सरकार पाडण्यामागे पवार ह्यांचा हात कसा ?

Submitted by हस्तर on 12 November, 2019 - 08:48

बघा मुद्दे पटले तर

१) विखे पाटील :- लोकसभा निवडणुकीच्या वेळी जुना वाद उकरून काढला वर सुजय विखे ने संग्राम जगताप ला पाडले ,आता जर भाजपचे सरकार आले असते तर इथे पण विखे नक्की मंत्री झाले असते व ताकत वाढली असती

२) फडणवीस :- आतून मैत्री असेलहि पण एकतर विखे ह्यांना घेऊन नाराज केले आणि समक्ष आव्हान दिले ,गेम तर होणारच

३) ED :- ची नोटीस देऊन आगाऊ पणा करायची गरज नव्हती ,डिवचले तर गेम करणारच

४) चिवसेना :- आमचे १७५ आमदार आहेत हे आक्रमक पणे कोणीही सांगणार नाही विनाकारण ,दिल्ली शी शिव सेनेचा संपर्क कमी ,मग कोणी पाठिंबा दिला ? राष्ट्रवादी असणारच ,
परत ५ वर्ष आधी जाहीर पाठिंबा दिला होता भाजपला राष्ट्रवादी ने विधानसभा २०१४ ला ,आत्ता मुद्दाम कोणालाच नाही ,भाजप ला नाही कारण १ ते ३ ,आणि शिव सेनेला सौम्यपणे कारण सांगून मनाई केले कारण ५

५) पुनर्निवडणूक :- झाली तर (पाऊस पडणार नाही तरी पण ) जागा वाढू शकतात कारण भाजप आणि शिवसेना ह्यांचे भांडण बघून लोक विटले आहेत

जेव्हा राज्यपालांनी काल बोलावले तेव्हा शरद पवार स्वतः गेले नाहीत ,व सकाळीच राष्ट्रवादीने वेळ वाया ना घालवता जास्त वेळ मागितली ,८:३० पर्यन्त थांबण्यास काहीच त्रास नव्हता कारण काँग्रेस तास पण पाठिंबा दिला असता व देवेंद्र किंवा शिवसेने कोणीतरी साहेबांचा शब्द मानलाच असता उगाच फेर निवडणूक करण्यापेक्षा ,किंवा जास्त वेळ संध्याकाळी पण मागता आली असती ,तसेच राज्यपाल यांनी काँग्रेस ला पण आमंत्रण दिले नाही जणू त्यानं पाठिंबा मिळणारच नाही व दुपारीच राष्ट्रपती राजवट जाहीर केली अर्थात ठरलेले असू शकते

आता पब्लिक च्या डोळ्यात फक्त फक्त राष्ट्रवादी आहे शिवसेनेचा चा गेम झालाय आणि भाजप खोटारडी आहे ,जनतेच्या मते ,काँग्रेस मूग गिळून गप्प आहे
तेव्हा फायदा कोणाला ? पवार ह्यांना

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राष्ट्रपती राजवट आली तरी बहुमतासाठी लागणारा आकडा असलेला कोणताही पक्ष जाऊन सरकार स्थापनेचा दावा करू शकतो. फेर निवडणुका होतील असं सध्या तरी वाटत नाही

नाही
Bjp चा राज्यपाल
जबाबदार आहे.
काँग्रेस चा तिरस्कार भारतीय लोक का करू लागली ह्याचा अभ्यास bjp नी करावा आणि .
संतुलित पने केंद्र सरकारचे अधिकार वापरावेत नाही तर त्यांचा सुधा काँग्रेस होईल

Bjp चा राज्यपाल
जबाबदार आहे >>>
तो कसाकाय ? १७५ आमदारांनी समर्थन दिलंय असं खोटं सांगणारे निष्पाप?

पण पैज लावून कोणतंही सरकार पाडण्याची त्यांची capacity आहे

Submitted by Rajesh188 on 14 November, 2019 - 22:04 >>>

अरेरे असला माणूस भारताच्या पंतप्रधानपदी हवा होता, मग त्याने सगळ्या शत्रू देशांची सरकारे पाडली असती.

साहेबांची कॅपासिटी बारामतीत सीमित राहून पार वाया गेली राव

१० जनपथ मध्ये राफेल राफेल अशा किंकाळ्या अजूनही ऐकू येतात म्हणे. मध्येच विमानाचा आणि नंतर तोफेचा आवाज येतो म्हणे.

>>>>>>>>>>> १० जनपथ मध्ये राफेल राफेल अशा किंकाळ्या अजूनही ऐकू येतात म्हणे. मध्येच विमानाचा आणि नंतर तोफेचा आवाज येतो म्हणे. <<<<<<<<<<<<<

१० जनपथ मधुन
गरीबी हटाव
नॅशनल हेराल्ड
कोल स्कॅम
२जी स्कॅम
बोफोर्स
हॉवित्झर
स्कॉर्पियन
जीप
ईव्हीएम
अश्या अनेक किंकाळ्या दिवस रात्र ऐकु येत असतात

Biggrin

फडणविस सरकार जाण्याला केवळ फडणविस यांचा नाकर्तेपणा, उथळपणा आणि भाजपाचा खोटेपणा जबाबदार आहेत. गेले पाच - आठ वर्षे सेनेची नुसती फरफट चालवली होती. हाताच्या बोटावर मोजता येतिल एव्हढीच पण कमी महत्वाची खाती सेनेला मिळाली आणि पदोपदी अपमान.

सेनेसोबत भाजपाची युती होती पण भाजपाच्या सर्व कारवाया सेना संपवण्यासाठीच होत्या. भाजपाला महाराष्ट्रात वाढवण्यामधे आणि भाजपाच्या यशात सेनेचा मोठा हातभार होता....

युती तोडण्याचे धारिष्ट्य दाखवल्याबद्दल शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि ढाण्या वाघ खासदार संजय राऊत यांचे अभिनंदन. धाडस लागते आणि त्यांनी ते दाखवले आहे.

राष्ट्रपती राजवटीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे माहित नाही.

>>> भाजपाला महाराष्ट्रात वाढवण्यामधे आणि भाजपाच्या यशात सेनेचा मोठा हातभार होता.... >>>

हे वाक्य सोडून उर्वरीत प्रतिसादाशी सहमत.

उदय+१. युती झाली तेव्हा सेनेला ज्या काही सव्वाशेच्या आसपास जागा मिळाल्या त्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील अधिक होत्या. अपवाद मुंबई व आसपासचा परिसर. बिजेपिला शहरी मतदारांवर भरोसा होता. आणि तो बरोबरही होता. बिजेपिने युतीतील प्रत्येक पक्षाला दुय्यम वागणूक दिली. १०५ पैकी मूळ बीजेपी चे आमदार किती आणि मित्रपक्षांचे किती? आपले चिन्ह मित्रपक्षांवर लादणारा बहुतेक बोजेपी पहिलाच पक्ष असावा. बीजेपीला आणि त्यांच्या उमेदवारांना युती म्हणून चांगली मते मिळाली आहेत. तुलनेत सेनेचे नुकसानच झाले आहे. सेना एकटी लढून जितक्या जागा येतात तितक्याच किंवा त्याहून कमी जागा जर युतीतून येत असतील तर युती कुणाच्या फायद्याची होती हे कळतेच. युती तोडून अक्कल दाखविली त्याबद्दल सेनेचे अभिनंदन.

भारताकडून दर मॅचला मार खाणाऱ्या पाकिस्तानने भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाला चिअरअप करुन भारताविरुद्ध टफ दिल्याचा अतिशय दुर्मिळ असा आनंद मिळवणाऱ्या अश्या वरच्या काही पोस्टी आहेत Proud

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ.
गुजरातेत जेमतेम १००. हरयाणात बहुमत गेले.
ईशान्येकडच्या राज्यांत तिथले अख्खे पक्ष गिळले किंवा काँग्रेसमधून मेगा भरती.
झारखंड आणि मग दिल्ली आहेच पुढे. कर्नाटकातल्या पोटनिवड्णुकाही आहेत.

ख पु , सहमत...

शिवसैनिकांच्या डोळ्यात कॉन्गी गुलामांनी केलेली वकीली पाहुन पाणी आले नाही तरच नवल !
आता आसवे गाळणारे २०१४ च्या निवड्णुका स्वबळावर झाल्या नि शिवसेनेला नाक मुठीत धरुन भाजपला पाठिम्बा द्यावा लागला हे विसरतात. तेव्हा केलेले अफजल्खान , कोथळा वगैरेही यान्च्या विस्म्रुतीत गेलेलं दिसतंय. असो , असतात काही लोकांच्या मजबुर्या....

तरी नशीब , अजुन शपथविधी झालेला नाहीय.

ख पु , सहमत...

BJP विरुद्ध लिहायला मिळतय ह्या एकाच आनंदाने पागल झालेले आहेत !

Biggrin

मुंबई: 'मुस्लिम आक्रमक मोहम्मद घोरीला अनेक वेळा पराभूत करूनही पृथ्वीराज चौहान यांनी त्याला जीवदान दिले. हीच चूक चौहान यांना महागात पडली. शिवसेनेनंही महाराष्ट्रात घोरीसारख्या विश्वासघातकी प्रवृत्तीला जीवदान दिले. हीच प्रवृत्ती आज शिवसेनेवर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करीत आहे,' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख ह्यांनी टीका केली

अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख ह्यांनी टीका केली
<<

हे सेनानेते वर्तमान काळात कधी जगायला शिकणार आहेत, हे देवाला ठावुक.
बाकी भाजपाने एनडीएतून डच्चू दिल्याचे फारच मनावर घेतलेय सामना प्रमुखांनी.

जसे कॉंग्रेसी सूतकताई, चरखा, दांडीयात्रा वगैरेतून पुढे आलेच नाहीत, तसेच सेनावाले सुद्धा अफजलखान, घोरी, कोथळा, शाहिस्तेखान इ. तून बाहेर आलेले नाहीत.

Pages