व्हर्टिगो आणि विमानप्रवास

Submitted by वत्सला on 29 October, 2019 - 06:29

या विषयावर चर्चा झाली असल्यास कृपया मला लिंक द्या.

एका ज्येष्ठ नागरिक बाईना व्हर्टिगोचा त्रास आहे. त्यांना विमानप्रवासात काही त्रास होऊ शकतो का? तसेच विमानप्रवासात अजून काय काळजी घ्यावी? इथे या संदर्भात कोणाचे काही अनुभव असल्यास सांगाल का?
धन्यवाद!

Group content visibility: 
Use group defaults

keep hydrated. Juice and water tea soup not cola or soda drinks. Request isle seat and close window after take off. Eat light but not stay empty stomach. No alcohol business class will provide full bed. This is expensive but worth it . Ticket can be purchased on card and paid off in emis.

वत्सला, वर्टिगोचे ट्रिगर्स काय आहेत? त्यानुसार डॉकशी बोलून विमानप्रवासात काय टाळायचे ते ठरवावे. काही वेळा डॉक प्रवासाआधी घ्यायला औषधे लिहून देतील. तसेच प्रवासात देखील औषधे घेवून वर्टिगोची लक्षणे कमी जाणवतील. प्रवासत पाणी, ज्यूस पिणे, हलका आहार ठेवावा. अमानी बिझनेस क्लास, फुल बेड सुचवले आहे पण अपराईट पोझिशनमधे त्रास कमी होतो. प्रवासात कुणी सोबत असलेले बरे. विलचेअर रिक्वेस्ट करावी. प्रवास किती लांबचा आहे? ट्रायल म्हणून एक लहान अंतराचा प्रवास करता येइल का? साधारण अंदाज येइल. लहान अंतराचा प्रवास झेपला तर त्या बाईना वाटणारी काळजी कमी होईल. बरेचदा काळजीने वर्टिगोचा त्रास वाढतो.

Thanks अमा आणि स्वाती2

एका लहान प्रवास केला आहे. त्यापैकी एकदाच landing च्या वेळी त्रास झाला. तो थोड्या वेळाने कमी झाला. प्रवासात सोबत आहे आणि व्हीलचेयरसाठी request केली आहे. स्ट्रेस न घेण्याबद्दल त्यांना सांगते. ले ओव्हर पकडून प्रवास साधारण 15 ते 16 तासांचा आहे.

पाणी फार कमी देतात विमानप्रवासात. अगदी लहान पेल्यात येते पाणी. आणि मग सारखं हवाईसुंदरीला बेल वाजवून बोलावयाला कानकोंडं वाटतं, संकोच वाटतो. तेव्हा बाट्लीच न्या व भरुन आणायला सांगा तिला. माझ्या बाबांना तहानेने त्रास झाला होता. त्यांना खूप पाणी लागतं.

कानाचा आणि व्हर्टिगोचा जवळचा संबंध आहे. कानात कापसाचे बोळे घालून प्रवास करा. अधून मधून लॉलीपॉप किंवा च्युइंग गम चघळा.

वत्सला, त्यांना व्हर्टिगो चा कायम त्रास आहे का? माझ्या नवऱ्याला एकदा त्रास झालाय. तो दार आठवड्याला विमान प्रवास करतो. डॉक्टरांनी एक गोळी दिलेली आहे. त्रास झाला तर घ्यायची आणि मग पुढे 2-3 आठवडे घ्यायची.

घोट घोट सारखे पाणी पिणे, प्रवासात स्क्रीन अजिबात न बघणे, जास्त ना वाचणे, मानेचे व्यायाम करणे वगैरे उपाय सांगितले आहेत. आणि कानात बोळे किंवा प्रवासात विमान देते ते इअर प्लगस घालावे.

अहो मी कायम ते बिझनेस क्लास मध्ये काय काय अप ग्रेड्स असतात ते व्हिडीओ बघत असते. मला ही ते जास्तच वाट्तात पण वयस्कर व आपल्यासाठी महत्वाच्या व्यक्तींना जर आरामात नेता येत असेल तर तो खर्च वर्थ आहे म्हणून टिपण लिहून ठेवले. मी माझे आई बाबा दोघे व्हीलचेअर वरऊन मधुमेही त्यात धावपळीने वडिलांची शुगर लो होणार अश्या त्रासातू न दोघांचे पुणे हैद्राबाद ट्रेन प्रवास केले आहेत . तेव्हा पुण्यास फ्लाइट नव्हती व तीन तीन तिकिटे टू फ्रो काढायची ऐपतही नवह्ती. क्रेडिट कार्डे पण नव्हती.

मुख्य म्हणजे त्यांच्या खास वैयक्तिक गरजा काय आहेत त्या मोकळे पणी विचारून घ्या. मला विमान प्रवासात व एरवीही झोपताना डोक्याभोवती हिजाब सारखे ओढणी गुंडाळून झोपायची सवय आहे. त्यामुळे डोक्याव र एसीचा मारा होउन सर्दी होत नाही. विमानातली हवा विचित्र पणी थंड असते. त्यांच्या पण अश्या काही गरजा असतील तर त्या कश्या पूर्ण होतील व प्रवास सुख कर होईल ते बघा. एअर होस्टेसला सांगून ठेव ता आले तर त्यामुली खूप मदत करतात जमेल तशी.

या संबंधात हा धागा व त्यावरील प्रतिसाद वाचा. यात माझा सुद्धा एक प्रतिसाद आहे. व्हर्टिगोचे कारण व Maneuver बाबत मी लिहिले आहे:
https://www.maayboli.com/node/63464

व्हर्टिगो त्रास पुर्वी झाला असेल तर कानात प्रचंड वेदना विमान प्रवासात होतात. मला पुण्याहून मुंबईला जाताना खंडाळा सोडल्यावर विमान प्रवासारखे दुखत नाही पण संवेदना जाणवतात. मी विमानप्रवास कानात कापुस गच्च भरुन केल्यावर त्रास होत नाही. माझ्या सारखा त्रास इतरांना होत नाही. पण व्हर्टिगो संबंध असावा असे मात्र ही चर्चा वाचून वाटतआहे,,

मला पुण्याहून मुंबईला जाताना खंडाळा सोडल्यावर विमान प्रवासारखे दुखत नाही पण संवेदना जाणवतात.>> वेगात घाट उतरून खाली आले की हे असे बहुतेक लोकांना जाणवते. उलट आता एक्सप्रेस वे आणि एसी गाड्यांमुळे कमी प्रमाण झाले असावे असेही वाटते.