राजस्थान सहलीसाठी मार्गदर्शन

Submitted by Vishu Shelar on 17 September, 2019 - 05:01

मि आणि माझे मित्र डिसेंबरमध्ये राजस्थान फिरायला जाणार आहोत तर तिथे जी ठिकाणं आपण टाळून येऊच शकत नाही आणि आम्ही उदयपुर - जयपुर - बिकानेर आणि जैसलमेर असा कार्यक्रम ठरवला आहे तर कोणत्या ठिकाणी काय-काय बघायला आहे आणि ते बघण्यासाठी साधारण किती वेळ लागेल तसंच तिथे राहण्यासाठी आणि खाण्यासाठी उपलब्ध स्वस्त आणि मस्त पर्याय सुचवा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधली अंतरं दोन अडिचशे किमि

मधली अंतरं दोन अडिचशे किमि आहेत हे लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी बसेस भरपूर आहेत.
बिकानेर, जयपूर इथे थेट ट्रेनस आहेत मुंबईहून.
दोनदोन दिवस राहून व्यवस्थित बघता येईल. नऊ दिवस. (१)विमानाने जयपूर * -बिकानेर -जैसलमेर -जोधपूर -उदयपूर* विमानाने हा किंवा उलट क्रम करता येईल.
-----
(२) ट्रेनने फलना स्टेशन* - राणकपूरमार्गे उदयपूर - चितोडगढ करून -जयपूर -बिकानेर -जैसलमेर -जोधपूर* इथून ट्रेनने परत.
किंवा (३)बान्द्रा_उदयपूर ट्रैनने प्रथम चितोढगढला* सात वाजता उतरायचे. तो पाहून - उदयपूर -जोधपूर-जैसलमेर -बिकानेर - जयपूर *. इथून रेल्वे/विमान.
*ते* बस सर्वीस तिकडेच बुक करा . जाण्या येण्याचे आरक्षण करणे.