पहिला पाऊस

Submitted by @गजानन बाठे on 1 October, 2019 - 06:44

पहिला पाऊस

घनदाट मेघ हे आज दाटले,
नभी जमला रम्य देखावा.
अलगद चमके विद्युल्लता,
वाऱ्यासही का सुटला हेवा.

धरतीलाही ओढ सरींची,
आसमंत का अजाण सारा.
कुठे उडाली फुलपाखरे,
थुईथुई नाचे मोरपिसारा.

शीतल वारा मनी शहारा,
मातीलाही सुवास न्यारा.
मी मग मजला कसा सावरू,
का मी दवडू एक नजारा.

नव तरुणीसम सजली धरती ,
नेसून शालू गर्द हिरवा.
उठ उठ ते बळीराजा तू ,
गात आहे गोड पारवा.

गजानन बाठे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अलगद चमके विद्युल्लता,

धरतीलाही ओढ सरींची

हे बदल सुचवावेसे वाटतात, कविता एकदम सुंदर