प्रेमाची परवड भाग २

Submitted by Swamini Chougule on 9 November, 2019 - 12:06

प्रवीण मित्रांन बरोबर फिरण्या शिवाय कोणतेही काम करत नव्हता.त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले होते.प्रविणचे वडील आता रिटायर्ड झाले होते. व ते पेनशन वर घर भागवत होते. सुमेधा आणि प्रविणच्या लग्नाला आता एक वर्ष झाले होत. ह्या एका वर्षांत प्रविणची आई अल्पशा आजाराने मरण पावली. त्यामुळे प्रविण चांगलाच बिथरला होता.तो आईचा खूपच लाडका होता. एकुलता एक असल्याने आई त्याला खूपच जवलची होती.प्रविण आईच्या जाण्याचे दुख पचवू शकला नाही आणि व्यसनाच्या आधिकाधिक आहारी गेला. सुमेधा त्याला सावरण्यात असफल झाली होती.

वडीलांचा त्याला जरा धाक होता. म्हणुन तो जरा कमी पीत होता.वडील त्याला समजावत होते. पण त्याचा कोणताच परिणाम प्रविणवर दिसत नव्हता. सुमेधाशी ही तो आता खूपच वाईट वागत होता. अशातच सुमेधाला दिवस गेले. तिला वाटले आता प्रविण जबाबदार होईल, सुधारेल आणि कामाधंद्याला लागेल.पण आशा फोल थरल्या. प्रविण वर ह्या गोड बातमीचा काही परिणाम झाला नाही. सुमेधाने यथावकाश एका गोंडस मुलीला जन्म दीला. तिला आता फक्त तिच्या सासऱ्याचा आधर होता.पण त्यांचीही प्रकृती प्रविणच्या काळजीने खालावत चालली होती. आणि एक दिवस तेही हे जग सोडून गेले.सुमेधावर तर आभाळच कोसळले. ज्यांचा तिला आधार होता असे तेचे सासरे ही आता नव्हते. सासरे गेल्यामुळे पेनशन बंद झाली. आता काय करायचे हा प्रश्न सुमेधा समोर होता.प्रविण ला आता वडीलानचा धाकही नव्हता .त्यामुळे तो रोज दारु पेउ लागला. सुमेधाला मारझोड करु लागला. शेवटी सुमेधाने काम करण्याचा निर्णय घेतला. पण तीची नववीच झाली होती. मग तिला नोकरी कोण देणार चांगली. सुमेधाने नोकरी मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. २ महिने ती नोकरीसाठी पायपीट करत होती. पण प्रविणला त्याचे काही सोयरेसुतक नव्हते.

त्याची आर्थिक परीस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली . प्रवीणच्या वडीलांनी ठेवलेले प्रोविडंट फंडचे पैसे प्रवीण दारु मध्ये उडवत होता. ते पैसे संपले . घरात आता खायला देखील काही राहिले नव्हते व पैसे पन संपले मग सुमेधाने नाईलाजाने लोकांची धुनीभांडी करायला सुरुवात केली . आणि ती घर चालवु लागली प्रवीण अधिकाधिक व्यसनी होत चालला होता. तो सुमेधाला धमकाउन वेळ पडल्यास मारझोड करुन दारुसाठी पैसे घेऊन जाऊ लागला . सुमेधा संसाराचा गाडा कसोशीने वडत होती. तीच्या लग्नाला आता आठ वर्षे झाली होती. सुमेधाने आणखीन दोन मुलांना जन्म दिला . तिच्या पदरात आता दोन मुली आणि एक मुलगा आशी तीन मुले होती .सुमेधा लवकर उठून घरकाम आवरून सकाळीच कामाला निघत असे.

तीच्या चांगल्या कामाच्या जोरावर तीला बरेच काम मीळाली होती .पन काम कष्टाचे होते. सुमेधा काम करून थकुन घरी संध्याकाळी येत असे. पन एक चांगली गोष्ट होती . ती म्हणजे तीची मुलगी सात वर्ष्याची होती पन तीच्या वया पेक्षा परिस्थितीमुळे बरीच समंजस होती . ती सुमेधा कामावरून येवू पर्यंत शाळेतून येवून बरेचसे घरकाम उरकत असे व स्वयंपाकात ही सुमेधाला मदत करत असे .

आता प्रवीण पूर्ण पाने व्यसनाच्या जाळ्यात अदकला होता. तो सतत दारूच्या नशेत राहत होता. दारु नाही मिळाली तर तो वेडापीसा होत होता. सुमेधाकडून पैसे घेऊन . तो दारू पित असे कधी काही काम करून ते पैसे दारुत उडवत असे

एक दिवस त्याला संध्याकाळपर्यंत कोठे काम नाही मिळाले . मग काय दारु प्यायला त्याच्या कडे पैसे नव्हते

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा खूप छान लिहीत आहात पण शुद्धलेखनाच्या चुका फारच आहेत. डायरेक्ट टाईप करण्याऐवजी लिहून काढा मग टाईप करा.

बेक्कार लिहीलेय.
अशा परीस्थितीत ३ मुलं? बापरे Sad
सगळा आनंदी आनंदच आहे.

कथा चांगली लिहीताय. पण मी दोनही भाग सलग वाचले अन् confused झाले.. पहिल्या भागाचा दुसर्या भागाशी काहीच संबंध नाहीये, पात्राच्या नावांव्यतिरिक्त. अस वाटलं..

कथेचा पुढचा भाग पोस्ट करण्याआधी आधीचे भाग वाचत जा आणि योग्य ते बदल करुन पोस्ट करा..

पुलेशु! Happy