पहीली भेट

Submitted by सामो on 20 December, 2019 - 15:14

परदेशी नागरिकत्व मिळूनही, भारताबद्दल अतूट प्रेम वाटते, किंबहुना या भूमीवरती पाऊल ठेवले की भरून येते. इथे ना कधी उपरेपणा जाणवला ना जाणवेल. किती का पाश्चात्य संस्कृती अंगवळणी पडलेली असू देत, पण या जागेबद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल जो जिव्हाळा वाटतो तो अवीट आहे व तसाच राहील .
मुलगी ३ वर्षांची असताना आम्ही अमेरिकेत गेलो त्यापश्चात, यावेळेला मुलीबरोबर पहिली भारतवारी केलेली. म्हणजे तिच्याकरता पहिली. खूप anxiety होती की तिला हि भूमी कशी वाटेल , तिला आवडेल का, ममत्व वाटेल का? अर्थात आवडेल ना आवडेल त्यात मला काहीच say नव्हता, तो सर्वस्वी तिचा वैयक्तिक अनुभव होता. पण तरीही!

आणि काय आश्चर्य मुलीला भारत देश पहिल्यांदा पाहूनच , अतिशय आवडून गेला. तिच्याच शब्दात सांगायचे झाले 'तिला surreal वाटले". काहीतरी ओळखीचे पण हातात धरू पाहाताही चिमटीतही ना येणारे, काहीतरी illusive . तिला इथली झाडे, पक्षी , लोक, गर्दी सारे काही आवडून गेले. आणि हे सर्व तिच्या मनात मी काहीही भरविले नसताना.आपणहोऊन हा जो आपलेपणा वाटला याला काय म्हणावं. आणि तरी अजून तर बेस्ट ऑफ कंट्री yet टु सी. कोकण, केरळ, गोवा, दक्षिणेतील मंदिरे , राजस्थान काहीकाही पाहिलेले नाही.
दर वेळेला इथे आलं की गलबलून येतं. इथे आपलेपणा वाटतो. इथे आपण फक्त ब्लेंडच होत नाही तर I belong here - हे आवर्जून लक्षात येते.
coming बॅक टु रुटस म्हणजे काय हे अनुभवायला, आधी आपली मूळे उखडून, दूर वेगळ्या परक्या वातावरणात स्वतः:ला रुजवावे लागते नंतरच हे सुख अनुभवता येत असो.
मुलीच्या हृदयाला तिच्या मातृभूमीच्या घातलेली ही साद मला कशी वाटते सांगू. अज्ञेय यांच्या शब्दात-
>>>> वह सोने की कनी जो उस अंजलि भर रेत में थी जो
--धो कर अलग करने में--
मुट्ठियों में फिसल कर नदी में बह गई--
(उसी अकाल, अकूल नदी में जिस में से फिर
अंजलि भरेगी
और फिर सोने की कनी फिसल कर बह जाएगी।)>>>>>
काळाच्या प्रवाहात कधीतरी उन्हात चमचमणारी सोन्याची बांगडी हाताला लागते काय आणि हातात धरेधरे स्तोवर ती विखरून परत नदीत विखरून जाते काय. तसे झालेले आहे. उन्हाने लाटांवरती निर्माण केलेली ही बांगडी ना कधी धरता येईल परंतु , एका क्षणी ती तशी illusively का होईना हातात आली, हेही नसे थोडके.
हे क्षण नाही धरून ठेवता येणार पण ते तसे निर्माण झाले, अनुभवता आले, हेच इतके मोठे आहे. तिला वाटलेला हा जिव्हाळा, माझयाकरता, अत्यंत सुखद धक्का आहे. कोणी सांगावे, आमच्या पश्चातही.पुन्हापुन्हा, ती घरट्याकडे झेपावत राहिला. फक्त देशाकडे एक स्थान, ठिकाणं, या दृष्टीने नाही तर मनातील जागा, एका हळवा कोपरा, एक चिंतन, तिची मूळे, तिच्या values म्हणूनही. मी अतिशय आनंदात आहे की तिला एकदा तरी देश दाखवता आला, तिच्याबरोबर.
____________________________________
२२ डिसेंबररला, रात्री ९ ला एकविरा दर्शन झाले. अत्यंत निवांत. कोणीच नाही.देऊळ बंद व्हायला आल्याने, फक्त आम्हीच. मनसोक्त वेळ दर्शन घडले.खाली येताना, किर्र काळोख आजूबाजूला पण पायवाटेवरती बंद होत जाणाऱ्या दुकानांचे दिवे. फारच मजा आली. नाना प्रकारची मंगळसुत्रं - माशाचं पदक, माणीकमोत्यांच्या कलाकुसरीची पदके, मोत्याच्या घोसांची पदके. काय काय व्हरायटी. माझ्या मैत्रिणींकरता काही ना काही घेता आले. मग तांब्याचे कडे, गोमेद मणी, कवड्या. मुलीला हे सर्व अनोखे होते, एक्सायटिंग होते. तिने नानाविध एथनिक वस्तू, तिच्या मैत्रिणींकरता घेतल्या. फुलपाखरासारखी भिरभिरत होती मुलगी. एक कवडी विकत घेतली. (तंत्र मार्गात, कवडी ची उभी चीर ही योनीचे प्रतिक मानली जाते. जसे शिवलिंग तशी देवीची कवडी. असे वाचल्याचे स्मरले) माझ्या देवघरात ठेवेन बहुत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं.
लेकीचे आश्चर्य वाटले.कारण ओळखीच्या बऱ्याच पालकांची परिस्थिती तुझ्यासारखी असते.अमेरिकन नागरिकत्व पण जीव अजून भारतात रमलेला.पण त्यांची मुले ethe यायला नाखूष होती.मोठे झाल्यावर तर अजिबात येणार नाही म्हणतात.एकाअर्थी त्या पिढीचे बरोबर आहे.

मायभूमीचे प्रेम परभूमीवर गेल्यावरच खरे जाणवते. एक ओढ वाटत रहाते या भूमीची.
मला अशी शंका आहे की मायबोलीवरचे कार्यरत असलेले सदस्य जास्तीकरून भारताबाहेरील असावेत. त्याना समाजात मिसळण्याचा, कुणाशी तरी बोलण्याचा आनंद मिळत असावा इथे आल्यावर.

सामो
फार भारी वाटलं वाचून मस्त मस्त