पन्नाशीपुढची वाटचाल

Submitted by अश्विनीमामी on 9 October, 2014 - 05:28

पन्नाशीत पाउल ठेवताना असे जाणवते कि अजून दहा अ‍ॅक्टिव्ह वर्षे आपल्या हातात आहेत. त्यानंतर ऑफिशिअली रिटायर व्हायचेच आहे. पण कितीतरी गोष्टी करता येतात. आवडीचे शिक्षण, छंद, भटकंती,
संसाराच्या, नोकरीच्या धावपळीत राहून गेलेले बरेच काही आता आरामात करता येते.

बदलत्या जीवनमानानुसार व चांगल्या आरोग्यसेवांच्या उपलब्धतेमुळे आता खर्‍या अर्थाने ज्येना होण्यास पंचाहत्तरी तरी गाठावी लागते. खुद्द पुण्यनगरीतच ह्याहूनही पुढचे कितीतरी विद्वान, हसरे अ‍ॅक्टिव ज्येना आहेत. जगभरातच जीवनाच्या ह्या कालखंडाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलत आहे.
व्यवस्थित प्लॅनिन्ग केल्यास, आरोग्य, अर्थ आणि भावनिकद्र्ष्ट्या अतिशय छान, आनंदी जीवन,
वयाच्या पन्नास ते पंचाहत्तर ह्या कालखंडात जगणे शक्य आहे.

पहिला गोल साठीपर्यंत पोहोचणे हा असावा. त्यासाठी आरोग्याचे तसेच पैशाचे व्यवस्थापन गरजेचे आहे. तसेच मुलांच्या जीवनात मायक्रो मॅनेजमेंट न करता आपला रोल आता कन्सल्टंट/ ऑकेजनल हेल्पर असा राहणार आहे हे उमजून घेउन आपले स्वतःचे जीवन कसे जास्त एन्रिच करता येइल या संबंधाने चर्चेसाठी हा बाफ उघडला आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठीकच आहे सामी . मी माझा अनुभव सांगितला एवढंच.

निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा आहे.

हा फरक बहुधा पेन्शन ची सोय असलेले आणि नसलेले जॉब्ज यामुळे होत असावा का? Happy पेन्शन असल्यावर लवकर रिटायर झाले तरी शेवटपर्यन्त इन्कमची ग्यारन्टी असते. प्रायव्हेट नोकर्‍या करणार्‍यांना तसले लाड नाहीत. तुम्ही जे सेव्ह केले आहे ते जितके पुरेल तितकेच काय ते खरे.

होय अगदी बरोबर ओळखलेत मैत्रेयी. तो फॅक्टर आहेच की. आर्थिक स्वातंत्र्यापुढे अगदी सर्वच पर्याय मागे पडतात Sad सर्वांची एवढी बचतही नसते.

<<< कमी दगदग. ओके पैसे, आपल्या अनुभवाचा फायदा होइल असे काम. ही त्रिसुत्री आहे. >>>
वर प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार.
तसं म्हटलं तर मला काहीही दगदग नाहीये. प्रवास फारतर १५-२० मिनिटे आहे, कामाचे प्रेशर नाही, रजेचा प्रश्न नाही, पैसे भरपूर मिळतात. आयुष्यभर काहीही केले नाही तरी पुरून उरतील, ते टेन्शन नाही. सुट्टीत वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे नेहमीच करत आलो आहे.

प्रश्न असा आहे की जर मी तृप्त असेन तर मी काय करायला हवे? आणि काय करायला नको? साधारणपणे पैसे मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो, पण जर त्याचीच गरज नसेल तर काय? रोज उशीरा उठीन, टीव्हीवर आवडीचे कार्यक्रम बघीन, प्रवास करीन, दुपारी झोप काढीन... सर्व ठीक आहे, पण त्याचा पण कंटाळा येणार ना? हा विचार मनात येतोय. म्हणून विचारले.

काही वर्षांपूर्वी याच विषयावर मार्गर्शन करणारा लेख वाचनात आला होता. त्याची लिंक खाली देत आहे. कृपया नक्की वाचा..

http://tdrtimes.blogspot.com/2013/08/retirement-speech-by-pp-ramachandra...

प्रश्न असा आहे की जर मी तृप्त असेन तर मी काय करायला हवे? आणि काय करायला नको? साधारणपणे पैसे मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो, पण जर त्याचीच गरज नसेल तर काय? रोज उशीरा उठीन, टीव्हीवर आवडीचे कार्यक्रम बघीन, प्रवास करीन, दुपारी झोप काढीन... सर्व ठीक आहे, पण त्याचा पण कंटाळा येणार ना? हा विचार मनात येतोय. म्हणून विचारले.>>
वरची लिंक पाहिली नाही अजून.
कंटाळा निष्क्रियतेमुळे येतो असे मला वाटते. निष्क्रिय म्हणजे आळशीपणा या अर्थाने नाही. घड्याळ्याच्या काट्याबरोबर धावण्याची गरज संपल्यामुळे आलेली निष्क्रियता. रिटायर झाले तरी जोवर प्रकृती साथ देते आहे तोवर दिवस सकाळी सुरू झाल्यावर नित्यकर्मांखेरीज त्या दिवसासाठी काही तरी ध्येय हवे ( I mean something to look forward to) ज्यामुळे दिवस संपताना रितेपणाची, आयुष्य कंटाळवाणे असल्याची भावना मनाला कुरतडणार नाही. मग ते ध्येय काहीही असेल. अगदी घर आवरण्यापासून कपडयांचे कपाट आवरणे, काही विशेष पदार्थ करणे, आपण राहतो त्या सोसायटीचे कामकाज पहाणे, आठवड्यातले काही ठराविक दिवस आपल्या सोयीने गरजू मुलांना शिकवणे, अंधांना / वृद्धांना पुस्तके वाचून दाखवणे, एखादी कला अवगत असेल तर गायन/ वादन/ नकला करून रूग्णांचे मनोरंजन करणे, जवळच्या पाळणाघरातील मुलांना गोष्टी सांगणे इ. जे झेपेल ते आणि आवडेल ते.

चंद्रा +१
पर्पझ हवा. नाहीतर भकास वाटेल. पण मग वाटतं जोवर निकराने अन्य सर्व (नोकरीधंदा) बंद करत नाही तोवर नवीन पर्पझ (ध्येय) सापडणारच नाही.
पण त्या मिषाने जर नोकरी सोडली आणि मग ध्येयच सापडलं नाही तर?

उपाशी बोका,
तुम्ही अडव्हेंचरस् आहात काय? असाल तर नोकरीला एक वर्ष सुट्टी टाका आणि बॅगपॅक करून भारतभर हिंडा. ते युरोप-अमेरिकेतले विद्यार्थी कसे कॉलेजनंतर एक वर्ष एकट्याने किंवा ग्रुपने कुठेतरी भटकतात आणि मग परत येऊन नोकरी वगैरे रहाटगाडगं चालू करतात, तसं.
कदाचित या प्रवासात 'तुम्हाला काय हवंय ते (किंवा त्याचं उत्तर)' सापडेल.
पण तुमची पन्नाशीतली हेल्थ, खाण्यापिण्याझोपण्याच्या सवयी वगैरेचा आधी विचार करा. आणि तुम्ही अमेरिकेतले भारतीय असाल तर बिहार-यूपीत फिरताना जपून, नाहीतर फस गये रे ओबामा व्हायचं Wink

Pages