बायपोलर डिसॉर्डर - माहीती

Submitted by सामो on 13 September, 2019 - 11:05

- मी वैद्यकियशास्त्राशी दुरान्वयानेही संबंधित नाही. ही माहीती अन्यत्र गोळा करुन येथे दिलेली आहे. तेव्हा जर काही शंका असतील तर त्यांवर आपल्या डॉक्टरांकडुनच सल्ला घावा.
https://cdn.psychologytoday.com/sites/default/files/blogs/89816/2012/06/98951-96374.jpg
.
बायपोलर डिसॉर्डरचे अजून एक नाव आहे ते म्हणजे मॅनिक-डिप्रेसिव्ह इलनेस. अवसाद किंवा ज्याला नैराश्य म्हणतात त्या आणि उन्माद या २ टोकांच्या मध्ये हेलकावे खाणारा मूड. या डिसॉर्डरची अगदी सर्वसामान्य लक्षणे व माहिती पाहू यात.
(१) बायपोलर डिसऑर्डर म्हणजे उन्मादाचे शिखर आणि अवसादाची खोल गर्ता यामध्ये हेलकावे खाणारा मूड हाच मुख्य आजार.
(२) अवसाद व उन्मादाच्या आलटून पालटून येणाऱ्या कालखंडांमध्ये काही काळ मूड सामान्य/नॉर्मलही राहातो.
(३) ही डिसऑर्डर टीनएज किंवा विशीच्या सुरवातीच्या काळात उचल खाते, लक्षात येते.
(४) हा आजार बारा होता नाही पण अतिशय कुशलतेने व परिणामकारक रीत्या मॅनेज करता येतो किंबहुना सर्वाधिक कमी क्लिष्ट आणि मॅनेज करण्यास सोपी अशी ही व्याधी आहे.
(५) अनेकदा बायपोलर असणाऱ्या रुग्ण स्त्रियांचे चुकीचे निदान "डिप्रेशन" असे होते तर रुग्ण पुरुषांमध्ये तसेच चुकीचे निदान "स्किझोफ्रेनिया" असे होते.
(६) अजून एक चुकीचा रूढ प्रकार म्हणजे बॉर्डरलाईन व्यक्तिमत्वांमना बायपोलर व्याधीचे रुग्ण मानले जाणे. अनेकजण बॉर्डरलाईन असू शकतात. याचा अर्थ ते बायपोलर रुग्ण आहेत असा नसतो.
(७) दुर्लक्षित किंवा निदान झालेली बायपोलर व्याधी ही घातक असते. यामध्ये अवसाद काळात रुग्ण आत्महत्या करू शकतो. उन्मादाच्या काळात स्वतः:ला आर्थिक, भावनिक, शारीरिक नुकसान पोचवू शकतो उदा. - जुगारात, खरेदीत पैसे उधळून टाकणे, लैंगिक वर्तनाबाबत अविचार, वैवाहिक आयुष्यात निष्ठेला, विश्वासाला तडा जाईल अशी वागणूक आदि घटना घडू शकतात.
(८) ही व्याधी वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार तज्ञानकडूनच निदान व मॅनेज केली जाऊ शकते.
(९) अवसादाची, नैराश्याची लक्षणे : चिडचिडेपणा, सतत रडू येणे, कारणाशिवाय रडू येणे, ऊर्जेची इतकी कमतरता जाणवणे की दैनंदिन व्यवहारात अडथळा येणे, वाईट स्वप्ने, स्वप्नात रडु येणे.
(१०) या उलट उन्मादाची लक्षणे म्हणजे - अतिशय ऊर्जा असणे, ३-४ तासांची झोपही पुरेशी होणे, चित्तवृत्ती उल्हसित असणे, हाय सेल्फाएसटीम, स्वतः:बद्दल ऊंच भ्रामक कल्पना असणे. बोलताना भराभरा बोलणे, एकामागोमाग एक झपाट्याने विचार व कल्पना सुचणे. व्यभिचार करण्यास, वैवाहिक विश्वासाला तडा जाऊन देण्यात, वाट्टेल तसा खर्च करण्यास मागेपुढे ना पाहणे. एकंदर रिस्की वागणे. अनेक प्रकल्प एकाच वेळी हाती घेणे, महत्त्वाकांक्षी व एकंदरच आऊटगोईंग वागणे.
(११) ही व्याधी जरी अनुवांशिक असली तरी ती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होईलच अशी खात्री देता येत नाही. अजून तरी अशी खात्रीशील लिंक मिळालेली नाही.
(१२) खूपदा व्यक्ती ही या व्याधीकरता प्रिडिस्पोज्ड असते, ससेप्टीबल असते आणि एखाद्या स्ट्रेस factor मुळे या व्याधीची सुरुवात होते.
(१३) या व्याधीचे वर्गीकरण ३ प्रकारात केलेले आहे. प्रत्येकामध्ये लंबकाचा अवसाद-उन्मादात हेलकावे खाण्याचा कालावधी व मुख्य वारंवारिता वेगवेगळी आहे.
(१४) या व्याधीची एक विचित्र विशेषता म्हणजे - assortative मॅटिंग अर्थात या व्यक्ती अन्य तशीच व्याधी असलेले मित्र-मैत्रिणींकडे आकृष्ट होतात.
(१५) एन्टायडिप्रेसंट, एंटायसायकॉटिक मेडस, मूड स्टॅबिलायझर्स असहा अनेक प्रकारच्या औषधांचे कॉकटेल रुग्णास घ्यावे लागते.
(१८) COMBINE MEDICATION AND TALK थेरपी हे दोन्ही एकत्र अतिशय परिणामकारक असतात.
(१९) Cognitive behavioral therapy (CBT), Psycho-education , Narrative therapy , Solution Focused थेरपी, Interpersonal and social rhythm therapy (IPSRT) , अशा नाना थेरपी आहेत. या सर्वच थेरपीनबद्दल मला माहीत नाही पैकी Psycho-education ही पद्धत माझ्याकरता अतिशय सूट झालेली आहे. म्हणजे या व्याधीबद्दल मिळेल तेवढे वाचून काढायचे व सेल्फ-अवेअरनेस वाढवत ठेवायचा.जवळजवळ १० वर्षे हे सातत्याने केल्याने मला स्वतः:च्या वर्तनातील किंचितही बदल लक्षात येतो - अरे आज कॉफी जास्त झाली म्हणून उन्मादक वाटतंय, आज झोप कमी झाली म्हणून उन्मादक वाटतंय, आज झोप जास्त झाली म्हणून निराश वाटतंय आदि स्वतः:चे स्वतः:लाच नीट कळू लागते.
(२०) Electroconvulsive therapy (ECT) म्हणजे Shock ट्रीटमेंट ही एक कुरूप पद्धत सुद्धा या व्याधीवरचा इलाज आहे व एके काळी होता पण आता ही पद्धत फार कमी प्रमाणात वापरली जाते. तिचे साईड इफेक्टसही कमी त्रासाचे झालेले आहेत. सहसा जरा औषधे अजिबातच लागू पडत नसतील तर अथवा औषधांचा गर्भावरती परिणाम होउ नये म्हणून तात्पुरता पर्याय म्हणून ही पद्धत वापरात आणली जाते.
(२१) जरा नीट मॅनेज झालेली नसेल तर प्रियजनांकरताही हे रुग्ण कसोटी असतात. अशावेळी घरातील लोकांनीही या व्याधीबद्दलचा स्वतः:चा अवेअरनेस वाढविणे महत्त्वाचे असते.
(२२) रुग्नाला मूड, झोप, व्यायाम, अन्न आदि माहितीची स्वतः:ची दैनंदिनी ठेवण्याने खूप फायदा होतो.
(२३) बायपोलर व्यक्ती जोडीदार असल्याचे फायदे व तोटे दोन्ही आहेत. तोटे अर्थात वरती आलेलेच आहेत पण एक प्रेमळ आणि captivating , creative जोडीदार मिळणे हा फायदाही असतो.
(२४) या व्याधीचा रुग्ण अवसाद व उन्माद या स्पेक्ट्रमवर कोठेही असू शकतो. यामध्ये विविधता आहे, प्रत्येकाच्या आजारात एकमेवता आहे.
(२५) अनेक गैरसमजांपैकी दोन बिनबुडाचे गैरसमज म्हणजे या व्यक्ती वेड्या असतात, किंवा नीट नोकरी करू शकत नाहीत हे. काही लोकांना नोकरी टिकविण्यास समस्याच येतही असतील पण ७५% व्यक्ती या जॉबमध्ये यशस्वी आढळतात.
(२६) अजून एक गैरसमज हा की - हा खरा आजाराचं नाही. तसे नव्हे. हा गंभीर आजाराचं आहे. यातून आत्महत्येपासून ते घातक परिणामांपर्यंत काहीही उद्भवू शकते.
(२७) अजून एक गैरसमज हा की या व्यक्ती गुन्हेगार, पिसाट असतात. प्रत्यक्षात तसे नसून उलट रुग्ण हे अशा गुन्ह्याच्या, क्रूरतेच्या व्हिक्टीम असण्याचीच संभावना जास्त असते.
(२८) बायपोलर व्याधी आणि लठ्ठपणा यांचा घनिष्ठ संबंध आहे. ६८% बायपोलर रुग्ण हे लठ्ठ असण्याची शक्यता असते.
(२९) March 12, 2002 या दिवशी अमेरिकन न्यायाधीश हेन्री केनेडी यांनी निकाल दिला की हा खराखुरा आजार आहे ज्याचे मेंदू स्कॅनिंग ने निदान होउ शकते, जो सिद्ध होऊ शकतो, मेंदूतील रासायनिक बदल जे मोजले जाऊ शकतात.
(३०) या रुगणांनी घ्यावयाच्या काही काळजाला म्हणजे - ड्रग्ज, मादक द्रव्ये यांपासून दुर राहणे, झोपेचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे, नियमित व्यायाम करणे, दैनंदिनी लिहिणे, स्वतः:च्या आजाराबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवणे.
(३१) 'जेलसि' हा अनेक सिम्पटम्स पैकी एक सिम्प्टम्.
(३२) व्हॅन गॉग चा जन्मदिन - ३० March हा जागतिक बायपोलर दिन मानला जातो.
__________________________

http://ecx.images-amazon.com/images/I/51nHlp6ayVL._SX331_BO1,204,203,200_.jpg
Ruth C. White यांचे "Preventing Bipolar Relapse" हे पुस्तक वाचून झालेले आहे. परत पारायण करणार आहे. बायपोलर बद्दल अनेक पुस्तके आहेत ज्यामध्ये "वैयक्तिक अनुभव" = OPersonal Account मांडलेले आहेत पण वरती उल्लेख केलेल्या पुस्तकात स्वतःच्या आजाराविषयी लेखिकेने अत्यंत मोघम उल्लेख केलेला आहे रोग्याच्या वागणूकीत काय बदल स्वागतार्ह आहे यावर कटाक्षाने भर दिलेला आहे. SNAP अ‍ॅप्रोच बद्दल वाचलेले होते. या पुस्तकातही तोच अ‍ॅप्रोच सांगीतलेला आहे.
SNAP = Sleep, Nutrition, Activity and People
Sleep - आजार बरा होण्याच्या प्रोसेस मधील अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. पुरेशी झोप झाली नाही तर अन्य लोकांना जितका मूड-स्विंग्सचा त्रास होतो त्यापेक्षा अनेक पटींनी बायपोलरच्या रुग्णास होतो. शिवाय बरे होण्याच्या आधी स्लीप डिसॉर्डर्स व बायपोलर हे हातात हात घालूनच नांदताना दिसतात. शरीरातील circadian सिस्टीम (घड्याळ), निद्रा कंट्रोल करते. ही सिस्टिम बायपोलरच्या रुग्णांमध्ये फॉल्टी असते. प्रकाश-अंधार यांच्या तालावरती हे घड्याळ चालते. तेव्हा वेळेवर (नो मॅटर व्हॉट) झोपणे व ऊठणेसुद्धा हे या रुग्णांकरता अत्यावश्यक असते.
Nutrition - सकस व योग्य आहार हा शरीराइतकाच मेंदूकरता आवश्यक आहे. भरपूर प्रतिकारशक्ती, अन्नातील सुयोग्य घटकांनीच वाढू शकते. तेव्हा Recommended आहार हा बायपोलरच्या रुग्णांकरता आवश्यक असतो.
Activity - ठरावीक वेळी व्यायाम हा प्रचंड महत्वाचा घटक म्हणता येइल. चालण्याच्या व्यायामात प्रत्येक टाकलेले पाऊल हे रुग्णास अधिक चांगल्या दर्जाचे आयुष्य देण्यास उपकारक ठरते.
People - रुग्णाला सपोर्ट देणार्‍या सकारात्मक लोकांची अतिशय गरज असते. शिवाय मूड्स्विंग्स चा जोवर अवेअरनेस रुग्णास येत नाही तोवर कोणीतरी मॉनिटर करुन दिशा देणारे असेल तर अत्युत्तमच.
रुग्णाने - झोप, आहार्,व्यायाम व तदनुषंगीक दुसर्‍या दिवशीचा मूड याचे जर्नल ठेवले तर खूप उपयोगाचे पडू शकते नव्हे ठेवलच पाहीजे.
अर्थात हे सर्व घटक पूरक झाले मुख्य लाइन ऑफ ट्रीटमेन्ट औषधोपचार ही असते. रुग्णास औषधांचे कॉकटेलच घ्यावे लागते - मूड स्टॅबिलायझर + स्लीप मेडिकेशन + अँटी-कन्व्हल्सन्ट्स + अँटी सायकॉटीक. अन या आजारातील सर्वात अवघड भाग असतो असे कॉकटेल सापडणे व लागू पडणे. तोपर्यंत ट्रायल-एरर ने रुग्ण जेरीस येतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा औषधे नियमित घेणे , कधीही बंद न करणे. कारण बरेचदा "मॅनिया/उन्माद" ही इतकी सुखावह अवस्था असते - Enthusiasm + high libido + energy + confidence अक्षरक्षः जगाच्या माथ्यावर पाय रोवून उभे राहील्यासारखे वाटते अन मग ही अवस्था हरवू नये या लोभाने काही रुग्ण औषधे बंद करतात. जे की घातक असते कारण Wherever there is high, there is low (= abysmal depression)
ही डिसॉर्डर बरी होत नाही पण अत्यंत कुशलतेने १००% मॅनेज केली जाऊ शकते.
________________
https://lh3.googleusercontent.com/jxl13G9gGYLeAY4_kgR8rL10bIKMXWbFgoPyh751sXYqjS345qhMIRbVErsxgnHcZNgy4x60Zpmn50LvNOg4UiCPhlw7q7260XNQrjxWJlx_Ho_ld1LGysfxm1OCzPOdl6lCTFkSfXQXEM73ZWYE-eX9lJ-XLA8rSxDC6yNUl_jORbnioI09i8An5VGCpOPIsiyTqCFMlo0xfmjXCytu2cnrL0ITFEfsMjZwiXw833JZ3M1M033nBWCnAR3KVPwo6cVEdiD6p_w_W9Qeqc_95hsmTh2x7aXBifo7wIKlZLd0tqscZ1mDFNMdkT-6IcB-iMk_SVHSouGthxXsnKKOkmVaASk_3kGdPFd9b0mqdLq0GIDomZE6_mLptsFdC9OqNMyUs-UBODv8l-ODRLhlxhBNLa_Vpz3FAD_0MJZOD120UYQl9059hobOPBz0s2dISH6ncZ606VRdAwE5o98Z7eKNtgzkemyk_q8S89y1qvqvSk9fZ2dBz3lP8B5-oSRDp-d_ExG8WJ26-jmEOlXpg1-ZPcIWFzjCNV6GrG737TD34KqreSpKDuFG9ugOpiSKuKCG6Uj17XxQL-I4_GbTTWbDCkD4u5v1_FSe5Lno4blECLono_x8zTUXFvaeG_z3Q9kHkPmKwpb1vPJnGM95RhYrseuqufl-uD2wcU3b8kMXf0Om5QADnMLwfv00ki8BrgD1TJudSw890Ne9SJgnVJDo0hwTh8Bx7xCMfBlUibsSz7wg=w912-h510-no
.
आपल्या हर्ष/आनंद आदी भावनांना कारणीभूत अशी ४ रसायने आहेत : एंडोर्फिन्स , डोपेमाईन ,ओक्सिटोसिन आणि सेरोटोनिन.प्रत्येकाचे ठरलेले कार्यक्षेत्र आहे.

एंडोर्फिन्स मुळे वेदना जाणवत नाहीत. जरा तुमच्यावरती एखाद्या प्राणघातक पशूने हल्ला केला तारा एंडोर्फिन्स तयार होतात ज्यायोगे जोवर तुम्ही सुरक्षित स्थळी पोचत नाहीत, तोवर तुम्हाला वेदना जाणवत नाहीत. उदा - मला संधिवात आहे, मी २२ व्या मजल्यावर राहाते. आग लागते. आणि मी धावत धावत २२ माजले उतरते, अशावेळी मला गुडघ्यात वेदना जाणवत नाहीत याचे कारण असते रिलीझ झालेले एंडोर्फिन्स. मग कोणी म्हणेल कि एंडोर्फिन्स सतत रिलीझ होता राहिले तर उत्तमच कि तर तसे नाही. कारण त्यामुळे काय होईल, तुम्हाला कधी वेदनाच जाणवणार नाहीत. वेदनांमुळे आपण धोक्यांपासून बचावात्मक उपाय शोधतो. आपले अस्तित्वात टिकवण्यामध्ये (survival ) वेदनांचा सहभाग असतो. एंडोर्फिन्स हे आत्यंतिक सुखद भावना अथवा भीतीही निर्माण करण्यास कारणीभूत असतात. जणू काही आपल्या मानवी गरजा लक्षात घेऊन, धोके टाळण्याकरता नियुक्त केलेला देखरेख्या म्हणजे एंडोर्फिन्स. तेव्हा एंडोर्फिन्स हे सतत निर्माण होता नाहीत हे उत्तमच आहे.

आता डोपेमाईन पाहू यात. डोपेमाईन केव्हा रिलीझ होतात तर तुम्हाला एखादे बक्षीस, काहीतरी आवडणारे मिळण्याच्या तुम्ही अगदी जवळ येऊन पोहोचला आहात. तुम्ही समजा रसाळ फळ तोडण्याच्या मिषाने, एखाद्या झाडावरती चढता आहात तर हे जे शेवटच्या २-४ फांद्या तुम्ही सहजगतेने ओलांडून जाता ते डोपेमाईनच्या जोरावर. जर तुमचे डोपेमाईन सदासर्व काळ निर्माण होतच राहिले असते तर तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये मग ती किती का किरकोळ असेना, तुम्ही आपली ऊर्जा तीमध्ये ओतत राहिला असता आणि महत्वाच्या गोष्टींकरता तुमची ऊर्जा वाचलीच नसती. तेव्हा डोपेमाईन सतत निर्माण होत नाही हे बरेच आहे. डोपेमाईन हे मुख्यतः एकाग्रता, फोकस यावरती काम करते म्हणजे आपल्याला काही साध्य करायचे आहे त्याकरता जी एकाग्रता लागते त्याचे कारकत्व आहे डोपेमाईन कडे. गाजराचे आमिष म्हणजे डोपेमाईन चे कर्तृत्व. सतत गाजर दिसत राहिले तर बैल/घोडा कसे पळत राहातील तसे हे रसायन आपली ऊर्जा एकाग्र करते. कोणतीही गोष्ट प्राप्त होणे या पेक्षा त्या गोष्टीच्या प्राप्तीचा ध्यास, तळमळ, ऍंटीसिपॅशन म्हणजे डोपेमाईनचे कारकत्व.
.
https://lh3.googleusercontent.com/SIqBRAiOjPIniY4H6igPll1VBFBLFVS8PQNH0dhgiL7VW19mnixL1lc--sUTEYPHtWGiNuXMFXoMmrNdr2ZFUJ3NkJzn3Tp1qncTh_XR3G_0BoTlNdbbZcLcXNYa_Xax-SCImjQOktiFeOoNR4hsMjsbIHMf4m2TcxV7Wd61o2VWikBWI1uJ-c_W4EqwOQjxN1lbvInFfEuawrZ9LbHScOJVHSf7CIkfOsoQG1lpE7Mms0hrHJKSegKrjiZ2-aG6M4s1o1GxQ4wtyoRDlhWeZAbOS8DQQEdBDjRQpUgRJqbY7ApXEOtChgc_P4OaVV817WX8IY9DWySnVzXCKWUWnAIX-KhK9yo2-8NCjP7twwySvVTY2hh5n0EZmQP0-yslmlRBYYd1lzk_j7EU7auT4ZrqaDk7Yvo9QdaSrhQVeCYogc7k_sUurRuxASFBBdHNbesd_VwIpIWw-M73dwW6tga-ZgLYTjfR0v1gx1PnS-ZwfwPlG3vmk4ZGcMcxd_S12VJJiAVpeDqunk2za6leKWKRr8PyrK4oveXlKV8VEbghn1Kk_Gvqab2QC7igsrbWHL7j6kUMD7iXkSa4qOmK3VOFKkYyHIIoTwi7tsqpPJ2_f8fKWzs5O4yiMw0TC7HS_XXqb9pCSl7VfneilPsJYToE36Vzf8GZIOO1gKZ7mU3Qbve9cuXdyYEIKxbdPNVg54LL47p4y70KfCIiLzvcqQuceEHMBAC5M7fWO6063qROPwBE=w450-h248-no
.
ऑक्सिटोसिन हे विश्वास निर्माण करणारे रसायन आहे. ते जरा सातत्याने निर्माण होता राहिले असते तर तुम्ही वाट्टेल त्या परक्या लोकांवर, वाईट झाला वृत्तीच्या लोकांवरही विश्वास टाकला असतात. मसाज, ऑर्गेझम, प्रसूती या काही ऑक्सिटोसिन, निर्माण करणाऱ्या क्रिया आहेत. जेव्हा गाय वासराला चाटते, किंवा आई मुलास जवळ हृदयाशी धरते, तेव्हा ऑक्सिटोसिन निर्माण होते. मानव आई जेव्हा मुलं अन्य कोणाकडे सोपवते किंवा प्राण्यांतही जेव्हा पिल्लू कळपात सोडले जाते तेव्हा जे सामाजिक बंध निर्माण होतात, त्यातही ऑक्सिटोसिन निर्मिती होत असते. वर सांगितल्याप्रमाणे, ऑक्सिटोसिन सतत निर्माण होणे हे survival च्या दृष्ट्या अनुकूल नाहीच.

सेरोटोनिन हे रसायन जेव्हा तुम्ही अधिकार गाजवता तेव्हा रिलीझ होते. मेंदूपेक्षा, माणसांच्या पोटात सेरोटोनिन अधिक असते, कारण आपले पूर्वज हे तेव्हा शांतपणे खाऊ शकायचे, पोटभर खाऊ शकायचे जेव्हा त्यांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल हमी असायची, विश्वास असायचा. ही हमी केव्हा वाटते जेव्हा तुम्ही अधिक बलवान असता, जसे बलवान पूर्वज अन्न चोरण्यास येणाऱ्या अन्य प्राण्यांना पळवून लावत . सतत जरा सेरोटोनिन रिलीझ होता राहिलं तर तुम्ही सर्वांकरता एक डोकेदुखी होऊन बसाल.
_____________________
१० ऑक्टोबर - विश्व मानसिक स्वास्थ्य दिन झाला. (वर्ल्ड मेंटल हेल्थ डे)
मध्यंतरी, वाचनात आले की मेंदूच्या ज्या भागाला पीडनेची, वेदनेची जाणीव होते, जो भाग वेदना आयडेंटीफाय करतो तोच भाग मत्सर नामक इन्टेन्स भावनेचे नियंत्रण करतो. त्याहीपुढे काही मानसोपचारतज्ञांकडून ही माहीती मिळाली की काही विशिष्ट मेंटल डिसॉर्डर्स (मानसिक व्याधी) मध्ये मत्सर अधिक अधोरेखीत होतो किंबहुना मत्सर हा एक सिम्प्टम असतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐसीवरील लेख आणि प्रतिसाद खूप माहितीपूर्ण आहेत. तिकडे हा लेख वाचून मला नवीन, वैज्ञानिक कारणं समजली. खूप धन्यवाद.

चांगला लेख आहे.
कल्याणी पगडीच्या पुस्तकातून ह्या आजाराची ओळख झाली होती.त्या, स्वतः या रोगातून जात आहेत.

आभार!! या लेखातून कोणाला मदत झाली तर बरे वाटेल खरे तर. पूर्वी एका ठिकाणी असा लेख टाकला असता ४-५ लोकांनी आवर्जून स्वतःचे अनुभव शेअर केलेल होते. त्यांना मदत झालेली होती जे ऐकून खूप बरे वाटलेले होते.

उत्तम लेख, आणि स्वतः पेशंट असून अभ्यासपूर्ण लेख लिहिला याचे कौतुक वाटत आहे, इतर पेशन्ट्स साठी हे प्रेरणादायी ठरेल.

१० ऑक्टोबर - विश्व मानसिक स्वास्थ्य दिन झाला. (वर्ल्ड मेंटल हेल्थ डे)
_________________________________________________
अन्य मुलींप्रमाणेच, साधारण पौगंडावस्थेत ज्या सुमारास मला प्रथम भिन्नलिंगीय सुप्त आकर्षणाची जाणीव झाली, त्याच अगदी त्याच सुमारास, मत्सर नामक अधिक क्लिष्ट अन सर्वव्यापी भावनेची देखील ओळख झाली. किंबहुना इतक्या हातात हात घालून या दोन्ही भावना जीवनात आल्या की दोन्ही गोष्टींचे मेंदूतील केंद्र एकच असावे की काय असे पश्चात, वाटून गेले. एखादा गोंडस मुलगा काय किंवा गणिताचे बुद्धीमान, शिक्षक काय जेव्हा महाविद्यालयीन आयुष्यात आवडले, तेव्हा तेव्हा त्यांच्याभोवती रुंजी घालणार्‍या, त्यांच्याशी मैत्री असलेल्या, माझ्या मते त्यांच्यावर प्रभाव टाकणार्‍या कोणा ना कोणा मुलीबद्दल तीव्र मत्सर निर्माण झालाच झाला. अन हिरव्या डोळ्याच्या राक्षसाने तो काळ मला अत्यंत पीडले असे आठवते. दर वेळेला कोणी आवडले, कोणा मुलाचे आकर्षण वाटले, की कोणीतरी मुलगी अतिशय नावडायची. तीन्ही त्रिकाळ तिच्याविषयी विचार येत. असूया, मत्सर, हेवा वाटे, राग राग येई.कोणी मुली इतक्या सुंदर, भाग्यवान कशा असू शकतात न आपणच काय घोडं मारलय आदि भावना डोकावत. एकंदर स्वतःचे स्वतःला मिझरेबल करुन घेण्याची कोणतीही संधी मी दवडत नसे.

पुढे वाचनात आले की मेंदूच्या ज्या भागाला पीडनेची, वेदनेची जाणीव होते, जो भाग वेदना आयडेंटीफाय करतो तोच भाग मत्सर नामक इन्टेन्स भावनेचे नियंत्रण करतो. त्याहीपुढे काही मानसोपचारतज्ञांकडून ही माहीती मिळाली की काही विशिष्ट मेंटल डिसॉर्डर्स (मानसिक व्याधी) मध्ये मत्सर अधिक अधोरेखीत होतो किंबहुना मत्सर हा एक सिम्प्टम असतो.

माझ्या मते, "हेवा" (एन्व्ही) या भावनेचा उत्क्रांतीमध्ये काही सकारात्मक सहभाग असूही शकतो. की मनुष्य अधिक प्रेयस प्राप्त करण्यास प्रयत्नशील व उद्युक्त होत असेल कदाचित, परंतु असूया/मत्सर या भावनेचा सकारात्मकतेशी सुतराम संबंध नसावा.

नंतर नंतर जसेजसे आत्मभान येत गेले तसेतसे अतिशय नकारात्मक छटा असलेल्या या वेदनामय भावनेच्या कचाट्यातून, पंज्यातून पूर्ण सुटका झाली. एक वेगळाच दृष्टीकोन मिळत गेला. कालांतराने "जोलीन" नावाचे "डॉली पॅट्रनचे" नितांत सुंदर गाणे ऐकण्यात आले. एका रुपगर्वितेला, एका सामान्य विवाहीतेने केलेली व्याकुळ विनवणी शब्दांकीत करणारे हे गाणे.मला इतके आवडले कारण यात आहे ना मत्सर ना हेवा फक्त एक रोखठोक विनंती की माझ्या नवर्‍यावर गारुड घालू नकोस. तुला असे छपन्न मिळतील मी मात्र जर तो मिळाला नाही तर प्रेमाशिवायच राहीन. तू सुंदर आहेस तुला हवा तो पुरुष मिळेल, पण तेवढा माझा नवरा सोड. त्याच्या मागे लागू नकोस.
https://www.youtube.com/watch?v=IW25foOMkwI

सामो, हा लेख अत्यंत मुद्देसूद झाला आहे. मी शोधून वाचला कारण माहितीतल्या एका कुटुंबाला त्याची गरज लागणार आहे. त्यातल्या सपोर्ट देणार्ञा व्यक्तीला हा वाचता येणार नाही म्हणून त्या व्यक्तीचा प्रश्न इथे विचारते. जमत असेल तर उत्तर दे. नाही देऊ शकलीस तरी ठीक आहे. ते वैद्यकीय उपचारही घेतात.

so the question from there is how can their family support in terms of offering help to help the patient? In general, what can they do? Also, how can they know if there is going to be high or low?

Many thanks.

वेका,
सामो उत्तर देतीलच पण या आजारात एक दीर्घकालीन केअर गिव्हर म्हणून माझा अनुभव. पेशंटच्या वावराची डायरी ठेवायची. प्रत्येक पेशंटचा त्या त्या फेजचा स्वतःचा असा विशिष्ठ वावर असतो. नोंद करत गेले की त्या व्यक्तीच्या हाय लो चा पॅटर्न लक्षात यायला लागतो तसेच फेजची सुरवातही लक्षात येवू लागते. त्यानुसार औषधाचे डोस अ‍ॅडजस्ट करायला मदत करता येते. फेजनुसार कुटुंबियांना केअरगिव्हर म्हणून स्वतःच्या वावरातही थोडाफार बदल करावा लागतो. डायरी ठेवली की काय वर्कआउट होते, काय नाही हे देखील उमगायला मदत होते.
माझ्याकडून शुभेच्छा!

हाय वेका, स्वाती यांनी छान सांगीतले आहे. मी माझ्या अनुभवातून सांगण्याचा प्रयत्न करते. -
(१) कुटुंबियांचा आधार हा इतका महत्वाचा आहे की मी तो शब्दांत व्यक्त करु शकणार नाही.
(२) या आजाराबद्दल जितकी ऑथेंटिक माहीती मिळेल तितकी कुटुंबियांनी वाचली तर या आजाराबद्दल अवेअर नेस खूप वाढतो. त्याने या आजाराचा सामना करणे सोपे जाते.
(३) पेशंट जर म्हणाला/ली की मला औषधे घ्यायची नाहीत, मी बरीच आहे, आता बासच झाली. तर तिला समजाउन सांगा, आकाशपाताळ एक करा पण वैद्यकिय मदत घ्याच. ते फार महत्वाचे आहे.
(३) हेल्दी लाइफस्टाइल मेंटेन करायला मदत करा, प्रोत्साहन द्ता. खाणेपीणे, व्यायामावर मूड प्रचंड अवलंबून असतो. तेव्हा त्या व्यक्ती चे रुटीन सेट करण्यास मदत करा. उदा - व्यायामाची वेळ, खाण्याची वेळ, औषधे घेण्याची वेळ व झोपण्याची वेळ एक सेट टाइम ठेवा. तसे परोपरीने सुचवा.
(४)त्या व्यक्तीला मूड चेंजेस कळणार नाहीत पण तुम्हाला कळतील. Keep a hawk eye. पेशंटची कॉफी जास्त झाली, हायपोमॅनियाकडे झुकू लागेल, कमी पडली डिप्रेशनकडे झुकू लागेल. व्यायाम जास्त झाला, अति उल्हसित व प्रो रिस्कटेकींग वाटू लागले, स्ट्रेस्मुळे मूड चेंजेस ट्रिगर होतील. पण तुम्ही पेशंटच्या ते लक्षात आणुन द्या. पेशंट चिडेल, डिनायल मोडमध्ये जाइल, पण संयम राखा, प्रेमाने, धीराने समजवा की पेशंटचे भलेच तुम्हाला हवे आहे.
(५) खरं तर जितका कस पेशंटचा लागणार आहे तितकाच तुमचाही लागणार आहे. तेव्हा मानसिक तयारी ठेवा. स्वतःची पूर्ण काळजी घ्या तुम्ही निरोगी, खणखणीत राहीलात तर त्याचा फायदा तुम्हाला व पेशंटलाही होणार आहे. तेव्हा स्वतःची काळजी घ्याच.
(६) ही डिसॉर्डर डायग्नोस व मॅनेज होण्याआधी पेशंटच्या हातून हिमालयाइतक्या चूका झालेल्या असतील, नक्कीच असतील. पेशंटने तुम्हाला दुखावलेले असेल. पण ते विसरुन जा कारण त्या नकळत घडलेल्या, अपरिहार्य चूका आहेत. तो पेशंटचा दोष खरच नाही. तेव्हा मुख्य म्हणजे क्षमा करा.
(७) त्याच्या एपिसोडसमध्ये चूका झाल्या तरी तुमचा तोल जाउ देउ नका.
(८) सकारात्मक रहा. एकदा ' खुल जा सिमसिम' कळ सापडली की ही डिसॉर्डर मॅनेज करणं सोपं आहे. रुटीन जबरदस्त सांभाळावं लागेल. झोपेची वेळ, औषधाची वेळ, व्यायामाची वेळ.
(९) परत सांगेन - या आजाराबद्दल, खूप वाचा, ऑथेंटिक माहीती वाचा त्यातून तुम्हालाच कळेल कसा सामना करायचा ते.

आपल्या मित्राला, बरे वाटू देत. आपल्याला हवा असल्यास, त्यांना देण्याकरता, माझा ईमेल आय डी देइन.
जर औषधांची ट्रायल-एरर चालली असेल तर ती व्यक्ती आत्ता भयंकर यातनांमधुन जात असल्याची शक्यता आहे. दर औषधागणिक, अप्स डाउन्स बाप रे यातनामयफार कठीण काळ असेल पण धीर धरा. लवकरच सुयोग्य कॉकटेल सापडेल.
_____________________
अतिशय उल्हसित वाटणे, ऑन टॉप ऑफ वर्ल्ड वाटणे, रिस्की बिहेव्हियर वाढणे, भरभर बोलणे, अटेन्शन स्पॅन कमी होणे - ही हायपोमॅनियाची लक्षणे आहेत.
उगाच रडू येणे,कशात रस न वाटणे, चिडचिड होणे - डिप्रेशनची लक्षणे आहेत.
अनाठाई चिंता चिंता वाटू लागणे, भीती वाटू लागणे - अ‍ॅग्झायटी ची लक्षणे आहेत.

स्वाती आणि सामो प्रतिसादाबद्दल आभार. सपोर्ट रिलेटेड मुद्दे शेयर करीन. मी आणखी एका सोर्सशी संपर्क करतेय त्यात वेगळी माहिती मिळाली तर तीही इकडे टाकेन कदाचित आणखी कुणाला उपयोगी ठरेल.

सामो किती सुरेख प्रतिसाद दिलात . कौतुक वाटते तुमचे . तुमच्या लिखाणाची रेंज आणि प्रतिक्रिया प्रशंसनीय असतात .

मी ज्यासाठी मदत मागितली होती ते इथे आहे. कदाचीत आणखी कुणाला उपयोगी पडेल.

हा सपोर्ट ग्रूप कोविडच्या काळात ऑनलाइन आहे म्हणजे तुम्ही कुठे राहता त्याने फरक पडायला नको. अर्थात मी वापरणार नाही त्यामुळे मला लि़ंकखेरीज काही माहित नाही. माझ्याकडे एक डॉक्युमेंट अटॅच्मेंट आहे पण काय ते हेप्पा लॉ मध्ये वगैरे अशा गोष्टी फोरम्स वर शेयर कराव्यात का काहीच कल्पना नाही. आणि शेयर करून भानगडी झाल्या तर कशात काही नाही आणि लफडी मागे लागणार त्यामुळे मोटिव्हेशन नाही. कुणाला हवं असल्यास संपर्क करू शकतात. जनर्ली सामोने तिच माहिती लिहिली आहे आणि माझ्याकडे ते इंग्रजीत एक डॉक मध्ये आहे इतकंच. पेशंट साठि जास्त बरं. सपोर्ट साठि नाही.
सपोर्ट ची लिंक

https://namior.org/programs/family-support-group/

लोकसत्तेमधे अपर्णा पिरामल राजे यांचं त्यांच्या २० वर्षांच्या ‘बायपोलर’च्या सहवासातील अनुभव सांगणारं पुस्तक ‘केमिकल खिचडी- हाऊ आय हॅक माय मेंटल हेल्थ’ नुकतंच प्रकाशित झालं. या मानसिक आजाराला त्यांनी कसं ‘हॅक’ केलं हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आरती कदम यांनी केलेली बातचीत. या लेखात आहे.
https://www.loksatta.com/chaturang/association-with-bipolar-bipolar-diso...

धन्यवाद प्रघा, हा लेख १००% वाचेन.
----------------------
किती सकारात्मक लेख आहे. कौतुक आहे. सर्व मुद्दे तंतोतंत!!! तं-तो-तं-त!!! बहीणीने वागण्यातील लहानसहान बदल टिपणे ते नवर्‍याची अमूल्य साथ. होय आणि होय!! अस्सेच.
---------------
शिवाय इफ आय अ‍ॅम करेक्ट त्यांचे पती आमच्या ओळखीचे आहेत. आमच्या सोसायटीत रहात. मी अपर्णा पिरामल यांना कॉन्टॅक्ट करेन.

Pages