ऑफिस मधे झोप येत असेल तर काय करावे

Submitted by वेडोबा on 17 December, 2019 - 04:47

धाग्यावर विनोदी प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. आत्ता भयंकर झोप येत असल्यामुळे धागा उघडला आहे. कृपया या गहन समशेवर उपाय सुचवावा. गंभीर प्रतिसाद अमलात आणले जाणार नाहीत Rofl

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनोळखी लोकांना स्माईल द्या, पण बोलायला थांबू नका. ऑफिसबॉय सोबत राजकारणावर गप्पा मारा. मोठ्याने पांडुरंग हरी वासुदेव हरी म्हणा

मला जेव्हा झोप येते तेव्हा मी अर्धा कप कॉफी पिते. कॉफी पॅन्ट्रीमधे जाउन स्वतः बनवून घेते.
किंवा एखादं बिस्किट खाते.
लिफ्ट पर्यंत दोन तीन फेर्‍या मारते.
नाहीतर सरळ खाली जाउन गार्डन मधे दोन तीन फेर्‍या मारते. उन पाहिलं की फ्रेश वाटत.
मला दिवसभर उन दिसणार पण नाही ऑफिसात बसले की. Sad

का नाही. करायचा. नवी प्रथा पाडायची.
बॉसला पटवून द्यायचं, नाही झोप काढली तर उरलेला अर्धा दिवस कामात नीट लक्ष लागणार नाही, चुका होतील. त्यापेक्षा अर्धा तास झोप काढली तर नंतर फ्रेश होऊन नीट काम करत येईल, प्रोडक्टीव्हिटी वाढेल. आवाजात ऑथॉरिटी टाकून, गांभीर्य ओतून नीट पटवून द्यायचं. बॉसही डुलकी घ्यायला सुरुवात करेल अर्धा तास.

एक काम करा. तुम्हाला झोप आली की जाऊन बाॅसच्या तोंडावर ग्लासभर पाणी मारा. आख्खा दिवस ऑफिसमध्ये कुणालाच झोप येणार नाही मग. शिवाय याचे पुण्य तुम्हालाच मिळेल. (हसरी बाहुली)

अर्धा तास झोप पुरेल का पण?>>
आपापल्या निद्राक्षुधेनुसार वेळ टाका. (मीठ चवीनुसार स्टाईल. मी पाकृ लिहिली आणि कढईभर भाजीला पाव चमचा मीठ असं लिहिलं तर तुम्ही पाव चमचाच टाकणार का? आपल्या लवणक्षुधे नुसारच टाकणार ना. तसंच.)

<<<पूर्ण न होण्याची असं हवय Lol
पाणी मारायची आयड्या पण भारी.. हाहा.. बॉस च्या तुपकट परोश्या दिसणारं तोंड जरा फ्रेश होईल >>
आणि मबो चालू असतंच अधे मधे... आजकाल विनोदी लेखन येईना ना नवीन... म्हणून मीच धागा काढला Proud

वाद निर्माण करणारं email साहेबाला किंवा सहकार्‍यांना पाठवावं आणि वाद घालण्यासाठी खडबडून जागं व्हावं.

मला झोप आली की मी झोपतो. कोणी सिनिअर वा बॉसने पकडले तर बोलतो जरा तब्येत बरी नव्हती, डोके दुखतेय मळमळतेय वगैरे... त्याने वर सहानुभुतीही मिळते.. तेच झोप येत होती सांगाल तर चढाच्ढी होते.

संस्कृतमध्ये एक सुभाषितही आहे ना.. शिंक जुलाब आणि झोप अडवू नये, नाहीतर उसळून बाहेर येते असे काहीसे..

त्या ठिकाणचं वातावरण कंटाळवाणं असल्यानेच झोप येत असणार. दुकानात/ बँकेत कसे लोक येत जात असतात. झोप येणारच नाही.

नेहमी जाड फ्रेमचा चष्मा वापरावा. तो एका विशिष्ठ पधतीने डोळ्यावर ठेवला की डोळे उघडे आहेत की बंद ते नीट कळत नाही.
मग काय "चितन मग्न" होऊन जायाच नि काय !!!

Pages