उद्या वॅलेंटाईन डे आहे. मला सुट्टी आहे. काय करू? तुमचा प्लान काय आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 February, 2020 - 11:48

काल ऑफिसमध्ये अचानक समजले की आमच्या ग्लोबर सर्वर वगैरेचा काही प्रॉब्लेम झाल्याने नेटवर्क शटडाऊन होत येत्या शुक्रवारी सुट्टी मिळणार आहे. आज ती सुट्टी कन्फर्मही झाली. आणि योगायोगाने उद्या संत वॅलेंटाईन डे असल्याने ऑफिसमध्ये एकाच वेळी आनंदाची लहर पसरली तर चिंतेचे वादळ उठले. अविवाहीत मंडळी खुश झाली. पण आम्ही लटकलो. नेहमीसारखा ऊद्याचा दिवस उजाडला असता. डबा घेऊन कामावर गेलो असतो. चंद्र मावळेपर्यंत तिथेच राहिलो असतो. संत वॅलेंटाईन यांचे श्राद्ध उरकूनच घरी परतलो असतो. पण आता उद्या आयता घरी असूनही दिवस लोळण्यात आणि पोरांसोबत खेळण्यात घालवला तर संध्याकाळपर्यंत माझीच समाधी बांधली जाण्याची शक्यता आहे.

आई क्नो, वॅलेण्टाईनच्या पूर्वसंध्येला असे अभद्र बोलणे शोभत नाही. पण लोकहो शक्य झाल्यास प्लान सुचवा...

किंवा एक करा...
तुमचा काय प्लान आहे शेअर करा..
मी तो चोरतो Happy

आणि हो... त्वरा करा !! ....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बायकोला माहिती नसेल. तुम्हाला उद्या सुट्टी आहे तर "फक्त तुझ्यासाठी सुट्टी टाकलीये. आज तु म्हणशील ते करु" एवढंच बोला.. हाकानाका!

बोकलत काही हरकत नाही... माबोवर वॅलेंटाईन साजरा करणारयांची टक्केवारी फार कमी असणार याची कल्पना आहे मला...

तरी कोणी भूतकाळाच्या आठवणीतून काही सुचवले शेअर केले तर आवडेल चालेल ..

बन्या अभिनंदन.. तुम्हाला उद्या काय करायचे याचे टेंशन नाही. काश मी सुद्धा आपल्याच बोटीत असतो

अतरंगी धन्यवाद...
जेवणाचा घरगुती प्लान नुकताच माझ्याही डोक्यात आलेला. काही दिवसांपूर्वी मी मासे तळायला शिकलोय. ते करता येईल. पण मासे आणने धुणे मीठमसाला लावणे सारे आईला करावे लागेल. ईतर मांसाहारात फक्त अंडे उकडता येते. नाही म्हणायला हाल्फफ्राय छान करतो पण बायको ते खात नाही. चिकन मॅगीला मांसाहारात मोजू शकतो का? मोजले तरी ते वॅलेंटाईन डे ला बायकोला बनवून दिल्यास मारणार तर नाही ना??
बाकी मांसाहाराचा हट्ट नसेल तर मला सॅण्डवीच बनवता येते. त्याच धरतीवर पिझ्झा ट्राय करू शकतो.

@ पिंट्या नसेल सोबतीला आता.. त्याचे नुकतेच लग्न झालेय. नवीनच असल्याने आणि फेसबूकवर जुळलेले प्रेमविवाह असल्याने त्याचा वॅलेंटाईन असेल जोरात.

काही दिवसांपूर्वी मी मासे तळायला शिकलोय. ते करता येईल. >>> बायको शाकाहारी आहेना, वाचल्यासारखे वाटतं कुठेतरी.

पिंट्या नसेल सोबतीला आता.. त्याचे नुकतेच लग्न झालेय. >>> वा वा, अभिनंदन, मोठा झाला पिंट्या.

आता या वेळेस नक्कीच तुमचे सेलेब्रेशन चालू असेन.
चांगली सलग तीन दिवस सुट्टी मिळाली असेल तर शाॅर्ट ट्रिप मारून या गेला बाजार अलिबाग ला.
नाहीतर घरबसल्या मैफिल सजवा जुन्या आठवणींची.

बायको शाकाहारी आहेना, वाचल्यासारखे वाटतं कुठेतरी.
>>>
शाकाहारी होती. लग्नानंतर मी मांसाहारी केले. ते सुद्धा तुटून पडणारी केले Happy
पण तिला मांसाहारी स्वयंपाक करता येत नाही. कारण घरून शिकलीच नाही. तिच्या घरचे सारेच शुद्ध शाकाहारी आहेत. कधी घरात कोंबडीचे पीसही उडत ऊडत येत नाही. याऊलट मी घरात ऊडत आलेले कोंबडीचे पीसही सोडत नाही. नो वार नो सणवार वर्षाचे ३६५ दिवस सामिष खाऊ शकतो. पण या बाबतीत चुकीच्या मुलीच्या प्रेमात पडल्याने ३६५ दिवस खाऊ शकत नाही Happy

आता या वेळेस नक्कीच तुमचे सेलेब्रेशन चालू असेन.
>>>>>
सेलेब्रेशन असे नाही. पण मला सरप्राईज गिफ्ट मिळाले. गॉगल्स. ते देखील एक सोडून दोन दोन. अर्थात ईतके एकसायटेड व्हायची गरज नाही. आवडेल तो ठेऊन दुसरा रिटर्न करायचा आहे. घातल्यावर तर मला दोन्ही छान दिसत आहेत. एक जरा डिसेंट लूकचा आहे तर एक जरा टपोरी लूक देणारा... आता उद्या सकाळी सुर्यनारायण उजाडल्यावरच कुठला चांगला जमतो ते समजेल.

बाकी तीन दिवस सुट्टी आहे पण शनवार रैवारचे प्लान फिक्स आहेत. प्रश्न उद्याचा आहे..... आणि आता या गॉगलनी दडपण वाढवले आहे !

लोकांचा प्लॅन माहित नाही पण तुझा प्लॅन हा धागा 100 नेण्याचा दिसतो आहे.
पुढच्या वर्षी हा धागा परत वर येणार. 2023 मध्ये 100 होतील असे वाटत आहे.

नाही च्रप्स मला कल्पना आहे की मी धागा काढायला ऊशीर केला. म्हणून मी धागाच्या भरव्श्यावर न राहता जमवले ऊत्तम Happy
तरी जे प्रतिसाद आले त्यांचे आभार.
शक्य झाल्यास धागा कायमचा कबरीत जाऊ देऊ नका. समाजाला अश्या धाग्यांची गरज आहे. शुभसंध्याकाळ !

राजेण्द्र देवी,
सॉरी फॉर लेट रिप्लाय.. हा लॉनग विकेण्ड जरा बिजी होता.

सर्वात पहिले म्हणजे सुट्टी ऑफिसला होती हे वर खोटे लिहीलेले. त्या दिवशी मुलीचे शाळेत ॲन्युअल फंक्शन होते. त्यासाठी सुट्टी काढली होती. मुलांबाबत त्यांचे प्लान आधी उघड न करण्याची काळजी म्हणून खरे सांगितले नव्हते.

असो. तर त्यामुळे असाही आमचा वॅलेण्टाईन स्पेशलच जाणार होता. आदल्या रात्री बायकोने मला गॉगल्स गिफ्ट दिले. ऑनलाईन शॉपिंग करत दोन मागवले जेणेकरून आवडला नाही तर रिटर्न करता येईल. पण मला एक ॲक्चुअली आवडला. माझ्या आवडीच्या सो कॉलड डॅशिंग टश्शिंग लूकला साजेसा होता. त्यामुळे तिचा सरप्राईज गिफ्टचा प्लान फसला नाही.

दुसरया दिवशी मुलीचा कार्यक्रम झाल्यावर आणि तिनेही तो छानपैकी गाजवल्यावर त्याच खुशीत तरंगत आम्ही तिला सोबत घेऊन मॅकडोनाल्ड गाठले. त्या मॅकडोनाल्डवाल्यांनाही बहुधा आमच्या मूडचा पत्ता लागला असावा. त्यांनी आमचा फॅमिली फोटो काढला. का? कश्यासाठी? त्याचे ते काय करतात याचा पत्ता नाही... पण खोटे का बोला, स्पेशल वाटले Happy

पोरासाठीही मग फ्रेंच फ्राईज पार्सल घेऊन गेलो. तो गरीब बिचारा तेवढ्यातच खुश.
आदल्या रात्री दोननंतर झोपून पहाटे सव्वासहाला उठून सुरू झालेला दिवस, पुन्हा ताजेतवाने व्हायला संध्याकाळी जरा ताणून दिली. मग रात्रीच्या जेवणात आपला वर ठरलेला स्वहस्ते मासे तळायचा पोग्राम होता. पण त्याआधीच तो दिवस अविस्मरणीय झाला असल्याने हे पुढच्या एखाद्या दिवसासाठी शिल्लक ठेवले Happy

ऊपाशी बोका, हे फार मजेशीर आहे बघा...
म्हणजे यात एकीकडे म्हटलेय की मॅकडी वेस्टर्न फूड आहे न्हणून ते भारतीय लोकांना भारी वाटते.
पण तेच यू एस मधील लोकांना ते फार भारी वाटत नाही.

याचीच दुसरी बाजू बघा आता..

यु एस मधील लोकांना ते भारी वाटत नाही म्हणून काही भारतीय लोकं त्यांच्या हा ला हा मिळवत त्याला छान नाही म्हणत आहेत.
म्हणजे या लोकांना स्वत:ची आवड निवड आहे की नाही.. की जे अमेरीकन लोकांना भारी वाटेल त्याला आपणही भारी म्हणायचे आणि जे त्यांना आवडणार नाही त्याला आपणही हसायचे..

मलाही पर्सनली बर्गर फर्गर जंक फूड बोअर होते.
पण माझा आपला एक साधा हिशोब आहे, पोरीला मॅकडीमध्ये जायला आणि तिथे फ्रेंच फ्राईज खायला आवडतात तर जातो. ती पण खुश आणि तिला खुश बघून मी पण खुश. यात कुठल्या अमेरीकन लोकांना मॅकडोनाल्डमध्ये जायला आवडते की नाही आवडत यावरून मी माझ्या मुलीला तिथे न्यायचे की नाही हे ठरवायचे असेल तर खरेच अवघड आहे !

श्री,
लग्न केले पण शब्द दिल्याप्रमाणे गर्लफ्रेंड्शीच केले Happy

सस्मित.
मॅक डी असो वा बर्गर किंग, मुळात बर्गर हाच प्रकार पुरेसा बोअर आहे.
त्यामानाने सबवेवरून सर्व प्रकारचे सॉस टाकून ज्यूसी बनवून काहीतरी ऑर्डर करावे ते छान वाटते.

देवकी धन्यवाद Happy

Pages