Submitted by shuma on 24 October, 2019 - 08:19
पाऊस दारी येता
मी कवाडं तिरपी करते
तो टपटप वाजत रहातो
मी पाठमोरीशी होते
तो घेऊन येतो सा-या
हरविल्या सप्त सूरांना
मी विसरु पाहते सारे
तो जगवितो पुन्हा क्षणांना
तो बधत नाही मजला
अन कवाड वाजवित बसतो
मी हिरमुसली होत्साती
तो ओल्या नजरेनं पहातो
मी टाळून जेव्हा त्याला
ती बंद कवाडे करते
खिडकीवर पागोळ्यांची
सर ओघळून बरसते
वाटते मलाही तेव्हा
कवेत त्याला घ्यावे
उघडावे दार मनाचे
अन चिंब सरींत भिजावे
टाळून क्षणिक त्या मोहा
मी पांपण्या मिटून घेते
कानांवर गर्जत रहाते
थैमान वादळी त्याचे...
थैमान वादळी त्याचे....
शमा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
क्या बात है! खूप दिवसांनी
क्या बात है! खूप दिवसांनी दिसलीस गं!!
खूप सुंदर!!! पाऊस हे मोहाचे
खूप सुंदर!!! पाऊस हे मोहाचे रुपक वाटते आहे.
कविता छानच पण शीर्षक अजून छान
कविता छानच पण शीर्षक अजून छान
खुपच सुंदर! आवडली तुमची कविता
खुपच सुंदर! आवडली तुमची कविता.. पुकाप्र!
सुंदर रोमँटिक आहे कविता
सुंदर रोमँटिक आहे कविता