दीर्घ आजारातून, सर्जरी नंतर बरे होतांना तुम्ही काय काय केले?

Submitted by प्रशि_क on 7 January, 2020 - 01:53

जेव्हा तुम्ही अगदी २ ३ महीने घराच्या बाहेर निघालेले नसता, तेव्हा तुमचे अनुभव एकदम नगण्य होऊन जातात त्या काळापुरते तरी. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात बोअर व्हायला लागतं. लिखाण करणारे असाल तर, लिहायला ही काही विषय सुचत नाहीत. आता माझ्याबाबतीत सुद्धा असेच होत आहे, काहीतरी व्याधी झाली आणि मी २ महीने नुकतेच पूर्ण केले, कशाचे- घराच्या बाहेर पाऊल न टाकण्याचे. आणि, आयुष्य एवढे कंटाळवाने वाटू लागले आहे की बस्स!

सारखी तिच माणसं सारखी तेच चेहरे पाहून कंटाळा आलाय. घरचे लोकं सर्वच व्यवस्थित काळजी घेत आहेत माझी पण एका जागी बसून आणि फक्त निवडक पावले तेही घरातल्या घरात चालने आणि मग पुन्हा अंथरूनावर जाणे हाच काय तो दिनक्रम.

त्यातही काही मुली मैत्रिणी आहेत ज्या मला किंवा मी त्यांना अधुन-मधून फोन लावायचो आता ती सुद्धा सोय नाही. घरच्या समोर कसं बोलणार? त्यामुळे मन खट्टू करून चाललेत दिवस रेटनं. प्रकृतित सुधार होतोय, डॉक्टरांनी सांगीतलंय आणखी एक महीना लागणार.
आता आणखी एक महीना काढायचा.

तर या लेखाच्या निमित्ताने जाणून घ्यायला आवडेल की आपण कधी अशा दीर्घ आजारातून, सर्जरी किंवा इ काही व्याधीतून गेले असल्यास तुमचा वेळ कसा घालवला, तुमच्या त्या एकाकी पणाचा मनावर काय परिणाम झाला वगैरे.

Group content visibility: 
Use group defaults

वाचन आणि अभ्यास. करमणुकीच्या वाचनासोबतच आपला एखादा आवडीचा विषय / नवा कुठला विषय शोधून त्याचा अभ्यास करायचा: उदा. आहारशास्त्र, मानसशास्त्र, उत्क्रांती(हा विषय निवडणारे असंख्य असतात), भारतीय सिने संगीताचा प्रवास - यात विविध गायक, संगीतकार यांचा अभ्यास.. असंख्य विषय सापडतील.

माझे हर्निया चे ऑपरेशन झाले त्याचा अनुभव आहे.
भूल दिल्या नंतर ऑपरेशन पूर्ण होण्या पासून नंतरचे काही तास माणूस परावलंबी असतो.
स्वतः विषयी कोणतेच निर्णय स्वतः घेवू शकत नाही,शरीराची हालचाल,स्वतः करू शकत नाही.

भूल उतरल्या नंतर भयंकर वेदना.
माझी अर्धांगिनी बरोबर होती म्हणून सर्व वेदना सहन करण्याची ताकत आली.
नंतर टाके सुके पर्यंत खूप अस्पष्ट भविष्य असते .
कधी ही जखम चिखळू शकते.
आणि ह्या काळात दुसरे कोणतेच विचार मनात येत नाहीत.

एखादा ऑनलाईन लर्निंग कोर्स करा जो पुढे उपयोगी पडेल.वेळही जाईल आणि बुद्धीला खाद्य मिळाल्याने कंटाळा जाऊन उत्साही वाटेल.

वाचन करा. खुप चांगली चांगली पुस्तके वाचायची राहीली असतील, तर वेळ कारणी लावा.

लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा!

वाचनाऐवजी एखादा मागे पडलेला आणि बसल्याजागी करता येऊ शकणारा छंद जोपासु शकता..
Internet surfing किंवा games आहेतच सोबतीला..

घरात पालेभाज्या- शेंगा-भाज्या निवडून चिरणे, लसूण सोलणे, फळे सोलून-कापून ठेवण अशी काम करा, कधी न खाल्लेली variety खायला मिळेल.
ऑल the best for fast recovery

सध्याची आरोग्य स्थिती, मानसिक स्थिती काय आहे आणि वैयक्तीक आवड ह्यावर अवलंबुन आहे.
१. वाचन (ह्याचा नंतर फार फायदा होतो, शिवाय प्रचंड पर्याय उपलब्ध आहेत)
२. बैठे खेळ खेळणे /शिकणे (बुद्धीबळ , केरम)
३. चित्रकला
४. गिटार
५. गाणी ऐकणे
६. सिरीज पाहणे (फ्रेंड्स, बिग बँग , इतर काही जुन्या सिरीज)
आणि वर सुचवल्याप्रमाणे ऑन लाईन कोर्सेस.
अर्थात हे सगळं मानसिक स्थितीवर भयंकर अवलंबून आहे (आजारी असताना बहुतेक वेळा ही चांगली नसते). हे चांगलं असेल तर भरपूर पर्याय आहेत.

नवऱ्याचं मागच्या मार्च मध्ये हर्निया चं ऑपेरेशन झालं.
आम्ही अमेझॉन वर movie पाहायचो.
पण तो बऱ्याच वेळ आरामच करायचा.
वाचनाची आवड असल्यास पुस्तके वाचू शकता.
आवडत्या नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांना घरी बोलवू शकता एखादे दिवशी. आजारपणात कोणी येऊन भेटल्यास बरे वाटते आणि वेळही चांगला जातो.

सर्वांचे आभार खूप छान छान सल्ले दिले. मागेच काही पुस्तके खरेदी केली होती, पण ती कपाटात तशीच पडून होती. आता वाचायला घेतली आहे.

>>>>मागेच काही पुस्तके खरेदी केली होती, पण ती कपाटात तशीच पडून होती. आता वाचायला घेतली आहे.>>> लवकर बरे होण्याकरता आपल्याला शुभेच्छा.

तीन महिने आजारपणामुळे घरी होतो.
पहिले पंधरा दिवस हाल झालेले. मग रिकवर होऊ लागलो. चांगली गोष्ट म्हणजे मुलीला दिड महिने सुट्टी पडली. सकाळी माझी स्थिती फार बेकार असायची. मळमळ जळजळ डोके गरगरायचे. पचनशक्ती खराब झालेली. वीकनेस असायचा. ईम्युनिटीची आयमाय झालेली. ऑफिसमध्ये जाऊन काम करावे ईतकी ताकद नव्हती. पण घरातली छोटीमोठी कामे करायचो. पोरीला संध्याकाळी आंघोळ घालायचो आणि फिरायला न्यायचो. रोजच. तिला ऊंदडू द्यायचो मी तिच्यावर लक्ष ठेवत आराम करायचो. तिचे फोटो काढायचो. पण ते कुठे अपलोड करायचो नाही. कारण ऑफिससाठी मी आजारी होतो. प्रत्यक्षात ही संध्याकाळ मला रिफ्रेश करून जायची. पण हे पटवणार कोणाला. दोन महिने गेले मग अंगातली ताकद वाढली. परीस्थिती सुधारली. मुलीची शाळा सुरू झाली. सकाळी स्कूलबस असूनही मी स्वत: तिला सोडायला जायचो. तिला बेस्टच्या बसने जायची क्रेझ होती. तिची ती हौस महिनाभर पुरवली. सकाळच्या हवेत मलाही छान वाटायचे. येताना हलकाफुलका नाश्ता घेऊन यायचो. ईटली डोसा वडासांबार वगैरे. खाऊन पुन्हा ताणून द्यायचो. या तीन महिन्यांच्या काळात माझा तीन महिन्यांचा मुलगा सहा महिन्यांचा झाला. त्याच्याशी त्या वयात छान बॉन्डींग जमली. आयुष्याच्या एका चांगल्या टप्प्यावर आजारपणानिमित्त का असेना पोरांसोबत होतो. त्यामुळे हा काळ मला चांगला वाटतो. घरी असूनही आणि अंगात पुरेशी ताकद अन वेळ असूनही मी सर्वच सोशलसाईटपासून दूर होतो. मायबोलीही बंद झालेली. त्यानंतरही मग कमीच झाली. हल्ली साधारण दिडेक वर्षांनी पुन्हा हळूहळू ईथे सक्रिय होत आहे.

मला वर ऋ चा १ प्रतिसाद ५ वेळा दिसत आहे. शेवटची ओळ दिड वर्षाने सक्रिय होतो आहे अशी आहे तर सुरवात ३ महिने घरी होतो अशी आहे.
३×५ =१५ म्हणजे १.२५ वर्ष झाले. Rofl

मला वर ऋ चा १ प्रतिसाद ५ वेळा दिसत आहे.
>>>
बहुधा माझे आजारपणाचे वाचून तुमचे डोळे भरून आले असावेत म्हणून ५ दिसत असावेत.. या सहवेदनेबद्दल. धन्यवाद पाफा

हो.. आता मलाही ५ दिसल्या :क्षमस्व: माबोची जागा बॅण्डविड्थ की काय म्हणतात ते वाया घालवले त्याबद्दल Sad

काय हे
ऋन्मेसह (तुझ नाव मराठी मध्ये लीहणे हे एक मोठं कामाचं आहे)

राजेश पण आपण चॉपी पेस्ट न करता प्रयत्न केले हे मला आवडले.
माझे नाव मी असे लिहितो ऋन्मेष RnmeSha .. कॅपिटॉल आर थेट ऋ मध्ये बदलला जातो माझ्या कीबोर्डवर Happy आयुष्य खूप सिंपल आहे आपण उगाच कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो...

येनीवेज
@ धागा... आजारपणानंतरही आयुष्य जमेल तितके सिंपल ठेवा. हे सिंपल जगणे जमण्यासाठीच आयुष्याने तुम्हाला हा आजारपणाचा ब्रेक दिला असतो.