हे वृक्षांनो (आरे कॉलनीतल्याही

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 17 September, 2019 - 12:03

हे वृक्षांनो (आरे कॉलनीतल्याही)

हे वृक्षांनो
माफ करा आम्हाला
वाढतेय आमची प्रजा
वाढताहेत गरजा
नाही थांबवता येत
कत्तल तुमची आम्हाला
सत्तेमधील समीकरणे
धनिकांचे घर भरणे
जणू काही हे सारे
मान्य आहे आम्हाला

पर्याय असतात सापडतात
जर शोधले तर
युरेका नावाचा हर्षवायू
कधी लागतो हाताला

पण धनदांडगे कॉन्ट्रॅक्टर
टक्क्यांवर पोसली जाणारी
त्यांची बुभुक्षित पिलावळ
हसते ठेंगा दाखवून आम्हाला

मरा तुम्ही ठिकऱ्या पडत
पडा तुम्ही फांद्या तुटत
तुमचे ते हिरवे जग
जल्लाद म्हणू देत आम्हाला

त्या तुमच्या मरणात आम्ही
अधोरेखित केले आमचे मरण
शेवटी चिता आणि शवपेट्या ही
तुम्हीच होता ना आम्हाला
*

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तमच लिहिलीय. चिता आणि शवपेट्या यांचा उल्लेख मन जाळीत गेला. मानवाला मृत्यूनंतर वृक्ष मदत करतात पण झाडांच्या मृत्यूसमयी मानव कुठे असतो?
पण हर्पेन यांचेच शब्द: आवडली असे तरी कसे म्हणू?

एक झाड तोडायला 10 मिनीट खुप झाली..पण त्याच झाडाची पुर्ण वाढ व्हायला 10 वर्षसुद्धा अपुरी पडतात.. Sad