माझा गार्डिअन एंजल

Submitted by सामो on 4 October, 2019 - 16:30

******************* सर्व कार्टून्स, चित्रे जालावरुन साभार***********************
.

.
माझ्या गार्डिअन एंजलची अर्थात देवदूताची चंद्ररास कन्या असून, त्याचे लग्न "कर्क" व सूर्यरास "वृश्चिक" असल्याचा संशय मला फार पूर्वीपासून म्हणजे ज्योतिषातील बेसिक ब्लॉक्स कळल्यापासूनच होता.
.
या ज्योतिषविषयक अंदाजाचे कारण सांगते -
लहानपणी बराच व्रात्यपणा केलेला आहे. उदा - गंमत म्हणून कोणाच्यातरी सायकलची हवा काढून टाकणे, कैर्‍या पाडताना, दगड मारुन काचा फोडणे, तीसर्‍या मजल्यावरील लोकांच्या दाराला बाहेरुन कडी घालून, बेल वाजवुन पळून जाणे वगैरे वगैरे. पण माझा देवदूत लक्ष ठेऊन असल्याने, सतर्क असल्यामुळे कधी पकडले गेले नाही. आता इतके सतर्क, सतत जागे व ड्युटीवर कन्या-चंंद्राशिवाय अन्य कोण असेल, तुम्हीच सांगा! एकदा तर कुत्र्याची अतिशय गोंडस, गोडुली पिल्ले पाहून, "कुतु"हलाने, त्यांच्याशी "यु-यु" करत खेळायला गेले असता "कुतु"माता चवताळून अंगावर येऊन तेथून "हल"ण्याची आपत्तीही ओढवुन घेतलेली आहे. फक्त देवदूताची काळजी म्हणुन त्या प्रसंगातून वाचलेले आहे.
.

.
लहानपणापासून खाद्यपदार्थ हादडणे, बोकाणे भरणे, तोबर्‍यावर तोबरे भरत लोळत दिवाळीअंक वाचत पडणे, असे आवडीचे टाइमपास आका रिक्रिएशनल हॉबीज राहीलेले असल्याने, बाळसे हे पाचवीला पूजलेल आहे. अजुनही ती सवय आहेच. बरेचदा तर मैत्रिणीने तिची खीरीची वाटी मला देऊ केल्याचे प्रसंग घडलेले आहेत. अर्थात तिचे मन कसे मोडायचे म्हणून मीही ती गट्ट केली आहे. यात मैत्रिण माझ्या फिगरचा बळी देऊन,स्वतःची फिगर जपत असल्याचा संशयही मला बराच काळ आलेला नव्हता हे अलहिदा. आता अशा आग्रहाला कर्केच्या प्रेमळपणाशिवाय अन्य रास जबाबदार असूच शकत नाही. असा प्रेमळ देवदूत काळजी घेत असेल शत्रू कशाला हवेत नाही का! आणि मग फिगरचा बोर्‍या वाजणार नाही तर काय!
हा माझा देवतदूत शाबासकी देण्यातही प्रेमळ आहे, तत्पर आहे. शाबासकी दिल्याशिवाय रहात नाही. कधी कोणाला मदत केली, कोणाचं मनापासून, परतफेडीची अपेक्षा न ठेवता चांगलं केलं की त्याच्च खरच त्याच दिवशी व्याजासकट पोचपावती मिळते मला.
.

.
वृश्चिक ही सूडी रास म्हणुन कुप्रसिद्ध आहे. विंचू किंवा इंगळी ही तिच्या डसण्याकरता तर प्रसिद्ध(कु) असते. म्हणजे आता वृश्चिकेच्या स्वभावाप्रमाणे सूड घ्यायचा की कन्येचे कर्तव्यपालन करायचे या द्वंद्वामध्ये देवदूत कन्फ्युझड आणि "पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव्ह" होऊन बसलेला आहे. याची बरीच उदाहरणे आहेत. एकदमच ठळक उदाहरण म्हणजे "लग्न", इतर वेळी सजग असणारा आमचा देवदूत तेव्हाच कुठेतरी गोट्या खेळायला गेलेला तरी होता नाहीतर मुद्दाम छद्मी हसून मज्जा खरं तर पुढे होणार असणारी मेजर फजिती बघत होता. Wink
.
माबोवर लेख टाकतानाही बरेचदा म्हणजे जसे आतासारखा बरेचदा हा मला सावध करत असतो "लेख टाकू नकोस. टुकार, चाइल्डिश, मंद आहे. इथला क्राऊड सहनशील आहे त्याचा गैरफायदा घेतीयेस. कधीतरी अंगाशी येइल." पण मी नेहमीप्रमाणे आजही त्याचे ऐकणार नाहीये. मग याला निस्तरावे लागणार आहे Wink अर्थात कितीका भिकार असेना माझ्या काही मित्र-मैत्रिणींना किंवा नवोदितांना "चान चान" म्हणावे लागणार आहे. Proud
.
आज ऐकलं नाही म्हणून मग उद्या हा १००% "पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिवपणाचे" प्रदर्शन करणारच आहे मला खात्री आहे. म्हणजे उद्या ऑफीसात नक्की ब्रायन "हाऊ वॉज वीकेंड" ने सुरुवात करुन, त्याने गाडीचे सर्व्हिसिंग कसे केले, गॅरेज कसे नीटनेटके केले असल्या बोअरींग गोष्टी त्याच्या हेवी अ‍ॅक्सेंटमध्ये सांगून पीडणार आहे. मला त्याचे बोलणे अर्ध्याहूनही कमी कळतं आणि मी फक्त "ओह रियली...हम्म्म, ....ग्रेट" या तीन शब्दांपुढे बोलले नाही तरी तो तासभर मला पीडल्याशिवाय सोडत नाही. आणि दर वेळेला, देवदूत ढिम्म काहीही न करता मिष्किलपणे हसत हसत पहातो. मला त्याचे अँटिक टॅक्टिक्स कळत नाही असं नाही पण करते काय. खरं तर डेली हडलचा काही एक हेतू असतो, थोडक्यात काल पूर्ण केलेले टास्क,आज करण्याचे टास्कस आणि रोडब्लॉक्स (अडचणी) एवढच्च तोंड उघडून बोलायचं असतं. पण सुझेट डेली हडलमध्ये इतका वेळ फालतू स्वतःच्या कामाचं गाणं गाते आणि मग वाक्याने वाक्य वाढत जाऊन हडलचे एक मोठ्या अनियंत्रित मीटींगमध्येच परिवर्तन झाले की मी झोन आऊट होते. आणि मग माझी टर्न आली की मी एकदम जागी होऊन त-त-प-प करते. आणि हे त्याला दर वेळेस माहीत असतं तरी तो माझी फजिती होऊन देतो.
.
असा कन्या-चंद्र, कर्क-लग्न, वृश्चिक-सूर्य देवदूत वरदानही आहे व त्रासही. तुझे-माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना टाइप. असो. लेखकाचे नाव वाचून, ट्रॅक रेकॉर्ड माहीत असूनही तुमच्या देवदूताने तुम्हाला हा लेख वाचू दिला असेल तर तो त्याचा व तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमच्या लठ्ठालठ्ठीत मला पाडू नका. आता असं म्हणू नका की फालतू होता, वेळ वाया गेला Lol
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का गं देवकी? ते राशींमुळे विरस झाला असेल. किंवा बस नाही आवडत क्वचित Happy
अनु, ही 'हल' कोटी उसनी आहे , कोणीतरी तिच्या लेखात (तशा प्रकारची कोटी) केलेली होती Happy

माका फोटो दिसत ना. गार्डीयन एंजेल काय प्रकार असतो? इष्टदेवता म्हणता येईल का? कि एखादी सिध्दी वगैरे, प्रसन्न करून घेतलेलं एखादं दैवत?

मी सुद्धा लोकांच्या घराला बाहेरुन कडी लावुन उगाच येता जाता कुणाच्याही घराची बेल वाजवणे हे प्रकार करायचे.. Lol बचपन कि यादे Happy
लेख चांगलाय..पण पुर्ण कळाला नाही..
जोतिषीशास्त्रात रस आणि विश्वास दोन्ही नाही..म्हणुन असेल कदाचित. Happy

फोटु दिसेनात..

हो दिसले आता फोटोस.
Btw तुम्हाला Tibettian fluorite stone angel बद्दल माहिती आहे? असल्यास ते कितपत उपयोगी असतं ते सांगा।

श्रद्धा, हां असे देवदूत दुकानात पाहीले आहेत, परंतु माहीती नाही गं.
मी बरेचदा, 'Graveyard Angels' अशी सर्च देते आणि इमेजेस चाळत बसते. इतके सुंदर देवदूत पुतळे सापडतात. Happy

तुमच्या लठ्ठालठ्ठीत मला पाडू नका. आता असं म्हणू नका की फालतू होता, वेळ वाया गेला .
असं कसं?... असं कसं?
.
.
बायदवे भारीय हे शुचि