Submitted by Swamini Chougule on 7 November, 2019 - 09:39
थांब थांब आता
घे जरा उसंत
किती बरशील अजून
नको पाहू अंत
तुझ्या अजून बरसण्याने
भरतेय आम्हा थंड
थांब थांब आता
घे जरा उसंत
किती बरशील
किती गर्जशील
बास कर आता
तुझा कहर
थांब थांब आता
घे जरा उसंत
नद्यांचा भरला उर
म्हणूनच अलता पूर
माणसांची तारांबळ
संसाराची वाताहत
थांब थांब आता
घे जरा उसंत
बस झाला तुझा राडा
पेलावेना संसार गाडा
पिकांचा झाला पार चूथडा
घरांचा झाला की रे ढिगारा
थांब थांब आता
घे जरा उसंत
दाखव जरा दया
येऊ दे ना माया
दुष्काळी भागात जा बरसाया
वाट पाहतोय तिथला शेतकरीराया
स्वामिनी चौगुले
(टीप नाव सहित कॉपी पेस्ट करण्यास हरकत नाही . कॉपी राईट लागू आहे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
पण कविता कथा-कादंबरीच्या ग्रुपवर का पोस्ट केलीये?
नवीन आहे मी या पाना वर त्या
नवीन आहे मी या पाना वर त्या मुळे नाही कळलं तिथून पुढे कविता ह्या ग्रुप वर पाहायला मिळेल
खूप छान होती कविता
खूप छान होती कविता