उद्या वॅलेंटाईन डे आहे. मला सुट्टी आहे. काय करू? तुमचा प्लान काय आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 February, 2020 - 11:48

काल ऑफिसमध्ये अचानक समजले की आमच्या ग्लोबर सर्वर वगैरेचा काही प्रॉब्लेम झाल्याने नेटवर्क शटडाऊन होत येत्या शुक्रवारी सुट्टी मिळणार आहे. आज ती सुट्टी कन्फर्मही झाली. आणि योगायोगाने उद्या संत वॅलेंटाईन डे असल्याने ऑफिसमध्ये एकाच वेळी आनंदाची लहर पसरली तर चिंतेचे वादळ उठले. अविवाहीत मंडळी खुश झाली. पण आम्ही लटकलो. नेहमीसारखा ऊद्याचा दिवस उजाडला असता. डबा घेऊन कामावर गेलो असतो. चंद्र मावळेपर्यंत तिथेच राहिलो असतो. संत वॅलेंटाईन यांचे श्राद्ध उरकूनच घरी परतलो असतो. पण आता उद्या आयता घरी असूनही दिवस लोळण्यात आणि पोरांसोबत खेळण्यात घालवला तर संध्याकाळपर्यंत माझीच समाधी बांधली जाण्याची शक्यता आहे.

आई क्नो, वॅलेण्टाईनच्या पूर्वसंध्येला असे अभद्र बोलणे शोभत नाही. पण लोकहो शक्य झाल्यास प्लान सुचवा...

किंवा एक करा...
तुमचा काय प्लान आहे शेअर करा..
मी तो चोरतो Happy

आणि हो... त्वरा करा !! ....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्रप्स आयड्या नाही. बर्गरमधले चिकनवड्या खाणे हा माझ्यासारख्या मांसाहारप्रेमींसाठी एक अत्याचारच असतो. मजा नसते त्यात काय. एकवेळ ते अंड्याचे बर्गर परवडले..

Pages