मायबोलीशी मी कसा एकनिष्ठ राहलो.

Submitted by प्रशि_क on 21 November, 2019 - 23:03

तर काल दिवसभर माबो संकेतस्थळ बंद होतं आता हे माझ्याच बाबतीत होत होतं की इतरही जणांना हा अनुभव आला हे मला माहिती नाही, पण दिवसभरातून सतरा वेळा चकरा मारल्या तरी "५०४ गेटवे टाईमआऊट" असा संदेश पानावर दिसत होता, आणि मायबोली वापरता येत नसल्याची हुरहुर सतत मनाला बोचत होती.

मग काहीतरी वाचावे म्हणून शेवटी मिपा संकेतस्थळावर गेलो आणि तिथे वाचन करत बसलो, तिथेही माबोसारखेच एकसे बढकर एक लेख, प्रवासवर्णने इ होती. आता मला तात्पुरते का होईना पण मिपावर प्रेम जडले होते, आणि सभासद होण्याची इच्छा मनाला वेड लावू लागली होती. त्यातच काही माबोवरील सभासद तिथे लेखन करतात हे समजल्यावर ती इच्छा अजून तीव्र झाली. असो.

शेवटी मनाला आवर घालून फोनवरील तो वेबसाईटचा टॅब बंद केला आणि इतिहास हटवून फोन बाजूला ठेवून दिला, आणि मग आज सकाळीच चक्कर टाकली तर माबो संकेतस्थळ खुले झाले होते. फार आनंद झाला माबोची मजा, येथील लेखक, वाचक यांनी लिहिलेले लेख यात आपुलकीची भावना होती कुठेतरी यांना रिलेट करता येत होते जे दुसऱ्या संकेतस्थळावर शक्य नव्हते. एक आनंदी उसासा टाकला, आणि मायबोलीशी एकनिष्ठ राहल्याचे समाधानही वाटले. Happy

Group content visibility: 
Use group defaults

दिवसभरातून सतरा वेळा चकरा मारल्या >>>
मायबोली वापरता येत नसल्याची हुरहुर सतत मनाला बोचत होती. >>>
याचा अर्थ तुमचे मायबोलीवर खूप प्रेम आहे, असा नाही. तुम्हाला व्यसन लागले आहे किंवा ही सुरुवात आहे. दोन दिवस तुम्ही मराठी आंतरजालापासून (मग ते मायबोली असो किंवा मिपा असो) दूर राहू शकता का? ही याची सोपी टेस्ट आहे. वेळीच स्वतःला आवरा, नाहीतर हे अजून गंभीर होऊ शकते.

सेम हिअर .

मिपावर वाचायलादेखिल जात नाही...एकदा इथल्याच कुणाच्या तरी सांगण्यावरून गेलो होतो पण मला ते संकेतस्थळ आवडलचं नाही...

खुपच किचकट आणि गिचमिड असल्यासारखं वाटलं...

सभासद ओळखीचे होतात. एक आपुलकीची भावना तयार होते. मित्रच नाही तर शत्रू वा ज्यांच्यशी मतभेद होतात त्यांच्याशीही एक वादाचे नाते जडते. . आपला कट्टा सोडून मग ईतर जावेसे वाटत नाही.

हं.....

"साहित्याशी एकनिष्ठ रहा आणिक.........................................
संकेतस्थळाशीही "

मायबोली व्यवस्थापन मध्येच वेबसाईट बंद करुन, सदस्य पळुन जातात की टिकून रहातात याची परीक्षा घेत असते.
टिकून रहा.

मायबोली व्यवस्थापन मध्येच वेबसाईट बंद करुन, सदस्य पळुन जातात की टिकून रहातात याची परीक्षा घेत असते.-- हाहा☺️

एकनिष्ठ वगैरे काही नाही. व्यसनच आहे. पण ह्या सगळ्या वेबसाईट्स एकनिष्ठ्/व्यसन लागल्याबद्दल अवॉर्ड वगैरे अजिबातच देत नाहीत. Wink

शेवटी प्रत्येक दारुड्याला स्वतःचा गुत्ता प्यारा 

नवीन Submitted by सिम्बा on 22 November, 2019 - 22:02

उदाहरण साफ चुकलंय सिम्बा.

नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 22 November, 2019 - 22:36
>>>>
आपला ब्रॅन्ड तो आपला ब्रॅन्ड

खरंतर मी आधी मिपा वाचकच होते, तिथे कोणीतरी धुंद रवी च्या लुंगी खरेदी ची लिंक दिली आणि माबो भेटली ,आताही अधून मधून मिपाला भेट देते पण माबोचं आपलेपण नाही जाणवत तिथे मला,
पण मिपा वर गेल्यामुळे रामदास यांचं शिंपिणीच घरटं आणि काटेकोरांटी ची फुले हे दोन्ही परत एकदा वाचायला मिळाले ,खूप खूप खूप मस्त आहेत दोन्ही,
So thnku माबो ,मधेच विश्रांती घेतल्याबद्दल Wink
अगदी न राहवून इथेही लिंक देतेय,वाचून बघा
https://misalpav.com/node/4488

https://misalpav.com/node/2254

मायबोली व्यवस्थापन मध्येच वेबसाईट बंद करुन, सदस्य पळुन जातात की टिकून रहातात याची परीक्षा घेत असते.
टिकून रहा.>>>>
हो नक्कीच!!

आदु किती सुरेख लिहिले आहे रामदास यांनी- तुमचे खूप खूप धन्यवाद- मिपा सभासदत्व घ्यायचा मोह होतोय हे वाचून....

पण मिपा वर गेल्यामुळे रामदास यांचं शिंपिणीच घरटं आणि काटेकोरांटी ची फुले हे दोन्ही परत एकदा वाचायला मिळाले ,खूप खूप खूप मस्त आहेत दोन्ही,>>
दोन्ही लेख वाचले खूप आवडले