तालिबानी विचार पद्धतीचं गौरवीकरण

Submitted by नोझिपा मरारे on 9 December, 2019 - 08:46

freepressjournal_2019-12_22e5663e-a616-4ab5-8996-7f918724b423_Congress.jpg
हैद्राबादच्या घटनेनंतर त्या घटनेचं समर्थन करणा-या प्रतिक्रिया देशभर पहायला मिळत आहेत. ज्यांना समर्थन करायचे त्यांना तसे करण्याचा हक्क आहे. पण समर्थन करतानाच मानवी हक्क वाले, पुरोगामी आणि विचारवंत या शिव्या असल्याप्रमाणे त्यांचा उद्धार करणे हे नेहमीप्रमाणे दिसून येते.

अशा प्रतिक्रियांचे प्रमाण समाजात किती हे समजत नाही. मात्र समर्थन करणारे कुणाचंही काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. त्यांना अशा पद्धतीच्या इन्स्टंट न्यायाच्या विरोधात असणारे हे समाजाचे अत्रू असल्याप्रमाणे प्रोग्राम केलेले आहे कि काय अशा शंका येतात. अशा पद्धतीच्या घटना घडण्याअगोदर बराच काळ जनमत अशा पद्धतीचे व्हावे म्हणून छुपे प्रबोधन चालू असते. सध्या सर्वच चित्रपटविषयक वाहीन्यांवर दक्षिणेकडचे डबडे सिनेमे चालू असतात. या सर्व सिनेम्यात न्यायालयात गेले तर काय झाले असते ? हे गुन्हेगार सुटले असते आणि पुन्हा तुमच्या आयाबहीणींवर अत्याचार करायला मोकळे फिरले असते अशा पद्धतीचे संवाद असतात. नायक स्वतःच कायदा हातात घेतो, स्वतःच तपास करतो आणि स्वतःच शासनही करतो आणि सिनेमा काही प्रश्न निर्माण करतो.

सरळ आहे , असे सिनेमे मासेस साठी असतात. त्यांच्यासाठी ते विचारप्रवर्तक असतात. त्यांना व्यापक विचार करण्याची आवश्यकता नसते. ते फक्त एका घटने पुरते पाहतात. माध्यमातूनही अशा पद्धतीचे लेख सातत्याने पाडले जात असतात. पूर्वी हे सर्व प्रचारकी वाटत नसे. पण आता सरळच दिसून येते. लोकांचे मत बनवण्यासाठी हे लोक सरसारवले आहेत कि काय असे वाटावे.

हैद्राबादच्या घटनेनंतर संताप असणे साहजिक आहे. मात्र त्याचे पर्यवसान ज्या पद्धतीने झाले ते चिंताजनक आहे. एण्काउंटरची बातमी आल्याबरोबर काही क्षण न्याय मिळाला असे वाटणे हे स्वाभाविक. पण नंतर इतर अनेक घटनांचा विचार करता पोलिसांना असे समर्थन देणे किती घातक आहे याचा विचार प्रत्येकाच्या मनात यायला हवा.

पोलिसांनी तपास कसा केला हे आपण इथे पाहून ठरवू शकत नाही. मात्र ज्या सीसीटीव्ही क्लिप्स आज विविध न्यूज एजन्सीजने आमच्या हाती लागल्या आहेत असा दावा करून नेटवर टाकल्या आहेत त्या जर पाहिल्या तर एकाही क्लिप मधे आरोपी अथवा पीडीता ओळखू येत नाही. जी ट्रक टोल प्लाझा सोडून चालली आहे त्याच्या आत पीडीता आहे असे कुठेच निष्पन्न होत नाही. पेट्रोल बाटलीत घेऊन जाण्याची क्लिप सुद्धा याच पद्धतीची आहे. त्यावर पोलिसांनी अजून काही काम केलेही असेल. प्रश्न असा आहे की जर हे पुरावे एकमेकांना बळकटी देत असतील तर मग एण्काउंटर करण्याची काय गरज होती ?

न्यायालयात त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होणे हाच न्याय आहे. अगदी एण्काउंटर समर्थकांच्या फिल्मी स्टाईलनेच न्याय हवा असेल तर न्यायालयीन युक्तीवाद पूर्ण झाल्यावर अगदीच त्रुटी शोधून आरोपी सुटल्यावरही एण्काऊटर करता आलाच असता की. त्यासाठी कुठलेही कारण देता आले असते.

या आरोपींनीच गुन्हा केला होता याबाबत आता शंका निर्माण होतील. एका पत्रकाराने त्या मुलीला आधीपासूनच धमक्या येत होत्या असे म्हटले आहे. यातली सत्यता तपासणे अवघड आहे. पण अशी जर शक्यता असेल तर मग तपास पूर्ण होणे गरजेचे नव्हते का हा प्रश्न उभा राहतो.

मात्र या निमित्ताने एका एण्काउंटरला जनमान्यता मिळून तो राजमान्य झाला तर म्हातारी मेल्याचे दु:ख नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. एका दलित स्त्री वर पोलीस स्टेशनमधेच गँगरेप झाला आणि तिच्या मेहुण्याची पोलिसांनी कस्टडीत हत्या केली. यालाही योग्यच ठरवणार का ? कारण पोलीस न्याय करण्याच्या क्षमतेचे असतात हे गृहीतक एकदा मांडले आणि त्याला मान्यता दिली की अशा घटनांसाठीही पोलीसांची स्टोरी तयारच असणार. त्याला तरी का विरोध करा ?

अनेक बलात्कार, खूना च्या घटनांमधे आरोपींची सामाजिक पत पाहून तपास केला जातो. त्रुटी ठेवल्या जातात. त्यामुळे न्याय मिळत नाही. थोडक्यात हे पोलिसांच्या मनावर असेल की कुठे खरा एण्काउंटर करायचा, कुठे खोटा आणि कुठे कुणाला फायदा मिळवून द्यायचा. पोलीस खराच एण्काउंटर करतात असे म्हणणे असलेल्यांनी उन्नाव मधे सेनगरचा का एण्काऊटर झाला नाही याचे उत्तर दिलेले नाही. नुसतेच व्हायला पाहीजे याला काय अर्थ आहे ? तो कधीच होणार नाही.

म्हणजे एका घटकाला पोलीस न्याय देणार आणि एकाला नाही हा अन्याय आहे हे कुणालाच वाटत नाही का ?

न्यायसंस्थेवर ज्या गोष्टींसाठी शंका घ्यायच्या त्या पोलिसांनी केल्या तर चालते का ? पोलिसांना अनेक गोष्टींची माहिती नसते. त्यांना कायद्याची कलमेही ठाऊक नसतात असे एका पाहणीत आढळले आहे. तर ते अंधश्रद्धाळू असतात, परंपरावादी असतात असेही आढळले आहे. जातीसाठी माती खाणारे पोलीसही असतात. धार्मिक दंगलीत एकतर्फी भूमिकाही ते घेतात. राजकीय दबाव किंवा गावात सामाजिक दबावाखाली चटकण येण्याचे कारण काय असावे ? अशा प्रकारे दबावाखाली येणारे पोलीस न्यायदानाच्य भूमिका करतील ही कल्पना ज्यांना रंगवाविशी वाटते त्यांचे तालिबानीकरण झालेले आहे एव्हढेच म्हणावेसे वाटते.

प्रश्न असा आहे की हे देशाच्या किती टक्के जनतेच्या बाबत खरे आहे ? की ९९% जनता तालिबानी झाल्यावरच याला खतपाणी घालणारे गप्प बसणार आहेत ?
79299670_3165377003561308_596539041512423424_n.jpg78429433_536433103754569_6141273715352010752_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुबोध खरे यांनी या धाग्यावर राजकारण का आणता असा प्रश्न विचारला होता. राजकारण कुठे आणले यावर त्यांनी उत्तर दिले नाही. त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. फक्त आरोप करायचा एव्हढेच ठाऊक दिसते.
दोन दिवसांनी दुस-या एका धाग्यावर इथे निरूत्तर झालेल्या आणखी एका मेंब्राने या धाग्याचा उल्लेख तिस-याच धाग्यावर करत चर्चा चालू ठेवली. तिथेही खरे (?) यांनी राजकारण का आणता हे टुमणे चालू ठेवले. म्हणून त्यांना या धाग्याची चर्चा इथेच करावी आणि राजकारण कसे काय आणले हे स्पष्ट करावे असा आग्रह धरला.

त्यावर त्यांनी या धाग्यावरच्या एका छायाचित्रात मोदी, शहा यांची छायाचित्रे आहेत हा आरोप केला. हा असा आरोप एखाद्या नवशिक्याने केला असता तर काही वाटले नसते. पण खरे हे स्वतःला संतुलित म्हणवून घेतात.

त्यांना मोदी शहा दिसले पण बाईला मारणारे पोलीस दिसले नाहीत. अवघडच आहे. ही बाई उन्नाव पीडीतेच्या जळीत प्रकरणी आंदोलन करत असताना तिच्यावर आणि आंदोलक महिलांवर जो लाठीचार्ज झालेला आहे त्याची ही छायाचित्रे आहेत. एकीकडे एण्काऊंटर करणारे पोलीस दुसरीकडे बलात्कार झालेल्या पीडीतेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करत असलेल्या महिलांवर लाठीचार्ज करत आहेत हा विरोधाभास धाग्याचा विषय स्पष्ट करायला अत्यंत समर्पक असताना खरे यांना यात पार्श्वभागी कुणाची छायाचित्रे आहेत हे दिसावं हे हास्यास्पद नाही का ?

उन्नाव च्या आंदोलक ही पार्श्वभूमी ठाऊक नाही असे म्हटले असते तरी दुस-या छायाचित्रात तर रस्त्यावर पाडून महिलांना पोलीस मारत आहेत हे दिसतेच आहे. पोलीस असे वागत असतील तर न्यायाची अपेक्षा त्यांच्याकडून कशी ठेवणार हा आशय या छायाचित्रातून दिसतो.

खरे साहेबांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. चित्राची चिकित्सा कशी करावी हे शिकण्यासारखे आहे , त्यांच्याकडून.

तुमचीच लाल हे शब्द तुम्ही संपादीत केले खरे, पण त्यातून कमेंटमागच्या भावना समजल्या. दुस-या धाग्यावर तुम्ही थुत्तरफोड या शब्दावर आक्षेप घेऊन माझ्याशी संवाद करणार नाही अशी भूमिका घेतली तरी पुन्हा पुन्हा का यावे लागतेय ? थुत्तरफोड या शब्दाचा मायबोलीवरचा अर्थ सडेतोड, रोखठोक असा आहे. माझीच लाल आणि थुत्तरफोड या दोन्हीत कोणता शब्द जास्त आक्षेपार्ह आहे ?

समोरच्यावर आरोप करून पळून जायचे आणि उत्तर मिळाले की कांगावा करायचा हे धोरण सोडा साहेब. अजून एक प्रश्न अनुत्तरीत आहे.

तो शब्द लिहिल्यावर मलाच आक्षेपार्ह वाटलं म्हणून मी पुढच्या दोन मिनिटातच काढून टाकला तर तुम्हीच तो परत परत उगाळून स्वतःला त्रास करून घेताय.

मला वाटते माझ्या प्रतिसादानंतर काढून टाकला. कारण तुमच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून जो प्रतिसाद दिला आहे तो संदर्भहीन झालेला आहे. त्या वेळी विचारणा केली देखील होती. तुम्ही मात्र ताबडतोब समोरच्याच्या शब्दावरून त्याला वाळीत टाकण्याचा निर्णय घेत सुटले असताना तुमच्या शब्दांची लायकी सांगणे चुकीचे आहे का ?

आधी आपल्या चुका कबूल करा मग समोरचा कसा गाढव हे सांगा. आम्ही ते नावात घेतलेच आहे. त्याचा त्रास होत नाही. स्विकारायची तयारी आहेच. तुमची आहे का ? की फक्त समोरच्याला पिंज-यात उभे करायचे एव्हढेच येते ?

तुम्हाला विचारणा केली तेव्हां माफ करा , चुकून झाले असे म्हणता आले असते. असो. सक्ती नाही. एखाद्याला नाही जमत माफी मागायला.

अरे वा ! छान डॉक्टर आहात. अगदी पेशाला शोभेल अशी भाषा. लहान पोरांना तुमच्याकडून भांडणे करताना छान प्रेरणा मिळत असेल नै ? चालू द्या तुमचे. आपले मानसिक वय समजले. धन्यवाद.

बरं

किती ती जळजळ
उगी उगी >>>>> ४० * ५ = २ रूपये (अक्षरी दोन रूपये फक्त)

बरं >>> ४० नये पैसे (अक्षरी चाळीस पैसे फक्त )
चालू द्या मीटर.

बरं

Pages