मीच तर गुणगान होते गात त्याचे !

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 January, 2020 - 22:22

विषय काढत राहते पश्चात त्याचे
नाव येते त्यामुळे ओठात त्याचे

दुःख रिचवत पचवले आघात सारे
षडरिपू होते तरी कह्यात त्याचे

ज्या क्षणी मिसळायचे डोळ्यात डोळे
गुपित ऐकू यायचे मौनात त्याचे

गच्च डोळे मिटुन रस्ता पार करते
धावतो हातात देण्या हात त्याचे

केवढे उपकार केले अनुभवांनी
पांग फेडू कोणत्या जन्मात त्याचे ?

बेशकिमती दागिना चोरीस गेला
मीच तर गुणगान होते गात त्याचे !

पाहिजे आहे तुझा मक्ता तुझ्यावर ?
नाव घेणे सोड तू स्वप्नात त्याचे

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

अप्रतिम खूपच आवडली
ज्या क्षणी मिसळायचे डोळ्यात डोळे
गुपित ऐकू यायचे मौनात त्याचे>> हे तर बे sss स्स्ट आहे

विषय काढत राहते पश्चात त्याचे
नाव येते त्यामुळे ओठात त्याचे

नाव घेणे सोड तू स्वप्नात त्याचे>>> हे विशेष आवडले

छान!