मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिका

Submitted by mangeshminal on 5 November, 2009 - 19:37

आशुतोष गोवारीकरच्या 'व्हॉटस युअर राशी ?' चित्रपटात प्रियांका चोप्राने १२ भूमिका केल्या व या भूमिकांची नोंद गिनीज बुक मध्ये होणार अशी चर्चा झाली.
त्यानंतर बातमी आली की एखाद्या कलाकाराने एकाच चित्रपटात १२ भूमिका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राजेश शृंगारपुरेने 'शंभु माझा नवसाचा' या २००६ साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात १२ भूमिका केल्या होत्या.
हे वाचून वाटले की, आतापर्यंत मराठी चित्रपटात सादर झालेल्या दुहेरी / विविध भूमिका संकलित कराव्यात.
आपल्याला माहित असलेल्या दुहेरी / विविध भूमिका कळवत रहा.

प्रत्येक नोंदीसाठी खालील माहिती जमा करता येईल.
प्रदर्शनाचे साल, चित्रपटाचे नाव, कलाकाराचे नाव, व्यक्तिरेखांची संख्या, व्यक्तिरेखांची नावे

मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिकांची यादी -
१९३३ औट घटकेचा राजा शाहू मोडक २ राजकुमार / भिकारी

१९४१ संत सखू हंसा वाडकर २ संत सखू / विठ्ठल

१९५२ पेडगावचे शहाणे राजा परांजपे २
१९५७ गृहदेवता रेखा कामत २
१९५८ राजा गोसावीची गोष्ट राजा गोसावी ३

१९६० रंगपंचमी जयश्री गडकर २
१९६४ पाठलाग भावना २

१९७३ आंधळा मारतो डोळा दादा कोंडके २
१९७३ थापाड्या निळू फुले २
१९७६ फरारी जयश्री टी. २
१९७९ पैजेचा विडा लक्ष्मीछाया २

१९८० चोरावर मोर उषा चव्हाण २
१९८२ भन्नाट भानू सुषमा शिरोमणी २ भानू / जयमाला
१९८७ चल रे लक्ष्या मुंबईला लक्ष्मीकांत बेर्डे २ लक्ष्या काणे / स्मगलर भोजराज
('स्मगलर भोजराज' या व्यक्तिरेखेसाठी रविंद्र बेर्डे यांनी आवाज दिला आहे.)
१९८८ चंगू मंगू अशोक सराफ २
१९८८ मज्जाच मज्जा वर्षा उसगावकर २ प्रतापसिंग / कामिनी
('प्रतापसिंग' या व्यक्तिरेखेसाठी सुनिल शेंडे यांनी आवाज दिला आहे.)

१९९० अनपेक्षित अशोक सराफ २
१९९० आमच्यासारखे आम्हीच अशोक सराफ २
१९९० आमच्यासारखे आम्हीच सचिन २
१९९० धडाकेबाज लक्ष्मीकांत बेर्डे २ लक्ष्मीकांत / गंगाराम
१९९१ अपराधी प्रिया अरुण ३ शालन / लाली / सोनाली
१९९१ गोडी गुलाबी रेखा राव २
१९९१ मुंबई ते मॉरिशस वर्षा उसगावकर २ भारती / आरती
१९९१ शेम टू शेम प्रिया अरुण २ शेवंता ओतूरकर / पल्लवी दादरकर
१९९१ शेम टू शेम लक्ष्मीकांत बेर्डे ४ लक्ष्मण जावळे / भालू जावळे / शंतनु जावळे /
'कमिशनर' राम जावळे
१९९१ शेम टू शेम दिपक शिर्के २ सटवाजीराव / हवालदार क्र. १००

२००० जोडीदार मृणाल कुलकर्णी २
२००० मृगजळ भक्ती कुलकर्णी २
२००६ जत्रा भरत जाधव २ मोन्या / घुम्या कानोळे
२००६ जत्रा विजय चव्हाण २ शिवा कानोळे / जिवा कानोळे
२००६ शंभु माझा नवसाचा राजेश शृंगारपुरे १२
२००७ कलम ३०२ अशोक सराफ ७

२०१० आयडियाची कल्पना सचिन ३ जयराम गंगावने / सचिन पिळगावकर (स्वत:) / गंगाराम गंगावने
२०१० दुर्गा म्हणत्यात मला मिलिंद गवळी २ डॉ. विजय / श्याम
२०१० दुर्गा म्हणत्यात मला दीपाली सय्यद २ दुर्गा सातारकर / डॉ. दुर्गा
२०१३ नारबाची वाडी मनोज जोशी २ रंगराव खोत / मल्हारराव खोत
२०१३ पितृऋण सचिन खेडेकर २
२०१४ मुक्काम पोस्ट धानोरी प्रकाश धोत्रे २ बाळासाहेब इनामदार / आप्पासाहेब इनामदार
२०१४ लय भारी रितेश देशमुख २

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा हे माहीतीचं नव्हतं , शंभु माझा नवसाचा वाले या भूमिकांची नोंद गिनीज बुक मध्ये होण्यासाठी प्रयत्न करताहेत की नाही ?

शेम टू शेम नावाच्या (टुकार) चित्रपटात सर्वंच कलाकारांचे डबल रोल्स होते.
मुंबई ते मोरिशस मध्ये वर्षा उसगांवकरने दुहेरी भुमिका केलिये...

श्री१२३, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. 'व्हॉटस युअर राशी ?' चित्रपट प्रदर्शित होण्याच्या सुमारास राजेश शृंगारपुरेची मुलाखत वाचली होती. त्यात त्याने सांगितले होते की तो या भूमिका करत असताना त्याला तो काही विक्रम करत असल्याची कल्पना नव्हती.
आता 'शंभु माझा नवसाचा' चित्रपटाशी संबंधित व्यक्ती या विक्रमाची नोंद होण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा करूया.

दक्षिणा, कळवलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. माहितीच्या आधारे यादीत सुधारणा केली आहे. 'शेम टू शेम' चित्रपटाच्या प्रदर्शनाचे साल माहित आहे का ?

'थापाड्या' या चित्रपटात निळू फुले यांनी दुहेरी भूमिका केली आहे.

शंभु माझा नवसाचा वाले या भूमिकांची नोंद गिनीज बुक मध्ये होण्यासाठी प्रयत्न करताहेत की नाही ?
<<< अशी बातमी टी.व्ही. वर (बहुदा झी न्युज) ऐकली कि प्रियांका गिनिज बुक मधे नोंद करणार याची चर्चा असताना बिपाशा नी नव्या चित्रपटाची घोषणा केलिये, ज्यात ती १३ कि १४ भूमिका करणार आहे , त्यामुळे १२ वाले मागे पडणार !:फिदी:

शंभु माझा नवसाचा...
हा चित्रपट कधी आल्याचे ऐकले नाही.. (आपली मराठी वरही दिसला नाही कधी)

पाठलाग मध्ये भावनाची सुद्धा दुहेरी भूमिका आहे. त्यावरून मेरा साया हा सिनेमा काढला होता. त्यात साधनाने डबल रोल केला होता.

नको मारुस हाक या पाठलाग मधल्या गाण्यावर झुमका गिरा रे बेतले आहे तर या डोळ्यांची दोन पाखरे वर, मेरा साया साथ होगा. मराठी सिनेमात मात्र दोनच गाणी होती.
फरारी (किंवा फरार ) या सिनेमात जयश्री टी (तळपदे) ने दोन भुमिका केल्या होत्या. पण त्यात अनेक दृष्यात, तिची बहीण, मीना, तिची डबल म्हणून वावरलीय. आंधळा मारतो डोळा, मधे दादा कोंडके दुहेरी भुमिकेत होते.
निळू फूलेची पण एका चित्रपटात दुहेरी भुमिका बघितल्याचे आठवतेय (एक डाकू तर एक तमासगीर ) थापाड्या च असणार तो.
रेखा आणि विवेक च्या पण एका सिनेमात, रेखा (कामत) च्या दोन भुमिका बघितल्या आहेत.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

कल्पू व दिनेश, कळवलेल्या माहितीच्या आधारे यादीत सुधारणा केली आहे.

दिनेश, रेखा कामत यांनी केलेल्या दुहेरी भूमिकेबद्दल अधिक काही कळले तर जरूर कळवा.

निळू फुले यांनी आणखी एका चित्रपटात दुहेरी भूमिका केली होती. एक भूमिका गावातील पुढार्‍याची होती व दुसरी भूमिका पुढार्‍याचा जुळा भाऊ असलेल्या सज्जन माणसाची होती. चित्रपट कोणता ते लक्षात नाही.

दिनेश, त्या चित्रपटाचे कथानक आठवले. ते साधारणपणे असे आहे:

विवेक हा सिव्हिल इंजिनियर असतो. त्याचे रेखा कामतशी लग्न झालेले असते व त्याला लहान मुलगी असते. एका धरणाच्या कामावर त्याची नेमणूक होते व तो कामाच्या ठिकाणी राहायला जातो. तेथील मुख्य इंजिनियरची मुलगी दिसायला विवेकच्या पत्नीसारखीच असते (रेखा कामत यांची दुसरी भूमिका). ती विवेकच्या प्रेमात पडते. पण विवेक तिला आपण विवाहीत असल्याचे सांगतो. काही दिवसांनी विवेकची पत्नी व मुलगी त्याच्याबरोबर राहायला येतात. मुख्य इंजिनियरची मुलगी विवेकच्या मुलीचे लाड करते.
त्यासुमारास विवेकच्या पत्नीला आजार होतो. हा आजार असाध्य असल्याचे कळल्यानंतर विवेक व मुख्य इंजिनियरची मुलगी यांची जवळिक वाढावी असा प्रयत्न विवेकची पत्नी करते. त्यायोगे आपल्या मुलीला परत एकदा आईचे प्रेम मिळेल असा तिचा विचार असतो.

चित्रपटाचे नाव किंवा प्रदर्शनाचे साल मात्र अजून आठवत नाही.
कथानक सविस्तर लिहिले आहे, ते वाचून कोणाला चित्रपटाचे नाव व इतर माहिती असेल तर जरूर कळवा.

'चल रे लक्ष्या मुंबईला' या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेने 'लक्ष्या काणे' व 'स्मगलर भोजराज' या २ व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. 'स्मगलर भोजराज' या व्यक्तिरेखेसाठी रविंद्र बेर्डे यांनी आवाज दिला आहे.

चित्रपटाचे नाव किंवा प्रदर्शनाचे साल मात्र अजून आठवत नाही.>>>>>>>
हा ब्लॅक & व्हाइट चित्रपट आहे. पाहिलाय पण नाव आठवण अशक्य. फार वर्ष झाली त्याला.

चित्रपटाचे नाव: गृहदेवता
विवेक, रेखा

मिडीमधील गाणे "सांग धावत्या जळा"

mbhure, चित्रपटाचे नाव कळवल्याबद्दल धन्यवाद.
खूप दिवसांपासून डोक्यात घोळत असलेल्या विचारांना एक नाव मिळाले.

कळवलेल्या माहितीप्रमाणे यादीत सुधारणा केली आहे.

१. उषा चव्हाण चा डबल रोल - 'चोरावर मोर' ('सीता और गीता' चा रिमेक)
कुलदीप पवार व अशोक सराफ ही यात होते.

भरत जाधवची दुहेरी भुमिका असलेला अजुन एक चित्रपट आणि दोन नाटक खालीलप्रमाणे:
१. पछाडलेला - यात त्याने चार वेगवेगळ्या भुमिका केल्या आहेत. पहिली - इनामदार, दुसरी - किरकिरे(इनामदाराचा नोकर), तिसरी - बाब्या(इनामदारांचा वेडा मुलगा) आणि दुर्गा मावशी(वंदना गुप्ते). या सगळ्यांनची भुतं त्याला पछाडत असतात.
नाटकः
१. श्रीमंत दामोदर पंत - यात संध्याकाळी ६:०० नंतर त्याच्या अंगात त्याचे म्रुत आजोबा येत असतात.

२. सही रे सही - यात त्याने ३ भुमिका केल्या आहेत आणि या नाटकामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे, एका sceneमध्ये हे तिघही एकाच वेळी स्टेजवर आले आहेत LIVE.

>>शेम टू शेम नावाच्या (टुकार) चित्रपटात सर्वंच कलाकारांचे डबल रोल्स होते. >>
या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे आहे की यात जुळ्यांच्या तब्बल ५४ जोड्यांनी काम केले आहे.

नाटकातले डबल रोल पण लिहायचेत का ?
बे दुणे पाच मधे प्रशांत दामले, रथचक्र कधे रोहिणी हत्तंगडी, जेव्हा यमाला डुलकी लागते मधे सुधा करमरकर दोन भुमिका करत असत ( हि एकाच व्यक्तिने घेतलेली रुपे नव्हती )
खुपदा छोटे कलाकार नाटकात दोन तीन भुमिका करतच असतात.

अरुण नलावडे आणि रसिका ओक यांचे एक धमाल नाटक टीव्हि वर पाहिले होते... त्यात त्या दोघांनी ५ पेक्षा जास्त भुमिका केल्या होत्या. आणखी एक नाटक पाहिले होते त्यात विजय कदम आणि रसिका ओक यांनी अशात खुप भुमिका केल्या होत्या. दोन्ही नाटकांची नावे आठवत नाहित.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

masha, कळवलेल्या माहितीप्रमाणे यादीत सुधारणा केली आहे.
'चोरावर मोर' या चित्रपटात बहुतेक रवींद्र महाजनी यांनी काम केले आहे, उषा चव्हाण व अशोक सराफ यांच्याबरोबर. उषा चव्हाण यांच्या Blog मध्ये असलेल्या 'चोरावर मोर' चित्रपटाच्या छायाचित्रांत रवींद्र महाजनी आहेत.

Satishbv, बरोबर. नक्की किती जोड्या होत्या हे माहित नाही पण जुळ्यांच्या या जोड्या सहलीसाठी (आवळे-जावळे सहल) मुंबईत आलेल्या असतात. त्यांच्या गाडीतून लक्ष्मीकांत बेर्डे प्रवास करतो. त्यावेळी 'ही मुंबई भलतीच डेंजर, इथे सगळंच शेम टू शेम...' हे चित्रपटाचे शीर्षकगीत चित्रीत केले आहे.

DhanuD, 'गैर' मध्ये संदीप कुळकर्णीची दुहेरी भूमिका आहे की नाही हे नक्की माहित नव्हते. कळवल्याबद्दल धन्यवाद. चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असल्याने सर्वांचा रसभंग होऊ नये त्यामुळे यादीत सध्या सुधारणा करणे टाळले आहे.

मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करताना खालील प्रकारच्या भूमिकांचा विचार केलेला नाही. त्यामागचा विचार खाली लिहिला आहे.
१. व्यक्तिरेखेचे वेषांतर - मूळ व्यक्तिरेखा काही कारणाने वेषांतर करून किंवा न करता वेगळ्या नावाने वावरत असेल तरीही मूळ व्यक्तिरेखा एकच असते.
उदा. लक्ष्मीकांत बेर्डे व सचिन यांच्या 'अशी ही बनवाबनवी' मधील भूमिका,
अजिंक्य देव याची 'जगावेगळी पैज' मधील भूमिका.
२. व्यक्तिरेखेची स्वत: वेगळे असल्याची समजूत - स्मृतिभ्रंशामुळे किंवा Split Personality सारख्या वैद्यकिय कारणामुळे व्यक्तिरेखा स्वतःला कोणी वेगळीच व्यक्ती असल्याचे समजत असेल तरीही मूळ व्यक्तिरेखा एकच असते.
उदा. दिलीप प्रभावळकर यांची 'रात्र आरंभ' मधील भूमिका.
३. व्यक्तिरेखा पछाडली जाणे - व्यक्तिरेखा पछाडली गेली तरीही पछाडलेल्या व्यक्तिमत्वाचे स्वतंत्र अस्तित्व नसते.
उदा. भरत जाधव याची 'पछाडलेला' मधील भूमिका.
४. व्यक्तिरेखेचा अंतर्मनाशी संवाद - चित्रपटात व्यक्तिरेखा अंतर्मनाशी संवाद करताना दाखवले तरीही अंतर्मन हे मूळ व्यक्तिरेखेचेच प्रतिरूप असते.
उदा. शरद तळवलकर यांची 'जावई विकत घेणे आहे' मधील भूमिका.

मी लिहिलेल्या कारणांसंबंधी आपले सर्वांचे विचार जरूर कळवा.

मुग्धा व fiona, वर लिहिलेल्या कारणांमुळे आपण कळवलेल्या भूमिकांचा अंतर्भाव यादीत सध्या केलेला नाही. यासंबंधी आपले मत जरूर कळवा.

मुग्धा, दिनेश आणि ami79, कळवलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
नाटकातील दुहेरी / विविध भूमिकांबद्दल कळवल्यामुळे ही माहितीही संकलित करण्यासाठी नाटक विभागात नवीन धागा सुरू केला आहे.
मराठी मालिकातील दुहेरी / विविध भूमिकांच्या संकलनासाठी उपग्रह वाहिनी विभागात नवीन धागा सुरू केला आहे.
मराठी नाटकातील आणि मालिकातील विविध भूमिकांबद्दलही कळवत रहा.

मुग्धा, सही रे सही नाटकात भरत जाधवने ४ भूमिका केल्या आहेत. स्वतःशी मोठ्या आवाजात बोलणारी 'गलगले' ही भूमिका याच नाटकात आहे. हीच व्यक्तिरेखा भरत जाधवने 'गलगले निघाले' या केदार शिंदेच्या चित्रपटातही साकारली आहे.

ami79, अरुण नलावडे व रसिका ओक यांचे नाटक म्हणजे 'गंमत जंमत'. यात बहुतेक सोनिया मुळेनेही काम केले होते.
विजय कदम व रसिका ओक यांचे नाटक पूर्वी प्रभात वाहिनीवर पाहिल्याचे आठवत आहे. नाव नेमके आठवत नाही. त्या नाटकाचे नेपथ्य बहुतेक रिकाम्या चौकटी वापरून केले होते.

'मृगजळ' चित्रपटात भक्ती कुलकर्णीने दुहेरी भूमिका केली आहे. तुषार दळवी व रेशम टिपणीस यांची मुलगी मीरा व आधीच्या जन्मातील सचिन खेडेकरची मुलगी या २ भूमिका तिने केल्या आहेत.
यादीत सुधारणा केली आहे.

रेखा रावने 'गडबड घोटाळा' (१९८६) या चित्रपटात दुहेरी भूमिका केलेली नाही. तिची दुहेरी भूमिका 'गोडी गुलाबी' (१९९१) या चित्रपटात आहे.
यादीत सुधारणा केली आहे.

एका चित्रपटात दिलिप प्रभावळकर आणि प्रिया अरूण यांनी दोन भुमिका केल्या होत्या.
दिलिप प्रभावळकर अमेरिकेहून आलेयत असे भासवत असतात आणि मजेदार भाषेत 'वदनि कवळ घेता' म्हणतात. प्रत्यक्षात ते एक लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी चालवत असतात. प्रिया अरूण चतुर चोराच्या आणि बंगाली बाईच्या वेशांतरात होती. तिचे बंगाली नाव ओशोबिनी होते. यात लक्ष्मिकांत बेर्डे, अशोक सराफ, अलका कुबल आणि रेखा राव सुद्धा होते.

Pages