तिचं काय चुकलं?

Submitted by सखा on 8 November, 2019 - 01:28

सकाळ झाली उठता क्षणी अर्धवट झोपेतच
गोपीकाने नेहमीच्या सवयीने मोबाईल वर फेसबुक उघडले. दहा-बारा पोस्टला सवयीने न वाचताच लाईक केले. दोन-चार कुत्र्यांचे गोंडस फोटो, पाच-सहा बायकांनी साड्या घातलेले फोटो तसेच गोरगरिबांना मदत करा अशा पोस्ट तसेच नवीन कॅमेरा घेतल्यामुळे फेसबुकवर आपल्या सावली पासून आपल्या नखापर्यंत धुमाकूळ घातलेल्या व्यक्तीचे सगळे फोटो यांना लाल बदाम देऊन झाले. अनेक लोकांनी परदेशातून पोस्ट केलेल्या फोटोला देखील जड अंतकरणाने बदाम देऊन झाले. एव्हाना डोळ्याला जरा बरं दिसू लागल्यामुळे तिच्या लक्षात आलं की कुणाच्यातरी आप्तस्वकीयांच्या निधनाच्या पोस्टला देखील तिने लाल बदाम दिलाय मग घाईघाईत तिने त्याला बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याला चुकून दुःखी ऐवजी खदाखदा हसणारा इमोजी पोस्ट झाला मग ती ने एकदाचा त्याला एक अश्रू ढळणारा इमोजी पोस्ट केला तेव्हा कुठे तिच्या जीवात जीव आला. काल तिने एका सुप्रसिद्ध ब्लॉगरच्या पोस्टवर एक कमेंट केली होती लोकांनी मूळ ब्लॉगर ऐवजी तिच्या पोस्ट वरच प्रचंड कमेंट्स करून तिला ट्रोल केलं हे बघून ती हबकूनच गेली मग तिने ती मूळ कमेंट डिलीट केली. मग नेहमी प्रमाणे तीने अकाऊंट स्विच करून नवऱ्याच्या अकाउंटने लॉगिन झाली. आपल्या नवऱ्याला कोणाही बाईचा संदेश नाही हे बघून तिला बरं वाटलं. नुकतीच त्याच्या बॅचची रीयुनियन झाल्यामुळे ती जरा जास्तच सावध होती. एवढ्यात तिला तिच्या मॉडेल सारख्या दिसणाऱ्या टका टक मैत्रिणीने पोस्ट केलेला सुरेख साडीतला फोटो दिसला आणि तिने तत्परतेने कमेंट टाकली "हाय ब्युटीफूल हाऊ आर यू?" मग दुसर्‍या क्षणी तिच्या लक्षात आलं कि आपण ही पोस्ट आपल्या नवऱ्याच्या अकाउंट वरून केल्याने हा वेगळाच "सिलसिला" आपण केला आहे. मग तिने घाईघाईत ती पोस्ट डिलीट करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि फोनची बॅटरी डेड झाली. (Horror music)
तात्पर्य: मोबाईल फोन नियमित चार्ज करत जा.
@सत्यजित_खारकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह.ह.पु.वा.

प्रश्ण हाच पडला की, नवराच्या फ्रेंड लिस्टीत, तुमची मैत्रीण असल्याशिवाय, मैत्रीणीचा फोटो कसा दिसेल?
——-
माझे डोळे उघडताक्षणी फोन चेक करायचे व्यसनाने , डोळे दुखायचे. बर्याच मुश्कलीने सवय कमी केलीय. डोळ्याला कमी दिसतेय असे वाटायचे आणि डोकं दुखायचे. नवरा अगदी नित्यनेमाने, फोन कसा डोळे उघडताच त्तत्काळ पाहिल्याने डोळ्यावर परीणाम वगैरे होतात ह्याची माहिती सांगायचा.

समोरुन हवा तसा प्रतिसाद मिळाला तर नवऱ्याचे फावणार आणि नको तसा प्रतिसाद मिळाला तर "मी असे काही कॉमेंट केलेच नाही" म्हणून तो हात वर करणार. भारीए. Lol

Lol मस्त.

मस्त Lol

Pages