स्फुट - जातीअंत

Submitted by बेफ़िकीर on 31 May, 2018 - 03:56

स्फुट - जातीअंत

मांगीरबाबासाठी केलेला शिरा मातंगांसोबत

आणि झबरनाथाला कापलेला बोकड 'दगड वडारांसोबत' खाऊनही

माझे ब्राह्मण्य जाता जात नाही आणि जातीयवादी असल्याचा शिक्काही पुसला जात नाही

मोलकरणीने घासलेली भांडी,
पाणी ओतून घरात घ्यायची माझी आजी!

मराठयांच्या मुलांसोबत तर खेळत नाहीस ना, विचारायची माझी आई

पण, शिंपी, सोनार, न्हावी मित्रांनी माझे बालपण शिवले, सोनेरी केले आणि सेटही केले

मुंजीचे वर्ष सोडले, तर कार्य आणि आईचे चौदा दिवस सोडून अंगात जानवे घातले नाही

पंचवीस वर्षे देश फिरलो, कोणाच्याही खांद्याला खांदा लावून, कुठेही, काहीही खात

पहिला बॉस ब्राह्मण, पहिला कस्टमर चांभार, पहिला असिस्टंट महार, पहिला महाविद्यालयीन मित्र धनगर!!

माळी बाईच्या हातचा रस्सा भुरकला, भारती जातीत बसून नाश्ता केला, गुरव विद्यार्थिनीकडे पोटभर जेवलो, कोळी मुलीची फी भरली

पण ब्राह्मण्य आणि जातीयवादी असण्याचा शिक्का, दोन्ही जात नाही

बारमध्ये पेग घेतो तेव्हा माझ्याकडे बघत कोणीतरी म्हणतो

'गोडसेची औलाद आहे ती'

बहुधा काही गोष्टी राहून गेल्या

त्या केल्या की सगळे सुरळीत होईल

भाषा बदलायला हवी

वाक्यागणिक चार शिव्या हव्यात
बायकोला थोबाडायला हवे
म्हातारा मरत नाही ही तक्रार करायला हवी
फक्त दोन वेळा जेवणासाठी घरात जाऊन बाकी वेळ गप्पा हाणायला हव्यात
जातीमुळे मागे पडलो असे म्हणत राहायला हवे

कदाचित,

तरीही जाणार नाही हा शिक्का

कारण, बहुधा जात हे जगण्याचे एक कारण बनलेले आहे

प्रत्येकाचा अंत म्हणजेच त्याच्या त्याच्यापुरता जाती अंत बहुधा
========

-'बेफिकीर'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठेशाहीचा अंत होउन ३ जुनला २०० वर्षे झाली.>> राज्य करते ती पेशवाई आणि अंत होतो ती मराठेशाही? मज्जाय की!

>>>>

यु अंडरस्कोर्ड माय पॉइंट आगाउ. धन्यवाद.
मी डफबाबाचे पुस्तक वाचतो आहे. त्यात तो मराठेशाही म्हणत असतो. मराठा साम्राज्य/राज्य या अर्थाने. तसेच नुकतेच काही भारतीय लष्कराच्या इतिहासावरची पुस्तके वाचली लष्करी अधिकार्‍यांनी लिहिलेली (अर्जुन सुब्रमण्यम - इंडिया'ज वॉर्स - अ मिलिटरी हिस्टरी). त्या सगळ्यात अष्टीच्या लढाईने मराठा साम्राज्याचा अंत झाला (पुढे काही सरदार लढले पण मोठ्या प्रमाणावर कणा मोडला तो तिथे) व १८४९च्या लढाईत शिख साम्राज्याचा असे उल्लेख वाचले. त्यामुळे चुकून तसे शब्द उमटले असे मला वाटले. पण आता लक्षात येते की माझ्या नसानसात भिनलेल्या जातीयतेच्या वीषामुळेच मी ते तसे लिहिले.

रश्मी,
मला कालच लिहायचे होते पण वेळ मिळाला नाही,
तुमचा प्रतिसाद आवडला,
.>>>>>>>>>त्यातुन ब्राह्मणासकट बरेचसे इतर सर्व जातीचे लोक खालच्या थराला कसे जाऊ शकतात ते मी प्रत्यक्ष डोळ्याने बघीतले आहे, त्यामुळे जात, संस्कार या शब्दांवर माझा फारसा विश्वास उरलेला नाही.>>>>> हा भाग विशेष आवडला.

पुढचा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाही.

खालिल प्रतिसाद "लेखक बेफिकीर" यांना उद्देशून,

त्या माणसाने तुमच्या जातीचा हिणकस उल्लेख केला याची सल व्यक्त केली आहे, (तुमच्या मते तुम्हीजात मानत नसताना) , हीच सल ततुम्ही दुसर्या एका लेखात/स्फुटातहि व्यक्त केली होती.

एकाच प्रसंगावर हि दोन स्फुटे लिहिली आहेत का हे मला जाणून घ्यायला आवडेल, कि एकाच प्रसंगाच्या शिळ्या भाताचा हा फोडणीचा भात बनवला आहे?
जर हे २ वेगवेगळे प्रसंग असतील तर त्यात इंवोल्व्ड असणाऱ्या व्यक्ती त्याचं आहेत का?
जर २ वेगळे प्रसंग असतील आणि हा शेरा मारणाऱ्या २ वेगळ्या व्यक्ती असतील तर मात्र त्यांचे लेखक बद्दलचे हे इंप्रेशन का झाले आहे हे तपासून पाहायला हवे.

वर ह्र्पेन, रश्मी म्हणाले तसे ब्राह्मणांचे trolling होते का? त्यांना जातीय शेर्यांना तोंड द्यावे लागते का?
हो होते, त्यांना सुद्धा जातवाचक शेऱ्याना तोंड द्यावे लागते
पण किती फ्रिक्वेन्सी ने?
कधीतरी आलेल्या एखाद्या शेऱ्याने लेखक इतका दुखावला गेला आहे, तर जन्मापासून (खरेतर पिढ्यांपासून) पदोपदी जातीची जाणीव करून दिली गेल्याने , जातीमुळे नाकारले गेल्याने त्या व्यक्ती मध्ये किती कटुता आली असेल? (आता प्लीज, महाराष्ट्रात जातीवरून नाकारले जात नाही वगैरे सांगू नका ढीगभर उदहाराने मिळतील याची )

आहे रे ,वर्गाने एखादी गोष्ट नाकारणे त्यांची प्रागतिकता समजली जाते, तर नाही रे , वर्गाने नाकारलेली गोष्ट त्यांचा गुन्हा समाजाला जातो
तुम्ही ब्राह्मण असल्याने जात (तुमच्या मते)नाकारलीत तर उच्चवर्गीय लोक त्याच्याकडे तुमचा जातीअंत करायचा प्रयत्न म्हणून पाहतील, पण इतर समूहातील कोणी जात मानत नाही सांगितले तर कदाचित त्याच्यावर "जात लपवतो आहेस " असा आरोप होण्याची शक्यता जास्त आहे.
त्यामुळे आलेला हा कडवटपणा असू शकेल का?

सामाजिक उतरंडीत (आर्थिक स्टेट्स, शिक्षण, कुटुंब, जात )वरच्या स्थानावर असणारी व्यक्ती (जातीची उतरंड केवळ समाजाने कंडीशनिंग केले आहे म्हणून), आज माझ्यापुढे आहे (आणि ती कायद्यानुसार जाणारी असल्याने तिकडच्या तिकडे retaliate करण्याची शून्य शक्यता आहे) तर त्याचे trolling करून काही क्षणांसाठी का होईना स्वत:ला मी त्याला वरचढ आहे याचे समाधान ते मिळवत असतील का?

असो.. तुमचे स्फुट वाचून केलेले हे मुक्त चिंतन.

>>>>>
हा भाग बेफिकीर id साठी
तुम्हाला "गोडसेची अवलाद " म्हंटले या मुळे तुम्ही खरेच इतके अपसेट झालात?
"ठो धुडूम" करून इकडे जेव्हा पिस्तुलाचे फोटो टाकले गेले होते तेव्हा तुम्ही एका अक्षराने बोलल्याचे आठवत नाही (माझे आठवण चुकू शकत), चुकली असल्यास आधीच माफी मागतो ), ते लिहिणाऱ्या id बद्दल तुमच्या मनात असलाच तर सोफ्ट कॉर्नरच आहे (आणि त्या id च्य आताच्या अवताराबद्दल),
कदाचित "गोडसेची अवलाद " हा शेरा तुमच्या या आवडी बद्दल होता (जसा माबोवर नथुरामी म्हणून मारला जातो) आणि तुम्ही तो जातीवरून आहे असे समाजत असाल?

स्वाती २, भन्नाट भास्कर, रश्मी यांचा प्रतीसाद आवडला.

कोणत्या जातीतली लोकं कशी वागतात, त्यांच्यात काय असतं, आप्ल्यात काय असतं यावर आजी चर्चा करायची तिला भरपूर वेळ असायचा. आता यावर वाचायलाही कंटाळा येतो कारण सगळ्या जातीत सगळ्याप्रकारचे लोक असतात. बोलताना कळली तरी दुसर्‍याची जात कधी लक्षात राहिली नाही आणि कोणी मला जातीवरुन काही बोलले तरी काही फरक पडत नाही. एका दिवसात काही बदलणार नाही. आधी कुठे व्हायची आंतरजातीय लग्ने...आता होतात. आता तर लग्न न करताही एकत्र राहतात. आमच्या आईवडिलांनी लग्न करताना जात पाहिली आणि आता पुढे आमची मुले लग्न करताना धर्मही पाहतील कि नाही काय माहित. सो चील!!!
लोकांनी जात पाळू नये म्हणून काही होणार नाही. जातीवरून लोकांचे गट पडतात तोपर्यंत फायदा घेणारे याचा फायदा घेत राहणार. जोपर्यंत मुलांच्या/आपल्या कागदपत्रांवर जातीच्या पुढे काट मारली जात नाही तोपर्यंत जातीचा अंत होणार नाही Happy

जोपर्यंत मुलांच्या/आपल्या कागदपत्रांवर जातीच्या पुढे काट मारली जात नाही तोपर्यंत जातीचा अंत होणार नाही

-- हा म्हणजे उदाहरणार्थ फारच भाबडा समज आहे हां एकंदरीत.. कागदपत्रांवर जात आहे म्हणून जात अस्तित्वात आहे हे मानणे म्हणजे आपण कपडे घालतो कारण टेलर्स आहेत म्हणूनच. किंवा दारु बनवणारे आहेत म्हणून लोक पितात...

अहो तसे नाही Happy .. आतापर्यंत कितीही गमजा मारल्या मी जात मानत नाही, पाळत नाही. पण जेव्हा जात विचारली जाते तिथे जात लगेच बाहेर येते असे नको म्हणून तसे सांगावेसे वाटले.
हि कागदोपत्री जात लावली जाते त्यावरुन त्यांचे वर्गीकरण होते, त्यांना सुविधा दिल्या जातात. त्यांना फेवर केले जाते. तसेच भडकवायला अस्तातच काही लोक जे सगळा डेटा गोळा करून राजकारण करतात. पण माझा समज खूपच भाबडा आहे कि जातच राहिली नाही तर जातीयवादही राहणार नाही Happy असो.
बाकी जात नसली तरी हेवेदावे करणारे, दुसर्‍याला खाली बघणारे लोक दिसणे, राहणे, वागणे यावरून हेवेदावे करणारच.

हेवेदावे करणे हे बेसिक इंस्टिंगट आहे, तर ते किमान जन्मजात नको. माणसाला आयुष्यात बदलता येऊ दे. पैशावरून, अक्कलेवरून, शिक्षणावरून हेवेदावे आर मच बेटर.

हो. म्हणून त्यासाठी जाती मानणे, पाळणे सोडून दिले पाहिजे. पण तसे न करता कागदपत्रावरील जात सर्वात आधी आठवते असा एकूण अनुभव आहे. पर्सनली घेऊ नका.

जोपर्यंत मुलांच्या/आपल्या कागदपत्रांवर जातीच्या पुढे काट मारली जात नाही तोपर्यंत जातीचा अंत होणार नाही >>> जात गेली की धर्म येणार (आहेच म्हणा) धर्म गेला की देश येणार (तो ही आहेच) तो ही नसला तर भाषा येणार (भाषावाद नाहीये म्हणता ?) मग सीमा जाऊन सगळे ग्लोबल सिटिझन झाले की रंग येणार (तो ही आहेच) रंग गेला तर ऊंची, डोळे, नाक आणि तेही नसले तर बौद्धिक पातळी आहेच आणि अगदी रामराज्य आले तरी मोदीने आणले रागां ने, ट्रम्प ने आणले की ओबामा ने , स्टारबक्स की डंडो, वॅन घॉग की डाली, श्रीदेवी की माधुरी, हेरॉईन की कोकेन, मामलेदार की फडतरे असे काही ना काही असणारंच. थोडक्यात माणसे एक किंवा अनेक 'मीच सुपिरिअर' आहे हे पटवण्यासाठी काही ना काही कारण शोधून काढणारच.
सुपिरिअ‍ॅरिटी दाखवणे हे अ‍ॅनिमल ईंस्टिंक्ट आहे... प्राणी ताकदीने सुपिरॅरिटी प्रस्थापित करतात माणसे मेंदू आणि भषा आहे म्हणून जात, धर्म वगैरे अ‍ॅबस्ट्रॅक्ट गोष्टींघेऊन फुटकळ बुद्धीभेद करत राहतात. टीवी/ सोशल मिडिया आहे म्हणून फिजिकल होता येत नाही, एका रूम मध्ये घालून करा वाद विवाद... दुसर्‍या मिनिटाला बुद्धीभेद सोडून शिरच्छेद चालू होईल. तर ते सोडा.
चांगला जोक सांगा कोणी तरी.

आक्शी बरुबर बगा हायझेनबर्ग....

ओशो म्हणले व्हते की जर माणसे एकजात एकसारखी डिट्टो सेम टू सेम एकमेकांची कॉपी असते तरीही त्यांनी डिस्क्रिमीनेशनसाठी काहीतरी असे शोधून काढलेच असते.

नाहीच घेत. कारण माझे कधी कोणाशी जातीवरुन हेवेदावे नाही झाले कि कोणी मला जातीवरून काही शिकवायला आले. ज्या दिवशी शाळेत दहावीचा फॉर्म भरावा लागला त्यादिवशी वडिलांनी जाती समोर काय लिहायचे ते सांगितले. मग जात म्हणजे काय आणि त्यात आपली 'कॅटेगरी' काय ते समजले. तेव्हा जात समोर आली. हे कळूनही माझ्यात आणि माझ्या मैत्रपरिवारात कोणाला काही फरक पडला नव्हता.

नवीन Submitted by हायझेनबर्ग on 5 June, 2018 - 11:07 >>> Lol आवडले. बघा कितीतरी गोष्टी आहेत वाद घालायला. मग जात कशाला हवी.

सिंबा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ब्राह्मणांपेक्षाही इतर जातीतल्या ( दलित समाज ) लोकांना या भेदांना जास्त तोंड द्यावे लागले आहे. पण गंमत अशी आहे की मला ब्राह्मण या शब्दावरुन खिजवणारे दलित समाजातील कुणीच नव्हते. ते सर्व ओबिसी गटातील होते. शाळेत असतांना माझ्या घराशेजारच्या बौद्ध कॉलनीतल्या मुलींशी माझी पटकन मैत्री झाली, घरी येणे जाणे होते. इतकेच काय की त्यांच्या ज्या गाई म्हशी होत्या, त्यांचे शेण आणायला ( चाळ असल्याने मागे पुढे अंगण होते, मग दिवाळीसाठी शेणाने ती जमिन एकसारखी करायला लागायची) आम्ही जायचो.

पण वर्गातल्याच इतर सोनार, शिंपी, मराठा इत्यादी जातीतल्या मुली मैत्री करायला मागेच होत्या. मी व माझी दुसरी ब्राह्मण मैत्रिण शिल्पाच मग सोबत असायचो. शाळेत आपण म्हणतो की मुले मुली निरागस असतात, पण तसे नाहीये. उलट एकमेकांचे धर्म, जाती शाळेतुनच कळु लागतात. तरी माझ्या वेळी टिव्ही एवढा प्रचलीत नव्हता. मी अकरावीत असतांना घरी टिव्ही आला. आता तर काय, सोशल मिडीयाचे प्रस्थच जास्त माजले आहे. आणी त्यातुन फेसबुक, वॉट्स अ‍ॅपने अफवा पसरवुन कहर केला आहे.

सगळे महान संत, विभूती सगळ्या जाती धर्मांनी व्यवस्थीत वाटुन घेतले आहेत. ज्ञानेश्वर, रामदास, एकनाथ ब्राह्मणांचे, चोखामेळा महारांचे, नामदेव शिंपींचे, नरहरी सोनारांचे. कबीर आणी साई बाबा बिचारे ना हिंदु, ना मुसलमान असे मध्येच लटकलेले. प्रत्येकाला जातीचा शिक्का बसलाय. आणी राजकारणी आहेतच फायदा घ्यायला.

लिहीण्यासारखे अनूभव खूप आहेत, सध्या इथेच थांबते, वाटले तर लिहीन.

बेफि,
अपेक्षित आयडींचे अपेक्षित प्रतिसाद आलेच!
कितीही संतुलितपणाचा आव आणला तरी बुरखा फाटायचा तो फाटतोच!
मज्जा मज्जा!

बेफि
तुमि बरोबर लिहिले आहे काहि लोकांकडे प्र्गल्भता नसल्याने ते समजु शकत नाहि
मुळात जे स्वताला वंचित वगैरे समजतात त्यांनाच जात टिकवायचि आहप्र्माण्प आहे प्र्माण पत्रा द्वारे

त्यापे कशा पाळा ना जात

लय फायदे आहेत

मि तर पाळतो

@बेफि सर
वाक्यागणिक चार शिव्या हव्यात
बायकोला थोबाडायला हवे
म्हातारा मरत नाही ही तक्रार करायला हवी
फक्त दोन वेळा जेवणासाठी घरात जाऊन बाकी वेळ गप्पा हाणायला हव्यात
जातीमुळे मागे पडलो असे म्हणत राहायला हवे

बाकीच्या जातींतील लोक हे सगळं सर्रास करतात असे वाटतं का तुम्हाला?

बेफिकिर,

एक अनुभव सांगते.

मी शाळेत होते तेव्हा मैत्रीणींसोबत चालत गावातल्या शाळेत जायचे. साधारण अर्ध्या तासाचे चालणे असायचे आणि खूप गप्पा व्हायच्या. अगदी रिबिनीच्या लांबी पासून दप्तरातल्या डब्याच्या भाजीपर्यंत सगळे विषय असायचे त्यात.

आम्ही ४-५ वीला असू. शाळा सरकारी होती. त्यामुळे शिक्षक उत्तम होते. (काही अपवादही होतेच. असो.) त्यावेळी आमच्या वर्गात काही नवीन दप्तरे येऊन पडली. लाल-निळ्या रेघांची. सरांनी नावे पुकारायला सुरवात केली आणि काही जणींना, काही जणांना ती दप्तरे उचलून हातात दिली. माझ्या मैत्रीणीलाही मिळाले. मी आणि माझी दुसरी मैत्रीण वाट बघत होतो. पण आमची नावे नव्हतीच त्यात.

घरी परतताना आमच्यात चर्चा रंगली. तिला का मिळालं? आम्हाला का नाही वगैरे.... त्यात एका ७ वीतल्या मुलीने सांगितले. 'अगं आपली जात वेगळी हाय. त्यांन्ला मिळते आपल्याला नाय मिळत.' Sad

खरतर शाळा-कॉलेज मुळे जात-पात अधोरेखित झाली. नाहीतर माणसाला माणूस म्हणूनच बघायला शिकलो आहोत सारे.

Pages