- मी वैद्यकियशास्त्राशी दुरान्वयानेही संबंधित नाही. ही माहीती अन्यत्र गोळा करुन येथे दिलेली आहे. तेव्हा जर काही शंका असतील तर त्यांवर आपल्या डॉक्टरांकडुनच सल्ला घावा.
.
बायपोलर डिसॉर्डरचे अजून एक नाव आहे ते म्हणजे मॅनिक-डिप्रेसिव्ह इलनेस. अवसाद किंवा ज्याला नैराश्य म्हणतात त्या आणि उन्माद या २ टोकांच्या मध्ये हेलकावे खाणारा मूड. या डिसॉर्डरची अगदी सर्वसामान्य लक्षणे व माहिती पाहू यात.
(१) बायपोलर डिसऑर्डर म्हणजे उन्मादाचे शिखर आणि अवसादाची खोल गर्ता यामध्ये हेलकावे खाणारा मूड हाच मुख्य आजार.
(२) अवसाद व उन्मादाच्या आलटून पालटून येणाऱ्या कालखंडांमध्ये काही काळ मूड सामान्य/नॉर्मलही राहातो.
(३) ही डिसऑर्डर टीनएज किंवा विशीच्या सुरवातीच्या काळात उचल खाते, लक्षात येते.
(४) हा आजार बारा होता नाही पण अतिशय कुशलतेने व परिणामकारक रीत्या मॅनेज करता येतो किंबहुना सर्वाधिक कमी क्लिष्ट आणि मॅनेज करण्यास सोपी अशी ही व्याधी आहे.
(५) अनेकदा बायपोलर असणाऱ्या रुग्ण स्त्रियांचे चुकीचे निदान "डिप्रेशन" असे होते तर रुग्ण पुरुषांमध्ये तसेच चुकीचे निदान "स्किझोफ्रेनिया" असे होते.
(६) अजून एक चुकीचा रूढ प्रकार म्हणजे बॉर्डरलाईन व्यक्तिमत्वांमना बायपोलर व्याधीचे रुग्ण मानले जाणे. अनेकजण बॉर्डरलाईन असू शकतात. याचा अर्थ ते बायपोलर रुग्ण आहेत असा नसतो.
(७) दुर्लक्षित किंवा निदान झालेली बायपोलर व्याधी ही घातक असते. यामध्ये अवसाद काळात रुग्ण आत्महत्या करू शकतो. उन्मादाच्या काळात स्वतः:ला आर्थिक, भावनिक, शारीरिक नुकसान पोचवू शकतो उदा. - जुगारात, खरेदीत पैसे उधळून टाकणे, लैंगिक वर्तनाबाबत अविचार, वैवाहिक आयुष्यात निष्ठेला, विश्वासाला तडा जाईल अशी वागणूक आदि घटना घडू शकतात.
(८) ही व्याधी वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार तज्ञानकडूनच निदान व मॅनेज केली जाऊ शकते.
(९) अवसादाची, नैराश्याची लक्षणे : चिडचिडेपणा, सतत रडू येणे, कारणाशिवाय रडू येणे, ऊर्जेची इतकी कमतरता जाणवणे की दैनंदिन व्यवहारात अडथळा येणे, वाईट स्वप्ने, स्वप्नात रडु येणे.
(१०) या उलट उन्मादाची लक्षणे म्हणजे - अतिशय ऊर्जा असणे, ३-४ तासांची झोपही पुरेशी होणे, चित्तवृत्ती उल्हसित असणे, हाय सेल्फाएसटीम, स्वतः:बद्दल ऊंच भ्रामक कल्पना असणे. बोलताना भराभरा बोलणे, एकामागोमाग एक झपाट्याने विचार व कल्पना सुचणे. व्यभिचार करण्यास, वैवाहिक विश्वासाला तडा जाऊन देण्यात, वाट्टेल तसा खर्च करण्यास मागेपुढे ना पाहणे. एकंदर रिस्की वागणे. अनेक प्रकल्प एकाच वेळी हाती घेणे, महत्त्वाकांक्षी व एकंदरच आऊटगोईंग वागणे.
(११) ही व्याधी जरी अनुवांशिक असली तरी ती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होईलच अशी खात्री देता येत नाही. अजून तरी अशी खात्रीशील लिंक मिळालेली नाही.
(१२) खूपदा व्यक्ती ही या व्याधीकरता प्रिडिस्पोज्ड असते, ससेप्टीबल असते आणि एखाद्या स्ट्रेस factor मुळे या व्याधीची सुरुवात होते.
(१३) या व्याधीचे वर्गीकरण ३ प्रकारात केलेले आहे. प्रत्येकामध्ये लंबकाचा अवसाद-उन्मादात हेलकावे खाण्याचा कालावधी व मुख्य वारंवारिता वेगवेगळी आहे.
(१४) या व्याधीची एक विचित्र विशेषता म्हणजे - assortative मॅटिंग अर्थात या व्यक्ती अन्य तशीच व्याधी असलेले मित्र-मैत्रिणींकडे आकृष्ट होतात.
(१५) एन्टायडिप्रेसंट, एंटायसायकॉटिक मेडस, मूड स्टॅबिलायझर्स असहा अनेक प्रकारच्या औषधांचे कॉकटेल रुग्णास घ्यावे लागते.
(१८) COMBINE MEDICATION AND TALK थेरपी हे दोन्ही एकत्र अतिशय परिणामकारक असतात.
(१९) Cognitive behavioral therapy (CBT), Psycho-education , Narrative therapy , Solution Focused थेरपी, Interpersonal and social rhythm therapy (IPSRT) , अशा नाना थेरपी आहेत. या सर्वच थेरपीनबद्दल मला माहीत नाही पैकी Psycho-education ही पद्धत माझ्याकरता अतिशय सूट झालेली आहे. म्हणजे या व्याधीबद्दल मिळेल तेवढे वाचून काढायचे व सेल्फ-अवेअरनेस वाढवत ठेवायचा.जवळजवळ १० वर्षे हे सातत्याने केल्याने मला स्वतः:च्या वर्तनातील किंचितही बदल लक्षात येतो - अरे आज कॉफी जास्त झाली म्हणून उन्मादक वाटतंय, आज झोप कमी झाली म्हणून उन्मादक वाटतंय, आज झोप जास्त झाली म्हणून निराश वाटतंय आदि स्वतः:चे स्वतः:लाच नीट कळू लागते.
(२०) Electroconvulsive therapy (ECT) म्हणजे Shock ट्रीटमेंट ही एक कुरूप पद्धत सुद्धा या व्याधीवरचा इलाज आहे व एके काळी होता पण आता ही पद्धत फार कमी प्रमाणात वापरली जाते. तिचे साईड इफेक्टसही कमी त्रासाचे झालेले आहेत. सहसा जरा औषधे अजिबातच लागू पडत नसतील तर अथवा औषधांचा गर्भावरती परिणाम होउ नये म्हणून तात्पुरता पर्याय म्हणून ही पद्धत वापरात आणली जाते.
(२१) जरा नीट मॅनेज झालेली नसेल तर प्रियजनांकरताही हे रुग्ण कसोटी असतात. अशावेळी घरातील लोकांनीही या व्याधीबद्दलचा स्वतः:चा अवेअरनेस वाढविणे महत्त्वाचे असते.
(२२) रुग्नाला मूड, झोप, व्यायाम, अन्न आदि माहितीची स्वतः:ची दैनंदिनी ठेवण्याने खूप फायदा होतो.
(२३) बायपोलर व्यक्ती जोडीदार असल्याचे फायदे व तोटे दोन्ही आहेत. तोटे अर्थात वरती आलेलेच आहेत पण एक प्रेमळ आणि captivating , creative जोडीदार मिळणे हा फायदाही असतो.
(२४) या व्याधीचा रुग्ण अवसाद व उन्माद या स्पेक्ट्रमवर कोठेही असू शकतो. यामध्ये विविधता आहे, प्रत्येकाच्या आजारात एकमेवता आहे.
(२५) अनेक गैरसमजांपैकी दोन बिनबुडाचे गैरसमज म्हणजे या व्यक्ती वेड्या असतात, किंवा नीट नोकरी करू शकत नाहीत हे. काही लोकांना नोकरी टिकविण्यास समस्याच येतही असतील पण ७५% व्यक्ती या जॉबमध्ये यशस्वी आढळतात.
(२६) अजून एक गैरसमज हा की - हा खरा आजाराचं नाही. तसे नव्हे. हा गंभीर आजाराचं आहे. यातून आत्महत्येपासून ते घातक परिणामांपर्यंत काहीही उद्भवू शकते.
(२७) अजून एक गैरसमज हा की या व्यक्ती गुन्हेगार, पिसाट असतात. प्रत्यक्षात तसे नसून उलट रुग्ण हे अशा गुन्ह्याच्या, क्रूरतेच्या व्हिक्टीम असण्याचीच संभावना जास्त असते.
(२८) बायपोलर व्याधी आणि लठ्ठपणा यांचा घनिष्ठ संबंध आहे. ६८% बायपोलर रुग्ण हे लठ्ठ असण्याची शक्यता असते.
(२९) March 12, 2002 या दिवशी अमेरिकन न्यायाधीश हेन्री केनेडी यांनी निकाल दिला की हा खराखुरा आजार आहे ज्याचे मेंदू स्कॅनिंग ने निदान होउ शकते, जो सिद्ध होऊ शकतो, मेंदूतील रासायनिक बदल जे मोजले जाऊ शकतात.
(३०) या रुगणांनी घ्यावयाच्या काही काळजाला म्हणजे - ड्रग्ज, मादक द्रव्ये यांपासून दुर राहणे, झोपेचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे, नियमित व्यायाम करणे, दैनंदिनी लिहिणे, स्वतः:च्या आजाराबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवणे.
(३१) 'जेलसि' हा अनेक सिम्पटम्स पैकी एक सिम्प्टम्.
(३२) व्हॅन गॉग चा जन्मदिन - ३० March हा जागतिक बायपोलर दिन मानला जातो.
__________________________

Ruth C. White यांचे "Preventing Bipolar Relapse" हे पुस्तक वाचून झालेले आहे. परत पारायण करणार आहे. बायपोलर बद्दल अनेक पुस्तके आहेत ज्यामध्ये "वैयक्तिक अनुभव" = OPersonal Account मांडलेले आहेत पण वरती उल्लेख केलेल्या पुस्तकात स्वतःच्या आजाराविषयी लेखिकेने अत्यंत मोघम उल्लेख केलेला आहे रोग्याच्या वागणूकीत काय बदल स्वागतार्ह आहे यावर कटाक्षाने भर दिलेला आहे. SNAP अॅप्रोच बद्दल वाचलेले होते. या पुस्तकातही तोच अॅप्रोच सांगीतलेला आहे.
SNAP = Sleep, Nutrition, Activity and People
Sleep - आजार बरा होण्याच्या प्रोसेस मधील अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. पुरेशी झोप झाली नाही तर अन्य लोकांना जितका मूड-स्विंग्सचा त्रास होतो त्यापेक्षा अनेक पटींनी बायपोलरच्या रुग्णास होतो. शिवाय बरे होण्याच्या आधी स्लीप डिसॉर्डर्स व बायपोलर हे हातात हात घालूनच नांदताना दिसतात. शरीरातील circadian सिस्टीम (घड्याळ), निद्रा कंट्रोल करते. ही सिस्टिम बायपोलरच्या रुग्णांमध्ये फॉल्टी असते. प्रकाश-अंधार यांच्या तालावरती हे घड्याळ चालते. तेव्हा वेळेवर (नो मॅटर व्हॉट) झोपणे व ऊठणेसुद्धा हे या रुग्णांकरता अत्यावश्यक असते.
Nutrition - सकस व योग्य आहार हा शरीराइतकाच मेंदूकरता आवश्यक आहे. भरपूर प्रतिकारशक्ती, अन्नातील सुयोग्य घटकांनीच वाढू शकते. तेव्हा Recommended आहार हा बायपोलरच्या रुग्णांकरता आवश्यक असतो.
Activity - ठरावीक वेळी व्यायाम हा प्रचंड महत्वाचा घटक म्हणता येइल. चालण्याच्या व्यायामात प्रत्येक टाकलेले पाऊल हे रुग्णास अधिक चांगल्या दर्जाचे आयुष्य देण्यास उपकारक ठरते.
People - रुग्णाला सपोर्ट देणार्या सकारात्मक लोकांची अतिशय गरज असते. शिवाय मूड्स्विंग्स चा जोवर अवेअरनेस रुग्णास येत नाही तोवर कोणीतरी मॉनिटर करुन दिशा देणारे असेल तर अत्युत्तमच.
रुग्णाने - झोप, आहार्,व्यायाम व तदनुषंगीक दुसर्या दिवशीचा मूड याचे जर्नल ठेवले तर खूप उपयोगाचे पडू शकते नव्हे ठेवलच पाहीजे.
अर्थात हे सर्व घटक पूरक झाले मुख्य लाइन ऑफ ट्रीटमेन्ट औषधोपचार ही असते. रुग्णास औषधांचे कॉकटेलच घ्यावे लागते - मूड स्टॅबिलायझर + स्लीप मेडिकेशन + अँटी-कन्व्हल्सन्ट्स + अँटी सायकॉटीक. अन या आजारातील सर्वात अवघड भाग असतो असे कॉकटेल सापडणे व लागू पडणे. तोपर्यंत ट्रायल-एरर ने रुग्ण जेरीस येतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा औषधे नियमित घेणे , कधीही बंद न करणे. कारण बरेचदा "मॅनिया/उन्माद" ही इतकी सुखावह अवस्था असते - Enthusiasm + high libido + energy + confidence अक्षरक्षः जगाच्या माथ्यावर पाय रोवून उभे राहील्यासारखे वाटते अन मग ही अवस्था हरवू नये या लोभाने काही रुग्ण औषधे बंद करतात. जे की घातक असते कारण Wherever there is high, there is low (= abysmal depression)
ही डिसॉर्डर बरी होत नाही पण अत्यंत कुशलतेने १००% मॅनेज केली जाऊ शकते.
________________
.
आपल्या हर्ष/आनंद आदी भावनांना कारणीभूत अशी ४ रसायने आहेत : एंडोर्फिन्स , डोपेमाईन ,ओक्सिटोसिन आणि सेरोटोनिन.प्रत्येकाचे ठरलेले कार्यक्षेत्र आहे.
एंडोर्फिन्स मुळे वेदना जाणवत नाहीत. जरा तुमच्यावरती एखाद्या प्राणघातक पशूने हल्ला केला तारा एंडोर्फिन्स तयार होतात ज्यायोगे जोवर तुम्ही सुरक्षित स्थळी पोचत नाहीत, तोवर तुम्हाला वेदना जाणवत नाहीत. उदा - मला संधिवात आहे, मी २२ व्या मजल्यावर राहाते. आग लागते. आणि मी धावत धावत २२ माजले उतरते, अशावेळी मला गुडघ्यात वेदना जाणवत नाहीत याचे कारण असते रिलीझ झालेले एंडोर्फिन्स. मग कोणी म्हणेल कि एंडोर्फिन्स सतत रिलीझ होता राहिले तर उत्तमच कि तर तसे नाही. कारण त्यामुळे काय होईल, तुम्हाला कधी वेदनाच जाणवणार नाहीत. वेदनांमुळे आपण धोक्यांपासून बचावात्मक उपाय शोधतो. आपले अस्तित्वात टिकवण्यामध्ये (survival ) वेदनांचा सहभाग असतो. एंडोर्फिन्स हे आत्यंतिक सुखद भावना अथवा भीतीही निर्माण करण्यास कारणीभूत असतात. जणू काही आपल्या मानवी गरजा लक्षात घेऊन, धोके टाळण्याकरता नियुक्त केलेला देखरेख्या म्हणजे एंडोर्फिन्स. तेव्हा एंडोर्फिन्स हे सतत निर्माण होता नाहीत हे उत्तमच आहे.
आता डोपेमाईन पाहू यात. डोपेमाईन केव्हा रिलीझ होतात तर तुम्हाला एखादे बक्षीस, काहीतरी आवडणारे मिळण्याच्या तुम्ही अगदी जवळ येऊन पोहोचला आहात. तुम्ही समजा रसाळ फळ तोडण्याच्या मिषाने, एखाद्या झाडावरती चढता आहात तर हे जे शेवटच्या २-४ फांद्या तुम्ही सहजगतेने ओलांडून जाता ते डोपेमाईनच्या जोरावर. जर तुमचे डोपेमाईन सदासर्व काळ निर्माण होतच राहिले असते तर तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये मग ती किती का किरकोळ असेना, तुम्ही आपली ऊर्जा तीमध्ये ओतत राहिला असता आणि महत्वाच्या गोष्टींकरता तुमची ऊर्जा वाचलीच नसती. तेव्हा डोपेमाईन सतत निर्माण होत नाही हे बरेच आहे. डोपेमाईन हे मुख्यतः एकाग्रता, फोकस यावरती काम करते म्हणजे आपल्याला काही साध्य करायचे आहे त्याकरता जी एकाग्रता लागते त्याचे कारकत्व आहे डोपेमाईन कडे. गाजराचे आमिष म्हणजे डोपेमाईन चे कर्तृत्व. सतत गाजर दिसत राहिले तर बैल/घोडा कसे पळत राहातील तसे हे रसायन आपली ऊर्जा एकाग्र करते. कोणतीही गोष्ट प्राप्त होणे या पेक्षा त्या गोष्टीच्या प्राप्तीचा ध्यास, तळमळ, ऍंटीसिपॅशन म्हणजे डोपेमाईनचे कारकत्व.
.
.
ऑक्सिटोसिन हे विश्वास निर्माण करणारे रसायन आहे. ते जरा सातत्याने निर्माण होता राहिले असते तर तुम्ही वाट्टेल त्या परक्या लोकांवर, वाईट झाला वृत्तीच्या लोकांवरही विश्वास टाकला असतात. मसाज, ऑर्गेझम, प्रसूती या काही ऑक्सिटोसिन, निर्माण करणाऱ्या क्रिया आहेत. जेव्हा गाय वासराला चाटते, किंवा आई मुलास जवळ हृदयाशी धरते, तेव्हा ऑक्सिटोसिन निर्माण होते. मानव आई जेव्हा मुलं अन्य कोणाकडे सोपवते किंवा प्राण्यांतही जेव्हा पिल्लू कळपात सोडले जाते तेव्हा जे सामाजिक बंध निर्माण होतात, त्यातही ऑक्सिटोसिन निर्मिती होत असते. वर सांगितल्याप्रमाणे, ऑक्सिटोसिन सतत निर्माण होणे हे survival च्या दृष्ट्या अनुकूल नाहीच.
सेरोटोनिन हे रसायन जेव्हा तुम्ही अधिकार गाजवता तेव्हा रिलीझ होते. मेंदूपेक्षा, माणसांच्या पोटात सेरोटोनिन अधिक असते, कारण आपले पूर्वज हे तेव्हा शांतपणे खाऊ शकायचे, पोटभर खाऊ शकायचे जेव्हा त्यांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल हमी असायची, विश्वास असायचा. ही हमी केव्हा वाटते जेव्हा तुम्ही अधिक बलवान असता, जसे बलवान पूर्वज अन्न चोरण्यास येणाऱ्या अन्य प्राण्यांना पळवून लावत . सतत जरा सेरोटोनिन रिलीझ होता राहिलं तर तुम्ही सर्वांकरता एक डोकेदुखी होऊन बसाल.
_____________________
१० ऑक्टोबर - विश्व मानसिक स्वास्थ्य दिन झाला. (वर्ल्ड मेंटल हेल्थ डे)
मध्यंतरी, वाचनात आले की मेंदूच्या ज्या भागाला पीडनेची, वेदनेची जाणीव होते, जो भाग वेदना आयडेंटीफाय करतो तोच भाग मत्सर नामक इन्टेन्स भावनेचे नियंत्रण करतो. त्याहीपुढे काही मानसोपचारतज्ञांकडून ही माहीती मिळाली की काही विशिष्ट मेंटल डिसॉर्डर्स (मानसिक व्याधी) मध्ये मत्सर अधिक अधोरेखीत होतो किंबहुना मत्सर हा एक सिम्प्टम असतो.
सामो, अशा पद्धातीच्या
सामो, अशा पद्धातीच्या लेखांमुळे एका पातळीवर समाजप्रबोधन होत असते. स्टिग्मामुळे जे लोक बोलायला कचरत असत ते यामुळे बोलू लागतात. मुख्य म्हणजे जी बाजू पेशंटच्या नातेवाईंकांच्या लक्षात आलेली नसते ती लेखां मुळे लक्षात येते. जसे की तुमच्या लेखातील
प्रतिसादातील ९ मुद्दे.
उपयुक्तता आणि तंतोतंत
उपयुक्तता आणि तंतोतंत सादरीकरण हे या लेखाचे वैशिष्ट्य आहे. खूप छान.
मानसी धन्यवाद. कोणाला उपयोग
मानसी धन्यवाद. कोणाला उपयोग झाला तर बरे होइल.
सामो
सामो
एबीपी माझा या चॅनेल वर "मन सुद्ध तुझ" या सिरियल मधे हा बायपोलर वरील भाग पहा
https://youtu.be/la2pXI9ugps?si=sOLkuLLyJ4Rk_Slc
नक्की पहाते प्रघा.
नक्की पहाते प्रघा.
नक्की होईल! मनात सदिच्छा घेऊन
नक्की होईल! मनात सदिच्छा घेऊन केलेलं काम कधीच वाया जात नाही.
>>>>सामो एबीपी माझा या चॅनेल
>>>>सामो एबीपी माझा या चॅनेल वर "मन सुद्ध तुझ" या सिरियल मधे हा बायपोलर वरील भाग पहा
किती सुंदर भाग आहे. माझ्यातरी घशात आवंढा आला. सुनील बर्वे, स्वजो, आणि समिधा गुरु - काय मस्त काम केलय तीघांनीही.
ए काम (शांत) ब्रेन - गायत्री
ए काम (शांत) ब्रेन - गायत्री देवी
फार मस्त पुस्तक आहे. हाऊ टु अनलर्न डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न्स. आपला मेंदू शांत असेल तर शरीर आपोआप शांत होते बरोबर? अं हं जर शरीर शांत केले तर मेंदू शांत होतो. थोडे बसा, लोळा, पक्षी बघा, झाडे-पाने-फुले पहा. गाणी ऐका, 'जस्ट हम' (सूदिंग गुणगुणा)....... आपल्या भारतियांकडे तर इतकी शांतवणारी, बहारदार गाणी आहेत. गुणगुणा ना. आपोआप मेंदू स्थिर होइल, शांत होइल.
.
सिम्पॅथेटिक सिस्टिम आणि पॅरॅसिम्पॅथेटिक सिस्टिम. वेगस नर्व या बद्दल खूप माहीती मिळाली. पुस्तक फार आवडले. लेखिका हुषार, अनुभवी, बुद्धीमान, न्युरॉलॉजिस्ट आहेत. अजुन काय हवे. क्वालिटी टाइम मिळाला. फार मस्त वाटले.
खूप माहितीपुर्ण धागा आहे सामो
खूप माहितीपुर्ण धागा आहे सामो. अभिनंदन नाजूक विषयावर इतकं डीटेल & संयत लिहिलेस
जवळच्यांमधे एकाची पत्नी हा त्रास भोगत आहे, पण पती ने विभक्त होणे पसंत केले. त्याची स्वतःची मानसिक स्थिती ह्या प्रकरणात फार चिघळली. त्यामुळे फक्त पेशंट च नाही तर त्याच्या सोबत राहणार्याची पण कसोटी लागते. सर्व काही अबाऊट पेशंट होऊन बसते. हा मुद्दा पण विचारात घेण्या जोगा वाटला.
पण पती ने विभक्त होणे पसंत
...
छान, उपयुक्त माहिती. धन्यवाद.
छान, उपयुक्त माहिती. धन्यवाद.
आशू, कांदळकर आभारी आहे.
आशू, कांदळकर आभारी आहे.
Pages