अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप बनवुन हवे आहे

Submitted by चंपक on 13 December, 2019 - 00:07

नमस्कार!

मला शैक्षणिक उपयोगासाठी एक अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप बनवुन हवे आहे. त्यामध्ये साधारण १० जीबी पर्यन्त माहिती साठवली जाईल. पिडीएफ , ऑडिओ, व्हिडिओ अश्या स्वरुपामध्ये माहिती द्यायची आहे.

वर्गवार व विषयवार फोल्डर्स असावेत. फार किचकट डिजाईन नसावी. अशी अपेक्षा आहे.

सदर अ‍ॅप हे विद्यार्थी व पालकांना शक्यतो मोफत द्यायचे आहे, त्यामुळे त्यानुसार बजेट आहे.

किती दिवस लागतील व किती खर्च येईल त्याबाबत क्रुपया त्या क्षेत्रातील जाणकारांनी विचारपुस / इमेल द्वारे संपर्क करावा.

धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न जितका मोठा असतो तितके त्याचे उत्तर छोटे असते. - डॉ. भारत गंगाधर करडक

Listen India App हे ऍप मोफत आहे. एकदा डाऊनलोड केले की पाहिजे ती माहिती आपण वाचू किंवा ऐकू शकता.
१) सन २००६ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचा अभ्यास करताना डॉ. भारत करडक यांना " रेकोर्डिंग केलेली अभ्यासाची महत्वाची पुस्तके ऐकायला " मिळाली तर अभ्यासाचा वेळ वाचु शकेल असे वाटले.त्सन २०१९ साली स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करताना पुन्हा त्याच गोष्टीची गरज त्यांना भासली. अश्या स्पर्धा परिक्षांसाठी राष्ट्रीय पातळीवरील एन सी ई आर टी ने तयार केलेले मुलभुत अभ्यासक्रम महत्वाचे असतात. अन म्हणुन डॉ. भारत करडक यांनी तीच पुस्तके ऐकु येतील अशी व्यवस्था करण्याचे काम सुरुपुस्तकेहा अभ्यासक्रम सर्वच पालक, शिक्षक, विद्यार्थी यांना दैनंदीन अभ्यास व स्पर्धा परिक्षांची तयारी यासाठी कामी येणार आहे. तसेच, सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा वैद्यानिक दृष्टीकोन वाढावा, इतिहास, भुगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आदी विषयांचे मुलभुत ज्ञान मिळावे यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

२) राष्ट्रीय पातळीवरील नीट, जे ई ई, आय आय टी, UPSC या परीक्षांचा अभ्यास करत असताना विद्यार्थी अनेक मोठमोठ्या प्रकाशनाचे प्रश्नसंच वापरतात, नोटस् वापरतात आणि त्यामध्ये स्वतःला हरवून घेतात. हे करत असताना मुळ पाठ्यपुस्तक वाचायचे मात्र राहून जाते.
राष्ट्रीय पातळीवरील नीट, जेईई, आयआयटी, UPSC सारख्या परीक्षा पाठ्यपुस्तकातील संकल्पनांवर आधारित असतात. पाठ्यपुस्तकातील संकल्पना पुन्हा-पुन्हा वाचल्या, ऐकल्या, समजावून घेतल्या तर किचकट वाटणारे प्रश्न सोपे होऊन जातात.

३) राष्ट्रीय पातळीवरील नीट, जे ई ई, आय आय टी, UPSC या परीक्षा एनसीईआरटी सारख्या राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमा वर आधारित असतात. महाराष्ट्रासारख्या राज्यात एनसीईआरटी चा अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध नाही.
ग्रामीण भागांमध्ये एनसीईआरटी च्या पुस्तकांची उपलब्धता कमी आहे. पुस्तके उपलब्ध झाली तरी ती समजावून सांगण्याची यंत्रणा उपलब्ध नाही.

४) विशेषतः विद्यार्थी आणि त्यांचा अभ्यास घेणारे पालक (गृहिणी) यांना एनसीईआरटीच्या पुस्तकातील संकल्पना समजावून घेणे अवघड होते आहे. त्या पालक व गृहिणींसाठी हा उपक्रम उपयुक्त आहे.

५) जे शिक्षक सीबीएसईच्या शाळांमध्ये शिकवतात ते देखील स्वतः स्टेट बोर्ड चे शिक्षण घेतलेले विद्यार्थी असल्याने या राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमाच्या तयारी मध्ये काही प्रमाणात कमी पडतात. म्हणून विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यासाठी एक "सपोर्ट सिस्टम" असावी असा विचार समोर ठेवून ही कल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे.

६) एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळ महत्त्वाचा आहे. कमी वेळात जास्त पुस्तके अनेक वेळा वाचून व्हायला हवीत अशी अपेक्षा असते. हे करताना जर मदतीला Listen India App असेल तर अभ्यास सोपा होईल.

७) आपण जेव्हा पुस्तक समोर ठेवून पुन्हा पुन्हा वाचत राहतो तेव्हा ते पुस्तक आपल्या स्मृतीपटलावर कोरले जाते. ते आपल्या स्मृतीचा भाग बनते. त्यामुळे एक पुस्तक दहा वेळा वाचले आणि एक उदाहरण दहा वेळा सोडवले तर तो अभ्यास पक्का होतो.
Listen India App चे ऑडिओ बुक ऐकताना किंवा यूट्यूब वरील व्हिडिओ बघताना, आपण पुस्तक समोर ठेवून ते ऐकले तर कमी वेळेत अन् कमी श्रमात पुस्तक वाचून होईल. पहिल्या तीन-चार वेळेस पुस्तक समोर ठेवले तर पुढे नुसते शब्द कानावर पडले तरी पुस्तकाच्या कुठल्या भागामध्ये, कुठल्या पानावर, कितव्या पॅरेग्राफ मध्ये ती वाक्य आहेत हे आपल्या लक्षात यायला लागेल. असे अनेकदा केल्यास संपूर्ण पाठ्यपुस्तक लक्षात राहण्यासाठी आणि अर्थ समजून घेण्यास सोपे जाईल.

८) सर्व सामान्य नागरिकाला विज्ञान व नागरिकशास्त्र या विषयांबद्दल माहिती मिळावी यासाठी हे ऍप उपयुक्त ठरेल. जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व प्रशासन व राजकारण याबद्दल योग्य माहिती त्यांना उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे ऍप बनवले आहे.

ज्ञानाधिष्टीत समाजाच्या निर्मिती साठी . . .

Download From Google Play Store On Android Mobile:
https://play.google.com/store/apps/details?id=com.bharat.listenindia&fbc...

#OneNationOnesyllabus #ListenIndia #ListenIndiaApp #ReadWithDrBharatKardak #SuperBharat #DBKAcademy
#DrBharatKardak #DrBharatKardakAcademy #NCERTexplained #PrepareForTomorrow #ForStudentParentTeacher #BigProblemSmallSolution
#NEET #IIT-JEE #UPSC #यूपीएससी #एमपीएससी #MPSC #CET #MHCET #NCERT #CBSE #SSC #HSC #Kardakwadi #KardakwadiFoundation #Newasa #Ahmednagar #Foundation #IITfoundation #8,9,10 Foundation #FoundationCourse #IIT #AIIMS #IITENTRANCE #MEDICALENTRANCE #Agri #Pharmacy #ENTRANCE #NEET #JEE #UPSC#CDS #NDA #IAS #IPS #IFS #MPSC #PSC#PUBLICSERVICECOMMISSION #Parents #HouseWives #Housewife #ScienceEducation #SocialAwareness #PoliticalAwareness #DevelopedNation #ScientificApproach #SocialAwareness #Responsible Citizen #Citizen

Download केलं . लॉगिन केलं.
ओडिओ प्ले कसा करायचा? बटण कोणते?
हिस्ट्री सहावी चे धडे पिडिएफ उघडतात.