मेहुणींना बर्थ डे गिफ्ट काय देऊ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 January, 2020 - 15:03

जगातले सर्वात कर्मकठीण काम म्हणजे बायकोला काय गिफ्ट द्यावे असे आपल्याला वाटत असेल तर तुमच्यावर अजून मेहुणीला गिफ्ट द्यायची वेळ आली नसणार हे नक्की..
मला सुदैवाने दोन मेहुण्या आहेत. जुळ्या आहेत. त्यामुळे वाढदिवस एकाच दिवशी येतोय. तो दिवस तोंडावर आला तरी काय द्यावे ते अजून ठरत नाहीये.

आजवर कधी मी माझ्यातर्फे त्यांना गिफ्ट दिले नाही. माझ्या बायकोने दिले. भले ते माझ्याच खिश्यातून पैसे काढून दिले असले तरी तिचे तिनेच ठरवून दिलेय. माझ्या मताला कवडीचीही किंमत दिली नाहीये.

तर आता मला मेहुणींना गिफ्ट का द्यायचेय?

कारण् मला त्या दोघींनी आजवर न चुकता बड्डे गिफ्ट दिल्या आहेत. माझे बड्डेही पुढाकार घेत सेलिब्रेट केले आहेत. म्हणजे केक आणने, सरप्राईज डेकोरेशन करणे, माझ्या बड्डेच्या दिवशी पिकनिक प्लान करणे, त्यासाठी ऑफिसला सुट्टी टाकणे अश्या गोष्टी केल्या आहेत.
मागे एक मेहुणी परदेशात गेली असताना मला तेथील महागडे ब्रांडेड घड्याळ आणले होते. महागडे म्हणाल तर त्या किंमतीचे घड्याळ घेणे तर दूर मी कधी तसा विचारही केला नसता.
नुकतेच गेल्या महिन्यात दोघी पर्यटनाला परदेशात गेल्या होत्या तेव्हा पुन्हा मला तिथून बरेच ब्रांडेड कपडे वगैरे आणले होते.

त्यामुळे यंदा मलाही वाटतेय की बायको नेहमीप्रमाणे त्यांना जे देईल ते देईल. पण मलाही माझ्यातर्फे त्यांना काहीतरी द्यायला हवे. कदाचित त्यांनाही वाटत असेल की आपले ईकलौते जिजू आपल्याला आजवर काहीच कसे देत नाहीत...

मायबोलीवर गिफ्टबाबत छान सल्ले मिळत असल्याने डेअरींग करत हा तसा जरा पर्सनलच धागा काढत आहे. प्लीज तितकेच सिरीअसली घ्यात सल्ले द्या. आणि लवकर द्या...

तर साधारण मदत सल्ले असे हवे आहेत.

१) गिफ्ट अर्थातच त्यांच्यासाठी सरप्राईज राहील. बायकोला या कटात सामील करेन वा न करेन.

२) दोघींना सेमच हवे. नंतर एकीपेक्षा दुसरीला चांगले असे लफडे नकोत.

३) गिफ्टला कुठला रोमांटीक ॲंगल नको. म्हणजे बायकोला वा गर्लफ्रेंडलाच शोभावे असे गिफ्ट नकोत. उगाच माझ्या संसारात राडा व्हायचा.

४) दोघींच्या गिफ्टचे मिळून टोटल बजेट २ हजारापासून १० हजारापर्यंत पकडू शकता.

तळटीप - मी आजवर ऑनलाईन शॉपिंग केली नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटफ्लिक्सचे वर्षभराचे subscription दे.
तीन जणांत ते शेअर करता येते. तिघी बहिणी मिळून शेअर करतील, तुलाही बघता येईल.

शूज दे.
१. बायकांना शूज फार आवडतात म्हणे.
२. कुठल्याही बजेटमध्ये मिळतात.
३. शूज मध्ये काही रोमँटिक नसतं म्हणून ती बाजू सेफ.
४. त्यांना आवडले नाहीत तर त्या त्याच शूज नी तुला बडवू शकतात म्हणजे घेतलेल्या वस्तूचा अगदीच उपयोग झाला नाही असं व्हायला नको.

मानवमामा, नेटफ्लिक्स ॲमेझॉन वगैरे आहे तिन्ही बहिणींकडे. माझ्याशीच शेअर करत नाहीत. आणि नसते तरी हे असे गिफ्ट मला देणे मला रुचत नाही. गिफ्टला आकार ऊकार वस्तुमान हवे ना...

अरुणकुमार मी त्यांना कधी फोटोतही सायकल चालवताना पाहिले नाही.
बाई चान्स जर त्यांना चालवताच येत नसेल तर त्यांना बसवून मलाच ती ढकलावी लागेल.
बाई दवे, व्हाई बीटवीन साईकल ओनली? येनी स्पेशालिटी? आई क्नो ओनली ॲटलास्ट साईकल Happy

कनिका, आपण सहसा गिफ्टची किंमतही साण्गत नाही, त्यावरचा प्राईज टॅगही काढून फेकतो. मग असे आधीच सांगणे की अमुकतमुक ते तमुक अमुकमध्येच घ्यायचेय हे रुचत नाही. माझे स्वत:चे असे कित्येकदा होते की चार हजारापर्यंत शूज घ्यायचे हे बजेट ठरवून जातो पण आठचे मनात भरले तर मन मारण्यापेक्षा घेतो ते सरळ. त्यांचेही असे झाले तर.. मग माझे लो बजेट गिफ्ट त्यांना नाराज करेल Sad

आपले ते हे शूज चांगला पर्याय आहे. विचार करतो. ट्रेकिण्गला ऊपयुज्त पडतील असे शूज देऊन मग ट्रेकिंगही प्लान करता येईल...

असो... नुकताच व्हॉटसपवर हा मेसेज वाचला

_____

रात्रपाळी करून सकाळी साडे नऊ वाजता प्रकाश घरी आला. आल्या आल्या त्याने हिरव्या पानाची पुडी बायकोच्या - प्रतिभाच्या हातात दिली.

प्रतिभा : "हे काय ?"
प्रकाश : "अगं, गजरा आणलाय तुझ्यासाठी."

तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि नंतर बाहेर पाहिलं.

प्रकाश : "बाहेर काय बघतेस ?"
प्रतिभा : "सूर्य कुठून उगवला ते बघतेय."
प्रकाश : "असं काय करतेस, सूर्य पूर्वेलाच उगवलाय."
प्रतिभा : "तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलाय मला वाटलं पश्चिमेला उगवलाय की काय ?"
प्रकाश (लाडात येत) : "कधी वाटलं बायक़ोला गजरा आणावासा तर आणू नये काय?"
प्रतिभा : "आजपर्यंत कधी आणला नव्हता म्हणून आश्चर्य वाटलं. खरंखरं सांगा आज कसा काय आणावासा वाटला हो गजरा ?"
प्रकाश : "खरं सांगू का ? एक गजरा विकणारी लहान मुलगी "घ्या घ्या" म्हणून मागेच लागली म्हणून मग घेतला."
प्रतिभा : "तरीच!"

******
साडे दहाच्या सुमाराला प्रतिभाच्या धाकट्या बहिणीचा, उर्मिलाचा फोन आला.

उर्मिला : "ताई कशी दिसतेय मी ?"
प्रतिभा : "काय वेडबीड लागल़ंय का तुला, उर्मि? फोनवर कसं दिसणार मला तू कशी दिसतेस ते ?"
उर्मिला : "म्हणजे ? तू व्हाटस्एप पाहिलं नाहीस ?"
प्रतिभा : "नाही."
उर्मिला : "अगं, मी फोटो पाठवलाय माझा. काय आहे, आज आमच्या ऑफिसमधे पूजा आहे. मी साडी नेसून आलेय."
प्रतिभा : "असं,होय. बघते मी नंतर ."
उर्मिला : "बघ बघ. अगं त्यात मी गजरे माळलेयत ना ते मला भावोजींनी घेऊन दिले सकाळी. मला ते स्टेशन बाहेर भेटले. मला म्हणाले, 'उर्मे, एवढी साडी नेसलीयस तर गजरा नाही का माळायचा? आणखी छान दिसशील.' "
मग त्यांनी पन्नास रुपयांचे तीन गजरे घेतले. मी म्हणाले, "मला तिन तिन काय करायचेत, मी दोन माळते, एक ताईला घेऊन जा."

( पुढील कथानक कुणी तरी पूर्ण करावे. माझी हिंमत नाही. )

How will you know shoe size?
>>>
मी रोज जातो त्यांच्या घरी. चेक करेन त्यांचे शूज

@ मन्या. व्हॉटसपवरच वाचले असेल. तिथूनच चॉपीपेस्टलेय

व्यक्ती चित्रण चांगले करतोस म्हणून,..
सीता न गीता दोघींबद्दल तुला जे वाटते ते एका कागदावर खरडून त्यांचे फोटो डकवून, खाली परी आणि खर्या ॠ कडून ही सही करून घे.
ते कागद फ्रेम करून दे.
ताजे ताकः तुझ्या वाईट सवय ६ चा अती वापर महागात पडू शकतो. त्यामुळे काळजी घेणे. Rofl

तुझ्या हातची चव चाखवू शकतोस. रात्री बाराला केक कापल्यानंतर मॅगी खाऊ घाल. मदतनीस म्हणून पिंट्याला बोलावलेस तर कमीत कमी पातेल्यातली उरलीसुरली मॅगी त्याला खाऊ घालणे. Wink

चित्र आणि डायलॉग हे गिफ्ट माझी मुलगी देईलच.
मी दिले पत्र तर राडा होईल.
कितीही सपक लिहिले तरी ते लव्हलेटर म्हणून गणले जाईल..

माझ्या हातचे खाऊ घालायची आयड्या छान आहे. पण ते सेलिब्रेशन झाले. गिफ्ट नाही.

कनिका, आपण सहसा गिफ्टची किंमतही साण्गत नाही, त्यावरचा प्राईज टॅगही काढून फेकतो. मग असे आधीच सांगणे की अमुकतमुक ते तमुक अमुकमध्येच घ्यायचेय हे रुचत नाही. माझे स्वत:चे असे कित्येकदा होते की चार हजारापर्यंत शूज घ्यायचे हे बजेट ठरवून जातो पण आठचे मनात भरले तर मन मारण्यापेक्षा घेतो ते सरळ. त्यांचेही असे झाले तर.. मग माझे लो बजेट गिफ्ट त्यांना नाराज करेल Sad>>>>मग पुस्तके best.आता एक काहीतरी final करावेच लागेल ना

मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पावणे. दुनियादारी पिच्चरची सीडी गिफ्ट दे.
>>>>>
तरीच बोल्लो अजून कोणी हा डाईलॉग कसा नाही मारला.. असो नो सीडी नो दुनियादारी.. एक चॉकलेट बॉय पुरेसा आहे.. दोन नको

याचं कारण काय असावं.?
>>>
ईमेज !
माझी नाही तर समस्त पुरुषजातीची आणि भावोजी मेहुणी या नात्याची

मग पुस्तके best.आता एक काहीतरी final करावेच लागेल ना
>>>>
हो फायनल करत आहे.. काही शॉर्ट लिस्ट केले आहे.. अजूनही लास्ट मोमेण्टपर्यंत चांगला पर्याय शोधणे चालू आहे. जे काही देईन परवा ते ईथे नक्की सांगेन Happy

आताही मी आधी बाहेर पडून वडापाव पार्सल घेतले. रिक्षात बसताच बायकोच्या हातात एक गरमागरम वडापाव ठेवला. ती ही खुश. तिच्या आवडीचा आहे. एक फेमस दुकान आहे समोर. मॉर्निंग वॉल्कला जाणारयांची चिक्कार गर्दी असते. बायकोने एक संपवताच दुसरा हातात ठेवला. बायको डबल खुश. आणि आता ईंटरवलला ९० रुपयांचे दोन समोसे आणि दिड दोनशे रुपयांचे सॅंडवीच घ्यावे लागणार नाही म्हणून मी ट्रिपल खुश. त्यात मुंबईत पडलेली "कडाक्याची" थंडी मदतीला धाऊन आली. कोकाकोलाचाही बेत रद्द झाला. एकंदरीत आपल्या मातीतला चित्रपट लाह्या आणि मराठमोळा वडापाव खाऊन साजरा झाला.
>>> अरे हा एवढा चिक्कू.... आहे. बायकोवर खर्च करायला दहादा विचार करतोय. आणि हा मेव्हण्यांना गिफ्ट देईल? वेळ जावा म्हणून हवा करत असावा. Wink

अरे हा एवढा चिक्कू.... आहे. बायकोवर खर्च करायला दहादा विचार करतोय. आणि हा मेव्हण्यांना गिफ्ट देईल?

नवीन Submitted by अरुणकुमार शिंदे on 1 February, 2020 - 14:08
>>>>>
Rofl
घर की मुर्गी दाल बराबर. (तो पक्का मांसाहारी आहे)
साली आधी घरवाली. यहा तो सीता गीता है.

घरवाली, घरवाली के जगह होती है. साली साली की जगह. Wink

थ्रीडी चित्रपटांच्य तिकीटांवर २२०+२२० = ४४० रुपये खर्च प्लस येऊन जाऊन रिक्षाचे १०० आणि चित्रपट संपल्यावर पुन्हा मॅक डीमध्ये केलेल्या खादाडीचे ४०० रुपये प्लस सकाळचे वडापाव जोडल्यास असे टोटल हजार रुपयाचा केलेला खर्च लोकांना दिसत नाही.
पण अव्वाच्या सव्वा किंमत लावलेले पॉपकॉर्न खाणे टाळले तर माणूस चिक्क्कू होतो. याच शिक्क्याला घाबरून तर काही जण ते महागडे पॉपकॉर्न विकत घेत नसतील ना?

पण अव्वाच्या सव्वा किंमत लावलेले पॉपकॉर्न खाणे टाळले तर माणूस चिक्क्कू होतो. याच शिक्क्याला घाबरून तर काही जण ते महागडे पॉपकॉर्न विकत घेत नसतील ना?

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 1 February, 2020 - 16:43
>>>><
मिळाला नवीन धाग्याचा विषय Wink

Wink

चिक्कू
विचारी लोक असा विचार विचार करणार नाहीत.
१००० रुपयाला एक समोसा असू ध्या तो घेता येईल.
पण त्या समोस्यचा उत्पादन खर्च ८०० रुपये असावा.
इथे समोसा ५ रुपयाचा आणि विक्री किँमत १००, रुपये.
सरळ सरळ मूर्ख बनवतात आणि काही मूर्ख परत मूर्ख बनतात

ते लोक तुम्हाला बळजबरी करतात का? तुम्ही सिनेमा बघता की खाता? खाता खाता बघता की खाता खाता बघता? सिनेमा फार्तर तीन तासांचा असतो. तेवढा काळ काही खाल्लं नाही तर कुणी मरणार नाही,पण बाकीचे चॅवमॅव करत आहेत म्हणता लाळ सुटत असावी. दहा रुपयांचा समोसा मी शंभर रुपये देऊन घेणार नाही ( अपवाद पंचतारांकित हॉटेल) असा निर्धार हवा आणि स्वत: वर विश्वास हवा.

असा निर्धार हवा आणि स्वत: वर विश्वास हवा.
>>>

अरे काय हे..
आणि हा निर्धार नी दाखवला तर मग माझे कौतुक करायचे सोडोन नला चिक्क्कू काय म्हणत आहात... एकतर घोडा बोला किंवा चतुर बोला

ओक्के ओक्के.

चतुर घोडा.

कित्ती ग बाई तू हूश्शार!!! कित्ती ग बाई तू हूश्शार !!!!

कापूस कोंड्याची गोष्ट कंटीन्यू

आणि हा निर्धार नी दाखवला तर मग माझे कौतुक करायचे सोडोन नला चिक्क्कू काय म्हणत आहात... एकतर घोडा बोला किंवा चतुर बोला
>> मी तर चतुर भामटा बोलेन. तुझ्या दूरदृष्टीचं कौतुक करावे तितके थोडेच आहे. अगोदरच वडापाव चारुन बायकोचं पोट भरायची आयड्या करणं वगैरे फार मुत्सद्दीपणाचं लक्षण आहे. तू खरं तर राजकारणात यायला पाहिजेल. चाणक्याला आऊट करशील सहज.

पेट्स द्या. किंवा दोघीत मिळून एकच पेट द्या. दोघींना मिळून एका पेटची काळजी घेणे सोपे आणि सोयीचे राहील.

जर्मन शेफर्ड पपी किंवा पर्शिअयन मांजर तुमच्या बजेटमध्ये बसेल.

छान प्रस्ताव बिपीन चंद्र..
अर्थात ज्यांना द्यायचेय त्यांना पेटची आवड / ईच्छा आहे का हे पहावे लागेल, पण हा सुद्धा छान पर्याय आहे.

मी पण वाचायला/पहायला आले होते. सांग बाबा एकदा काय दिलं ते अन आता कुणाचा वाढदिवस आय मीन कुठल्या नातेवाईकाचा वाढदिवस/लग्न/मुंज/बारसं...

आज देणार आहे.
रात्री दिल्यावर सांगतो. ईथून खबर लीक व्हायला नको.
काल रात्री बाराला सहकुटुंब त्यांच्या घरी धाड टाकत केक कापून पहिला राऊंड साजरा झाला.
काल माझ्या मुलीने त्यांच्या मावश्यांना गिफ्ट आणि ग्रीटींग दिले. आज आम्ही देऊ... पण मुलीने जे दिले त्याने त्यांना जास्त आनंद झाला असणार

तर फायनली आपल्या सर्वांच्या

तर फायनली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मेहुणीज जन्मदिन सोहळा संपन्न झाला.

त्यातील गिफ्ट पुराणाबद्दल थोडक्यात,
आदल्या रात्री पावणेबारा वाजता सहकुटुंब त्यांच्या घरावर धाड घातली. आधीच ही बातमी लीक झाली असल्याने ती भेट सरप्राईज झाली नाही. पण त्या भेटीत दिलेली भेटवस्तू मात्र सरप्राईज होती.

पहिला मान मावश्यांच्या लाडक्या भाचीचा. मुलीने दिवसभर मेहनत घेत एक ग्रीटींग बनवले होते. मावश्यांचे एक चित्र काढले होते. काही शोभेच्या वस्तू जमवल्या होत्या. आपल्या पिगीबॅंकमधील काही चिल्लरही त्यात ओतली होती. हे असे सगळे एकत्र करून त्यांना छान गिफ्ट व्रॅप केले होते. आणि या सोबत आम्ही केकही घेऊन गेलो होतो.

दुसरया दिवशी म्हणजे काल मुख्य बड्डे सोहळ्याला आणखी एक केक घेऊन पुन्हा त्यांचा दरवाजा ठोठावला. आता गिफ्ट द्यायची पाळी आमची होती. केक कापायच्या आधी बायकोने त्या दोघींच्या हातात प्रत्येकी एक मोठे रंगीत पुडके ठेवले. त्यांनी आपापले पुडके उघडले. त्यात त्यांना आणखी एक बॉक्स सापडला. तो देखील कौतुकाने उघडला. त्यात आणखी एक बॉक्स सापडला. तो वैतागत उघडला. त्यात आणखी एक, त्यात आणखी एक , असे करत ओरीजिनल मोठ्या पुडक्याचे रुपांतर चपट्या पुठ्याच्या खोक्यात झाले. आणि फायनली त्यातून एक पैश्याचे पाकिट म्हणजे रिकामे पैसे ठेवायचे वॉलेट बाहेर आले. एव्हाना त्या हातात धत्तुरा लागतो की काय अश्या अवस्थेला पोहोचल्या होत्या. त्यामुळे त्यांना ते छोटेसे गिफ्टही फार आवडले. निदान त्यांनी तसे दाखवले तरी..

लगोलग मी सुद्धा एक एक चपटे पाकीट त्या दोघींच्या हातात सरकावले. म्हटलं हे माझ्यातर्फे...
त्यांनी डोळे विस्फारून त्याचा स्विकार केला. त्यातून रंगीत हातरुमाल बाहेर आले. छान डिजाईन होती. त्यांना आवडले. मुळात आपले जिजू आपल्याला गिफ्ट देत आहेत हिच भावना त्यांना आश्चर्याने ठार करणारी होती.

गिफ्ट छोटे असो वा मोठे ते देणारयाची भावना महत्वाची असे म्हटले जाते. बरेचदा लोकं हे औपचारीकपणेच म्हणतात. पण काल मी हे खरोखर अनुभवले.

मग आम्ही केक कापला. नाचगाणे दंगामस्ती रुटीन सेलिब्रेशन झाले. जेवायच्या आधी बायकोने पुन्हा आपली पोतडी उघडली. आणि पुन्हा दोन मोठाले पुडके बाहेर काढले. पण आता त्यात कोणता छळ नव्हता. त्यातून दोन मोठाल्या पर्स बाहेर आल्या. आधीचे छोटे बटवे फक्त ट्रेलर होते. हा खरा पिक्चर होता. ते ही छान होते. हे तर फारच छान होते. दोन्ही बहिणींनी अत्यांनंदाने आपल्या ताईला कचकचून मिठी मारली. आणि ईथे माझा चेहरा पडला....!

काय रे, तुला काय झाले असे तोंड पाडायला. एक जुजबी चौकशी झाली माझी...
आणि मी म्हणालो, हे काय यार हिने दोन दोन गिफ्ट दिले. एक छोटे आणि एक मोठे.. आणि माझे फक्त छोटेच..

ईटस ओके जिजू... गिफ्ट देणे महत्वाचे वगैरे बोअर डायलॉग मारून माझ्या सांतवनाचे प्रकार सुरू झाले..

ते काही नाही.. असे म्हणत मी सुद्धा मग त्वेषात उठलो आणि दोन पिशव्या मी सुद्धा माझ्या पोतडीतून बाहेर काढल्या. त्यातून सिंड्रेलापेक्षाही सुंदर असे दोन छान छान ड्रेस निघाले. त्या दोघींनी पुन्हा आनंदाने नाचत आपल्या ताईला एक कचकचून मिठी मारली. भेटवस्तू कोणी दिली आणि गळाभेट कोणाला असे थोडे झाले मला.. पण त्यामागच्या भावना महत्वाच्या असे म्हणून मी मनाची समजूत काढली. आणि अश्याप्रकारे आमचा भेटवस्तू देवाणघेवाण सोहळा संपन्न झाला Happy

तळटीप - चारपैकी कुठल्याही गिफ्टचे फोटो काढले नाहीत. ते ऊचित वाटले नाही. तुम्हीही कोणी प्लीज मागू नका. तरी कोणाला वाटल्यास आपला अविश्वास दाखवायचा हक्क बजावू शकता Happy

अरे हो, सर्वांचेच विशेष आभार....
आम्ही ईतक्या छान छान कल्पक गिफ्ट सुचवल्या पण या मेल्याने टिपिकल ड्रेस दिले असे कोणाला वाटले तर सॉरी ईन ॲडवान्स..
मी विचार केला की यावेळी मी गिफ्ट देणार आहे हाच त्यांच्यासाठी सरप्राईज फॅक्टर होता. तर गिफ्टमधील कल्पकता पुढल्यावेळेसाठी राखून ठेऊया Happy

Pages