पाणघोडा कसा पाळावा?

Submitted by माँटी on 25 February, 2020 - 01:06

रहदारी व प्रदूषण यावर अक्सीर उपाय जलवाहतूक आहे. त्यासाठी पाणघोडा कसा पाळावा याबद्दल माहिती हवी आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या सगळ्यांनीच त्यांचे पाणघोडे नदीत उतरवले तर नदीत ट्राफीक जाम नाही का होणार? मग तेव्हा कोणता पक्षी पाळु असा धागा काढावा लागेल.
त्यापेक्षा रस्त्यावरच साधे घोडे वापरा.

गर्दीच्या वेळी आणि जवळच्या ठिकाणी जायला मोटरबाइक वापरतो तसा सिंगल घोड़ा वापरा (डबल सिटसाठी पेटा वगैरे एजनसीची कागदपत्रे RTO लाइसेन्स आणि इन्शुरन्स पी यु सी सारखी सोबत बाळगा) त्याच्या लिदीपासून बायोगॅसवर चालणारी घोड़ागाड़ी फॅमिली कारच्या जागी वापरा. हाकानाका Light 1

Lol
त्याना त्यांची घरची धुणी भांडी कामं आवरून कामावर रुजू व्हायला उशीर झाला तर आयत्या वेळी पंचाईत ना !

पाण्घोडा पळून पळून कितीसा जोरात पळणार ?
त्या पेक्षा , डॉल्फिन किन्वा व्हेलचा विचार का नाही करत ?

सर्वात बेस्ट ड्रैगनवर सवारी करा
चालत तर चालत
वाटले तर पोहत आणि
अतिघाई असेल तर सरळ उड़त !
पॉल्युशन फ्री MUV

पाणघोडा हवाच कशाला? त्यापेक्षा दिवसभर घरी बसून माबो वर निरर्थक धागे काढण्यात जास्त मजा नाहीय का?

आमच्या वेळेस हे असा काही नव्हते आम्ही स्वतःच पाण्यातून पोहोत जायचो. झालाच तर मगरींचा त्रास च व्हायचा. तोदेखील इतका कॉमन झाला होता कि शाळेत देखील मगरीने पकडल्याने उशीर झाला हे कारण कोणी मान्य करायचे नाही. आताच्या पिढीत तो दम राहिला नाही. कशाला हवेत पाणघोडे आणि डॉल्फिन. ह्या सगळ्या मुळे नैराश्य येतेय नवीन पिढीत.

आम्ही तर मगरच पाळली होती. बाकिचे पाणघोडेवाले आणि व्हेल, डोल्फिन वाले आमच्या मगरीला घाबरुन बाजुला व्हायचे आणि मी वेळेत ऑफिसला पोचायचो. पण नंतर पाळलेली मगर एका मगरासोबत पळुन गेली की हो Uhoh तेव्हापासुन बस ने धक्के खात प्रवास करावा लागतोय.

पाणघोडा हा मजबूत प्राणी आहे. त्याच्या पाठीवर दुमजली अंबारी बांधता येईल. त्यातून बसवाहतूक सुरू करता येईल. पाणघोडा कसा पाळावा याच्या टीप्स अपेक्षित आहेत. उदा. प्रवासी पाठीवर असताना त्याने खोल पाण्यात बुडी मारू नये यासाठी काय काळजी घ्यावी इत्यादी.

धाग्यात शाहरूख कसा आणावे बरं ...

हमम.. करण अर्जुन मध्ये शाहरूखने घोड्यांचा आख्खा तबेला पाळला होता. पानघोडा फार वेगळा असतो का?
विचार करून सांगा, जल्दी है क्या..
पानघोडाही चाहिये, वो क्यू भला ??

मराठीतला शारुख धाग्याच्या नावातच आहे.. Wink
>>>

हे पाणघोड्याने आईकले तर त्याला फिलींग रॉकस्टार सुपर्रस्टार होईल Happy

ऑन ए सिरीअस नोट,
राणीबागेच्या शेजारी अख्खे बालपण गेलेय. तेव्हा तर छान छान प्राणीही असायचे तिथे. रोज शाळेतून घरी जायचा शॉर्टकट राणीच्या बागेतून पाणघोड्याच्या अंगणातून जायचा. त्यामुळे पाणघोड्याचे मला कौतुक नाही. माझ्या बालवाडीतल्या आठवणीप्रमाणे तेव्हा राणीच्या बागेत ऊंट, हत्ती, घोडा, पाणघोडा यांच्या सवारी सुद्धा व्हायच्या. त्यामुळे पाणघोडा हाकायचेही कौतुक नाही मला. धाग्याने नॉस्टॅल्जिक तेवढे केले हे मात्र खरे.. आणि त्यासाठी मनापासून धन्यवाद Happy

पाणघोड्याची आवड पण आपल्या दृष्टीने वाईट खोड म्हणजे पाण्यात डुंबुंन पडून राहाणे. दुसरी म्हणजे दोन नर समोरासमोर आले की जबडे जास्तीतजास्त उघडून ताणून मीच मोठा हा खेळ खेळतात. मी तुम्ही माबोवर येऊन हा खेळ पाहणार कधी किंवा ओफिसातल्या लोकांचा हाच खेळ हुकणार.
पाणघोडींना असल्या खेळाची आवड नसते. ती ठेवा.

ऋन्मेष आणि Srd >>>>> LOL
Rofl