Submitted by सा. on 20 November, 2019 - 13:48
माझा एक मित्र आहे. त्याला आपला हेअरकट चेंज करायचा आहे. कृपया माहिती द्या. त्याला लहानपणापासून 'साईडचे बारीक. वरचे जरा कमी बारीक' हा एकच कट माहित आहे. पण आता जरा चेंज हवा आहे. आजकाल फेड, मश्रुम कट वगैरे नवेनवे प्रकार आले आहेत त्यामुळे त्याला जरा गोंधळायला होतं आणि न्हाव्याला काय सांगावं कळत नाही.
मित्र अमेरिकेत आहे.
केस मोस्टली काळे आहेत. एखाददुसरा ग्रे असू शकतो.
बहुतांश केस अजून शिल्लक आहेत. टकलाचा प्रॉब्लेम नाही.
सल्ला डोक्यावरचे केस कापण्याबाबत हवा आहे.
मेनटेनान्सला इझी असावा. तेल, जेल वगैरे प्रकारात पैसा, वेळ आणि श्रम घालवायची इच्छा नाही.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो दोन्ही साईडने नांगरून
तो दोन्ही साईडने नांगरून मध्ये बांध ठेवण्याची फ्याशन आलीय हल्ली तसा ठेवायला सांगा.
इस्पीकच्या राजा सारखा हेअरकट
इस्पीकच्या राजा सारखा हेअरकट करायला सांगा.
वर्ष दोन वर्षे सहज निभावतात मेंटेनन्स शिवाय.
आणि नंतरही स्वतःच आरशात बघुन ट्रीमर वापरून रिशेप करता येते. मागचे नाही ट्रिम करता आले तरी कॉलरखाली दडवता येतात.
डोक्यावर २५,००० केस असतील आणि
डोक्यावर २५,००० केस असतील आणि १०,००० केस कापायचे असतील तर सल्ला मिळू शकेल.
तुम्ही कुठे आहात? न्हावी कुठे
तुम्ही कुठे आहात? न्हावी कुठे आहे? न्हाव्याला कुठली भाषा समजते? तुमचा पगार काय? तुमच्या मित्राचा पगार काय? तो सिंगल आहे का? डेटिंगचा काय सीन आहे? मुलं बाळं आहेत का? तो भारतात रहायचा का? रहात असेल तर तिथे असताना तलावपाळी/ गणपती मंदिर किंवा गेलाबाजार शनिवारवाड्याच्या बाहेर केस कापवुन घ्यायचा का? केस कापण्यावर कान कोरणे फ्री असल्या फ्रीबीज मध्ये त्याला इंटरेस्ट आहे का?
या प्रश्नांची आधी उत्तरे द्या. मग मी खालचा रिप्लाय लिहिणारे.
केस स्वतःच का कापत नाही? कॉस्को मध्ये २०-२५ डॉलर मध्ये केस कापायचं मशिन मिळून जाईल. मग स्वतःचे आणि रिटायर झाला तर आजूबाजूच्यांचे केस कापायचा धंदा चालू करायचा. रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.
हाडळीचा आशिक,
हाडळीचा आशिक,
नांगरलेल्या भागावर लगेचच केसांचे कोंब येत राहतात आणि ते सारखे नांगरावे लागतात. मित्राला मेन्टेनान्स नको आहे.
उपाशी बोका,
नक्की किती केस आहेत माहीत नाही. मित्र झाला तरी आकडा विचारणे प्रशस्त वाटत नाही. सगळेच केस कापायचे आहेत.
अमितव,
कॉस्टकोच्या माहितीबद्दल धन्यवाद. मित्राला कळवतो. या किटने केस कापण्याबद्दल (आपले किंवा इतरांचे) तुम्हाला अनुभव असल्यास वाचायला आवडेल
अनुभव चांगलाच आहे. न्हावीपण
अनुभव चांगलाच आहे. न्हावीपण अशाच किटने कापतो. आपले आपल्याला कापायला एकदा जमलं की झालं.
केसाला आग लावण्याचा नवा कट
केसाला आग लावण्याचा नवा कट पाहिलाय व्हिडीओत.
https://www.google.com/url?sa=i&source=images&cd=&ved=2ahUKEwj60ePdlPrlA...
भाईच्या गावात! डेंजर आहे हे.
भाईच्या गावात! डेंजर आहे हे.
मुलभूतच्या धाग्यावर मला हे
मुलभूतच्या धाग्यावर मला हे सुद्धा टाकावे लागेल. केस कापायचा खर्च शून्यावर आणण्यासाठी दर रविवारी लोकांच्या घरी जाऊन केस कापून द्यायचा धंदा सुरू करायचा विचार आहे. यात आग लावायचा आयटम अॅड करावा का याबाबत बैठका चालू आहेत.
मि म्हणतो झिरो मशीन फिरवा..
मि म्हणतो झिरो मशीन फिरवा.. ना रहेगा बाप ना बजेगी बांसूरी..
ना रहेगा बाप ?
ना रहेगा बाप ?
ना रहेगा बाप... झिरो मशीन
ना रहेगा बाप... झिरो मशीन फिरवल्यावर..
बाप रे!... मग नकोच ते!...
बाप रे!... मग नकोच ते!... नाहीतर मित्राला आडनाव बदलून परलोकदेसाई करावे लागेल
परलोकदेसाई
परलोकदेसाई
झिरो मशीन कानावरचे आणि
झिरो मशीन कानावरचे आणि काखेतले केस कापायला ठिक आहेत पण डोक्यावर मशीन फिरवू नये. तिथे कात्री चालवत हॅण्डमेड कट मारावा. आपल्या पूर्वजांच्या काळात कुठे होत्या झिरो मशिनी, तरी हिरो दिसायचेच ना... केशरचना अशी असावी जी बघणारयाला आपल्या संस्कृतीची ओळख करून देईल.
यातल्या हिरोप्रमाणे कापा
यातल्या हिरोप्रमाणे कापा केस
https://www.youtube.com/watch?v=XYHxZMPZRzc
घेरा आणि शेंडी ठेवायला सांगा,
घेरा आणि शेंडी ठेवायला सांगा,
पानिपत पिक्चर आल्यावर या हेअर स्टाईल ची क्रेझ येणार आहे
जे रणवीरला जमलं नाही ते
जे रणवीरला जमलं नाही ते अर्जुन कपूर करून दाखवणार म्हणताय?
परलोकदेसाई <<< मित्र पण देसाई
परलोकदेसाई <<< मित्र पण देसाई निघाला का? की त्यानेही 'परदेसाई' नामक पुस्तक लिहून टाकले?