ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - ३

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:50

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: मराठी साहित्यिक
यामध्ये मंडळ एखाद्या साहित्यिकासंदर्भात एखादा क्ल्यू देईल जसे की त्या साहित्यिकाच्या लेखनशैलीचा एखादा नमुना, त्या साहित्यिकाच्या पुस्तकांची नावे, त्या साहित्यिकासंदर्भात काही प्रसिद्ध किस्से/गोष्टी किंवा त्या साहित्यिकाचा छोटासा परिचय. त्यावरुन आपल्याला त्या साहित्यिकाचे नाव ओळखायचे आहे
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल आणि हा खेळ पुढे चालू राहील.
या खेळामध्ये फक्त मराठी साहित्यिकांचा समावेश असावा.
क्ल्यू देताना कुठलीही उघड माहिती न देता पण पुरेश्या हिंट देवू शकलात तर हा खेळ खुप रंगतदार होईल.

उदाहरणार्थ:
एकदा 'उदाहरणार्थ' एक मित्र आला, त्याने भांडून 'वगैरे' मला गावबाहेर नेले. पूर्वी मी त्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याचा धाक धाकवून त्याने मला कायम 'मुर्दाबाद' केले
उत्तर: नेमाडे

किंवा
शिक्षणाने इंजिनीयर, व्यवसायाने कॉपीरायटर आणि तरुणाईचा लाडका कवी
उत्तर: संदीप खरे

किंवा
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
उत्तर: पु. ल. देशपांडे

आवडला का हा खेळ?
करायची का सुरुवात?

तुमच्यासाठी पहीला क्ल्यू आहे:

"सवतंत्र सामाजिक नाटाक: "पायाचा दगड"
पार्टी गावतलीच
म्यानेजर: गुलाब हेरवाडे
आणि दिगदर्शक: अन्याबा परीट "

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नाटककार, ह्यांनी वेगवेगळ्या साहित्यिकांशी मारलेल्या गप्पांचे एक पुस्तक प्रसिद्ध आहे.

या लेखकाची एक कादंबरी आहे जिच्या शीर्षकात आपल्या स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनाचा उल्लेख आहे.
( दोन्ही दिन हे लक्षात घ्या)

नाही,
भारताचे दिन .

ही कादंबरी म्हणजे महाराष्ट्राचे एक भेदक व्यंगचित्रण. आहे. ती भविष्यातील राजकीय, कला आणि सांस्कृतिक जगावर जळजळीत भाष्य करते.

☺️
माहिती वाढवतो.
त्यांनी ३ कादंबऱ्या लिहिल्या. त्या प्रत्येकी १० वर्षांच्या अंतराने. त्यापैकी पहिल्या २ कादंबऱ्यांचा समावेश विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्येही केला आहे.

आता मिळालं.
इंटरेस्टिंग आहे.
बाकीच्या दोन काद़बऱ्यांची नावं ऐकली होती.
पुरुषोत्तम बोरकर.

बरोबर
( १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी)

या धाग्याच्या निमित्ताने अपरिचित पुस्तकांची नावं कळताहेत.
राजकारण पार्श्वभूमी असलेल्या काद़बऱ्यांची यादी करायला हवी.

हे कादंबरीकार, कवी व समीक्षक.

त्यांच्या मुलाखतीतील हा संवाद :

प्र. " समजा, पुढचा जन्म असेल, तर तेव्हा तुम्हाला काय व्हावेसे वाटेल?

लेखकाचे उत्तर :
"पुन्हा लेखकच व्हावे वाटेल पण माझा जन्म युरोपात व्हावा !"

ओळखा.

माहिती वाढवतो.
ते साहित्य अकादमी पुरस्कार विजेते.

नाही.
त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नव्हता; त्यांनी फक्त त्या प्रश्नाला उत्तर दिले होते.

Pages