Submitted by Happyanand on 20 December, 2019 - 10:23
चुरा सांडता शब्दांचा
कागदावरती अंकुर फुटते..
झंकार उठतो शब्दांचा ओठांवरी
कागदावरती कविता उमटते..
प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला
रडण्यासाठी खांदा देते,.
वळण चुकलेल्या मुसाफिराला
वाटेवरी नेवून सोडते,.
पहाटे जावूनी
पारिजातकास फुलवते..
मग हळूच निसटते तेथूनी ही
ओंजळ भरुनी मोगरा वेचते..
माळते हळूच तिच्या केसांत
आणि नाव तिथे त्याचे सांगते..
प्रियकराची व्यथा सारी
ती शब्दात मांडते..
घेवूनी बाजू त्याची
ती जावुनी तिच्याशी भांडते..
कधी शब्दांच्या धुक्यात हरवते....
कधी रसिकाच्या मनात हरवते....
झंकार उठतो शब्दांचा ओठांवरी
कागदावरती कविता उमटते.
.
.
.
.
–Anand
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच! आवडली..
मस्तच! आवडली..
आवडली छान आहे
आवडली छान आहे
धन्यवाद मन्या, राजेंद्र देवी…
धन्यवाद मन्या, राजेंद्र देवी…..