Submitted by वेडोबा on 15 November, 2019 - 08:52
वाचकहो, आपण आपल्या बरोबर घडलेल्या चांगल्या गोष्टी इथे शेअर करू आणि आपला आनंद वाढवू..रोज काही ना काही चांगलं घडत असतं , आपण ते शोधु आणि इथे लिहूया... चला करू सुरवात..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज हा छान धागा वाचायला मिळाला
आज हा छान धागा वाचायला मिळाला
मी पहिल्याच प्रयत्न केलेल्या मोत्याची फुलं बऱ्याच जणांना आवडली आणि मला आज पहिली ऑर्डर पण मिळाली , ही अजून 1 चांगली गोष्ट घडली
आज वेळेवर झोपण्याचा प्रयत्न
आज वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करणार आहे.. जमलं का ते उद्या सांगेन
मी पहिल्याच प्रयत्न केलेल्या
मी पहिल्याच प्रयत्न केलेल्या मोत्याची फुलं बऱ्याच जणांना आवडली. >> इथे फोटो दाखवा फुलांचा , ऑर्डरी वाढायची शक्यता आहे. ☺
नक्की मनिमोहोर, पण त्यासाठी
नक्की मनिमोहोर, पण त्यासाठी स्वतंत्र पोस्ट टाकावी किंवा धागा उघडावा लागेल ना, की इथेच टाकलं तर चालेल ? सॉरी, पण याआधी कधी अशी कामाची किंवा प्रमोशनल पोस्ट टाकली नाही , म्हणून विचारले...
स्वतंत्र पोस्ट टाका मीनाक्षी
स्वतंत्र पोस्ट टाका मीनाक्षी जेणेकरुन तो गदारोळात वाहून जाणार नाही.
माझी एक जुनी कविता सापडली,
माझी एक जुनी कविता सापडली, लगेच type करून पोस्ट केली माबोवर.
TV ची wire उंदरांन्नी कुरतडली
TV ची wire उंदरांन्नी कुरतडली म्हणून बंद पडला
राधीकाच्या serial एका दीवसासाठी पासुन सूटका झाली
रत्न : ☺️
रत्न : ☺️
फत्तेशीकस्त ची गाणी ऐकली
फत्तेशीकस्त ची गाणी ऐकली
1.काल Men' s Day च्या
1.काल Men' s Day च्या निमित्ताने ऑफिसमध्ये सगळ्या पुरूषांना ग्रिंटींग आणि चाॅकलेटस देण्यात आली..सोबत खास पुरूषांसाठी रॅम्प वाॅकदेखील ठेवलं होतं..रॅम्प वाॅक करताना खुप मजा आली..
2.रोज सकाळी भाजी पोळी झाल्यावर किचनच्या खिडकीत सौ. पोळी/ भाकरीचा तुकडा ठेवते...नेहमीचा कावळा येऊन खाऊन जातो..आज पोळी दिल्यावरही जास्तच काव काव आणि स्लायडींगच्या काचेवर टकटक करत होता म्हणून मी भूक लागली असेल तर आणखी तुकडा देण्यासाठी खिडकीची काच सरकवरली तर त्याच्या चोचीत कपड्यांचा चिमटा होता आणि तो ते द्यायला आलेला... चिमटा आमचा नव्हता पण कावळ्यांने आणलेली भेट खुप आवडली...
मेन्स डे निमित्त सर्व
मेन्स डे निमित्त सर्व पुरुषांना कप केक आणि मिश्या(म्हणजे कप केक वर मिश्या स्टिकर लावून) दिले होते.आम्ही सर्वांना विश केले.लोक(लोकी) फ्लोअर वर सोनेरी फुगे घेऊन विश करत फिरले.बऱ्याच जणांना आपला असा काही दिवस असतो हे ऐकून धक्का बसला पण छानही वाटले.आम्हाला वेळ मिळाला नाही पण इतर टीम मधील स्त्रियांनी विचारपूर्वक माउस पॅड वरून ज्याचे त्याचे फोटो छापून वगैरे पुरुषांना गिफ्ट दिले होते.असे डेज असण्यातला सुपर फिशियल पणा सोडल्यास मला त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून भारी वाटले.
वेळेवर झोपले काल.. सकाळी
वेळेवर झोपले काल.. सकाळी फ्रेश वाटलं
काल मला ई शुभेच्छा मिळाल्या.
काल मला ई शुभेच्छा मिळाल्या.
व्वा मस्त प्रतिसाद सगळ्यांचे.
व्वा मस्त प्रतिसाद सगळ्यांचे....आज माबो वरची जुनी सिरीज वाचायला मजा आली... पा.पो. चिवडा खात खात
दिगंतराचे प्रवासी हा
दिगंतराचे प्रवासी हा पक्ष्यांचा सुंदर धागा वाचून डोळे तृप्त झाले आणि दुसरा एक विनोदी धागा वाचून खूप हसले....
आज पुन्हा एकदा, लिहायला
आज पुन्हा एकदा, लिहायला सुरुवात करायची असं ठरवलं...
छान आहे धागा !
आज प्रदा आणि कला म्हणजे
आज प्रदा आणि कला म्हणजे प्रशांत दामले आणि कविता लाड यांची मुलाखत कलर मराठीवर पाहिली हरहुन्नरी कलाकार आहे प्रदा
आज हा छान धागा वाचायला मिळाला
आज हा छान धागा वाचायला मिळाला...
आज मुलांसोबत बागेत खूप फिरले.
आज मुलांसोबत बागेत खूप फिरले...मजा आली.
आज फडणवीस सीएम झाले
आज फडणवीस सीएम झाले
+1
+1
हेच टाईप करायला आले होते.
2.मस्त राजस्थानी चाट चे दुकान सापडले, खूप खादाडी केली.
आज मी titanic बघितला पूर्ण.
आज मी titanic बघितला पूर्ण. आवडला आणि रडले पण.
मी आज सोयाबीन चिली आणि फ़्रेंच
मी आज सोयाबीन चिली आणि फ़्रेंच फ्राईस बनवले, सोया चिली पाहिल्यादा बनवली आणि खूप आवडली घरात सगळयाना ,मला खूप आनंद झालाय
वा..रेसिपी टाका की.
वा..रेसिपी टाका की.
काल दुश्यम चित्रपटात काम
काल दुश्यम चित्रपटात काम केलेले.. हुरहुन्नरी अभिनेते कमलेश सावंत भेटले.. खुपच डाऊन टू अर्थ माणूस..आमच्याशी सहज गप्पा मारल्या..
छान वाटलं त्याना भेटून...
कोर्टाने सुनावणी उद्यावर
कोर्टाने सुनावणी उद्यावर ढकलली
आता रविवार एंजॉय करता येईल
आज माझा वाढदिवस आहे आणि
,
आज छोट्या छोट्या कुत्र्याच्या
आज छोट्या छोट्या कुत्र्याच्या पिलांसोबत 2 मिनट spend केले.. खुप छान वाटल..
खूप negative बोलणार होते,
खूप negative बोलणार होते, कंट्रोल करू शकले
हा एक खुप छान initiative आहे.
हा एक खुप छान initiative आहे. आज मी स्टेशन वर असताना एक कुली खुप सामान घेउन जिन्यावरुन उतरला आणि डोक्यावर दोन bags असताना त्याच्या हातातली bag खाली पडली...मी लगेच ती त्याला परत देण्यासाठी धावले...आणि माझं हे क्रुत्य़ बघुन आजुबाजुचे लोक देखील त्याच्या मदतीला आले
Pages