पन्नाशीपुढची वाटचाल

Submitted by अश्विनीमामी on 9 October, 2014 - 05:28

पन्नाशीत पाउल ठेवताना असे जाणवते कि अजून दहा अ‍ॅक्टिव्ह वर्षे आपल्या हातात आहेत. त्यानंतर ऑफिशिअली रिटायर व्हायचेच आहे. पण कितीतरी गोष्टी करता येतात. आवडीचे शिक्षण, छंद, भटकंती,
संसाराच्या, नोकरीच्या धावपळीत राहून गेलेले बरेच काही आता आरामात करता येते.

बदलत्या जीवनमानानुसार व चांगल्या आरोग्यसेवांच्या उपलब्धतेमुळे आता खर्‍या अर्थाने ज्येना होण्यास पंचाहत्तरी तरी गाठावी लागते. खुद्द पुण्यनगरीतच ह्याहूनही पुढचे कितीतरी विद्वान, हसरे अ‍ॅक्टिव ज्येना आहेत. जगभरातच जीवनाच्या ह्या कालखंडाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलत आहे.
व्यवस्थित प्लॅनिन्ग केल्यास, आरोग्य, अर्थ आणि भावनिकद्र्ष्ट्या अतिशय छान, आनंदी जीवन,
वयाच्या पन्नास ते पंचाहत्तर ह्या कालखंडात जगणे शक्य आहे.

पहिला गोल साठीपर्यंत पोहोचणे हा असावा. त्यासाठी आरोग्याचे तसेच पैशाचे व्यवस्थापन गरजेचे आहे. तसेच मुलांच्या जीवनात मायक्रो मॅनेजमेंट न करता आपला रोल आता कन्सल्टंट/ ऑकेजनल हेल्पर असा राहणार आहे हे उमजून घेउन आपले स्वतःचे जीवन कसे जास्त एन्रिच करता येइल या संबंधाने चर्चेसाठी हा बाफ उघडला आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा,
त्यासाठी आतापासूनच तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे. प्रकृती छान राहिली तर मग कुठलीही अ‍ॅक्टीव्हीटी सहजसाध्य होते. पण एकदा का त्या कुरबुरी सुरु झाल्या की मग वैतागच.

सध्या तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत. तक्रारी आल्यावरच नव्हे तर आधीही सहज म्हणून सर्व चेक अप करून घ्यावेत.

पैश्याचे नियोजन कितीही केले तरी त्या काळातल्या महागाईला तो पुरा पडेल याची खात्री नाहीच. मुलांवर कमीतकमी अवलंबून रहावे हे ठिकच. पण गरज असेल तर मुलांनी आपली देखभाल करावी हा आपला हक्क आहे, हे पण लक्षात असू द्यावेच.

पण एकदा निवृत्त व्हायचे ठरवले तर मात्र आयूष्य आपल्याला हवे तसे जगावे. मला संगीत, भटकंती, वाचन, चित्रपट, नाटक.... असे सगळे चालू ठेवायचे आहे. ( सुरु करायचे आहे Happy )

स्मिता तळवलकर अगदी ५९ वयात गेल्या तेव्हा मला फार वाइट वाटले होते. निदान त्यांनी साठी तरी बघायला हवी होती. पण तब्येतीने दगा दिला. असे शक्यतो होउ नये कारण पन्नास ते साठ मध्ये आपल्या करिअरचे पीक असते तसेच मुलाबाळांचे ही मेजर माइल्स्टोन पालकांच्या ह्याच दशकात येतात जसे हायर एज्युकेशन पूर्ण करणे, रिलेशन शिप मध्ये स्थैर्य यालला सुरुवात होणे. त्यांचे ओरिएंटेशन त्यांना समजणे इत्यादि. ह्या फेजेस मध्ये आपण प्रत्यक्ष रित्या सहभागी नसलो तरीही त्या बघायला आपण तिथे असणे गरजेचे आहे. भारतीय कंडिशनिंग नुसार नातवंडे सांभाळायचेच हे वय परंतू कितीतरी लोक्स ह्या वयात मस्त भटकत असतात. आरामात स्वतः प्लॅनिन्ग करून जग बघतात. ते मला चांगले वाट्ते. मदतीचा हात द्यावा परंतू मुलांवर अवलंबून न राहता स्वतःचे जीवन नीट जगावे
असा गोल असावा असे वाट्ते.

माझ्या आसपास मी जे पाहिलंय त्यावरुनः

१. सकारात्मक वृत्ती हवी. उगाच मुलांची चिंता करत बसून स्वतःला त्रास करुन घेऊन काही फायदा होत नाही. या वयात जोडीदाराचा वियोगही होऊ शकतो. अशावेळी दु:ख होतंच पण ते दु:ख कुरवाळत बसू नये. सकारात्मक जगावं. तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर मुलांनाही सपोर्ट मिळतो.

२. नवीन बदलांशी जुळवून घ्यावं. मग ते लॅपटॉप, आयपॅड वापरणं असेल, मुलांबरोबर वेगवेगळ्या पध्दतीचे पदार्थ चाखून बघणं असेल. मला जमणार नाही, नवीन म्हणजे वाईटच असा दृष्टीकोन नसावा.

३. या वयात अनेक वेळा भूतकाळात किंवा भविष्यकाळात माणूस जास्त जगतो. म्हणजे आमच्यावेळी कसं चांगलं होतं, किंवा मी २० वर्षांपूर्वी तमुक निर्णय घेतला ते चुकलंच वगैरे. किंवा भविष्याचं टेन्शन- माझं काय होईल? आजार कुठला झाला तर? पैसे पुरतील का? वगैरे. त्याऐवजी वर्तमानात जगावं. उदयाचं प्लॅनिंग जरुर करावं पण त्रास करुन घेऊ नये.

खुद्द पुण्यनगरीतच ह्याहूनही पुढचे कितीतरी विद्वान, हसरे अ‍ॅक्टिव ज्येना आहेत. जगभरातच जीवनाच्या ह्या कालखंडाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलत आहे.>>>

मान्य आहे अमाताई पण अशा लोकांची संख्या फार कमी आढळते. खरे तर मनुष्य ४० शी च्या पुढेच खालावतो. ५० शी तर खूप दुरची पायरी झाली.

माझे वय अगदी तुमच्या वयाच्या जवळ आहे. माझे अनुभव असे आहेत की, मला वाटत माणसाला जगायला आणि तेही आनंदी जगायला काहीतरी प्रेरणा हव्या असतात. काहीतरी जबाबदार्‍या हव्या असतात. कुणाचा तरी आधार आणि कुणाचे तरी प्रेम हवे असते. हे जर असले तर मग पुढची पायरी येते शरिर स्वास्थ्य आणि मनःस्वास्थ्य. बहुतेक जण .. ५० पर्यंत अन्न वस्त्र निवारा ह्या गरजांची तरतुद करुन ठेवतात. आणि वयोमानानुसार माणसाच्या गरजा सुद्धा कमी कमी व्हायला लागतात. वर दिनेशदा म्हणाले त्याप्रमाणे आर्थिक तरतुद कितीही करुन ठेवली तरी येणार्‍या काळाच्या महागाईनुसार आपली बचत पुरुन उरणार की नाही हे सांगता येत नाही. पन्नाशी नंतर अंगमेहनत होणार नाही. म्हणून अशी साधने निर्माण करणे फार गरजेचे आहे जेणेकरुन आपल्याला महिन्याला वीसेक-तीसेक हजार रक्कम घरबसून मिळेल.

तुम्ही प्रकृतीबद्दल बोलतात. तीही अगदी महत्त्वाची बाब आहे. शरिराची दुखनी बेजार करतात. घरचे आणि बेताचे अन्य, योग्य तो व्यायाम आणि विहार ह्या गोष्टी तर माणसाला कुठल्याही वयात लागतच असतात. आता पन्नाशी जवळ आली म्हणून हे सर्व सुरु करायचे मग आत्तापर्यंत शरिरात जे सामावत गेलो त्याचे काय!!! ते काय चुटकीसरशी निघून जाईल. म्हणून, रोजची दिनचर्या दीन असू नये!!!! इथे दीन म्हणजे कशीही असू नये. स्वतःला चांगली बंधने हवी असतात आणि ती बंधने आपण आपलीच घालावीत.

तसेच मुलांच्या जीवनात मायक्रो मॅनेजमेंट न करता
>> हे अगदी योग्य बोलतात आपण. मी तर म्हणेल फक्त मुलांच्याच नाहीतर इतर कुणाच्याही आयुष्यात ढवळाढवळा .. नको तेवढे नाक खूपसने असे करु नये. दुरुन निरिक्षण करावे आणि वेळ आली की दोन शब्द बोलून आपले प्रेम आधार तो काय व्यक्त करावा.

असो.

तुम्हाला अगदी निरोगी निरायम जीवन लाभो.

>>पन्नाशीत पाउल ठेवताना असे जाणवते कि अजून दहा अ‍ॅक्टिव्ह वर्षे आपल्या हातात आहेत>>
अगदी योग्य नोटवर सुरुवात अमा Happy , किमान दहा , राहून गेलेला जल्लोष करायला पुरेशी.

अमा धागा मस्त...अगदी सध्याच्या माझ्या विचारांशी मिळताजुळता!!

गेले बरेच दिवस आम्ही दोघेही याबाबतीत विचार करतो आहोत म्हणजे मी अजून पन्नाशीला आले नाही पण ६-७ वर्षांत येतेच आहे आणि नवरा १-२ वर्षांत..
असा विचार करतो आहोत की, पालनपोषणाची मुलाची जबाबदारी संपते तोपर्यंत नक्कीच, तर जास्त कमाईकडे (हातावर पोट असले तरी) फार लक्ष न देता...मुलापाशी रहाण्यापेक्षा....
१. मागील अनुभवास गाठीस धरून संशोधनात्मक काम करावे, जेणे करून पुढच्या पिढीस काही उपयोग होईल.
२. जास्तीत जास्त आतल्या खेड्यांमध्ये रहायला जाता आले तर पहावे म्हणजे थोडे काही समाजाचे ऋण समजून काही कार्य करता येईल का..

चांगला धागा आणि चांगले मुद्दे.
पन्नाशीमध्ये किंवा पुढे डेटिंग हा प्रकार रूढ नाही. तो व्हावा असे मनापासून वाटते. एखादा विशीतील मुलगा घरच्या सत्यनारायणाला एखादी मैत्रीण घेऊन आला तर काकू/मामी लोक हल्ली अगदी आत्मीयतेने चौकशी करतात, गप्पा मारतात. तो मोकळेपणा पन्नाशी आणि पुढील लोकांसाठीपण हवा.

असाच एक चाळीशीचा पण धागा होता का? देजावू झालय मला.>> चाळीशीचा धागा आहे.

चाळीशीच्या थांब्यापाशी पोहोचताना आणि दोन तीन वर्शे नंतर डोक्यात तारुण्याचे इल्युजन / सुखस्वप्न अजून ही शाबूत असते. आपण काहीही करू शकतो. छान दिसतो.सीइओ होउ शकतो. नवे मित्र मैत्रिणी मिळवू शकतो इत्यादि. हा गैरसमज मुळात जीवन १०० वर्शाचे आहे व पन्नास हा अर्धा माइलस्टोन आहे ह्या मानसिकतेतून येतो. तसे नाही.

अ‍ॅक्टिव लाइफ ७५ समजा. नंतर आपल्याला मेडिकल केअर व ऑफिशिअली म्हातारपण आले. ह्याचा मध्य पॉइंट ३५ - ३७ दरम्यान येतो. शरीर ३० नंतर डाउन होतच असते. म्हणजे ५० ला अ‍ॅक्चुअली तुमची रिटायरमेंट प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपण सुरेख मेंटेन केलेल्या लोकां चे फोटो बघतो पण ते जास्त करून सेलिब्रिटीज असतात. ज्यांच्या लुक्स वर खूप पैसे खर्च केलेले असतात व फोटो पण एअर ब्रश्ड असतात. जीवनाचे घाव त्यांच्या फोटो मध्ये दिसून येत नाहीत. जे आपल्या चेहृयावर ठळक होत जातात . केस पांढरे व विरळ होणे, वजन विचित्र पद्धतीने वाढणे हे काही दृश्य बदल. श्रीदेवी बघा व बोनी कपूर बघा त्यांच्यातच किती फरक आहे दिसण्यात. परत अनील कपूर बघा. बोनी हा अर्जुनचा बाप नक्की वाट्तो. श्रीदेवी पहिल्यापासूनच खूप हाय मेंटेनन्स आहे. इतके पैसे खर्च केले व वेळ दिला तर आपणही नक्की आपले बेस्ट दिसू शकतो. मिनिस्कर्ट घातलेल्या मुलीसोबत फोटो काढून घेण्याचा अट्टाहास केवळ करूण वाट्तो.

खरे बदल आपल्या शरीरात/ मानसिकतेत आणि आजू बाजूचे लोक आपल्याला कसे बघतात ह्यात होतो. जनरेशन गॅप स्पष्ट होते व जाणवते. आपले गुढगे बोलत आहेत, लवकर दमतो आहोत. कंटाळा येतो आहे. फराह खानचे चित्रपट आवर्जून बघावे असे आता वाटत नाही. नोकरी/ कामात उलटी गिनती सुरू होते. परवाच ५२ चे एक जण भेटले जे म्हणे अजून सहा वरशे नोकरी आहे. तेव्हा मला वाटले आपण दोन वर्षांनी असेच म्हणू का? आता आपल्याला आपले काम समजते, पण एक नवा उद्योग चालवू शकू का? अजून वीस वरशे जगायला मोटिव्हेशन काय आहे? काय असायला हवे?

वॉरन बफे ( ट) ह्यांनी आपले बरेचसे ऐश्वर्य पन्नाशीनंतर कमाविले आहे हे वाचले व हा काळ प्रॉडक्टिव कसा करता येइल असे विचार चालू झाले. खरे सांगायचे तर आता डेटिंगपेक्षा शेअर मार्केट मध्ये एखादा अंदाज
बरोबर आला तर एखाद्या गेममध्ये जिंकल्याचे थ्रिल मिळते. उगीच आहे तो वेळ कुठल्यातरी
कटकटया म्हातार्‍याबरोबर का घालवायचा असे आतल्या आत वाट्ते. मि. बिग सारखे हिरो फक्त सिनेमातच असतात. हे कुठे तरी कळून चुकले आहे. But it may work for some other fifty somethings. Whatever makes each one happy !

मस्त विषय अमा! स्स्स्चात्त्ळीशीपेक्षा जास्त महत्वाचा ट टप्पा आहे असं मला वाटतं. स्त्रियांसाठी हा टप्पा चाळीशीपेक्षा जास्त महत्वाचा टप्पा वाटतो. सांसारिक जबाबदार्या जवलपास संपलेल्या असतात. मेनाॉपॉज व एम्प्टी नेस्ट हे एकत्र येण्याची शक्यतेचा काल जो माझ्या बाबतीत आला, त्याची मानसिक व आर्तथिक तयारी पन्नाशीपूर्वीच करायला हवी. पन्नाशीनंतर तब्येत उत्तम असेल तर खर्च आटोक्यात असतात. आपले छंद व जे करायचे राहून गेले ते करण्यास हा उत्तम काल, आपल्या मनासारखं जगण्याचा काल. आनंदी मन व तंदुरुस्त शरिर राखण्यास छंद व आपल्याला झेपेल ते समाजकार्य मदत करतात. हा प्मोरतिसा मोबाईलवरुन बेक स्पेस देता येत नाही तूर्तास एवढेच. हा प्रतिसाद निसर्गोपचार आश्रमातून लिहीतेय Happy

५०शी मधे डेटींग म्हणजे त्या वयात ती एक विकृती नाही वाटत का? १६व्या वयापासून सुरु झालेले आकर्षण ५०शी पोचली तरी अजून संपलेलेच नाही !!! आणि जो आपला जोडीदार असेल त्याला/तिला काय वाटेल?

सिमंतीनी, पन्नाशीचा नवरा घराच्या सत्यनारायणाला डेटींग चालू असलेल्या मैत्रिणीला घेऊन आला तर बायकोने काय प्रेमाने चौकशी करायची की काय?
Happy

बी, सिरिअसली? Uhoh जोडीदार नसेल तरच डेटींग हा मुद्दा येतो ना?

बरं एखाद्याला/एखादीला असेल इंटरेस्ट .. पण म्हणून त्याला विकृती म्हणणे हे दुसर्यांच्या बिझनेसमध्ये नाक खुपसणे आहे. जे टोटलीचुकीचे आहे बायदवे, जर तुला माहीत नसेल तर म्हणून सांगते. Angry

बीचं बरोबर आहे, डेटिंग ही कुठल्याही वयात विकृतीच आहे. अमेरिकन खुळं आहेत - पुण्यामुंबईत बोकाळलेली!
बस्के, रागाच्या वगैरे स्मायलीज (रागाची स्मायली? हीसुद्धा एक विकृतीच नाही वाटत का?) देऊ नकोस. सकारात्मक विचार कर.

स्वतःचा जोडीदार असताना इतर स्त्रि वा पुरुषामधे रस घेणे हे नक्कीच योग्य नाही. विकृती म्हणणे कदाचित
टोकाचे होईल पण सामाजिक दृष्टीकोनातून गैर वर्तन होईल. आणि वय वर्ष पन्नाशी मधे शरिरामधे अस काय उरत आस्वाद घ्यायला. निखळ मैत्री कुठल्याही वयातील नक्कीच वेलकम आहे पण मनुष्य एकटा असो वा दुकटा ५०शी मधे डेटींग जग काय म्हणेल ह्याची पर्वा केला का?

बी सिंगल माणसाने कुठल्याही वयात डेटिंग करण्यात मला तरी काही चूक वाटत नाही. ५०+ वयात पहिलं किंवा दुसरं लग्न करुन सुखी झालेले स्त्री-पुरुष पाहण्यात आहेत. आजकाल जगही काही म्हणत नाही !

बी, पन्नाशीचा स्त्री/पुरूष अविवाहित/घटस्फोटित/विधूर/विधवा असेल तर चालेल ना डेटींग?>>

निखळ मैत्री कुठल्याही वयातील नक्कीच वेलकम आहे पण मनुष्य एकटा असो वा दुकटा ५०शी मधे डेटींग जग काय म्हणेल ह्याची पर्वा केला का?

पंडित रवीशंकर यांनी डेटिंग नको असा विचार केला असता तर जगाला अनुष्का आणि नोरा ह्या दोन चांगल्या संगीतज्ञ मिळाल्या नसत्या. बाकी मी फक्त विचार मांडला , आवडला पटला तर ठीक नाहीतर एकला चलो रे आहेच.

जोडीदाराची गरज हा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे. कोणाला २४ गुणिले ७ सोबत हवीशी असते तर कोणाला स्वतंत्र, स्वच्छंद जीवन हवे असते. कोणत्याही वयात आपण जज करू शकत नाही. पहिला जोडीदार असेल तरीही डेटिन्ग करावे असे काही प्रतिसादात कोणी म्हटलेले नाही. पिकासो, रविशंकर, मॅडोना, शॅरोन स्टोन , साराजेसिका पार्कर अशी उदाहरणे आहेतच की. निदान ह्या वया पर्यंत लोकांच्या अ‍ॅक्षनस ना मॉरल जजमेंट लावणे सोडून द्यायला हवे. जिं दगीमि लेगीना दोबा रा.

बी,
एक्स्पायरी डेट आली तुमची. Happy
जग काय म्हणेल हा बेसिकली पेद्रुट विचार आहे. तुम्ही काहीही केलंत तरी जग काहीतरी म्हणणारच आहे.

Pages