मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिका

Submitted by mangeshminal on 5 November, 2009 - 19:37

आशुतोष गोवारीकरच्या 'व्हॉटस युअर राशी ?' चित्रपटात प्रियांका चोप्राने १२ भूमिका केल्या व या भूमिकांची नोंद गिनीज बुक मध्ये होणार अशी चर्चा झाली.
त्यानंतर बातमी आली की एखाद्या कलाकाराने एकाच चित्रपटात १२ भूमिका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राजेश शृंगारपुरेने 'शंभु माझा नवसाचा' या २००६ साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात १२ भूमिका केल्या होत्या.
हे वाचून वाटले की, आतापर्यंत मराठी चित्रपटात सादर झालेल्या दुहेरी / विविध भूमिका संकलित कराव्यात.
आपल्याला माहित असलेल्या दुहेरी / विविध भूमिका कळवत रहा.

प्रत्येक नोंदीसाठी खालील माहिती जमा करता येईल.
प्रदर्शनाचे साल, चित्रपटाचे नाव, कलाकाराचे नाव, व्यक्तिरेखांची संख्या, व्यक्तिरेखांची नावे

मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिकांची यादी -
१९३३ औट घटकेचा राजा शाहू मोडक २ राजकुमार / भिकारी

१९४१ संत सखू हंसा वाडकर २ संत सखू / विठ्ठल

१९५२ पेडगावचे शहाणे राजा परांजपे २
१९५७ गृहदेवता रेखा कामत २
१९५८ राजा गोसावीची गोष्ट राजा गोसावी ३

१९६० रंगपंचमी जयश्री गडकर २
१९६४ पाठलाग भावना २

१९७३ आंधळा मारतो डोळा दादा कोंडके २
१९७३ थापाड्या निळू फुले २
१९७६ फरारी जयश्री टी. २
१९७९ पैजेचा विडा लक्ष्मीछाया २

१९८० चोरावर मोर उषा चव्हाण २
१९८२ भन्नाट भानू सुषमा शिरोमणी २ भानू / जयमाला
१९८७ चल रे लक्ष्या मुंबईला लक्ष्मीकांत बेर्डे २ लक्ष्या काणे / स्मगलर भोजराज
('स्मगलर भोजराज' या व्यक्तिरेखेसाठी रविंद्र बेर्डे यांनी आवाज दिला आहे.)
१९८८ चंगू मंगू अशोक सराफ २
१९८८ मज्जाच मज्जा वर्षा उसगावकर २ प्रतापसिंग / कामिनी
('प्रतापसिंग' या व्यक्तिरेखेसाठी सुनिल शेंडे यांनी आवाज दिला आहे.)

१९९० अनपेक्षित अशोक सराफ २
१९९० आमच्यासारखे आम्हीच अशोक सराफ २
१९९० आमच्यासारखे आम्हीच सचिन २
१९९० धडाकेबाज लक्ष्मीकांत बेर्डे २ लक्ष्मीकांत / गंगाराम
१९९१ अपराधी प्रिया अरुण ३ शालन / लाली / सोनाली
१९९१ गोडी गुलाबी रेखा राव २
१९९१ मुंबई ते मॉरिशस वर्षा उसगावकर २ भारती / आरती
१९९१ शेम टू शेम प्रिया अरुण २ शेवंता ओतूरकर / पल्लवी दादरकर
१९९१ शेम टू शेम लक्ष्मीकांत बेर्डे ४ लक्ष्मण जावळे / भालू जावळे / शंतनु जावळे /
'कमिशनर' राम जावळे
१९९१ शेम टू शेम दिपक शिर्के २ सटवाजीराव / हवालदार क्र. १००

२००० जोडीदार मृणाल कुलकर्णी २
२००० मृगजळ भक्ती कुलकर्णी २
२००६ जत्रा भरत जाधव २ मोन्या / घुम्या कानोळे
२००६ जत्रा विजय चव्हाण २ शिवा कानोळे / जिवा कानोळे
२००६ शंभु माझा नवसाचा राजेश शृंगारपुरे १२
२००७ कलम ३०२ अशोक सराफ ७

२०१० आयडियाची कल्पना सचिन ३ जयराम गंगावने / सचिन पिळगावकर (स्वत:) / गंगाराम गंगावने
२०१० दुर्गा म्हणत्यात मला मिलिंद गवळी २ डॉ. विजय / श्याम
२०१० दुर्गा म्हणत्यात मला दीपाली सय्यद २ दुर्गा सातारकर / डॉ. दुर्गा
२०१३ नारबाची वाडी मनोज जोशी २ रंगराव खोत / मल्हारराव खोत
२०१३ पितृऋण सचिन खेडेकर २
२०१४ मुक्काम पोस्ट धानोरी प्रकाश धोत्रे २ बाळासाहेब इनामदार / आप्पासाहेब इनामदार
२०१४ लय भारी रितेश देशमुख २

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगपंचमी चित्रपटात, चंद्रकांत आणि रत्नमाला पतिपत्नी असतात. एका तमाशा नर्तकीच्या ( हंसा वाडकर ) नादी तो
लागतो. दोघींना मूली होतात. हंसा वाडकर लबाडीने मुलींची अदलाबदल करते. पुढे दोघी जयश्री गडकर होतात.
सूर्यकांतसाठी एक बहीण त्याग करते.. वगैरे.

यात केवळ एकाच प्रसंगात दोन्ही जयश्री गडकर एकत्र येतात.

आशा भोसलेची अप्रतिम गाणी आहेत यात. मारिते गं पिचकार्‍या भरभरून / आले रे आले रंगवाले / बाई मला ठेच लागली ठेच / गेला हटकून बाई भरल्या बाजारात ... अशी अनेक.

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

धन्यवाद चीकू, आपण कळवलेल्या चित्रपटाचे नाव 'दुर्गा म्हणत्यात मला' हे आहे व हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता.

मिलिंद गवळी यांनी या चित्रपटात 'डॉ. विजय' व 'श्याम' या २ व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. डॉ. विजयच्या वडिलांचा फोटो म्हणून मिलिंद गवळी यांचाच फोटो वापरला आहे.

या चित्रपटात दीपाली सय्यद यांनीही २ व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. 'दुर्गा सातारकर' व त्यांची मुलगी 'डॉ. दुर्गा' या व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या आहेत.

यादीत सुधारणा केली आहे.

शेम टू शेम हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला होता. यात दिपक शिर्के यांनीही २ व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
यादीत सुधारणा केली आहे.

तुलनेने नव्या २ चित्रपटातील दुहेरी भूमिकांविषयी:

२०१३ साली प्रदर्शित 'नारबाची वाडी' या चित्रपटात मनोज जोशी यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. रंगराव खोत आणि (त्यांचा मुलगा) मल्हारराव खोत या व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या होत्या.

हा चित्रपट मदन मित्रा यांच्या 'साजानो बागान' या बंगाली नाटकावर आधारित होता. याच नाटकावर आधारित 'बच्छारामेर बागान' या तपन सिन्हा यांच्या चित्रपटात मदन मित्रा यांनी भूमिका साकारली होती.

याच चित्रपटावर आधारित 'इसी का नाम जिंदगी' हा हिंदी चित्रपट बनवला गेला होता.

२०१३ सालीच प्रदर्शित झालेल्या 'पितृऋण' या चित्रपटात सचिन खेडेकर यांनी दुहेरी भूमिका साकारली होती.

यादीत सुधारणा केली आहे.

तुलनेने नव्या २ चित्रपटातील दुहेरी भूमिकांविषयी:

२०१३ साली प्रदर्शित 'नारबाची वाडी' या चित्रपटात मनोज जोशी यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. रंगराव खोत आणि (त्यांचा मुलगा) मल्हारराव खोत या व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या होत्या.

हा चित्रपट मदन मित्रा यांच्या 'साजानो बागान' या बंगाली नाटकावर आधारित होता. याच नाटकावर आधारित 'बच्छारामेर बागान' या तपन सिन्हा यांच्या चित्रपटात मदन मित्रा यांनी भूमिका साकारली होती.

याच चित्रपटावर आधारित 'इसी का नाम जिंदगी' हा हिंदी चित्रपट बनवला गेला होता.

२०१३ सालीच प्रदर्शित झालेल्या 'पितृऋण' या चित्रपटात सचिन खेडेकर यांनी दुहेरी भूमिका साकारली होती.

यादीत सुधारणा केली आहे.

प्रिया अरुणची तिहेरी भूमिका असलेला चित्रपट 'अपराधी'. हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला होता.
यादीत सुधारणा केली आहे.

जागोमोहनप्यारे, 'मोसंबी नारंगी' चित्रपटात सुषमा शिरोमणी यांची दुहेरी भूमिका नाही.
'भन्नाट भानू' या चित्रपटात सुषमा शिरोमणी यांनी २ व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. हा चित्रपट १९८२ प्रदर्शित झाला होता.
यादीत सुधारणा केली आहे.

जागोमोहनप्यारे हा आयडी बंद झाला, त्यानंतर त्यांचे अनेक नविन आयडी होऊन गेले, तुम्हाला काहीच कल्पना नाही का याची ? Uhoh

महेश, कळवल्याबद्दल धन्यवाद.
आपल्या माहितीत मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिका असल्यास कळवा.

डबल रोल किंवा मल्टीपल रोलच्या यादीत जामोप्यांचं नाव यायलाच हवं. Proud ते किती यशस्वीपणे सगळे रोल्स सांभाळतात. नर्मदा, कमला आणि असेच बरेच अजुन कोणी कोणी.

सध्या ते कोण आहेत याची उत्सुकता आहे मला. Happy

सध्या ते कोण आहेत याची उत्सुकता आहे मला.>>>> anilchembur या नावाने नविन अवतार घेतला आहे.

सस्मित, आपण कळवलेल्या विविध भूमिका हिंदी चित्रपटातील असल्याने या यादीत त्याचा समावेश केलेला नाही.

आतापर्यंत हिंदी चित्रपटात सादर झालेल्या दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी नवीन धागा सुरू करता येईल.
याबाबत आपला विचार जरुर कळवावा.

नाही त्यामधे रविन्द्र महाजनी यांची दुहेरी भुमिका नाही. एकच व्यक्ती असते केवळ ऐषारामाचे आयुष्य सोडून गरीब माणूस बनून रहात असतो. हिंदीमधे "माया" नावाचा चित्रपट होता, त्यात देवआनंद आणि मालासिन्हा होते. त्याचाच हा मराठी रिमेक होता असे वाटते, यामधे रविन्द्र आणि रूही बेर्डे आहेत.

सातपुते

सत्ते पे सत्ता ची मराठी नक्कल आलेली ना मध्ये 'आम्ही सातपुते' या नावाने. अमिताभ च्या जागी आपले महाग्रू होते.

सत्ते पे सत्ता मध्ये अमिताभ चा डबल रोल होता. 'आम्ही सातपुते' मध्ये पण महाग्रूंनी डबल रोल केला असल्यास ऍड करा.

राज, महेश यांनी कळवल्याप्रमाणे 'आराम हराम आहे' या चित्रपटात रविंद्र महाजनी यांनी दुहेरी भूमिका साकारलेली नाही.

रविंद्र महाजनी हा उद्योगपती असतो. वडिलोपार्जित व्यवसायातून तो त्याच्या शाळेला मदत देऊ करतो, तेव्हा त्याचे शिक्षक त्याला स्वकष्टार्जित पैशाने मदत करायला सांगतात. त्यानंतर आपला व्यवसाय मॅनेजरकडे सोपवून तो शहरात जातो व वेगळ्या नावाने तेथे राहतो.

निंबुडा, 'आम्ही सातपुते' या चित्रपटाचे कथानक 'Seven Brides for Seven Brothers' या १९५४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटावर आधारित आहे.
त्यामुळे या चित्रपटात सचिन ऊर्फ महागुरुंची दुहेरी भूमिका नाही.

'सत्ते पे सत्ता' हा चित्रपटही 'Seven Brides for Seven Brothers' वर आधारित आहे. पण त्या कथानकात नायिकेची मालमत्ता हडपण्याची इच्छा असणारा काका व त्याने दिसण्यात रवि (अमिताभ) सारख्या गुंडाची मदत घेणे हे उपकथानक जोडले आहे. त्यामुळे 'सत्ते पे सत्ता' मध्ये दुहेरी भुमिकेचा समावेश झाला.

Pages