शोध (भाग एक)

Submitted by शुएदि on 29 October, 2019 - 10:30

आज कथा पूर्ण झाली. एक महिना या कथेवर काम करत  होतो. तसं पाहिलं तर मी पुर्ण वेळ लेखक नाही. पण मला कथा लिहायला आवडतात. लघुकथा. सुचेल तशी लिहितो आणि शनिवारी रविवार त्या व्यवस्थित संकलित करून ठेवतो लॅपटॉपवर. माझं नाव विनित सदानंद राऊत. मी पुर्ण वेळ अकाऊंटंट आहे. आज मी या कथांबद्दलच एक कथा सांगणार आहे. कथा सुचली की मी मोबाईलमध्ये टाईप करून नंतर लॅपटॉपवर कॉपी करत होतो. अशा वीस पंचवीस कथा लिहिल्या होत्या मी. पण त्या फक्त माझ्या लॅपटॉपवर होत्या.

कधीही कुठेच शेअर केल्या नव्हत्या कारण मला त्यांचं एक पुस्तक प्रकाशित करायचं होतं. "कथागंध" नाव पण ठरवलं होतं मी. माझी पत्नी श्रुती कधीतरी माझ्या कथा वाचत असे. ती शिक्षक आहे. मराठी भाषेची. तिला वेळ मिळाला की ती माझ्या कथा वाचत असे. तसंच तिला मासिकं वाचण्याचा खुप छंदही आहे. रोजचं रुटीन चालू होतं.

एक दिवस श्रुती शाळेतुन लवकर घरी आली. खुप आनंदात होती ती. तिला विचारल मी, "काय मॅडम, आज खुप खुश दिसत आहात."
"हो ना. अरे आज एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. तिथे आमचा स्टाफ गेला होता. लेखकाने आमच्या स्टाफमधील प्रत्येकाला एक एक पुस्तक भेट म्हणून दिलं. मी रात्री वाचणार आहे" श्रुती म्हणाली.
मला खरंतर हसू आलं. पण मनात हसलो. रुसली तर कोण समजवणार. अवघड असतं काम ते. जेवण झाल्यावर श्रुतीने पुस्तक वाचायला सुरवात केली. माझी तर झोप लागून गेली. रात्रीचा एक वाजले असतील. तिने मला झोपेतून उठवलं.

"विनित, लवकर उठून बस"
"काय झालं गं? झोपू दे उद्या ऑफिस आहे मला."
"अरे उठून इकडे बघ झोप उडेल तुझी."
"काय आहे?" मी जरा वैतागूनच उठलो. बघतो तर ती लॅपटॉप आणि पुस्तक दोन्ही घेऊन बसली होती.
"हे बघ वाच" श्रुतीने माझ्याकडे लॅपटॉप आणि पुस्तक दोन्ही दिलं.

काय वाचू?"
"अरे हा पॅराग्राफ वाच आणि तुझ्या कथेतला पॅराग्राफ वाच."
त्यांचं काय?"
"दोन्ही सेम टू सेम आहे. जसेच्या तसे."
"काही बोलतेस तू."
"मग वाच तर एकदा. पटेल तुला बघ."
मी वाचलं तर खरंच सेम होतं. मग पुन्हा पुस्तकातली कथा लक्ष देऊन वाचली तर मी जशी लिहली होती तशीच होती. फक्त कथेचं नाव, पात्रांची नावं, स्थळं इतकाच काही तो बदल. बाकीचं पुस्तक चाळलं तर पूर्ण पुस्तक जसंच्या तसं छापलेलं. असं कसं होईल. मी तर कुठे शेअर ही केल्या नाहीत कथा. मला आणि श्रुतीला खुपच टेंशन आलं. दोघेही जागेच राहिलो काहीच सुचत नव्हतं काय करायचं ते.

सकाळी मी माझ्या एका मित्राला मेसेज पाठवला. "भेटायचं आहे. चार वाजता. हॉटेल सनिसवासरा. अर्जंट"
त्याचं नाव. अक्षय रमाकांत बोरकर. दहावीपर्यंत एकत्र होतो वर्गात. जय विरू म्हणायचे आम्हाला. पण कॉलेज मग करीअर यामुळे वेगळे झालो. पण आधी पत्र नंतर मोबाईलमुळे टचमध्ये राहिलो. तो पोलीसमध्ये सायबर गुन्हे शाखेत होता. हे फक्त मला आणि त्याच्या घरी माहीत होतं. आमची भेट झाली तेव्हा तो म्हणाला, फक्त एकच वाक्यात सांगायचं.
"कॉपी टू कॉपी बस यासाठी बोलवलं"
"लॅपटॉप आणि पुस्तक दोन्ही हवं."
"हो. घेऊन जा."

त्याला मी लॅपटॉप आणि पुस्तक दोन्हीही दिलं. दोन दिवसांनी त्याचा मेसेज आला. "भेटायचं आहे. हॉटेल चमुकोमारम. संध्याकाळी सात." खरं तर या हॉटेल्सची नावं म्हणजे एक कोड होता. खरं नाव होतं चकोर. इथे म च्या किंवा इतर अक्षराच्या बाराखडीतली कोणतीही अक्षरं वापरायची आणि हॉटेलचं नाव कोडमध्ये बदलून जात असे. भेटलो आम्ही. अक्षयने जे मला सांगितलं. त्याने मला धक्काच बसला. माझा लॅपटॉप हॅक झाला होता. ते पण एका आयपी ॲड्रेस वरून नाही. तर जवळपास पाच सहा आय पी ॲड्रेस वरून. त्याला विचारलं मी असं कसं होऊ शकतं? त्याने मला पूर्ण माहिती सांगितली. ती अशी कोणती तरी लिंक तुला आली असेल मेलवर. ती एखाद्या जाहिरातीची असेल. ती लिंक ओपन केलीस की तुला त्या जाहिरातीची वेबसाईट दिसली असेल. जितका वेळ त्या वेबसाईटवर सर्च केलं तितक्या वेळात त्यांनी माझ्या लॅपटॉप चा आय पी ॲड्रेस हॅक केला आणि सर्व माहिती म्हणजेच कथा मिळवल्या.

हे थोडं वेगळंच होतं यातलं मला काहीही माहीत नव्हतं. अक्षयने मला सांगितलं पुढचं सगळं मी बघतो. तू फक्त कम्ल्पेंट कर. एफ आय आर असणं गरजेचं होतं. अक्षय माझ्यासोबत आलाही आणि त्याच्या वरिष्ठांना सांगून त्याने केस स्वतःकडे घेतली. आता सुरू होणार होता शोध

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users