तालिबानी विचार पद्धतीचं गौरवीकरण

Submitted by नोझिपा मरारे on 9 December, 2019 - 08:46

freepressjournal_2019-12_22e5663e-a616-4ab5-8996-7f918724b423_Congress.jpg
हैद्राबादच्या घटनेनंतर त्या घटनेचं समर्थन करणा-या प्रतिक्रिया देशभर पहायला मिळत आहेत. ज्यांना समर्थन करायचे त्यांना तसे करण्याचा हक्क आहे. पण समर्थन करतानाच मानवी हक्क वाले, पुरोगामी आणि विचारवंत या शिव्या असल्याप्रमाणे त्यांचा उद्धार करणे हे नेहमीप्रमाणे दिसून येते.

अशा प्रतिक्रियांचे प्रमाण समाजात किती हे समजत नाही. मात्र समर्थन करणारे कुणाचंही काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. त्यांना अशा पद्धतीच्या इन्स्टंट न्यायाच्या विरोधात असणारे हे समाजाचे अत्रू असल्याप्रमाणे प्रोग्राम केलेले आहे कि काय अशा शंका येतात. अशा पद्धतीच्या घटना घडण्याअगोदर बराच काळ जनमत अशा पद्धतीचे व्हावे म्हणून छुपे प्रबोधन चालू असते. सध्या सर्वच चित्रपटविषयक वाहीन्यांवर दक्षिणेकडचे डबडे सिनेमे चालू असतात. या सर्व सिनेम्यात न्यायालयात गेले तर काय झाले असते ? हे गुन्हेगार सुटले असते आणि पुन्हा तुमच्या आयाबहीणींवर अत्याचार करायला मोकळे फिरले असते अशा पद्धतीचे संवाद असतात. नायक स्वतःच कायदा हातात घेतो, स्वतःच तपास करतो आणि स्वतःच शासनही करतो आणि सिनेमा काही प्रश्न निर्माण करतो.

सरळ आहे , असे सिनेमे मासेस साठी असतात. त्यांच्यासाठी ते विचारप्रवर्तक असतात. त्यांना व्यापक विचार करण्याची आवश्यकता नसते. ते फक्त एका घटने पुरते पाहतात. माध्यमातूनही अशा पद्धतीचे लेख सातत्याने पाडले जात असतात. पूर्वी हे सर्व प्रचारकी वाटत नसे. पण आता सरळच दिसून येते. लोकांचे मत बनवण्यासाठी हे लोक सरसारवले आहेत कि काय असे वाटावे.

हैद्राबादच्या घटनेनंतर संताप असणे साहजिक आहे. मात्र त्याचे पर्यवसान ज्या पद्धतीने झाले ते चिंताजनक आहे. एण्काउंटरची बातमी आल्याबरोबर काही क्षण न्याय मिळाला असे वाटणे हे स्वाभाविक. पण नंतर इतर अनेक घटनांचा विचार करता पोलिसांना असे समर्थन देणे किती घातक आहे याचा विचार प्रत्येकाच्या मनात यायला हवा.

पोलिसांनी तपास कसा केला हे आपण इथे पाहून ठरवू शकत नाही. मात्र ज्या सीसीटीव्ही क्लिप्स आज विविध न्यूज एजन्सीजने आमच्या हाती लागल्या आहेत असा दावा करून नेटवर टाकल्या आहेत त्या जर पाहिल्या तर एकाही क्लिप मधे आरोपी अथवा पीडीता ओळखू येत नाही. जी ट्रक टोल प्लाझा सोडून चालली आहे त्याच्या आत पीडीता आहे असे कुठेच निष्पन्न होत नाही. पेट्रोल बाटलीत घेऊन जाण्याची क्लिप सुद्धा याच पद्धतीची आहे. त्यावर पोलिसांनी अजून काही काम केलेही असेल. प्रश्न असा आहे की जर हे पुरावे एकमेकांना बळकटी देत असतील तर मग एण्काउंटर करण्याची काय गरज होती ?

न्यायालयात त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होणे हाच न्याय आहे. अगदी एण्काउंटर समर्थकांच्या फिल्मी स्टाईलनेच न्याय हवा असेल तर न्यायालयीन युक्तीवाद पूर्ण झाल्यावर अगदीच त्रुटी शोधून आरोपी सुटल्यावरही एण्काऊटर करता आलाच असता की. त्यासाठी कुठलेही कारण देता आले असते.

या आरोपींनीच गुन्हा केला होता याबाबत आता शंका निर्माण होतील. एका पत्रकाराने त्या मुलीला आधीपासूनच धमक्या येत होत्या असे म्हटले आहे. यातली सत्यता तपासणे अवघड आहे. पण अशी जर शक्यता असेल तर मग तपास पूर्ण होणे गरजेचे नव्हते का हा प्रश्न उभा राहतो.

मात्र या निमित्ताने एका एण्काउंटरला जनमान्यता मिळून तो राजमान्य झाला तर म्हातारी मेल्याचे दु:ख नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. एका दलित स्त्री वर पोलीस स्टेशनमधेच गँगरेप झाला आणि तिच्या मेहुण्याची पोलिसांनी कस्टडीत हत्या केली. यालाही योग्यच ठरवणार का ? कारण पोलीस न्याय करण्याच्या क्षमतेचे असतात हे गृहीतक एकदा मांडले आणि त्याला मान्यता दिली की अशा घटनांसाठीही पोलीसांची स्टोरी तयारच असणार. त्याला तरी का विरोध करा ?

अनेक बलात्कार, खूना च्या घटनांमधे आरोपींची सामाजिक पत पाहून तपास केला जातो. त्रुटी ठेवल्या जातात. त्यामुळे न्याय मिळत नाही. थोडक्यात हे पोलिसांच्या मनावर असेल की कुठे खरा एण्काउंटर करायचा, कुठे खोटा आणि कुठे कुणाला फायदा मिळवून द्यायचा. पोलीस खराच एण्काउंटर करतात असे म्हणणे असलेल्यांनी उन्नाव मधे सेनगरचा का एण्काऊटर झाला नाही याचे उत्तर दिलेले नाही. नुसतेच व्हायला पाहीजे याला काय अर्थ आहे ? तो कधीच होणार नाही.

म्हणजे एका घटकाला पोलीस न्याय देणार आणि एकाला नाही हा अन्याय आहे हे कुणालाच वाटत नाही का ?

न्यायसंस्थेवर ज्या गोष्टींसाठी शंका घ्यायच्या त्या पोलिसांनी केल्या तर चालते का ? पोलिसांना अनेक गोष्टींची माहिती नसते. त्यांना कायद्याची कलमेही ठाऊक नसतात असे एका पाहणीत आढळले आहे. तर ते अंधश्रद्धाळू असतात, परंपरावादी असतात असेही आढळले आहे. जातीसाठी माती खाणारे पोलीसही असतात. धार्मिक दंगलीत एकतर्फी भूमिकाही ते घेतात. राजकीय दबाव किंवा गावात सामाजिक दबावाखाली चटकण येण्याचे कारण काय असावे ? अशा प्रकारे दबावाखाली येणारे पोलीस न्यायदानाच्य भूमिका करतील ही कल्पना ज्यांना रंगवाविशी वाटते त्यांचे तालिबानीकरण झालेले आहे एव्हढेच म्हणावेसे वाटते.

प्रश्न असा आहे की हे देशाच्या किती टक्के जनतेच्या बाबत खरे आहे ? की ९९% जनता तालिबानी झाल्यावरच याला खतपाणी घालणारे गप्प बसणार आहेत ?
79299670_3165377003561308_596539041512423424_n.jpg78429433_536433103754569_6141273715352010752_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचार प्रवर्तक आहे,

पण सगळे लोक कर्नाटक विजयाचा म्हैसूर पाक खायला गेलेत. इकडे कोण येणार ?

अश्या प्रकारचा पायंडा पडणे नक्कीच समाजासाठी घातक आहे. यातून एक वेगळाच भस्मासुर उभा राहू शकतो हे नक्की. परंतु याच बरोबर अश्या घटनांना सहानभूती का मिळते याचा पण विचार व्हावा. आपल्या कडील न्याय व्यवस्था नक्की आहे का कि त्याचा नुसताच देखावा उभा केला जातो हे पाहावे. सलमान खान कसा सुटला याचेच कोडे अजून उलडत नाही केस साधारण १५-२० वर्ष तरी चालली असेल, पुतण्याला सत्ता येताच काहीच दिवसात सगळ्या घोटाळ्यामध्ये कशी क्लीन चिट मिळते हे अजून एक उदहारण. या सगळ्याचा उद्रेक हा कधी तरी व्हायचाच ना.
बरं त्यातून एखादा पोलीस वाला प्रामाणिकपणे काम करत असला तर त्याचे काय होते हे सलमान केस मधील पाटीलकडे पाहून कळते. शेवटी काय आहे कधीतरी सामान्य माणूस त्याच्या परीने न्याय करण्याचा प्रयत्न करतोच.

जी पिडीत व्यक्ती असते गुन्ह्याची तिचा जगण्याचा हक्क गुन्हेगारांनी नाकारलेला असतो.
त्या पिडीत व्यक्तीला असंख्य अमानवीय पद्धतीने शारीरिक वेदना दिलेल्या असतात.
त्याचा विचार केला तर गुन्हेगारांना मानव अधिकार बिलकुल देवू नयेत असेच सामान्य लोकांना वाटत आणि ते चुकीचं आहे असे वाटत नाही.
पण काही विचाराची लोक गुन्हेगारांना मानव अधिकार असावा असे विचार व्यक्त करतात ते लोकांना बिलकुल पटत नाही.आणि अशा लोकांना देशद्रोही ,समाजविघातक,गुन्हेगारांचे पाठीराखे ह्याच नजरेने सामान्य जनता बघते.
मुळात गुन्हेगारांना शासन करणे हे सरकारी यंत्रणेची जबाबदारी आहे कारण सरकारकडे दंड शक्ती आहे.ताकत आहे.
त्या साठी पोलिस,न्याय व्यवस्था निर्माण झाल्यात.शेवटी त्या पण समाजाच्या भाग असतात.
ह्या यंत्रणा कमजोर करण्याचे काम कोण्ही केले .
लाच घेवून काम करण्याचा पद्धती मुळे ह्या सर्व यंत्रणा कमजोर आणि निष्प्रभ झाल्या आहेत.
लाचखोरी अत्यंत कडक नियम आणि कायद्यांनी मोडीत काढली पाहिजे सर्व समस्या ह्या लाचखोरी मुळे निर्माण झाल्या आहेत.
पण हिस्सेदारी खालच्या पासून वरच्या टोकापर्यंत असल्या मुळे ते अजुन थांबवली जात नाही.
न्याय पैस्याने विकत मिळतो असा लोकांचा अनुभव आहे त्या मुळे न्यायालयात न्याय मिळत नाही अशी भावना आहे.
Haydrabad च्या एन्काऊंटर चे समर्थन लोक त्या मुळेच करत आहेत आरोपी म्हणून जी लोक समोर आणली ते खरे आरोपी आहेत की नाही हे ठरवताना लाचखोर यंत्रणा निःपक्ष काम करेल ह्या वरच विश्वास नाही आणि ते गुन्ह्येगर कोर्टात निर्दोष पण सुटतील त्या पेक्षा एन्काऊंटर केले खूप छान झाले ही मनोवृत्ती
आहे.
न्यायदान च्या ह्या सर्व प्रोसेस मध्ये पोलिस यंत्रणेची भूमिका ही महत्त्वाची भूमिका आहे.
आरोपी म्हणून कोर्टात कोणाला हजर करायचे हे पूर्णतः पोलिस च्या मर्जीवर आहे.
न्यायाधीश आरोपी हे खरे गुन्हेगार आहेत का हे पोलिस च्या तपासावरून आणि कायद्यातील तरतूद काय आहे बघून ठरवतात.
न्यायलये अजुन आपल्या कर्तव्य पासून दूर गेलेली नाहीत पण त्यांच्यासमोर चुकीची माहिती देवून खरी माहिती लपवून ठेवून त्यांची दिशाभूल केली जाते.
ह्या पोलिस खात्याची साफसफाई केली तर नक्कीच लोक न्यायप्रक्रिय नी न्यायाची अपेक्षा ठेवेल.

९९% जनता तालिबानी झाल्यावरच याला खतपाणी घालणारे गप्प बसणार आहेत ?

याला राजकीय रंग दिला नसता तर बरे झाले असते.

याचे कारण बलात्कार, एन्काउंटर, पोलीसी अतिरेक हा सदा सर्वकाळ सर्व पक्षीय राजवटीत होत आलेला आहे.

सर्वात जास्त अत्याचार हे कम्युनिस्ट राजवटींनी केलेले आहेत. मागच्या शतकात कम्युनिस्टांनी केवळ संशयापोटी ५ ते १० कोटी विरोधकांना कायमचे संपवले आहे.
Valentino stated that the "highest end of the plausible range of deaths attributed to communist regimes" was up to 110 million".
https://en.wikipedia.org/wiki/Mass_killings_under_communist_regimes

मुंबईत पोलिसानि केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या १०६ आंदोलकांच्या स्मरणार्थ असलेले हुतात्मा चौक हे आपल्या राज्याच्या स्थापनेपासूनच चिरकाल असलेले स्मारक आपल्याला याची आठवण करून देईल

एकाच पक्षाला यात दोषी धरण्यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहील अशी भीती वाटते.

याला राजकीय रंग दिला नसता तर बरे झाले असते. >>> हा शोध कुठून लावलात ? तालिबान म्हणजे राजकीय ?? ती प्रवृत्ती आहे असा समज आहे माझा.

एकाच पक्षाला यात दोषी धरण्यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहील अशी भीती वाटते. >>> नीट वाचाल का धागा पुन्हा ? की हेत्वारोप करायचाच आहे. तसे असेल तर ठीक.

गाढव लोक्स एवढं छान लिहू रहायले बघून डोळे पाणावले! आम्हा मनुष्य प्राण्यांना कधी यायची अक्कल?

'Every state is founded on force,' said Trotsky at Brest­Litovsk. That is indeed right. If no social institutions existed which knew the use of violence, then the concept of 'state' would be eliminated, and a condition would emerge that could be designated as 'anarchy,' in the specific sense of this word. Of course, force is certainly not the normal or the only means of the state­­. But force is a means specific to the state. Today the relation
between the state and violence is an especially intimate one. In the past, the most varied institutions­­beginning with the sib­­have known the use of physical force as quite normal. Today, however, we have to say that a state is a  human community that (successfully) claims the monopoly of the legitimate use of physical force within a given territory. Note that 'territory' is one of the characteristics of the state. Specifically, at the present time, the right to use physical force is ascribed to other institutions or to individuals only to the extent to which the state permits it.

मॅक्स वेबर यांच्या politics as vocation या निबंधातील अवतरण.

यातली बोल्ड केलेले शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. राज्यशासनाचा डोलारा या शब्दांवर उभा असतो.

तालिबानी विचार म्हणजे आपल्या विचारांच्या विरूद्ध जो विचार करतो त्याला मृत्यू दंड देणे हा आहे.
आणि हा तालिबान विचार कुठे रुजला आहे,समाजमान्य आहे,आणि कृतीत आहे
हे जगजाहीर आहे.
Hyadrabad च्या घटनेची तुलना तुम्ही तालिबान शी करत असाल तर तुमचे मत निषेध करण्याच्या लायकीचे आहे

राजेश ८८, तुम्हाला जेव्हां स्वतःला काय म्हणायचे असते ते समजेल तेव्हां तुमच्याशी चर्चा करू. तोपर्यंत आपण मनोरंजन करत रहा. काही म्हणणे नाही.

राजेश १८८ आणि सुबोध खरे हे शारीरीक दृष्ट्या दोन वेगवेगळे इसम असावेत असा अंदाज करून मला प्रश्न विचारावासा वाटतो.

अशाच प्रकारे जर एखाद्या निषेधार्ह गुन्ह्यात चुकून माकून पोलिसांकडून या दोघांच्या घरातील एखाद्या कोवळ्या मुलाला अटक झाली, समजा त्याच्या सोबत असलेल्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि तो निर्दोष असतानाही पब्लिक च्या दबावाखाली त्याचे एण्काउंटर केले गेले तर त्या वेळीच तुम्हाला तालिबानी प्रवृत्ती कशाला म्हणतात हे समजेल का ? काही लोकांना आपल्यावर परिस्थिती आल्याशिवाय ब-याच संज्ञा, घटनांचे अर्थ समजत नाहीत म्हणून सांगावे लागले.

त्या तीन धाग्यांवर अनेकांनी हेच विचारले आहे. असे प्रतिसाद पद्धतशीर ओलांडून आपल्याला हवे तेच म्हणणे ही सुद्धा तालिबानी वृत्तीच आहे. तालिबानी याचा अर्थ समोरच्या चे समजून न घेणे. आपल्याला वाटले म्हणून आरोपीला गोळ्या घालणे, मुंडके उडवणे आणि हे गुन्हे पाहताना टाळ्ञा वाजवणे. त्या गर्दीला इतर शक्यता विचारात घेण्याची आवश्यकता भासत नसते.

हैद्राबाद मधे जे झाले त्या घटनेत ज्यांना इतर शक्यता तपासून पाहण्याची आवश्यकता वाटत नाही त्यांचा संविधानावर, न्याय प्रक्रियेवर विश्वास नाहीच. शिवाय उद्या जर वेगळे काही समोर आले तर जे जीव गेले त्यांना न्याय कसा द्यायचा याची उत्तरेही त्यांच्याकडे नसणार. तालिबानी पोलिसांनी केलेल्या न्यायावर न्यायालयापेक्षा जास्त विश्वास ठेवणारे तालिबान्यांपेक्षा कमी कसे ?

आणि यात राजकारण आले अशी ओरड कशी काय होऊ शकते ?
सिलेक्टीव्ह विचार करणारे तालिबानी नव्हेत का ?

राजेश ८८, तुम्हाला जेव्हां स्वतःला काय म्हणायचे असते ते समजेल तेव्हां तुमच्याशी चर्चा करू.

पुरोगामी
माझे पहिल्या पोस्ट मध्ये हेच विचार होते जे तुमचे होते तसेच होते की
आरोपी नी पोलिस नी गोळ्या घालून शिक्षा देणे चुकीचं आहे घटनात्मक मार्गाने शिक्षा देणे गरजेचे होते.
बऱ्याच लोकांची इच्या ही घटनात्मक मार्गाने शिक्षा झाली पाहिजे हेच आहे.
पण त्या मार्गात अडचणी आणण्याचे काम ढोंगी पुरोगामी करतात.
न्यायालयीन कामाला वेळ लागतो त्या मुळे न्याय मिळत नाही हे पण सत्य आहे.
पण पिडीत व्यक्तीला न्याय मिळाला असे ज्यांना वाटते त्यांना तुम्ही तालिबान शी बरोबरी करायला लागला हे चुकीचं आहे.
त्या विचार ल पाठिंबा देणार चे विचार चुकीची असेल पण भावना तालिबानी नाही हे तुम्ही विसरत आहात.
ही जनता खरोखर तालिबानी विचाराची असती तर भारतात रोज हजारो मुडदे पडले असते

९९% जनता तालिबानी झाल्यावरच याला खतपाणी घालणारे गप्प बसणार आहेत ?

99% जनता तालिबानी होईल असे म्हणणे म्हणजे जनतेला स्वतःची अक्कल नाही असेच गृहीत धरताय तुम्ही.
चालू द्या!

चला आता वैयक्तिक पातळीवर दुगाण्या झाडणे सुरू झाले. आपल्याला आपलेच मुद्दे स्पष्ट करता येत नसेल तर कांगावा करणारा एक गट या देशात कार्यरत आहे. तुम्हालाही ती शैली जमली आहे किंवा तुम्हीही त्याच गटाचे आहात असे म्हणूयात फारतर.

तालिबानी हा उल्लेख स्वतःवर ओढवून घेण्याची नाहीतर आवश्यकता पडलीच नसती.
आपण स्वतःच तालिबानी आणि हुकूमशाही यातला फरक समजावून सांगावा आणि नंतर त्याचे या धाग्यावर काय औचित्य आहे हे ही सांगण्याचे करावे. तसेच या धाग्यात कोणते राजकारण आणले गेले आहे हे ही सांगण्याचे करावे. उपकृत होऊ साहेब.

तालिबानी हा उल्लेख स्वतःवर ओढवून घेण्याची नाहीतर आवश्यकता पडलीच नसती
बादरायण संबंध कशाला जोडताय?
मी स्वतःवर काहीच ओढवून घेत नाहीये?
जनतेने संतापाने आणि वैफल्याने एखाद्या चुकीच्या गोष्टीचे तात्पुरते समर्थन केले म्हणून त्यांना तालिबानी वृत्तीचे होणार म्हणून आपणच उपमा देताय?
एन्काऊंटर चे चार प्रकार मी दुसऱ्या धाग्यावर लिहिले आहेत ते वाचा म्हणजे मला काय म्हणायचंय ते तुम्हाला समजेल.
नाही तर सोडून द्या

हा तो प्रतिसाद आहे

एन्काउंटर चे चार प्रकार आहेत
१) विदेशी दहशतवादी - हे जिहादच्या नावाखाली कोणत्याही देशात जाऊन दहशतवाद माजवतात. यांची विचारसरणी फार पक्की असते त्यांना आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप नसतो त्यामुळे त्यांचे वैचारिक पुनर्वसन अशक्य आहे असे बहुसंख्य मानसोपचारांचे मत आहे. अशा लोकांना तुरुंगात एक तर आजन्म ठेवणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना एन्काउंटर करून मारून टाकणे हे समाजाच्या दृष्टीने जास्त सोपे ठरते. उदा आय एस आय एस चे दहशतवादी.

२) भरकटलेले स्वदेशीय दहशतवादी- यांची माथी धर्म (जात किंवा प्रदेश याच्या नावावर) भडकावून त्यांना दहशतवादी बनवलेले असते. हे अत्यंत निर्ढावलेलेच असतात असे नाही तेंव्हा त्यांचे पुनर्वसन शक्य असते. परंतु बरयाच वेळेस त्यांनी अशा तर्हेचे गुन्हे केलेलं असतात कि त्या गुन्ह्यांचे पुरावे मिळवणे अशक्य असते. आणि पुराव्याशिवाय त्यांना सोडवण्यासाठी वकिलांचा फौजफाटा जय्यत तयार असतो. त्यामुळे न्यायालयात त्यांच्या विरुद्ध भक्कम आणि सज्जड पुरावा उभा करणे फार कठीण असते. यात धार्मिक दहशतवादी किंवा विद्रोही असे नक्षलवादी असतात.

काही वेळेस अशा माणसांचे एन्काउंटर करून त्यांना नष्ट करणे समर्थनीय ठरू शकते.

या दोन्ही तर्हेच्या दहशतवाद्यांविरुद्धचे युद्ध हे सुरक्षा दलांसाठी एक असमतोल (ASYMMETRIC) युद्ध असते ज्यात सुरक्षा रक्षकांनी मानवाधिकाराचे उल्लंघन करून चालत नाही परंतु दहशतवाद्यांनि काहीही केलेलं चालते.

३) यात एक तर निर्ढावलेले गुन्हेगार वारं वार चोरी,दरोडे, खिसेकापू असे लोक असतात किंवा बरेचसे परिस्थितीमुळे अगतिक झालेले गरीब लोक असतात जे अन्यायाविरुद्ध खवळून उठतात आणि गुन्हा करतात उदा बायकोवर बलात्कार झाल्यामुळे/ मुलाला विनाकारण कोठडीत टाकून रहाणं केल्यामुळे शस्त्र हातात घेतलेला आदिवासी/ गरीब खेडूत इ.

४) केवळ भावनेच्या आहारी जाणारे यात संतापाच्या भरात मारहाण किंवा खून केलेले अथवा संधी मिळाल्यावर वासना अनावर होऊन बलात्कार करणारे.

या तिसऱ्या आणि चौथ्या गटातील गुन्हेगार हे गुन्हेगार असले तरीही त्यांचे एन्काउंटर करून त्यांना संपवणे हे कधीही समर्थनीय होणार नाही.कारण हि माणसे सामान्यतः समाजाला तितकी धोकादायक म्हणता येणार नाही आणि अशा लोकांचे पुनर्वसन शक्य असते.

या लोकांना दहशतवादी लोकांच्या स्तरावर नेणे चूक ठरेल. पोलिसांना अमर्यादित अधिकार दिले तर आपल्याला नको असलेल्या माणसाला संपवणे हे फार सोपे असते त्यामुळे (केलेल्या किंवा) न केलेल्या बलात्काराबद्दल सरळ संशयिताला उडवणे हा शिष्टाचार झाला तर अनाचारच माजेल.
पोलीस खाते हे सरकारच्या अखत्यारीत असते त्यामुळे उद्या आपल्या राजकीय विरोधकाना संपवण्यासाठी पोलीस दलाचा वापर होऊ लागला तर आपली स्थिती कम्युनिस्ट राजवटीसारखी होईल. ( कम्युनिस्ट राजवटींनी गेल्या शतकात १०-११ कोटी स्वकीयांनाच केवळ संशयापोटी संपवलेले आहे)
पण न्यायसंस्था हि स्वतंत्र आहे आणि ती कोणत्याही प्रचलित सरकारच्या म्हणण्यानुसार चालत नाही त्यामुळे शिक्षा देण्याचा अधिकार हा न्यायसंस्थेचाच असायला हवा. त्यात ताबडतोबीने आमूलाग्र बदल करणे आवश्यक झाले आहे यात कोणताही संशय नाही.

इतर सर्व गुन्हे आणि बलात्कार यामध्ये एक मूलभूत फरक आहे.

तो म्हणजे असा बलात्कार (आणि त्यानंतर केलेली हत्या) आपल्यावर कधीही होऊ शकतो हि एक सुप्त भीती प्रत्येक स्त्रीच्या मनात खोल दडून बसलेली असते. यामुळे अशा निर्घृण गुन्ह्याचे वेळेस स्त्रियांची प्रतिक्रिया बऱ्याच वेळेस टोकाची असू शकते.

वैद्यकीय व्यवसायात मी जेंव्हा पहिली बलात्कार झालेली मुलगी रुग्ण म्हणून पाहिली तेंव्हा माझ्या मनातही अपार करूणा होती. परंतु आमच्या नर्सिंग मेट्रनचे वागणे तिच्या बरोबर अतिशय प्रेमाचे होते. या वेळेस एक लखकन डोक्यात विचार चमकून गेला तो म्हणजे मी एक पुरुष आहे त्यामुळे असे काही माझ्या बाबतीत होऊ शकते हा विचारच माझ्या मनात आलेला नसतो

याउलट प्रत्येक स्त्री घराबाहेर एकटी असताना हे आपल्या बाबत होऊ शकते या भीतीची गडद छाया घेऊन वावरत असते. यामुळे पुरुष आणि स्त्री यांच्या "व्यक्त होण्याच्या" पद्धतीत बराच फरक पडू शकतो.

यामुळे बऱ्याच वेळेस अशा गुन्हेगाराला फाशीच द्या असा आग्रह धरताना स्त्रिया जास्त दिसतात.

परंतु जर बलात्काराला फाशी हीच शिक्षा असेल तर कोणताही गुन्हेगार बलात्कार केल्यावर त्या दुर्दैवी स्त्रीला जिवंत सोडणारच नाही.
नाहीतरी फाशीच होणार आहे मग पुरावाच नष्ट करून टाका

हा विषय फार गहन आहे आणि याचे अनेक पैलू आहेत

जनतेने संतापाने आणि वैफल्याने एखाद्या चुकीच्या गोष्टीचे तात्पुरते समर्थन केले म्हणून त्यांना तालिबानी वृत्तीचे होणार म्हणून आपणच उपमा देताय?
अगदी ह्याच पुरोगामी. च्या विचारला माझा पण आक्षेप आहे.
ज्यांनी एन्काऊंटर चे समर्थन केले ती भावना तात्पुरती होती त्या लोकांची तुलना तुम्ही तालिबान शी केलीत.
इलेक्ट्रॉनिक मीडिया नी तालिबान आणि तालिबानी काय आहेत ह्याची ओळख जगाला करून दिली आहे

९९% जनता तालिबानी झाल्यावरच याला खतपाणी घालणारे गप्प बसणार आहेत ?

99% जनता तालिबानी होईल असे म्हणणे म्हणजे जनतेला स्वतःची अक्कल नाही असेच गृहीत धरताय तुम्ही. >> असा प्रतिसाद देणारी व्यक्ती एकतर संतुलित नाही, कांगावाखोर आहे किंवा भाषेचे अलंकार, व्याजोक्ती, भावना यातले तिला काहीही ठाऊक नाही असे मी गृहीत धरतो.

बलात्कार या विषयावरची तुमची आताची पोस्ट कितीही योग्य असली तरी धाग्याचा विषय हा बलात्काराबाबत नसून एखाद्या गुन्ह्यात ए़ण्काऊंटर करण्याबाबत समाजाचे व्यक्त होणे हा आहे. हा फरक जर तुम्हाला समजला तर तुम्हाला त्या अनुषंगाने प्रतिसाद देणे शक्य होईल. सक्ती नाहीच.

ब्वॉर >>> डॉक्टर असल्याने ढेकर देण्यावर स्वतःचेच औषध घ्यावे एव्हढेच म्हणीन. अर्थात प्रतिसादांवरून तसे वाटत नाही.

आत्ता खरे स्वरूप उघड झाले ब्वॉ तुमचे. फार वेळ सोंग घेता येत नाही म्हणायचे तुम्हाला. डॉक्टर झाले म्हणून काय झाले Lol
तालिबानी हा शब्द फारच झोंबला असेल तर दुसरा कोणता शब्द वापरू ? नेटभगवे ?

अहो , सुबोध खरे
तुमचीच लाल असे शब्द का बरे काढून टाकलेत प्रतिसादातून ? माझ्या प्रतिसाद संदर्भहीन नाही का होत त्यामुळे ? टाका पुन्हा.

हे एन्काउन्टर करुन दिलेला न्याय कितीही अस्वस्थ करणारा असला तरी,पोलिसानी जनतेच्या दबावाला बळी पडून परस्पर निर्णय घेवुन हे कृत्य केले याला कोठलेही राजकीय पाठबळ नसेल हा विचार भाबडा वाटतो

सैन्यामध्ये नाक खुपसून दुसर्याची शिक्षा बदलता येते म्हणे,

तसेच पोलिसनाही अधिकार असतील की

Pages