केस कापण्याबाबत सल्ला हवा आहे

Submitted by सा. on 20 November, 2019 - 13:48

माझा एक मित्र आहे. त्याला आपला हेअरकट चेंज करायचा आहे. कृपया माहिती द्या. त्याला लहानपणापासून 'साईडचे बारीक. वरचे जरा कमी बारीक' हा एकच कट माहित आहे. पण आता जरा चेंज हवा आहे. आजकाल फेड, मश्रुम कट वगैरे नवेनवे प्रकार आले आहेत त्यामुळे त्याला जरा गोंधळायला होतं आणि न्हाव्याला काय सांगावं कळत नाही.
मित्र अमेरिकेत आहे.
केस मोस्टली काळे आहेत. एखाददुसरा ग्रे असू शकतो.
बहुतांश केस अजून शिल्लक आहेत. टकलाचा प्रॉब्लेम नाही.
सल्ला डोक्यावरचे केस कापण्याबाबत हवा आहे.
मेनटेनान्सला इझी असावा. तेल, जेल वगैरे प्रकारात पैसा, वेळ आणि श्रम घालवायची इच्छा नाही.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो दोन्ही साईडने नांगरून मध्ये बांध ठेवण्याची फ्याशन आलीय हल्ली तसा ठेवायला सांगा.

इस्पीकच्या राजा सारखा हेअरकट करायला सांगा.
वर्ष दोन वर्षे सहज निभावतात मेंटेनन्स शिवाय.
आणि नंतरही स्वतःच आरशात बघुन ट्रीमर वापरून रिशेप करता येते. मागचे नाही ट्रिम करता आले तरी कॉलरखाली दडवता येतात.

तुम्ही कुठे आहात? न्हावी कुठे आहे? न्हाव्याला कुठली भाषा समजते? तुमचा पगार काय? तुमच्या मित्राचा पगार काय? तो सिंगल आहे का? डेटिंगचा काय सीन आहे? मुलं बाळं आहेत का? तो भारतात रहायचा का? रहात असेल तर तिथे असताना तलावपाळी/ गणपती मंदिर किंवा गेलाबाजार शनिवारवाड्याच्या बाहेर केस कापवुन घ्यायचा का? केस कापण्यावर कान कोरणे फ्री असल्या फ्रीबीज मध्ये त्याला इंटरेस्ट आहे का?
या प्रश्नांची आधी उत्तरे द्या. मग मी खालचा रिप्लाय लिहिणारे.

केस स्वतःच का कापत नाही? कॉस्को मध्ये २०-२५ डॉलर मध्ये केस कापायचं मशिन मिळून जाईल. मग स्वतःचे आणि रिटायर झाला तर आजूबाजूच्यांचे केस कापायचा धंदा चालू करायचा. रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.

हाडळीचा आशिक,
नांगरलेल्या भागावर लगेचच केसांचे कोंब येत राहतात आणि ते सारखे नांगरावे लागतात. मित्राला मेन्टेनान्स नको आहे.

उपाशी बोका,
नक्की किती केस आहेत माहीत नाही. मित्र झाला तरी आकडा विचारणे प्रशस्त वाटत नाही. सगळेच केस कापायचे आहेत.

अमितव,
कॉस्टकोच्या माहितीबद्दल धन्यवाद. मित्राला कळवतो. या किटने केस कापण्याबद्दल (आपले किंवा इतरांचे) तुम्हाला अनुभव असल्यास वाचायला आवडेल Happy

मुलभूतच्या धाग्यावर मला हे सुद्धा टाकावे लागेल. केस कापायचा खर्च शून्यावर आणण्यासाठी दर रविवारी लोकांच्या घरी जाऊन केस कापून द्यायचा धंदा सुरू करायचा विचार आहे. यात आग लावायचा आयटम अ‍ॅड करावा का याबाबत बैठका चालू आहेत.

बाप रे!... मग नकोच ते!... नाहीतर मित्राला आडनाव बदलून परलोकदेसाई करावे लागेल Happy

झिरो मशीन कानावरचे आणि काखेतले केस कापायला ठिक आहेत पण डोक्यावर मशीन फिरवू नये. तिथे कात्री चालवत हॅण्डमेड कट मारावा. आपल्या पूर्वजांच्या काळात कुठे होत्या झिरो मशिनी, तरी हिरो दिसायचेच ना... केशरचना अशी असावी जी बघणारयाला आपल्या संस्कृतीची ओळख करून देईल.