न्युटन चा पुनर्जन्म

Submitted by Wiseguru on 5 January, 2016 - 21:11

न्युटन चा पुनर्जन्म
---------------------

गॉड च्या मनात एकदा
एक छान विचार आला
पाठवू या का पृथ्वी वर
पुन्हा एकदा न्युटनला !

पृथ्वी वर म्हणे सध्या
टेक्निकल युग सुरु आहे
डिजिटल इंडियामधे
घराघरात नेट आहे

न्युटनास पाठवावे आधी
इंडियातच हे होईल बरे
स्मार्ट फोन च्या बूम मधे
लावेल दोन शोध खरे

मनी असा विचार येता
गॉड ने निर्णय घेतला
न्युटन ला एकदम
चेन्नईतच पाठवला

चेन्नईत येताच न्युटन
सिनेमा थेटरात घुसला
रजनिकांतचा 'रोबोट'
नेमका त्याने बघितला

रोबोट पाहून न्युटन
अस्सा मनी धसकला
समुद्रात जीव देवून
डायरेक्ट स्वर्गात पोचला

न्युटनला असा पाहून
गॉड जरा दचकला
अरे वत्सा, तू असा
इथे कसा परतला ?

थरथरत न्युटन म्हणाला
हाय हाय तौबा तौबा
नको रे भो तो रजनीकान्त
नकोच तो डिजिटल इण्डिया

अरे कसला हा प्राणी
देवा तू जन्मास घातला
रजनीकान्त कसला
माझा कर्दनकाळ पातला

भौतिकशास्त्राचे नियम सारे
धाब्यावर पूरते बसवले
आबरू चे सारे माझ्या
धिंडवड़े त्याने काढले !

नको देवा पुन्हा आता
मनुष्य जन्मा दाखवू
इंडियाच काय परन्तु
भूवरी न पुनः पाठवू !

(गिरीश देशमुख)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इकडे प्रत्येक हिंदी सिनेमात भौतिकशास्त्र गुंडाळून ठेवतात. शक्ती कपुरला गोळी लागणार असते पण गोळीपेक्षा जास्त वेगाने रजनीकांत मध्ये येऊन शक्तीचे प्राण वाचवतो हा सीन डोळ्यांसमोर आला.