घे उसन्त

Submitted by Swamini Chougule on 7 November, 2019 - 09:39

थांब थांब आता

घे जरा उसंत

किती बरशील अजून

नको पाहू अंत

तुझ्या अजून बरसण्याने

भरतेय आम्हा थंड

थांब थांब आता

घे जरा उसंत

किती बरशील

किती गर्जशील

बास कर आता

तुझा कहर

थांब थांब आता

घे जरा उसंत

नद्यांचा भरला उर

म्हणूनच अलता पूर

माणसांची तारांबळ

संसाराची वाताहत

थांब थांब आता

घे जरा उसंत

बस झाला तुझा राडा

पेलावेना संसार गाडा

पिकांचा झाला पार चूथडा

घरांचा झाला की रे ढिगारा

थांब थांब आता

घे जरा उसंत

दाखव जरा दया

येऊ दे ना माया

दुष्काळी भागात जा बरसाया

वाट पाहतोय तिथला शेतकरीराया

स्वामिनी चौगुले

(टीप नाव सहित कॉपी पेस्ट करण्यास हरकत नाही . कॉपी राईट लागू आहे)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

पण कविता कथा-कादंबरीच्या ग्रुपवर का पोस्ट केलीये? Uhoh