व्हेज स्टु

Submitted by TI on 22 November, 2019 - 00:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१५० ग्रॅम फरसबी (थोडी उभी तिरकी चिरून)
२ गाजर -उभे चिरून (जुलिअन्स)
३-४ उकडलेले बटाटे
१ वाटी उकळून/वाफवून किंवा नुसते स्वीट कॉर्न चे दाणे
हिरवी मिर्ची १-२
चवीनुसार मिरपूड आणि मीठ
एक चमचा बटर / साजूक तूप
नारळाचं फ्रेश दूध (घट्ट आणि पातळ दोन्ही चालेल) किंवा बाजारात कोकोनट मिल्क पावडर मिळते ती पण चालते.
कोकोनट मिल्क पावडरघेतल्यास साधारण २ जणांना ५०-८०ग्रॅम्स लागते,आवडत असल्यास जास्तं घ्यावी.

क्रमवार पाककृती: 

फरसबी गाजर धुवून उभे उभे चिरून घ्यावे.
मक्याचे दाणे वाफवून किंवा पाण्यात उकळून घ्यावे, बटाटे उकडून सालं काढून बारीक फोडी करून घ्याव्या.
सॉस पॅन मध्ये एक चमचा बटर /ऑलिव्ह ऑइल / साजूक तूप घ्यावे त्यात चिरलेली फरसबी आणि गाजर मंद आचेवर परतून घ्यायचं.
थोडंसं परतून गुलाबीसर झाल्यावर त्यात बटाटे टाकावे, थोड्याश्या कोमट पाण्यात कोकोनट मिल्क पावडर मिसळून घ्यावी आणि हे मिश्रण पॅन मध्ये टाकावे. नारळाचे दूध घेत असल्यास थोडंसं पाणी मिसळावं (अगदी पाव वाटी)
मंद आचेवर थोडं उकळलं की चवीनुसार मीठ मिरपूड टाकावं (मिरपूड सढळ हाताने छान लागते)
अजून थोडं उकळल्या नंतर हिरवी मिरची मध्ये चिरून टाकावी (तुकडे नकोत)
मिश्रण चांगलं मिळून आल्यावर गरम गरम सर्व्ह करावं.

वाढणी/प्रमाण: 
भाजी/ आमटी/सूप प्रमाणे! ह्यात गार्निश ची गरज नाही. आवडी नुसार मटार किंवा टॅपिओका add करता येईल. फ्लॉवर वगरे उग्र भाज्या शक्यतो टाळाव्या. सर्व्ह करताना मिरची काढून टाकली तर खाताना एखाद्यालाच मध्ये लागत नाही.
अधिक टिपा: 

शक्यतो भात (साजूक तुपावर काजू आणि लवंग परतून त्यात तांदूळ परतून बनवलेला काजू राईस फारच अप्रतिम लागतो!)बरोबरछान लागतं पण साऊथ मध्ये हा स्टु अप्पम सोबत खातात. आपले तांदळाचे घावन सुद्धा छान लागतात ह्या सोबत!
मी शक्यतो कोकोनट मिल्क पावडर आणि फ्रेश नारळाचं दूध मिक्स करून वापरते छान क्रीमी होतं!
भाज्या जास्ती शिजवाव्या लागत नाहीत परतून छान घेतल्या कि पुरे होतात

माहितीचा स्रोत: 
आमची आई!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

Hi mast recipe. Veg stew is also served with set dosas down south. Really good combination.

@ama Yess, mala hi recipe bhayankar awadte, it's my comfort food!
Photos nahiet next time kelyavar add karen