQ4MDAyMS9vcmlnaW4uanBnIiwiZXhwaXJlc19hdCI6MTYzNTczMDI1MX0.Dwf3XSz9cLEbV2eI4gfwXcmIKzxlgJ6jKsAx8E1ib_E/img.jpg?width=980&height=1304

कवितांचे कोणतेही पुस्तक खरे तर कोणत्याही पानावरती सुरु करता येते. डांटेचे 'इन्फर्नो' व तत्सम अतिदीर्घ कविता सोडल्या तर अन्य बहुतेक कविता लहानच असतात. पण रुपी कौर सारख्या या 'इन्स्टाग्राम' जमान्यातील कविंच्या कविता म्हणजे आत्ता सुरु होते न होते संपते. रुपी कौर पोएम्स अशी सर्च द्या आणि गुगलवर इमेजेस मध्ये खालीलप्रमाणे बऱ्याच कविता सापडतील.

https://wp.stanforddaily.com/wp-content/uploads/2017/01/6358946712935403202031547669_kaur.jpg

या कवितांचे प्रमुख बलस्थान गणले जाते ते म्हणजे 'सोप्या व सहजसाध्य' पण यालाच उथळ असा शब्द नाही का? रुपी कौरच्या मिल्क & हनी' ने २०१६-२०१७ मध्ये रेकॉर्ड केले. विक्रीचा उच्चांक वगैरे गाठला त्यात माझाही तीळभर हातभार होताच. पण या कवितांनी माझ्या मेंदूला ना खाद्य पुरवलं ना त्यांच्यातील सौंदर्यदृष्टिने मी मंत्रमुग्ध झाले. कवि हे शब्दाचे, भाषेचे ठेकेदार असतात् असा सूर मला लावायचा नाही. किंबहुना जरी कवि हे काही प्रमाणात तरी भाषाप्रभू असावेत अशी अलिखित अपेक्षा असली तरी ती एक वेळ सोडा. निदानपक्षी काही चमकदार उपमा, कल्पना कवितेत याव्यात ही अपेक्षा अगदीच गैर नाही. त्या तुलनेत पॉप कविता फारच तोकड्या पडलेल्या जाणवल्या. 'आय रोट इट फॉर ' हे पुस्तकदेखील विकत घेउन, वाचलेले आहे.

https://i.pinimg.com/originals/82/8f/77/828f7794998cbdd5f6b3953051268716.jpg

यात अतिशय लहान लहान कवितांबरोबरच सुंदर फोटोग्राफी आहे. पण एकंदर साचा तोच. अतिशय वैयक्तिक अनुभवांपुरता सीमीत कविता. कॉफी- बेगल कविता म्हणेन मी. कुठेही सुरु करा. तुम्ही स्वत:ला त्या कवितात जरुर पाहू शकता पण अमूर्त असे काहीच हाती लागत नाही. ना मेंदूस विचार करण्याची प्रेरणा मिळते ना आत्म्यास शीतलता ना कोणती अस्वस्थता. मग कलेचा 'हेतू' काय? कलेकरता कला? प्रत्येक कविता 'संदिग्ध' = ambiguous असलीच पाहीजे असे नाही पण कवितेने अंतर्मुख करावे, एक मेडिटेटिव्ह (ध्यान+एकाग्रता) अनुभव द्यावा अशी अपेक्षा चूकीची नसावी.
एकंदर या पॉप कविता, म्हणजे '२ मिनीटस मॅगी' प्रकार म्हणता येइल.
याउलट अनेक कंऱ्टेपररी कवि - कॅरॉलिन फोर्शे, मेरी हॉवे, जे हर्श्फिल्ड, माझ्या अजुन ३-४ भयंकर आवडत्या कवि आहेत, आत्ता सर्व नावे आठवत नाहीत पण - मेइमेइ बर्सेन्ब्रुग, नेटिव्ह अमेरिकन कवि जॉय हारजो, शॅरन ओल्ड,मेरी ऑलिव्हर (https://www.newyorker.com/books/page-turner/mary-oliver-helped-us-stay-a...) यांनी अत्यंत आनंद दिला, प्रग्ल्भ केले, फक्त वाचनसाक्षरतेच्या बाबतीतच नाही तर आत्मिक प्रतलावर, अमूर्त मनात त्यांच्या कविता रुजल्या. कधी त्यातील निसर्गसौंदर्य आवडले तर कधी शब्दांच्याही पलिकडले काही आकळल्याने आवडुन गेल्या. एक कविता शोधते आहे. मेरी ऑलिव्हर यांची फार आवडती कविता आहे. मिळाल्यास इथे टाकेन.
असो. हा जो नवा उथळ कवितांचा कल्ट जो की इन्स्टाग्रॅम अन ट्विटरने फोफावलेला आहे तो ट्रान्झिअन्ट असावा अशी इच्छा, परत कवितेला डिग्नीटी व तिचे मूळ सौंदर्य मिळावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दर्जा,प्रतिभा,ह्या सर्व गोष्टी शी कोणाला देणेघेणे नाही त्याला कवी कसे अपवाद असतील.
जे विकत ते पिकत ह्या एकच वाक्यात त्याचा अर्थ आहे.
इथे

मी सुद्धा अशाच पॉप कवींच्या बोटीत एखादवेळी असु शकते. अस वाटल! Proud
छान लिहीलाय लेख! मराठीतसुद्धा असे लिहिणारे भरपुर असावेत.

इंटरेस्टिंग माहिती! ते मी माझा, पुन्हा मी माझा वगैरे चारोळी संग्रह ह्याच प्रकारात मोडतात का?

@स्वाती, मला वाटतं , पॉप = पॉप्युलर. तेव्हा आपण पॉप नाही.
>>>ते मी माझा, पुन्हा मी माझा वगैरे चारोळी संग्रह ह्याच प्रकारात मोडतात का?>रोचक मुद्दा आहे.

>>> पॉप = पॉप्युलर. तेव्हा आपण पॉप नाही.
म्हणजे यश.

माझा प्रश्न असा होता की त्यांचं लिखाण 'जज' करताना आपण स्वतः नेहमी कीबोर्डला हात लावण्याआधी काहीतरी सखोल, वाचकाला अंतर्मुख करणारं किंवा चिरकाल परिणाम करणारं, निदान चमकदार लिहितो आहोत अशी आपल्याला खात्री असते का? पॉप कवी लिहिते आधी झाले आणि पॉप्युलर नंतर, बरोबर?

>>> हा जो नवा उथळ कवितांचा कल्ट जो की इन्स्टाग्रॅम अन ट्विटरने फोफावलेला आहे तो ट्रान्झिअन्ट असावा अशी इच्छा
का? जो जे वांछिल त्याने ते का लिहू नये? जे उत्तम असेल ते टिकेल काळाच्या ओघात आणि बाकी विरून जाईल.
आपल्याला आवडतं की नाही इतकंच आपण ठरवावं, बाकी लिहिणार्‍यांचा दर्जा आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची अभिरुची घाऊकरीत्त्या मोडीत काढणारे आपण कोण - असा प्रश्न आहे.

>>>>>> बाकी लिहिणार्‍यांचा दर्जा आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची अभिरुची घाऊकरीत्त्या मोडीत काढणारे आपण कोण - असा प्रश्न आहे.>>>> स्वाती या लोकांना जसे उथळ कविता लोकांच्या माथी मारण्याचा हक्क आहे (शूटींग फ्रॉम द हिप), आली लहर केला कहर .....तसाच आपणही टीका करण्याचा हक्क राखून ठेवतोच की.
आवड सबजेक्टिव्ह असते पण दर्जा ही गोष्ट सब्जेक्टिव्ह नसते असे माझे मत.
>>>आपण कोण>>> वाचक. आक्षेप घेण्याचा हक्क आहे आपल्याला.
_____________________
मला तुझा प्रश्न कळतोय की या लोकांवरच एवढं टिकास्त्र का? तर मला वाटतं सातत्याने कमी दर्जाचे साहीत्य वाचून, शॉर्ट अटेन्शन स्पॅन ठेउन, आपल्यालाही ' मिनटस मॅगी' ची सवय लागते. त्यातून मग दर्ज्याची व एकंदर अपेक्षांची घसरण सुरु होते. नकळत. तेव्हा ही चीड साहजिकच काही लोक बोलून दाखवतात. चांगल्या सवयी लागणं महाकर्मकठीण असतं, वाईट सवयी, शॉर्टकटस, '२ मिनटस मॅगी' चटकन अंगवळणी पडतात.

>>> आवड सबजेक्टिव्ह असते पण दर्जा ही गोष्ट सब्जेक्टिव्ह नसते

पूर्णपणे असहमत. कोणत्याही कलेच्या संदर्भात दर्जा ही बाब कायमच सापेक्ष असते. तसं नसतं तर भवभूतीला 'कालोह्ययंनिरवधिर्विपुलाचपृथ्वी:' असा दिलासा द्यायची आवश्यकता भासली नसती, व्हॅन गो सारखे प्रतिभावंत हलाखीत मेले नसते आणि एमिली डिकिन्सनला कवितांत सुधारणा सुचवायची तत्कालीन प्रकाशकाची प्राज्ञा झाली नसती.

काळ बदलतो तसं त्याचं प्रतिबिंब कलेत पडणं अपरिहार्य आहे. तुम्ही स्वयंपाकघरात जात्यावर बसत नाही, मग कवींनी याही काळात सखोल आणि सविस्तर लिहावं असा आग्रह का धरता?

वाचक म्हणून आक्षेप घेताना आपण सरसकटीकरणतर करत नाही ना याचंही भान ठेवायला नको का? ज्या अर्थी हे कवी पॉप्युलर आहेत, त्या अर्थी त्यांचा स्वतःचा वाचकवर्ग आहे, ज्यांना त्या लिखाणात काहीतरी सापडतंय. आपण त्या वाचकवर्गात नाही आहोत, इतकंच. आपल्याला जे आवडतं तेच वाचून आपापले अटेन्शन स्पॅन टिकवून ठेवायचं स्वातंत्र्य आपल्यालाही आहेच की.

'आवडलं नाही' हे सांगायचा अधिकार वाचकाला जरूर आहे, का आवडलं नाही याचीही चर्चा व्हावी, पण त्यात त्यांच्या अभिव्यक्तीचा अपमान होवू नये. 'पॉप कवी'सारखं लेबल लावून फक्त तुच्छता व्यक्त होते.

असो, माझा मुद्दा मांडून झाला आहे, तेव्हा थांबते. Happy
(जाता जाता, रूपी कौरच्या कविता मला स्वतःला आवडल्या नव्हत्या हेही नमूद करायला हवं. Proud )

माझ्या वरील लेखात, स्वतःच्या मेरीटपेक्षा, सोशल मिडीया च्या शिडीवरती प्रसिद्धी पावलेले कवि असा काहीसा उपहास आहेच. यामध्ये अर्थात हे स्नॉबिश अ‍ॅझम्प्शन आहेच की क्रीटीक्स जे उचलून धरता ते काहीतरी चांगले. पण बरेचदा क्रिटीक्स हे त्या विषयातील तज्ञ असतात व त्यांनी चौफेर विचार करुन, तोलून मापून एखाद्या कविस/लेखकास मान्यता दिलेली असते असेच आढळते.
मान्य! तू म्हणतेस तसे, अभिव्यक्तीचा अपमान बरोबर नाही, पॉप कवि, इन्स्टापोएटस सारखी शेलकी विशेषणे लावून अपमान होतो , हेदेखील बरोबर आहे.

‘Mona Lisa Smile’ चित्रपटातील हा प्रसंग वरच्या चर्चेवरून आठवला. Happy

संतुलित चर्चेबद्दल आभारी आहे. अशा चर्चा सहज पाय घसरून वादावादीच्या दलदलीत पडू शकतात नाहीतर. Happy