बिग बॉस सिझन हिन्दी १३: इस बार सिझन ' टेढा' है

Submitted by सूलू_८२ on 29 September, 2019 - 09:00

हाय फ्रेण्डस,

ह्यावेळचा हिन्दी बिग बॉसचा सिझन ' ओन्ली सेलिब्रिटिज' चा असणार आहे. नो कॉमनर्स!

बिबॉ लोणावळयात नसून, फिल्मसिटीत घडतय.

ह्यावेळी सिझनमध्ये काही नवीन टिव्स्ट्स असणार आहेत म्हणे.

एरवी बिग बॉस पुरुषी आवाजात स्पर्धकान्ना आदेश दयायचा, पण आता त्याच्या जोडीला फिमेल वॉईस ऐकायला मिळणार आहे. आणि तो आवाज असणार आहे:

अमिषा पटेलचा.

सो, चर्चा करायला या!

Bigg-Boss-House.jpg

Group content visibility: 
Use group defaults

हा धागा सुलू_८२ अथवा अंजू यांनी काढायला हवा, ही इच्छा पूर्ण झाली.
Happy
किती वाजता पहिला एपिसोड सुरू होणार आहे आज?

हो ना, कसले बोर कन्टेस्टन्ट्स आहेत. बहुतेक मेन ओवरग्रूम्ड कृत्रिम बॉडी बिल्डर्स, १-२ स्टुपिड क्लाउन कॅटेगरी. बाया पण तशाच सगळ्याच ग्लॅमरस बाहुल्या. एक पण ह्यूमन / पर्सनेबल फेस वाटत नाहीये फ्रॉम द फर्स्ट लूक. आधी मारे रुमर्स पसरवल्या होत्या चंकी पांडे, राजपाल यादव, आदित्य नारायण वगैरे.

मी हिंदी बघत नाही, यंदा सगळी हिंदी channels काढून टाकली केबलमधून, कोणी काही इंटरेस्टिंग लिहिलं तर तेवढयापुरते voot वर बघेन. नेहा पेंडसेचा खुर्ची task आणि मेघासाठी काही दिवस बघितलेलं मागच्यावर्षी. शिवला घेतलं असतं तर मात्र voot वर रोज बघितलं असतं आणि इथे इरिटेट केलं असतं लिहून Wink . आता नाही करणार, माझ्या पोस्टमुळे इरिटेट होणाऱ्या सर्वांची सुटका. हलके घ्या.

खूपजण माहिती नाहीयेत यातली. रश्मी देसाई, शुक्ला, गोपी वहू ओळखीचे आहेत. BTW कलर्सवरचा लेटेस्ट artist कोण आहे, फार काही कांड केलं नाही तर तो किंवा ती फायनलला नक्की असणार.

कोयना मित्रा पण ओळखीची आहे, साकी साकी रे साकी साकी वाली ना ती.

सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई कलर्सवरचे लेटेस्ट म्हणता येतील.
दोन्हीही निवांत फायनलला पोहोचू शकतात!
(बादवे रश्मी देसाई ही माझी सगळ्यात आवडती टेलिव्हिजन ऍक्टरेस आहे.)

Thank u अज्ञातवासी.

रश्मी उतरण मध्ये मला आवडायची, ती इच्छा नव्हती आवडत. पण सिरीयल फार कमी बघितली, तो हिरो दिसण्यात आवडायचा पण अभिनय so so. नंतर त्यांनी लग्न केलेलं खरं खुरे. ती दुसरी सिद्धार्थ, रश्मी सिरीयल नव्हती बघितली.

जिंकण्याचे चान्सेस रश्मीचे जास्त असतील जर ती task वगैरे चांगली खेळली तर.

मलाही ती उतरण मध्येच पहिल्यांदा बघितली, आणि आवडायला लागली. तिच्यासाठीच ती महाभयानक बोरिंग सिरीयल बघितली.
दुसरी दिल से दिल तक, फक्त रश्मी देसाई आहे, म्हणून पुन्हा सहन केली. डेडिकेशन Lol
फक्त तिने दुसरी शिवानी सुर्वे होऊ नये हीच इच्छा!!!

यावेळी बिग बॉस कमी आणि splitsvilla जास्त वाटतंय!
Lol
अमिषा पटेल घरात आल्यावर कुणीही उत्सुक दिसलं नाही, काही लोक तर मस्त खात बसले होते. तिचं सेलेब्रिटी स्टेटस काहीही काम करणार नाही बहुतेक!

अमिशा सेलेब्रीटी होती त्याला युगं उलटून गेली. माझ्या तर ती प्रचंड डोक्यात जाते कहो ना प्यार है पासूनच. शुक्लाजींवर मात्र मी जाम फिदा आहे. फक्त आणि फक्त त्याच्या साठी बालिका बधू सहन केली होती. पण बिग बॉस नाही सहन करू शकणार. रोज फक्त एक झलक पाहून जाईन. चकोराला एक चन्द्र किरण पुरेसा आहे की Proud

अज्ञा सेम हिअर..मला ही आवडते रश्मी देसाई.. दिसायला गोड ए ती..
पण फक्त तिला/ त्याला बघायला?! मी अजुनतरी कुठलीच सिरीअल बघीतलेली नाहीये.. Lol

डेडिकेशन >>> Lol

अमिषाला का आणलंय, ती कोणाला आवडत असेल असं वाटत नाही. काहीही करतात.

या वेळचे हिन्दी बीबी चा कांसेप्ट फारच विचित्र आहे. बिग्ग बॉस वाटतच नाही आहे.
मला आरती सिंग आवडते.
मेल स्पर्धक फक्त 5च आहेत. त्यात मध्ये फक्त sidharth shukla च चांगला वाटतो.
अमिषा पटेल कडे तर बघवतच नाही.

आरती सिंग आणि तिची मावसबहिण रागिणी खन्ना या दोघींची मालिका एकाच वेळी असायची tv वर तेव्हा मी रागिणीची बघायचे, ती जास्त आवडायची, अजूनही आवडते पण आरतीसुद्धा गोड आहे.

यावेळी मी हिन्दी बीबी नीट फॉलो करायचे ठरवलेले पण पहिला एपिसोड बघुन जमेल असे वाटत नाही. Sad
तो पारस छाबरा अजिबात आवडत नाही तो असलेला स्प्लीटविला पहिलय.

तो पारस छाबरा अजिबात आवडत नाही तो असलेला स्प्लीटविला पहिलय. >>+१११

मी आज बघीतला प्रिमीअर मला आवडला, मुली मधे दलजित, रश्मी अन कोयना बर्या वाटल्या, ती एक पंजाबी डोक्यात गेली अक्षरश: सिद्दार्थ शुक्ला, शिरेलीत आवडायचा, पण ईकडे थोडा अकडु वाटतोय. तो दुसरा डे तर अगदीच बकवास त्यापेक्षा तो कश्मिर वाला बरा वाटतोय सध्या तरी.

बाकी , अमिषा फुकटात मिळाली कि काय? एखादी दुसरी चांगली मालकिण मिळु शकली असती की यांना. की सगळे पैसे सलमानवर खर्च केले सो .. दुसरी कुठलीच परवडली नाही Uhoh

मला आवडायची पुर्वी अमिषा पटेल. ' यह है जलवा' पर्यन्त ती छान वाटायची मला. नन्तर मात्र चुकीचे चित्रपट निवडल्यामुळे तिच करियर डळमळल ते कायमचच. आता तर तिच्याकडे बघवत सुद्दा नाही. ती आणि कोयना मित्रा दोघीन्नीही त्यान्च्या चुकान्मुळे चान्गल्या चाललेल्या करियरची वाट लावली.

रश्मी उतरण मध्ये मला आवडायची, ती इच्छा नव्हती आवडत. पण सिरीयल फार कमी बघितली, तो हिरो दिसण्यात आवडायचा पण अभिनय so so. >>>>> मलाही आवडायची रश्मी. त्या दोघान्चा नन्तर डिवॉर्स झाला. मला त्या हिरोपेक्षा त्याचा भाऊ झालेला आवडलेला. त्याचा अभिनयही छान होता. रोहित खुराना त्याच नाव. सध्या तो कुठेच दिसत नाही.

ती दुसरी सिद्धार्थ, रश्मी सिरीयल नव्हती बघितली. >>>>>> ती ' चोरी चोरी चुपके चुपके' सिनेमावर बेतली होती. ह्या सिद्धार्थचे बरेच इश्यूज होते सिरियलच्या सेटवर. म्हणून त्याला हाकलल सिरियलमधून. त्याच्या जागी दुसरा आला.

काल त्या काश्मीरवाल्याला पारस आणि इतरजण उगाचच गॅन्गअप करत होते. पहिल्याच दिवशी पारस आणि काश्मीरवाल्याच भाण्डण झाल. काश्मीरवाल्याचे मुद्दे बरोबर होते, पण त्याने जम्मू- काश्मीर कार्ड खेळायला नको होत.

पन्जाबी सिन्गर एन्टरटेनिन्ग आहे.

मला त्या हिरोपेक्षा त्याचा भाऊ झालेला आवडलेला. त्याचा अभिनयही छान होता. रोहित खुराना त्याच नाव. >>> तो तर जास्तच आवडलेला, acting भारी होती त्याची. नंतर एकदा बघितलेला कुठेतरी.

ह्या सिद्धार्थचे बरेच इश्यूज होते सिरियलच्या सेटवर. >>> बाहेर पण अनेक इश्युज आहेत, केसेस आहेत असं वाचलं. असेच लागतात हिंदीत. हाईट, personality छान पण अभिनय so so.

ती देबोलीना म्हणजे गोपी वहू पण मागे गाजली होती एका केसमध्ये, म्हणून तिलाही एन्ट्री बहुतेक.

यावेळी चार आठवड्यांनंतर फीनाले आहे ना ? आणी त्यानंतर परत काही तरी twist आहे.
कामा साठी ड्युटी बाहेर च दिल्या गेल्या ते एक बरे केले नाही तर कैप्टन होई पर्यंत सगळे भांडत बसतात.
Bff ही कांसेप्ट काहीच्या काहिच आहे पण. Bed friend forever

नवीन बिग बॉस मध्ये सगळंच नवीन केलाय . घरातल्या कामासाठी पहिल्या दिवशीच कामाची वाटणी करून टाकली म्हणजे आता बिचुकले सारखं कोणी नकार द्यायला नको.मला हे काम नको ते काम नको म्हणजे भांडाभांडी पण वाचली . कदाचित कॅप्टन ची पोस्ट पण काढून टाकली असावी . म्हणजे इम्युनिटी साठी पण भांडाभांडी नको . कॅप्टन च काम आमिष पटेल करेल असं वाटत. ती मात्र खरोखरच बघवत नाही आणि चार आठवडयांनी ( म्हणजे साधारण एका महिन्याने) फिनालेचे स्पर्धक ठरतील आणि पुढचे दोन महिने तेच सहा राहतील असं असावं . म्हणजे काय सगळ्या स्पर्धकांचे पाचव्या सहाव्या आणि पुढच्या सगळ्याच आठवड्याचं मानधन वाचल कि . . तेरा मधले सात जण चार आठवडयांनी बाद होतील त्यामुळे उरलेल्या सहा जणांचाच फक्त काय मानधन द्यावं लागेल ते .

थोडक्यात स्पर्धकांचं पुढच्या आठवड्याचं वाचलेल मानधन आमिष पटेल वर खर्च करणार असं दिसतंय. यात बिग बोस चे पैसे वाचत नाहीचेत पण वेगळीच कन्सेप्ट एवढच Happy

Pages