मेहुणींना बर्थ डे गिफ्ट काय देऊ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 January, 2020 - 15:03

जगातले सर्वात कर्मकठीण काम म्हणजे बायकोला काय गिफ्ट द्यावे असे आपल्याला वाटत असेल तर तुमच्यावर अजून मेहुणीला गिफ्ट द्यायची वेळ आली नसणार हे नक्की..
मला सुदैवाने दोन मेहुण्या आहेत. जुळ्या आहेत. त्यामुळे वाढदिवस एकाच दिवशी येतोय. तो दिवस तोंडावर आला तरी काय द्यावे ते अजून ठरत नाहीये.

आजवर कधी मी माझ्यातर्फे त्यांना गिफ्ट दिले नाही. माझ्या बायकोने दिले. भले ते माझ्याच खिश्यातून पैसे काढून दिले असले तरी तिचे तिनेच ठरवून दिलेय. माझ्या मताला कवडीचीही किंमत दिली नाहीये.

तर आता मला मेहुणींना गिफ्ट का द्यायचेय?

कारण् मला त्या दोघींनी आजवर न चुकता बड्डे गिफ्ट दिल्या आहेत. माझे बड्डेही पुढाकार घेत सेलिब्रेट केले आहेत. म्हणजे केक आणने, सरप्राईज डेकोरेशन करणे, माझ्या बड्डेच्या दिवशी पिकनिक प्लान करणे, त्यासाठी ऑफिसला सुट्टी टाकणे अश्या गोष्टी केल्या आहेत.
मागे एक मेहुणी परदेशात गेली असताना मला तेथील महागडे ब्रांडेड घड्याळ आणले होते. महागडे म्हणाल तर त्या किंमतीचे घड्याळ घेणे तर दूर मी कधी तसा विचारही केला नसता.
नुकतेच गेल्या महिन्यात दोघी पर्यटनाला परदेशात गेल्या होत्या तेव्हा पुन्हा मला तिथून बरेच ब्रांडेड कपडे वगैरे आणले होते.

त्यामुळे यंदा मलाही वाटतेय की बायको नेहमीप्रमाणे त्यांना जे देईल ते देईल. पण मलाही माझ्यातर्फे त्यांना काहीतरी द्यायला हवे. कदाचित त्यांनाही वाटत असेल की आपले ईकलौते जिजू आपल्याला आजवर काहीच कसे देत नाहीत...

मायबोलीवर गिफ्टबाबत छान सल्ले मिळत असल्याने डेअरींग करत हा तसा जरा पर्सनलच धागा काढत आहे. प्लीज तितकेच सिरीअसली घ्यात सल्ले द्या. आणि लवकर द्या...

तर साधारण मदत सल्ले असे हवे आहेत.

१) गिफ्ट अर्थातच त्यांच्यासाठी सरप्राईज राहील. बायकोला या कटात सामील करेन वा न करेन.

२) दोघींना सेमच हवे. नंतर एकीपेक्षा दुसरीला चांगले असे लफडे नकोत.

३) गिफ्टला कुठला रोमांटीक ॲंगल नको. म्हणजे बायकोला वा गर्लफ्रेंडलाच शोभावे असे गिफ्ट नकोत. उगाच माझ्या संसारात राडा व्हायचा.

४) दोघींच्या गिफ्टचे मिळून टोटल बजेट २ हजारापासून १० हजारापर्यंत पकडू शकता.

तळटीप - मी आजवर ऑनलाईन शॉपिंग केली नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना... मलाही असंच वाटलं. Happy छान दिलीस हो भेट.
ड्रेसचे फोटो हवेतच...कारंण बायकांना ड्रेस, साड्या, दागिने असले फोटो बघायला आवडतात. वर्णनावर भागत नाही. Happy

मस्त गिफ्ट्स.

मला मात्र हातरुमाल ट्रेलर असणार आणि पिक्चर तो अभि बाकी है मेरे दोस्त वाटलं.

छोटी मुलं स्वतःच्या हाताने केलेलं ग्रीटिंग देतात , छोटं काही गिफ्ट देतात त्याची तुलना मात्र कशाशीही होऊ शकत नाही. माझी छोटी भाची पण करून देते घरात सर्वांना, मला देते तेव्हा काय वाटतं ते शब्दात नाही सांगू शकत.

त्यामुळे अर्थात छोट्या भाचीचं जास्त कौतुक, तिने कित्ती अनमोल गिफ्ट्स दिली दोन्ही मावश्याना.

छोटी मुलं स्वतःच्या हाताने केलेलं ग्रीटिंग देतात , छोटं काही गिफ्ट देतात त्याची तुलना मात्र कशाशीही होऊ शकत नाही.

+ ७८६

त्यातील ग्रीटींगचा फोटो काढला. गिफ्ट हॅम्परचा काढायचा राहिला. तसेच ड्रेस पर्स वगैरे कश्याचाच नाही काढला. आता काढायला गेलो तर मारतील Proud दोन्ही केकचे फोटो मात्र काढले. ते ईथे किंवा आजचा मेनू धाग्यावर टाकू शकतो..

तुर्तास हा पोरीच्या ग्रीटींग कम लेटरचा फोटो .. या लेटरच्या मागच्या बाजूस तिचे आणि मावश्यांचे चित्र होते.

सुरुवात भारी होती... फॉर माय हिरोईन्स Proud

FOR MY HEROINES
APPU AND ARCHU
I LOVE YOU MY AND RUNU'S MAU. I LOVE YOU. HAPPY BIRTHDAY.
HAVE A NICE DAY WITH US.
I LOVE TO DO ACTIVITY WITH YOU MY MAU.
I WILL GIVE YOU A NICE GIFT.

छान आहे. Happy
बरं राहु दे ड्रेसचा फोटो. Happy

गोड! Happy

एवढा आटापीटा करुन शंभरी नाहीच ओलांडली धाग्याने.
>>>>
तुमची हि स्वत:ची पोस्ट ९९ व्या क्रमांकाची होती. त्यानंतर मी रिप्लाय देताच १०० झाले असते. तरीही धागा शंभरी ओलांडणार नाही असा आत्मविश्वास तुम्हाला कसा आला? काही तांत्रिक दोष होत तुम्हाला कमी प्रतिसाद दिसत होते का?

असो, धाग्याला टीआरपी मिळाला तर माझे मन सुखावतेच हे सत्य आहे. पण हा धागा जर हजार पोस्टचा झाला असता तर त्यातून माझ्या कामाच्या पोस्ट वेचणे आणखी त्रासदायक झाले असते. त्यामुळे अश्या धाग्यांवर किती पोस्ट येतात यापेक्षा ऊपयुक्त किती येतात आणि सरतेशेवटी आपला हेतू साध्य होतो का हे महत्वाचे. तर तो हेतू साध्य झाला आणि यासाठी सर्वांचेच आभार Happy

एवढा आटापीटा करुन शंभरी नाहीच ओलांडली धाग्याने.
>>>>
तुमची हि स्वत:ची पोस्ट ९९ व्या क्रमांकाची होती. त्यानंतर मी रिप्लाय देताच १०० झाले असते. तरीही धागा शंभरी ओलांडणार नाही असा आत्मविश्वास तुम्हाला कसा आला? काही तांत्रिक दोष होत तुम्हाला कमी प्रतिसाद दिसत होते का?

असो, धाग्याला टीआरपी मिळाला तर माझे मन सुखावतेच हे सत्य आहे. पण हा धागा जर हजार पोस्टचा झाला असता तर त्यातून माझ्या कामाच्या पोस्ट वेचणे आणखी त्रासदायक झाले असते. त्यामुळे अश्या धाग्यांवर किती पोस्ट येतात यापेक्षा ऊपयुक्त किती येतात आणि सरतेशेवटी आपला हेतू साध्य होतो का हे महत्वाचे. तर तो हेतू साध्य झाला आणि यासाठी सर्वांचेच आभार Happy

एवढा आटापीटा करुन शंभरी नाहीच ओलांडली धाग्याने.
>>>>
तुमची हि स्वत:ची पोस्ट ९९ व्या क्रमांकाची होती. त्यानंतर मी रिप्लाय देताच १०० झाले असते. तरीही धागा शंभरी ओलांडणार नाही असा आत्मविश्वास तुम्हाला कसा आला? काही तांत्रिक दोष होत तुम्हाला कमी प्रतिसाद दिसत होते का?

असो, धाग्याला टीआरपी मिळाला तर माझे मन सुखावतेच हे सत्य आहे. पण हा धागा जर हजार पोस्टचा झाला असता तर त्यातून माझ्या कामाच्या पोस्ट वेचणे आणखी त्रासदायक झाले असते. त्यामुळे अश्या धाग्यांवर किती पोस्ट येतात यापेक्षा ऊपयुक्त किती येतात आणि सरतेशेवटी आपला हेतू साध्य होतो का हे महत्वाचे. तर तो हेतू साध्य झाला आणि यासाठी सर्वांचेच आभार Happy

ऋन्मेष गिफ्ट मस्तच . मावश्यांसाठी पिल्लू ने किती गोडुलं कार्ड बनवले आहे. खूपच आवडले.
गॉड ब्लेस हर Happy

अहो ऋन्मेष तुमच्या धाग्यावर किती प्रितीसाद यावेत याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही हो. तसेही या धाग्यामुळे मला 'सुचवलेल्या गोष्टींना शंभर प्रकारे नकार कसा द्यावा' हे समजले.

त्वरा करा त्वरा करा ..शेवटचे दोन तीन दिवस
आयड्याजचा महापूर येऊ दे.धाग्याची शंभरी होऊ दे..
तुम्हाला तुमच्या मेहुणीजची शप्पथ.. तुम्ही कोणाच्या मेहुणी असाल तर त्या नात्याचा वास्ता.. माझ्यासाठी आता मायबोली हाच एक रास्ता _/\_
Submitted by ऋन्मेऽऽष on 31 January, 2020 - 09:10

हा तुमचाच प्रतिसाद आहे. म्हणून वाटले की गिफ्ट काय घ्यावे यापेक्षा तुम्हाला प्रतिसाद शंभरी कधी गाठतायेत यात रस असावा. असो. तुम्ही धमाल केलीच असेल. तुमच्या मुलांनी दिलेले गिफ्ट एक नंबर आहे. आहा हा!

ऋन्मेषचे मला या धाग्यावर कौतुक वाटले की तो, मस्त सर्वांना खेळवत होता.किंबहुना सर्व गोष्टींची मजा घेत होता.तरीही त्याचा खेळकर अप्रोच या धाग्यापुरता आवडला.

ऋन्मेष भावा तू खऱ्या भावनेतून धागा काढला होता. मी त्याला आटापिटा संबोधणार नाही.
Submitted by अरुणकुमार शिंदे on 5 February, 2020 - 01:25
>> मी हा प्रतिसाद मागं घेत आहे. कुणी दुखावलं गेलं असेल तर क्षमामागतो.

सामी, मानवमामा, ॲमी, देवकी, अरुणकुमार, हरीहर सारे धन्यवाद..

@ हरिहर, अहो मी वाद नाही घालतेय तुमच्याशी. ईट्स ओके.

@ धागा शंभरी ॲण्ड ऑल तर आता हा धागा पुर्णत्वाला आलाय तर ईथूनही आपण सारे याला भरकटवून २०० च्या घरात नेऊ शकतो. ५० तुम्ही टाका ५० मी टाकतो. हाकानाका Happy

सामी, मानवमामा, ॲमी, देवकी, अरुणकुमार, हरीहर सारे धन्यवाद..

@ हरिहर, अहो मी वाद नाही घालतेय तुमच्याशी. ईट्स ओके.

@ धागा शंभरी ॲण्ड ऑल तर आता हा धागा पुर्णत्वाला आलाय तर ईथूनही आपण सारे याला भरकटवून २०० च्या घरात नेऊ शकतो. ५० तुम्ही टाका ५० मी टाकतो. हाकानाका Happy

दिलं का रे?
>>
हो थोडे मागच्या पानावर वाचा.. वृत्तांतच लिहीला आहे Happy

वावे अर्थ माहीत नाही. कदाचित अर्थ नसेलही. कदाचित असा शब्दच अस्तित्वात नसेल. मला फक्त डुआयडी काढायला कॅची नाव पाहिजे होते. आणि तो शब्द मराठी शब्दकोषातला हवा असा हट्टही नव्हता. त्यामुळे जे सुचले ते ठेवले.

पुढे हे नाव मला आणि माझ्या बायकोलाही आवडले असल्याने मुलाला ठेवले Happy

नावाचा अर्थ काय किंवा नावाला अर्थ तरी हवा यावरून बाकी घरात घमासान झाले.. पण मी बाकी कोणाला एंटरटेन केले नाही Happy

मानव Lol
शिवाय ण् च्या पुढे म् आल्याने पाणिनीच्या नियमानुसार ञम्त्व संधी होऊन ण् चा न् झाला.

गूड.
मावश्या एकदम डिट्टो दिसतात हा. तुम्हाला कळत असेल म्हणा फरक.

सस्मित मी तीन वर्षे घेतली ओळखायला. त्या वयाने लहान असताना अजून सेम होत्या. आणि मी कधी विशेष प्रयत्नही करायचो नाही त्यांना ओळखायला. जेव्हा माझी पोरगी दोघांमधील फरक आरामात ओळखू लागली तेव्हा मला लाज वाटली. आणि मग मी ओळखायचा प्रयत्न करून ओळखू लागलो.

ह्म्म. माझ्या दिराला आहेत दोघी जुळ्या. फरक आहे दोघींच्या चेहर्‍यात. पण बाहेरच्या कुणाला तरीही सेमच वाटतात.
आम्हा घरच्यांना कळंत कोण कोण आहे ती. Happy

Yes सस्मित +१, माझ्याही शाळेत असताना जुळ्या मैत्रिणी होत्या,बाकी कुणाला फरक कळायचा नाही त्यांच्यात पण सतत सोबत राहून मला मात्र आजिबात साम्य वाटायचं नाही त्यांच्या चेहऱ्यात

जे लोक चटकन ड्युआयडी ओळखतात त्यांचा साठी काय अवघड आहे जुळ्यातील कोण कोण ते ओळखणे.

आणि काही लोक तर नसलेले ड्युआयडीज ओळखतात त्यांना नसलेले सुद्धा जुळे वाटत असावे.

{{{ फरक आहे दोघींच्या चेहर्‍यात. पण बाहेरच्या कुणाला तरीही सेमच वाटतात.
आम्हा घरच्यांना कळंत कोण कोण आहे ती. }}}

मेरी आवाजही पहचान है... असं नाही का त्यांच्यात?

फोटो कुठे आहे.
>>>
फेसबूकवर... तुमचा अभिषेकच्या Happy
ईथली बरेच लोकं आहेत तिथे. काहींना आधीपासून हे ऋन्मेष प्रकरण माहीत होते. पण कोण उगाच चर्चा करायचे नाही ईतकेच Happy

मागे तुम्ही भन्नाट भास्कर नावाने एका ड्युआयडीचे मनोगत (ऋन्मेष) असा धागा काढला होता त्यावर काहींनी लिहिले की मला वाटते तुमचा अभिषेक म्हणजे तुम्हीच.तर तुम्ही उत्तर देण्याचे नाकारले होते.हा पहा धागा
https://www.maayboli.com/node/66381
मग ऋन्मेष id परत कधी वापरायला काढला? भन्नाट भास्कर नसावा हल्ली.आता हे समजले की फेसबुकवर Runmesh Thakur,तुमचा अभिषेक(मिसळपाववर पण आहे बहुतेक) आणि मायबोलीवर ऋन्मेष,भन्नाट भास्कर हे सर्वजण एकच आहेत.

जुना धागा पुन्हा वर काढतोय.

यावेळी वेगळीच समस्या आहे.
एक मेहुणी ईथे आहे तर एक अमेरीकेला.

त्यामुळे आता गिफ्ट एकीलाच घ्यावी का किंवा दोघींना घ्यावी.... आणि घ्यावी तर काय कशी हे समजत नाहीये.
अमेरीकेला आहे तिची गिफ्ट घेऊन ती भारत भेटीला येईपर्यन्त ठेवून घ्यावी का हा एक पर्याय आहे.
किंवा ऑनलाईन तिथल्या तिथेच तिला मिळेल हे बघावे हे समजत नाहीये.
कारण परवडायला सुद्धा हवे.. मेहुणी अमेरीकेत डॉलरमध्ये कमावत आहे, माझा पगार रुपयातच येतोय..

बाकी इथले आधीचे प्रतिसाद कामात येतील.

पंजाबी ड्रेस मटेरियल १ छान गिफ्ट आहे ऋन्मेष.. साईज चा प्रश्न नाही..ड्रेस कधीना कधी घालतातच मंदिरात वगैरे.

त्यांच्या आवडीचा पण प्रश्न आहे, बायको मदत करू शकेल चॉईस ला.

हो, धन्यवाद आशू
ड्रेस किंवा मटेरीअल हा पर्याय काही सुचले नाही की असतोच.
त्या दोघीही वाढदिवसाला एकमेकींना ड्रेस गिफ्ट करतात ही त्यांची परंपरा आहे Happy

>>>अमेरीकेला आहे तिची गिफ्ट घेऊन ती भारत भेटीला येईपर्यन्त ठेवून घ्यावी का हा एक पर्याय आहे.
ती परत येइल तेव्हा सगळं उट्टं भरुन काढा असा सल्ला देइन.
आता उगाच खर्चात पडू नका.

Pages