Submitted by अस्मि_ता on 22 January, 2020 - 04:58
Mazya eka maitrinicha call ala hota tevha tine sangital ki college madhala amacha ek Mitra depression madhe gela ahe. Pan apan depression madhe ahot he kas kalat? Ti mhanali tyach laksh lagat navhat kadhat , khup emotional zala hota. Me internet var search kela. Ani mala asa vatayla lagal ki hyatale kahi symptoms mala pan janvtat. Please kuni hya vishyavar prakash takel ka?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिली गोष्ट म्हणजे इन्टरनेटवर
पहिली गोष्ट म्हणजे इन्टरनेटवर वाचुन स्वतःच्या अथवा इतरांच्याही बाबतीत काही निष्कर्ष काढु नका. फार प्रॉब्लेम वाटत असेल तर एखाद्या फॅमिली डॉक्टरला भेठुन मन मोकळे करा आणि त्याने काही सल्ला दिलाच तर मग पुढील सोपस्कर करा.
बादवे, झी मराठीच्या शिरेल्स बघायला सुरु करा म्हणजे डिप्रेशन पासुन ४ हात आपोआपच लांबच रहाल. आपल्यापेक्षा त्यांच्या शिरेलितले प्रॉब्लेम्स खुप रंजक असतात..
डिप्रेशन म्हणजे नवीन आयडीने
डिप्रेशन म्हणजे नवीन आयडीने येवुन तात्काळ मित्र, ऑफीस अशा जनरल बाबींवर (लगेच शंका न येण्यासारख्या विषयांवर) मायबोलीवर मराठी येत असताना विंग्रजीत लिहुन रतीब लावल्याने असणार्या स्भासदांना जे येते ते डिप्रेशन.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/71013 इथ पहा
प्रकाश घाटपांडे>> dhanyawad
प्रकाश घाटपांडे>> dhanyawad
दुसऱ्याचे चांगले पाहून होणारी
दुसऱ्याचे चांगले पाहून होणारी आपली वाईट अवस्था??
@अस्मिता, तुम्हाला आणि
@अस्मिता, तुम्हाला आणि घरातल्यांना देखील तुमच्या खाण्यापिण्याच्या, झोपण्याचा सवयींमधे बदल, उगाच होणारी चिडचिड किंवा आवडत्या आपल्या माणसांत असुनही एकट वाटण असे बदल जाणवत असतील तर आधी family doctor ला भेटा. त्यांच्याशी बोला त्यांनी सजेस्ट केल तरच सायकायट्रिस्ट आणि सायकोलिस्ट ची मदत घ्या.
वरचा डिप्रेशनचा राधानिशा यांचा लेख वाचा. त्याची मदतच होईल.
All the best..
आयडी फेक आहे हे गृहीत धरून
आयडी फेक आहे हे गृहीत धरून प्रतिसाद देण्यापेक्षा ते न देण्याचा पर्याय ऊत्तन आहे.
डिप्रेशनवर माबोवर खूप सुंदर माहिती उपलब्ध आहे. लोकं देतील शोधून. किंवा तुम्हीही शोधा
मात्र मानसोपचारतज्ञ म्हणून शोधू नका. अन्यथा हजार धागे दिसतील ज्यात कोणीतरी कोणालातरी मान्सोपचारतज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला असेल.
तुमचे लेख वाचुन वाचकच
तुमचे लेख वाचुन वाचकच डिप्रेशनमध्ये जातील असं दिसतं.
डाॕक्टर - डिप्रेशनच्या
डाॕक्टर - डिप्रेशनच्या पेशंटला - तुम्हाला काय त्रास आहे....?
लेडी पेशंट - सर, उलट सुलट विचार येतात, थांबतच नाहीत ....
डाॕक्टर - कसले विचार येतात...?
लेडी पेशंटः- जसे कि मी इथे आल्यापासून येथे एकही पेशंट आला नाही...तर मी विचार करू लागले की , डाॕक्टरांच्याकडे एक पण पेशंट नाही आला ,मग तुमची कमाई कशी होईल, घर कसं चालणार, शिक्षणाला येवढा पैसा खर्च केला , आता काय होईल ....हाॕस्पीटल बांधायला पण खूप पैसा लागला असेल , मग कर्ज कसं फेडणार ...?
एक दिवस तुम्ही आत्महत्या तर नाही करणार ना...!
अशा प्रकारचे विचार येतात ....
हे ऐकून आता डाॕक्टर डिप्रेशन मध्ये आहेत.
.
.
.
मूड हलका करण्यासाठी लिहिलेय, कृपया हलकेच घ्या...
साधनाताई
साधनाताई

(No subject)
(No subject)
(No subject)
बाई दवे,
डिप्रेशनच्या विनोदावर तुम्हाला हसायला येते वा येत नाही ही तुम्हाला डिप्रेशन आहे की नाही हे ओळखायची कसोटी ठरेल का?
ऋन्मेऽऽष>> Dhanyawad
ऋन्मेऽऽष>> Dhanyawad
मन्या ऽ>> Dhanyawad
मन्या ऽ>> Dhanyawad
डिप्रेशनच्या विनोदावर
डिप्रेशनच्या विनोदावर तुम्हाला हसायला येते वा येत नाही ही तुम्हाला डिप्रेशन आहे की नाही हे ओळखायची कसोटी ठरेल का?>>>>
कसल्या प्रकारचे हसू येते त्यावर अवलंबून.
हम तुझसे मूहबत करके सनम
हसते भी रहे रोते भी रहे
गाणारा नायक तोंडाने हसतेभी रहे म्हणत असला तरी रडत गात असतो...
माबोवर काही आयडींची उपस्थिती
माबोवर काही आयडींची उपस्थिती पाहून काही आयडींना नैराश्श येत्ये. मग अमका तमका आयडी विकृत आहे असं (रड) गाणं गायला लागतात. त्यांचे मानलेले भावू बहीनी लगेच सांत्वनासाठी पळत येतात.
अस्मि_ता : तुम्ही मनोविकार
अस्मि_ता : तुम्ही मनोविकार तज्ञांना भेटल्यास ते तुमची परीक्षा घेउन तुमचे शंकानिरसन करू शकतील. आजार असेल तर औषधे देतील, नसेल तर तुमची शंका तरी दूर होइल.
तुमच्या ऑफिसच्या धाग्यावर सुद्धा मी तुम्हाला भास होत आहेत का हे तपासा अस म्हणल्याच आठवतय. तुमच्या एकंदर प्रश्नांवरून तुम्ही तज्ञांना भेटण गरजेच आहे.
शुभेच्छा.
विक्रमसिंह +१
विक्रमसिंह +१
लवकरात लवकर तज्ञांना भेटा. हयगय करू नका.
सई केसकरचा मन कशात लागत नाही हा लेखदेखील वाचा.
तुम्ही इंटरनेटवर पाहिले आहे
तुम्ही इंटरनेटवर पाहिले आहे म्हणताय. मग डिप्रेशन हि खूप मोठी व्याप्ती असणारी मनोवस्था आहे हे तुमच्या लक्षात आले नाही का? गुगल वर Depression शोधल्यास पहिल्या एक दोन लिंक येतात (.org) त्यातच खूप सारी माहिती आहे कि हो.
डिप्रेशन चे रुग्ण अबोल होतात, प्रसन्न व नीटनेटके राहण्यासाठी आपण नेहमीच्या ज्या गोष्टी करतो त्या न करण्याकडे त्यांचा कल वाढतो, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सवयीमध्ये प्रचंड अनियमितत येते, डिप्रेशनचे बहुतांश रुग्ण विमनस्क होतात, कामावर/शाळा/कॉलेजमध्ये गैरहजर राहण्याचे त्यांचे प्रमाण खूप वाढते, नातेसंबंध सांभाळणे त्यांना कठीण जाते... इत्यादी इत्यादी अनेक लक्षणे दिलेली आहेत.
केवळ लक्ष न लागणे आणि इमोशन होणे म्हणजे डिप्रेशन म्हणता येईल का शंकाच आहे. अर्थात याबाबत इथे चर्चा करण्यापेक्षा डिप्रेशन वर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे कधीही चांगले.
डिप्रेशन ही सिरियस व्याधी आहे
डिप्रेशन ही सिरियस व्याधी आहे. डॉक्टरांकडे जा.